क्रिकेटच्या ग्राउंड वर तीन ते चार एक्सट्रा पिच का असतात? व त्या कधी वापरले जातात? बॅट्समन च्या समोर साइड स्क्रीन का असते? टेस्ट क्रिकेट मध्ये सर्व खेळाडू त्यांच्या देशाचे कपडे न घालता पांढरे कपडे का घालतात? तसेच क्रिकेटर्स त्यांच्या मनगटावर कसला बँड घालतात? या विषयी महत्वाची माहिती या लेखातून !

क्रीडा लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा

आपण आज जाणून घेणार आहोत क्रिकेट खेळातील नवनाविन फॅक्टस विषयी. क्रिकेटच्या ग्राउंड वर तीन ते चार एक्सट्रा पिच का असतात? व ते कधी वापरले जातात. क्रिकेटर्स मॅच चालू असताना त्यांच्या तोंडाला कसली क्रीम लावतात? क्रिकेट मध्ये बॅट्समन च्या समोर साइड स्क्रीन का असते? टेस्ट क्रिकेट मध्ये सर्व खेळाडू त्यांच्या देशाचे कपडे न घालता पांढरे कपडे का घालतात? तसेच क्रिकेटर्स तेंच्या मनगटावर कसला बँड घालतात? हे सर्व का होते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

फॅक्ट नंबर 1-आपण पहिलंच असेल एका क्रिकेटच्या ग्राउंडवर तीन ते चार पिच असतात तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅच तर एकाच पिच वर होते मग ग्राउंड वर ते बाकीचे पिच कशाला असतात तर तुम्हाला वाटत असेल की मेन पिच खराब झाले तर उरलेला सामना खेळण्यासाठी बाकीचे पिच असतात तर ते साफ चुकीचे आहे.

कारण इंटरनॅशनल क्रिकेट नियमानुसार एक सामना एकाच पिच वर खेळवण्यात येतो तर बाकीचे पिच घरगुती क्रिकेट सामने खेळण्यासाठी असतात जसे की रणजीकरंडक दिलीप ट्राफि व इतर अनेक सामने बाकीच्या पिचवर खेळले जातात.ते मेन पिच इंटरनॅशनल सामन्यासाठीच राखीव ठेवली जाते. इंटरनॅशनल सामने असले की बाकीचे पिच क्रिकेटर्स ना सराव करण्यासाठी दिले जातात. जर तुम्हाला वाटत असेल तर हे सर्व सामने एकाच वर का होत नाही तर त्याचे उत्तर असे आहे की हे सर्व सामने एकाच पिच वर खेळले गेले तर त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते.

फॅक्ट न.2-तुम्ही जर बघितले असेल तर अनेक क्रिकेटर्स क्रिकेट सामने खेळताना तेंच्या त्यांच्या तोंडाला सफेद रंगाची क्रिम लावतात? तर ती क्रीम कसली असते. टेस्ट मॅचला तर जवळपास सर्वच क्रिकेटपटू ती क्रीम लावूनच ग्राउंड वर येतात. तरी ती क्रीम गोर होण्याची नसून ती सन स्क्रिम असते जास्ती प्लेयर तर झिंक ऑक्साईड ची क्रीम लावतात.

टेस्ट मॅच च्या सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंना उन्हातच गेम खेळावी लागते. जास्त वेळ सूर्यप्रकाश राहील्यामुळे त्यांची त्वचा जाळण्याचा व इरिटेशन होण्याचा ज्यास्त धोका संभवतो. मोठ्या मोठ्या सामन्यांमध्ये चेहऱ्यावर होणाऱ्या इरिटेशन ने वेगळे परिणाम करू शकते म्हणून सर्व खेळाडू हे सनस्क्रीन लाउनच ग्राउंड मध्ये उतरतात.त्यामुळे त्यांना 5ते 6 तास उन्हात राहिले तरी त्रास होत नाही.

