एखादी व्यक्ती जिवंत असताना मालमत्ता आपल्या वारसांना कशाप्रकारे हस्तांतरित करू शकते ? ।। हयातीत जमीन हस्तांतरण कसे करावे? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालकीच्या मालमत्तेचं, ती व्यक्ती हयात असताना जर हस्तांतरण करायचा असेल तर कसा करता येईल? याचा करता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण या सगळ्या पर्याययांकरता नोंदणीकृत करार करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या हयातीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपली मालमत्ता हस्तांतरित करायची असते, तेव्हा तो खरेदी विक्रीचा करार, बक्षीस पत्र किंवा इतर स्वरूपाचा करार करून आपली मालमत्ता हस्तांतरित करू शकतो. आता या हस्तांतरणास संदर्भात त्या मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप कस आहे याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे.

♦️ मालमत्तेच्या मालकीच्या स्वरूपाचे मुख्यतः दोन प्रकार होतात

1.एक म्हणजे ही स्वकष्टार्जित मालमत्ता आहे. 2. आणि दुसरी ही वडिलोपार्जित मालमत्ता.
समजा एखाद्या व्यक्तीची स्वकष्टार्जित मालमत्ता असेल, तर त्या मालमत्ते संदर्भात कोणताही निर्णय घेण्याच करार किंवा हस्तांतरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण अधिकार त्या मालकाला असतात. सहाजिकच आपल्या हयातीत अशा मालमत्ते संदर्भात कोणत्याही स्वरूपाचा करार किंवा हस्तांतरण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आणि अधिकार यांचा वापर करून अशी व्यक्ती अशी मालमत्ता तिर्‍हाईता च्या नावे हस्तांतरित करू शकतो.

आता ही मालमत्ता स्वकष्टार्जित असल्यामुळे ही वारसानांच दिली पाहिजे असंही नाही. तर इतरस्त्र व्यक्तीला सुद्धा ती मालमत्ता देता येऊ शकते. शिवाय या मालमत्तेमध्ये जर कोणीही सहहिस्सेदार नसेल तर त्याला ” राईट ऑफ प्रींप्शन” सुद्धा विचार करायची आवश्यकता नाही.

राईट ऑफ प्रींप्शन म्हणजे नक्की काय? : तर जेव्हा एखाद्या मालमत्तेमध्ये सहहिस्सेदार असतात आणि त्यातल्या एखाद्याला आपला हक्क किंवा हिस्सा विकायचा असतो, तेव्हा त्या सहहिस्सेदारांन्ना तो हक्क किंवा हिस्सा खरेदी करण्याचा प्राधान्याने अधिकार म्हणजे राईट ऑफ प्रींप्शन. पण जिथे एकच मालक आहे तिथे यांचासुद्धा प्रश्न उद्भवणार नाही.

♦️पुढची महत्त्वाची शक्यता म्हणजे ती जर मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर काय करता येईल?

आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा समान, स्वतंत्र आणि अविभाजित असा हक्क आणि हिस्सा असतो. सहाजिकच, केवळ महसूल अभिलेखात मध्ये काही लोकांचाच नाव आहे याचा फायदा घेऊन त्या संपूर्ण क्षेत्राचा करार किंवा हस्तांतरण करणे कायद्याने योग्य ठरणार नाही.

सहाजिकच जर आपल्याला कायदेशीर आणि योग्य कराराद्वारे हस्तांतरण करायचं असेल तर ते हक्काचं हस्तांतरण आपल्या हक्काच्या मर्यादेत राहून किंवा आपल्या हिश्याच्या मर्यादेत राहून करणे गरजेचे आहे. जर आपण आपला हक्क किंवा हिस्सा याची मर्यादा ओलांडली तर तो करार किंवा जे हस्तांतरण आहे ते कायदेशीर कचाट्यात सापडून बेकायदेशीर किंवा अवैध ठरण्याची दाट शक्यता आहे.

शिवाय, जेव्हा एखादी मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता असते तेव्हा बहुतांश वेळेला त्या मालमत्तेमध्ये सह हिस्सेदार हे असतातच . सहाजिकच जेव्हा एखाद्या सह हिस्सेदाराला आपला हक्क किंवा हिस्सा याचा करार करायचा आहे किंवा हस्तांतरण करायचे तेव्हा बाकीच्या सह हिस्सेदारांना जो राईट ऑफ प्रींप्शन हा अधिकार आहे त्याचा सुद्धा विचार होणं हे आवश्यक आहे.

