ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? आतापर्यंत त्यासाठी काय प्रयत्न झाले? आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तरी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो का? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

क्रीडा मनोरंजन लोकप्रिय शैक्षणिक

2007 ला महेंद्रसिंग धोनीच्या यंग ब्रिगेडने पहिला वहिला T20 वर्ल्डकप जिंकला.आणि पुढच्याच वर्षी बीजिंगमध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत देशासाठी पहिलं ऑलिम्पिक गोल्ड पटकावलं. या दोन स्पर्धान मधला महत्त्वाचा फरक माहिती आहे? धोनीची टीम स्टार झाली, पण अभिनव गोल्ड घेण्यासाठी जेव्हा गेला ना तेव्हा राष्ट्रगीत वाजलं.

ऑलिम्पिक हा खेळांचा कुंभमेळा. खेळाडूसाठी सर्वोच्च मनाची स्पर्धा आणि तिथे जिंकण्याची हीच खरी गंमत आहे. दुसरीकडे क्रिकेटला आपल्या देशात अफाट लोकप्रियता आहे. मागे टोकियोमध्ये ऑलिम्पिक सुरु असताना एक विचार क्रिकेट फॅनच्या मनात आला असेल, हे सगळे खेळ ऑलिम्पिकमध्ये असतात व त्यात क्रिकेट का नाही? क्रिकेट साठी प्रयत्न झालेच नाहीत का?

1896 मध्ये जेव्हा ऑलिंपिक खेळांचा ग्रीसची राजधानी अथेन्स ला जन्म झाला होता तेव्हाच क्रिकेटवर चर्चा झाली होती, आणि पुढे 1900 मध्ये पॅरिस मध्ये झालेल्या ऑलंपिक मध्ये क्रिकेट होतही, पण फक्त दोनच टीम इंग्लंड आणि फ्रान्स यांनी भाग घेतला आणि यातही फ्रान्सचे टीम मध्ये इंग्लंडमधून तिथे गेलेले निर्वासित जास्त होते.

मग शेवटी दोन टीम दरम्यान फक्त फायनल खेळवण्यात आली आणि दोन्हीही टीम्स ला आयफेल टॉवरच्या प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली आहे.पुढे जिथे जिथे ब्रिटिश वसाहती होत्या तिथे तिथे म्हणजे भारत, पाकिस्तान, वेस्टइंडीज, इथे क्रिकेटचा प्रसार तर झाला पण ऑलिम्पिकपर्यंत खेळ पोहचू शकला नाही. आणि ह्याची ढोबळमानानं काही कारणं देता येतील.

क्रिकेट हा खेळ ब्रिटिश वसाहतीपर्यंतच मर्यादित राहिला. फुटबॉल सारखा या खेळाचा प्रसार सगळ्या देशांमध्ये आणि खंडांमध्ये झाला नाही. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेसाठी लागणारी टीम ची संख्या सुरुवातीला तयारच होऊ शकली नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे क्रिकेट तेव्हा सहा दिवसांच्या टेस्ट मॅच च्या स्वरुपात खेळलं जात होत.

वन डे किंवा एक दिवसीय सामना हे अस्तित्वातही नव्हत आणि त्यामुळे क्रिकेट हा वेळ खाऊ खेळ समजला जाऊ लागला. टेस्ट मॅचेस सहज ड्रॉ होऊ शकतात. म्हणजे ते जिंकण्याचे निकष ठरवणं खूपच कठीण होतं. त्यामुळे विजेते टीम ठरवणे कठीण होत. आता विचार करा, अख्खा ऑलिम्पिक सोहळा पंधरा दिवसात संपतो,

अशा वेळी पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस भरवणार तरी कशा? 1900 च्या ऑलम्पिक मध्ये झालेली मॅच हे दोन दिवसांची होती पण क्रिकेटचे ही समस्या 1970 च्या दशकात वन डे च्या रूपाने आणि पुढे 2000 च्या दशकात टी ट्वेंटीच्या रूपानं सुटली. टी ट्वेंटी फॉरमॅट साडेतीन तासात संपू शकतो, आणि त्यातल्या फोर आणि सिक्सेसच्या आतिषबाजीमुळे लोक या खेळाची मजाही लुटतात.

टी ट्वेन्टी क्रिकेट जेव्हा रुळल तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तेव्हाचे अध्यक्ष डेव रिचर्ड सन यांनी 2017 मध्ये म्हटलं होतं की क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होण्याची वेळ आता आलेली आहे. पण 2020 मध्ये ब्रेक डान्सिंग , स्केटबोर्डिंग अशा खेळांचा समावेश झाला पण क्रिकेटचा समावेश झाला नाही. याचं एक कारण भारताचा म्हणजे पर्यायाने बीसीसीआयचा क्रिकेटच्या ऑलम्पिक समावेशाला असलेला विरोध हेही होतं.

