देवस्थान इनाम जमिनी ।। देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल केले जाऊ शकते का? याबद्दल महत्वाची माहिती !

शेती शैक्षणिक

आज आपण देवस्थान जमिनी बद्दल माहिती घेणार आहोत. देवस्थान इनाम दोन प्रकारात विभागलेले आहे. 1)सरकारी देवस्थान 2)खासगी देवस्थान -सरकारी देवस्थान:सरकारी देवस्थानाची नोंद गाव नमुना क्रमांक 1 (क) (7) आणि गाव नमुना क्रमांक 3 मंध्ये केलेली असते. -खासगी देवस्थान:खासगी देवस्थानाची महसुल दप्तराशी संबंध नसल्याने त्याची नोंद गाव दप्तरी केलेली नसते.

देवस्थानाच्या इनाम जमिनीतून येणाऱ्या उत्पन्नातून संबंधित देवस्थानाचे मंदिर किंवा मशिदी साठीच्या पूजा दिवाबत्ती साफसफाई उत्सव याचा पूर्ण खर्च भागवला जातो देवस्थान इनाम जमिनीचा सातबारा उताऱ्यावर भोगवटदार म्हणजेच मालक म्हणून देवाची किंवा देवस्थानाचे नाव नोंदविलेले असते.

तसेच नोंदविलेल्या नावाच्या खाली रेषा ओढून व्यवस्थापक म्हणजेच वहिवट दाराचे नाव लिहिल्या जात असे, परंतु काही काळानंतर सातबारा उतारा चे पुनर्लेखन करताना संबंधित देवस्थानाचे किंवा मशिदीचे नाव जाणीवपुर्वक लिहीले जात नसत किंवा चुकून नाव लिहिणे राहून जात असे चुकून नाव लिहिणे राहून जात असे.

त्यामुळे पुढील काळात अनेक समस्या निर्माण होऊन वाद होतात त्यामुळे सातबारा उताऱ्यावरील भोगवटदार मालक म्हणून देवस्थानाचे किंवा देवाचे अथवा मशिदीचे नाव दिले जाते वहिवाटदार व्यवस्थापकाचे नाव इतर हक्कात लिहिले जाते. देवस्थानाच्या इनामी जमिनीचा मालक म्हणून म्हणजेच.

भोगवटदार म्हणून सातबारा उताऱ्यावर महंत, मठाधिपती, पुजारी, ट्रस्ती, मुतावली, काझी यांची नावे कोण म्हणून लिहिली जात नाही. देवस्थान इनामी जमिनी चे हस्तांतरण, विक्री किंवा वाटप करता येत नाही. असा प्रकार झाल्यास अशी जमीन तात्काळ सरकार जमा करण्यात येते तसेच अनधिकृत बद्दल तलाठी यांच्या निदर्शनास आल्यास त्यांच्याद्वारे तहसीलदार यांना कळविण्यात येतात.

काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये शासनाची पूर्वपरवानगी आणि धर्मादाय संस्थेची आयुक्तांच्या मान्यतेने असे हस्तांतरण विक्री किंवा वाटप करता येते देवस्थान इनाम वर्ग 3 ची जमीन खरेदी करण्यापूर्वी शासनाची आणि धर्मादाय आयुक्त अशा दोघांची परवानगी घेणे आवश्यक असते तर दोघांची परवानगी नसेल तर इनाम जमीन विकता येत नाही.

देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल केले जाऊ शकते का?: देवस्थान इनाम जमिनी कुळाचे नाव दाखवू शकते परंतु देवस्थानचा ट्रस्ट ने कुळवहिवाट अधिनियम कलम 88 ची सूट घेतली असेल तर अशा कुळास कुळवहिवाट अधिनियम 32ग प्रमाणे जमीन विकत घेण्याचा अधिकार नसतो.

देवस्थान इनाम जमिनीला वारसाची नोंद होऊ शकते परंतु येथे जन्माने वारस ठरविण्या एवजी मैदा नंतर प्रत्यक्ष पूजा-अर्चा करणारा वारस ठरतो. म्हणजेच पदामुळे मिळणारा उत्तराधिकार हे तत्व इथे लागू होत नाही. एखाद्या मयत पुजाऱ्याला चार मुले असतील तर पूजा-अर्चा व वहीवटी साठी पाळी पद्धत ठरवून दिल्या जाते. पण एक न्यायालय निर्णयात याबाबत सांगितले आहे.

पुजारी किंवा मठाचा प्रमुख अविवाहित असला किंवा त्याला वारस नसल्यास तो त्याच्या मृत्यूच्या आधी शिष्य निवडून त्याला उत्तराधिकारी बनवू शकतो परंतु या जमिनीचे वारसांमध्ये वाटप होत नाही तसेच एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबांकडे हस्तांतरण ही होत नाही.

5 thoughts on “देवस्थान इनाम जमिनी ।। देवस्थान इनाम जमिनीत कुळाचे नाव दाखल केले जाऊ शकते का? याबद्दल महत्वाची माहिती !

  1. आपल्या टीप खूप चांगली आहे. या सोबत शासन निर्णय दिला तर खूपच उपयोगी होईल

  2. इनाम जमीन शेतकऱ्याच्यानावावर कधी होणार आहे

    1. इनम देवस्थान जमीन मूळ शेतकरी नाववर कधी होणार आहे

  3. ७० वर्ष झाली आम्ही जमीन कसतोय आणि त्या जमीनीची खरेदी केली दस्त १९६४/१९४७ आता तरी नावावर करा

Comments are closed.