नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
अनेकदा आपण एखाद्या दुकानात इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी जातो तेव्हा दुकानदार त्या उत्पादनाची ‘गॅरंटी’ आणि ‘वॉरंटी’ देतो. या दरम्यान काही दुकानदार तर म्हणतात की, ” जग नष्ट होईल , पण हे प्रोडक्ट त्यानंतरही सुरूच असेल.” तुर्रम खानचे बोलणे ऐकून ग्राहकांचे डोळे मोठे होतात आणि तो उत्साहाने वस्तू खरेदी करतो. मग काय? अरे तेच ‘ बोंबला…झालं खराब’. म्हणजे काही दिवस वापरल्यानंतर ते प्रोडक्ट खराब होते आणि आपली दुकानाच्या दिशेने परेड सुरू होते.
10 दिवसांच्या आत प्रोडक्ट खराब झाल्यानंतर ग्राहक दुकानदाराकडे पोहोचतो, तेव्हा दुकानदाराचे बोलणे ऐकून ग्राहक डोक्याला हात लावून बसतो. भाऊ तुम्ही कूलर सलग ५ तास चालवलात का? अरे भाऊ, हे करू नये, थोडी विश्रांती द्यायला हवी होती. माणसंही विश्रांती घेतात. तुम्ही कूलरला किती वॅटचा ‘प्लग’ बसवला होता? अरे भाऊ, ‘फोर प्लग’ लावायला नको होता. कुलरमध्ये पाणी भरले का? अरे भाऊ, असं करू नका, कूलर खराब होतो. ब्ला… ब्ला… ब्ला… हे सगळं ऐकून कोणाचं डोकं बिघडणार नाही!
हे सर्व अशा लोकांसोबत घडते जे छोट्या दुकानांमधून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात, जिथे ग्राहकाला तोंडी हमी दिली जाते. आजही अशी अनेक दुकाने आहेत जिथे दुकानदाराकडून ग्राहकांना तोंडी हमी दिली जाते. पण आजच्या युगात प्रत्येक लहान ते मोठा ब्रँड त्यांच्या उत्पादनांची ‘गॅरंटी आणि वॉरंटी’ देतो. आज आपण या लेखात हेच समजून घेऊ की वॉरंटी आणि गॅरंटी मध्ये नेमका काय फरक आहे?
बहुतेक लोकांना गॅरंटी आणि वॉरंटी यातील फरक माहित नाही. काही लोक त्यांना समानार्थी शब्द म्हणून ओळखतात. पण हे खरे नाही. हे दोन शब्द एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. परंतु या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे की गॅरंटी किंवा वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाकडे ठोस बिल किंवा कंपनीने दिलेले गॅरंटी/वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे. यानंतरही दुकानदाराने माल बदलण्यास किंवा दुरुस्ती करण्यास नकार दिल्यास आपण न्यायालयात जाऊ शकतो.
वॉरंटी म्हणजे काय? : वॉरंटी ही विक्रेत्याने ग्राहकाला दिलेली एक विशेष सवलत आहे, ज्यामध्ये एखाद्या उत्पादनात दोष आढळल्यास, दुकानदार/कंपनी त्या उत्पादनाची दुरुस्ती करून घेते. याला वॉरंटी म्हणतात. वॉरंटी ही बरेच वेळा काही अटी-शर्तीसोबत सोबत मिळते. जसे की वॉरंटीचा लाभ घेण्यासाठी पक्के बिल आवश्यक आसते. वॉरंटी ही ठरावीक काळासाठी असते, त्याच काळात वस्तु दुरुस्त करून मिळू शकते. बर्याच वेळा वॉरंटी ही 6 महीने किंवा 1 वर्षापर्यंत असते. त्या काळानंतर खराब झालेली वस्तु मोफत दुरुस्त करून मिळत नाही.
गॅरंटी म्हणजे काय? : जर आपण एखादी गॅरंटी असलेली वस्तू विकत घेतली आणि ती खराब झाली तर कंपनी आपल्याला त्या खराब वस्तूच्या बदल्यात नवीन वस्तू देते. गॅरंटी असलेले प्रोडक्ट दुरुस्त करून न देता नवीन प्रोडक्ट देतात. याला गॅरंटी म्हणतात. गॅरंटी साठीही काही अटी-शर्ती लागू असतात. जसे की, ती वस्तू आपल्या चुकीमुळे खराब झालेली नसावी. गॅरंटी मध्ये सहसा मॅन्यूफॅक्चरींग डिफेक्ट मुळे खराब झालेली वस्तूच बदलून मिळते. खराब झालेले प्रोडक्ट आपल्याला स्वतःजवळ ठेवता येत नाही, तर ते दुकानदाराला किंवा कंपनीला परत करावे लागते. गॅरंटी ही ठरावीक कलासाठीच दिली जाते, त्याकाळातच खराब झालेली वस्तू बदलून मिळते.
गॅरंटी आणि वॉरंटी मध्ये इतर काही फरक : आजच्या काळात जवळपास सर्वच ब्रॅंडेड वस्तूंवर वॉरंटी मिळते, परंतु गॅरंटी काही ठरावीक वस्तूंवरच मिळते. जसे की आपला मोबाईल खराब झाल्यास तो आपल्याला दुरुस्त करून मिळतो. कारण मोबाईलवर आपल्याला वॉरंटी मिळते गॅरंटी नाही. वॉरंटीचा कालावधी हा अधिक असतो तर गॅरंटीचा कालावधी हा तुलनेने कमी असतो.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.