फॅक्ट न.3-तुम्ही कधी न कधीतरी क्रिकेट ग्राउंड वरील साएडस्क्रीन बद्द्ल पहिलच असेल तर काय असते ही साएडस्क्रीन. तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा हे बॅट्समन बॉलर च्या मागे कोणीतरी आहे असे सांगून अंपायरला सांगून मागे सारताना दिसतात. काय असते ही “साइडस्क्रीन”. ही बॉलर च्या मागे व बॅट्समन च्या मागे पण असते.

या स्क्रीन चा उपयोग बॉलर ला आणि बॅट्मॅन ला बॉल वर फोकस करायला लावतो.पण साइडस्क्रीन समोर कोणी व्यक्ती आले किंवा काही हालचाली झाल्या तर बॅट्समन चे लक्ष विचलित होते.व ते या बाबत अंपायरला ला सांगतात. क्रिकेट ग्राउंड मध्ये खूप लोक असतात व त्यांच्या हालचालीमुळे खेळावर लक्ष केंद्रीत करणे कठीण होते.

त्यामुळे साइड स्क्रीन चा वापर केला जातो. साइडस्क्रीन 2 रंगाची असते एक सफेद रंगाची व एक काळ्या रंगाची असते. सफेद रंगाच्या साइडस्क्रीन चा उपयोग टेस्ट मॅच मध्ये केला जातो तर काळ्या रंगाच्या साइडस्क्रीन चा उपयोग वन डे सामने व 20/20 सामन्यांमध्ये केला जातो.

फॅक्ट न.4- तुम्ही पाहिलं असेल क्रिकेट मध्ये प्रत्येक देशाचा स्वतंत्र असा पोशाख आहे. प्रत्येक देशाचा कपड्याचा रंग वेगळा आहे त्याला जर्सी असे म्हणतात. जसे भारताची जर्सी निळी पाकिस्तान ची जर्सी हिरवी वेस्ट इंडिज ची लाल पण हे सर्व देश जेव्हा टेस्ट मॅच खेळतात तेव्हा सर्वांच्या ड्रेस चा रंग सफेद असतो कारण टेस्ट क्रिकेट चे सामने पाच दिवस खेळले जातात.

हे सामने सकाळी सुरु होतात ते संध्याकाळ पर्यंत चालतात. जेव्हा हे सामने खेळले जातात तेव्हा प्रखर ऊन असत आणि जर खेळाडूंनी रंगीबिरंगी जर्सी घातली तर हे रंग जास्त उष्णता खेचून घेतात व या प्रखर उन्हाळ्या सतत 5 दिवस खेळणे हे कठीण होते. तर सफेद रंग हा उष्णता खेचुन घेत नाही जास्त प्रमाणात उष्णता रिफ्लेक्ट करतो.

म्हणून सर्व खेळाडू 5 दिवसाचे सामने असले की सफेद रंगाचे कपडे घालतात. पण सर्व खेळाडूंचे कपडे हे सेम नसतात. प्रत्येकाने स्वतःच्या जर्सी वर तेंच्या देशाचे व त्याचे स्वतःचे नाव लिहिलेले असते. त्यांचा फक्त रंगच सेम असतो.

फॅक्ट न.5- नंबर तुम्ही पाहिले असेल की विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग असे अनेक खेळाडू त्यांच्या हाताच्या मनगटावरती एक बँड घालतात. याला ईस्ट बँड असेही म्हणतात. आणि हा बँड स्टाईल साठी घातला जात नाही तर तो घाम पुसण्यासाठी घातला जातो. क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना ग्राउंड मधील कासरतीमुळे खूप घाम येतो.

व सतत रुमाल काढून घाम पुसत हे कठीण होते तसेच रुमाल घेऊन फिरणे हे ही कठीण असते आणि म्हणून ते हातात ईस्ट बँड घालतात आणि याचा उपयोग घाम पुसण्यासाठी केला जातो. ईस्ट बँड घालून फिरणे हे रुमाल घेऊन फिरण्यापेक्षा खूप सोपे असते.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.