फक्त ऑलिम्पिकच नाही तर एशियन गेम्स, कॉमन वेल्थ गेम्स मध्येहि पूर्वी फारसा विचारच झालेला नाही. नाही म्हणायला 1998 च्या कौलालमपूर मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ गेम्समध्ये क्रिकेटचा समावेश झाला. एकच नाहीतर एशियन गेम्स किंवा कॉमनवेल्थ गेम्समध्ये ही यापूर्वी क्रिकेटचा फारसा विचार झालेला नाही आणि ह्यात भारतीय टीमने हि भाग घेतला होता. हि स्पर्धा तेव्हा क्रिकेटचा मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे खेळांच्या कुंभमेळ्यात समावेशचा दृष्टीने पहिले पाऊल मानलं जात होतं. पण क्रिकेट हा खेळ सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेल्या भारताचाच म्हणजे बीसीसीआयचा तेव्हाही विरोध होता. आणि इंग्लिश क्रिकेट बोर्डाचा ही.

आता भारतात जेथे क्रिकेटला धर्म मानला जात, तिथेच ऑलम्पिक समावेशाला विरोध का होतोय? त्याच्या मागची कारण सांगताना क्रिकेट समीक्षक सांगतात, बीसीसीआयचा विरोध 2008 पर्यंत होता पुढे तो मावळला. क्रिकेटचा ऑलिम्पिक मध्ये समावेश व्हायचा असेल तर त्यासाठी काटेकोर नियोजन लागेल. आताच क्रिकेट खेळणाऱ्या देशांचा क्रिकेट कार्यक्रम भरगच्च आहे.

त्यातून ठराविक वेळ ऑलिम्पिकला द्यावा लागेल आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट साठी लागणारे मोठे मैदान, प्रत्येक सामन्यासाठी लागणारे नवीन पीच यांची उपलब्धता बघावे लागेल. पीच खराब असेल तर मॅच रंगत नाही. टोकियो किंवा अशा क्रिकेट माहिती नसलेल्या ठिकाणी क्रिकेटच आयोजन थोड कठीण आहे. बीसीसीआयचा सुरुवातीला याच गोष्टींना विरोध होता आणखी काही कारण नव्हतं.

टी ट्वेंटीच्या उदयानंतर आता क्रिकेट खूप बदलले. खेळाचा प्रसार झाला आहे .आज मितीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती चे एकूण 106 सदस्य देश आहेत आणि 12 पूर्ण वेळ सदस्य तर इतर 96 असोसिएट सदस्य आहेत. आणि त्याबरोबरच बीसीसीआयचा हि क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाला असलेला विरोध मावळला आहे. पण एक समस्या तरीही आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या क्रिकेटमधल्या दोन बलाढ्य टीम आहेत.

पण ऑलिम्पिकमध्ये त्यांचे देश त्याचनावाने खेळत नाही. वेस्ट इंडिज तर जमैका, बार्बार्डोस, डोमानिका अशा टीम म्हणून खेळतात. अशा वेळी क्रिकेटमध्ये एकच राष्ट्रीय संघटना असेल की त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स करायचा हा तिढाहि सोडवावा लागणार आहे. पण हे सगळं असताना 2028 मध्ये अमेरिकेत क्रिकेटच्या समावेशासाठी खुद्द अमेरिकन मंडळ उत्चुक आहे आणि तस झाल तर यजमान देश काही खेळ निवडू शकतात.

त्या निकषांवर क्रिकेटचा समावेश ऑलम्पिकमध्ये खरच होऊ शकतो. ऑलिंपिक खेळांचा चांगला अभ्यास असलेले अनेक क्रीडा पत्रकार याविषयी सांगतात, 2024 चे खेळ निवडले गेलेले आहेत. 2028 सालीसुद्धा 28 खेळ कायम राहतील आणि पाच नवीन खेळ यजमानांना निवडण्याची मुभा आहे. त्या खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न आयसीसी करत आहे.

परंतु त्या पद्धतीनं ऑलिम्पिक चळवळी फक्त 28 देशांना ऑलिम्पिक मधून मिळणारा आर्थिक नफा वाटला जातो. त्यामुळे जर क्रिकेटला ऑलिम्पिक चळवळीचा अविभाज्य घटक व्हायचं असेल तर त्याला त्या 28 खेळा मध्ये समाविष्ट व्हावं लागेल. पण त्यासाठी कुठल्या तरी एका खेळाला ऑलिम्पिकमधून बाहेर काढावं लागेल. त्याला वेळ लागू शकतो. असा आहे क्रिकेट खेळचा आत्तापर्यंत चा इतिहास. तुम्हाला याबाबत काय वाटत हे नक्की कमेंट्स मध्ये कळवा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.