कारण जर आपण बाकी सहहिस्सेदारांचा प्राधान्याचा हक्क नाकारला आणि जर त्यांनी त्या कराराला किंवा हस्तांतरणाला आव्हान दिलं तर तो करार आणि हस्तांतरण कायदेशीर कचाटयात सापडुन कायदेशीर पेच उभा राहू शकतो. वेळ प्रसंगी तो करार आणि हस्तांतरण रद्द सुद्धा होऊ शकतो. अशी संकट येऊ नये याच्या करिता आपण आपल्या हक्क किंवा हक्कांची मर्यादा काय आहेत?

याची माहिती घ्यावी त्या हक्कांच्या बरोबरीने इतर लोकांचे हक्क काय आहेत? याचा सुध्दा भान ठेवावं आणि इतरांच्या हक्काची पायमल्ली न करता आपण आपल्या हक्काचा जो काही परीघ आहे किंवा जी काही मर्यादा आहे त्याच्यामध्ये राहुन असे करार किंवा हस्तांतरण करावे जेणेकरून आपण केलेल्या करार किंवा हस्तांतरणाला कायदेशीर कचाट्यात सापडण्याची किंवा कायदेशीर बाधा उद्भवण्याची शक्यता ही जवळपास शून्य असेल.

हयातीत मालमत्ता हस्तांतरण करणे हे, हयातीनंतर मालमत्ता हस्तांतरण करण्यापेक्षा कधीही अधिक श्रेयस्कर असतं. अर्थात त्याच्यात एक धोका असा उद्भवतो की, समजा एखादा व्यक्तीने वारसांना किंवा त्याची सगळी मालमत्ता हस्तांतरित करून टाकली आणि जर त्या लोकांनी ह्या मूळ मालकाला जर त्या मालमत्ते मधून हकलल तर बेघर होण्याची दाट शक्यता असते.

हा धोका टाळण्याकरता शक्यतोवर आपण सगळ्या मालमत्तांचा आपल्या हयातीत हस्तांतरण करू नये. काही मालमत्ता हस्तांतरण करायला हरकत नाही पण विशेष म्हणजे आपलं राहतं घर आहे तिथे आपण वास्तव्याला आहे, अशा मालमत्तेचा आपल्या हयातीत हस्तांतरण करणे हे टाळलेलं अधिक बर असत.

शिवाय जर तुमच्या कडे एकच मालमत्ता असेल आणि त्यामध्ये तुमचं वास्तव्य असेल तर शक्यतो असं हस्तांतरण टाळलेलंच बरं. कारण जर त्या हस्तांतरणाचा फायदा घेऊन त्या हस्तांतरणाच्या लाभार्थ्यांनी तुम्हालाच घराबाहेर काढलं तर मोठा कायदेशीर आणि वास्तविक संकट उभं राहू शकतं. आणि मग त्याच्या करिता घरचं सगळं कोर्टकचेरी, सगळे कायदेशीर प्रक्रिया पार पडायची हे त्रासदायक होऊ शकतो.

त्यामुळे शक्यतोवर जर तुमच्याकडे एकच मालमत्ता असेल तर त्याचा तुमच्या हयातीमध्ये हस्तांतरण न करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. आता तुमच्या नंतर त्यावरून वाद होऊ नये किंवा तुम्ही त्याची व्यवस्था लावून जावी अशी जर तुमची इच्छा असेल, तर त्याच्या करिता मृत्युपत्र करन हा एक समर्पक आणि अत्यंत योग्य असा उपाय आहे.

एकदा तुम्ही मृत्यूपत्र केलं की, तुमच्या मालमत्तेची व्यवस्था कशी लागणार?कोणाला काय मिळणार? कोणाला काय मिळणार नाही? याबद्दल सविस्तर तरतुदी किंवा तजवीज तुम्हाला तुमच्या हयातीतच करता येते. शिवाय जर परिस्थिती बदलली तर बदलत्या परिस्थितीच्या अनुषंगाने तुम्हाला नवीन मृत्युपत्र सुद्धा वेळोवेळी करता येतात. त्यामुळे एकच मालमत्ता असेल आणि बेघर होण्याचा धोका जर टाळायचा असेल तर त्या करिता या मालमत्तेचा हयातीत हस्तांतरण न करता त्याच्या करता मृत्युपत्रा सारखे तजवीज करणे हे जास्त श्रेयस्कर ठरेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.