क्रेडिट कार्ड कोणाला मिळू शकते? ।। क्रेडिट कार्ड घ्यावे कि नाही? ।। क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आपण क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे या विषयी माहिती घेणार आहे. तत्पूर्वी क्रेडिट कार्ड म्हणजे काय याची पण आपण माहिती घेऊ, बँकेमध्ये साधारणपणे दोन प्रकारचे कार्ड असतात, पहिला असत डेबिट कार्ड आणि दुसर क्रेडिट कार्ड यात मुख्य जो काही फरक आहे, डेबिट कार्ड आहे हे आपल्या सेविंग अकाउंट मध्ये लिंक असत.

आपल्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे ती रक्कम आपल्या डेबिट कार्डच्या माध्यमातून काढता येते. अगदी त्याच्या उलट क्रेडिट कार्ड कार्य करत . क्रेडिट कार्ड मध्ये बँकेकडून त्या ग्राहकाला एक विशिष्ट लिमिट दिलेलं असतं आणि त्या माध्यमातून तेवढी रक्कम ग्राहकाला वापरता येते.

त्यासाठी 30 दिवस 45 दिवस असे वेगवेगळे कालावधी दिलेले असतात. ज्या माध्यमातून त्याला इंटरेस्ट फी खरेदी किंवा कोणकोणते खर्च करता येतात. क्रेडिट कार्ड साठी अप्लाय कोण कोण करू शकत? क्रेडिट कार्ड ला अप्लाय करण्यासाठी साधारणपणे जे इलिजीबल होतात त्यांच्यामध्ये त्यांचा पगार बघितला जातो.

उत्पन्न चांगला आहे जे ITR भरतात आणि ज्यांचा सिबिल स्कोर चांगला आहे, अशा लोकांना साधारणपणे क्रेडिट कार्ड भेटते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भेटल्यानंतर त्याचे जे काही फायदे आहेत ते आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी क्रेडिट कार्ड ला अप्लाय कस करायचं असत?

ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण क्रेडिट कार्ड ला अप्लाय करू शकतो, आपण वेबसाईटला भेट करू शकतो आणि त्या माध्यमातून ऑनलाइन चौकशी करू शकतो किंवा आपल्या जवळच्या बँकेच्या शाखांमध्ये जाऊन चौकशी करून त्या पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो.

क्रेडिट कार्ड आपण कुठे कुठे वापरू शकतो? तर क्रेडिट कार्डचा वापर करत असताना आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी वापर करू शकतो. शॉपिंग साठी आपण वापर करू शकतो, ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तात्काळ मध्ये कॅश विड्रॉल करण्यासाठी पण आपण कार्ड चा वापर करू शकतो.

तर अशा तीन पद्धतीने आपण क्रेडिट कार्डचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या गरजा भागवू शकतो. तर हा वापर करत असताना क्रेडिट कार्ड चे फायदे काय आणि तोटे काय? क्रेडिट कार्ड चा पहिला फायदा आहे की आपण तात्काळ मध्ये कॅश विड्रॉल करू शकतो.

दुसरा फायदा आहे की आपण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करत असतो वेगवेगळ्या ऑनलाइन शॉपिंग साईट आता क्रेडिट कार्डसाठी आपल्याला कॅशबॅक पॉईंट देत असतात, रिवॉर्ड्स पॉईंट देत असतात, जे पॉईंट आपल्याला रेडीयम कडून आर्थिक फायदा होत असतो.

तिसरा जो महत्त्वाचा फायदा आहे की आपल्याला कॅश डिस्काउंट पण खूप मोठ्या प्रमाणात मिळतात उदा. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन या साइट च्या माध्यमातून आपण एखाद्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केली तर दहा टक्के पंधरा टक्केपर्यंत आपल्याला सूट देतात, तो आपल्या कॅश फायद्याचा आहे.

क्रेडिट कार्ड चा चौथा फायदा आहे यामध्ये आपल्याला क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वापरलेली रक्कम क्रेडिट कार्ड च्या कालावधीत म्हणजे 30 दिवस, 45 दिवस किंवा 50 दिवस असतो, तर इंटरेस्ट फ्री आपल्याला ती रक्कम वापरता येते, कदाचित एखाद्या व्यक्तीची लिमिट 1 लाख रुपये असेल तर त्याला 1 महिन्यासाठी 45 किंवा 50 दिवसांसाठी आपल्याला बिगर व्याजी ही रक्कम वापरता येते.

असे चार फायदे असले तरी याचे तोटे पण आहेत आणि क्रेडिट कार्ड वापरात असताना या तोट्याची माहिती असणे गरजेचं आह. पहिला तोटा, आपण जेव्हा कॅश विड्रॉल करत असतो त्यावेळी त्याला खूप मोठे चार्जेस लागतात 30% ते 36% चार्जेस कॅश विड्रॉल करण्यासाठी आहेत.

बऱ्याच ग्राहकांना या विषयी माहिती नसल्याने अनावश्यक विड्रॉल हे डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड ने केले जातात आणि त्याचा चार्जे त्या ग्राहकाला भोगावा लागतो. क्रेडिट कार्ड चा रिपेमेंट करत असताना ठरवलेल्या वेळे पेक्षा उशीर झाला तर पेनल्टी भरावी लागते.

त्यानंतर 3% वार्षिक 36% पेनल्टी आपल्याला भरावी लागते. क्रेडिट कार्ड चा तिसरा जो तोटा आहे, त्यामध्ये आपण क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून जी काही खरेदी करतो, त्यामधून आपली डिजिटल करन्सी एक्सचेंज होत असते. फिझिकल करन्सी नसल्यामुळे कदाचित आपल्या इमोशन्स ज्यावेळी आपण फिझिकल रीडर कॅश मोजून देतो आणि काही खरेदी करतो, त्यावेळी आपण जास्त खर्च करत नाही.

ज्यावेळी आपण डिजिटल कॅश च्या मध्यमातून खरेदी करतो क्रेडिट कार्ड वरून खर्च करतो तेव्हा आपला कंट्रोल राहत नाही आणि आपण अनावश्यक खरेदी करतो, त्यामुळे आपले अनावश्यक जास्त खर्च होतात, हा क्रेडिट कार्ड मधला मोठा तोटा आहे. क्रेडिट कार्डचा चौथा आणि सर्वात आणि सर्वात मोठा तोटा म्हणजे जर आपल्या क्रेडिट कार्ड हरवल आणि याचा इंटरनॅशनल काही वापर झाला तर त्यावेळेस आपण काही करू शकत नाही.

त्या वेळी आपण नॅशनल लेवल वर कार्ड वापर करत असतो. ओटीपी च्या माध्यमातून व्यवहार पूर्ण होत असतात त्यावेळेस हे कार्ड वापरताना इंटरनॅशनल वापरल जातात त्या वेळेस केवळ क्रेडिट कार्ड नंबर आणि कार्ड च्या पाठीमागे असलेला सीव्हीव्ही नंबर या दोन गोष्टींच्या माध्यमातून याचा वापर करू शकतो.

हा खूप मोठा तोटा क्रेडिट कार्ड मधला आहे. त्यामुळे आपल्याला क्रेडिट कार्ड वापरत असताना त्याचे फायदे आणि तोटे या दोन्ही बाबींची सविस्तर माहिती घेऊनच त्याचा केअरफुल्ली वापर करावा. क्रेडिट कार्ड आपल्यासाठी फायद्याचे होऊ शकते अन्यथा त्याचे तोटे जास्त होऊ शकतात.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.