सात बारा काढण्याचा महाराष्ट्र शासनाने दोन सर्व्हिस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. I)एक फ्री मध्ये सर्व्हिस उपलब्ध करून दिली, आणि दुसरी पे सर्व्हिस उपलब्ध करून दिले. ज्या वेळेस आपण फ्री ची सर्व्हिस वापरतो. त्यावेळेस आपण सात बारा काढतो.
त्या वेळेस तो सात बारा आपण कोणत्याही कारणा मध्ये वापरू शकत नाही. म्हणजे तो सात बारा केवळ आपल्या माहिती साठी उपलब्ध करून दिला आहे. तर दुसरी सर्व्हिस आहे ती पे सर्व्हिस आहे. तर त्याच्या मध्ये आपल्याला डिजिटल सात बारा उपलब्ध करून दिलेले आहेत.
डिजिटल सात बारा आपण कोणत्याही शासकीय कारणा मध्ये वापरू शकतो. म्हणजे त्या सात बाऱ्या वर एका साईडला बार कोड दिलेले आहे आणि एका साईडला राईटचे ऑपशन दिलेले आहे. म्हणजे तो आपल्याला तलाठ्या कडे जाऊन तलाठी साहेबाची सही घ्यायची आवश्यकता नाही.
किंवा नायब तहसीलदार यांची सही घेण्याची आवश्यकता नाही. तर ती सही म्हणजे डिजिटल सिग्नेचर उपलब्ध करून दिलेली आहे. तर हा डिजिटल सात बाऱा कसा काढायचा ? हे आपण पाहूया. 1) गूगल क्रोम या वर आल्या नंतर आपल्याला या सर्च इंजिन मध्ये https://mahabhumi.gov.in अशी लिंक प्रविष्ट करून सर्च करायच आहे.
त्या नंतर आपल्याला महाराष्ट्र शासनाचे एक होमपेज मिळेल. 2)या होमपेज् वर आल्या नंतर त्या ठिकाणी डिजिटल साईन सात बारा अँड प्रॉपर्टी कार्ड असे निळ्या कलरचे बटण दिसून येईल. या बटण वर क्लिक करावे. 3) त्यानंतर आपल्याला https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in अश्या प्रकारे वेबसाइट मिळेल.
या वेबसाइट वर आपण दोन -तीन प्रकारे येऊ शकतो. या वेबसाइटवर येण्या साठी दुसरा पर्याय i) गूगल वर आल्या नंतर डिजिटल सात बारा असा शब्ध प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला दोन प्रकार च्या वेबसाइट दिसतील. https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in आणि दुसरी https:// bhulekh.mahabhumi.gov.in तर अश्या प्रकारे आपण या मधील कोणत्याही वेबसाइट वर क्लिक वरून येऊ शकतो.
तर https:// bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट वर क्लिक केल्या नंतर आपण आपल्या महाभुलेख या वेबसाइट वर येऊ शकतो. आता या ठिकाणी https:// bhulekh.mahabhumi.gov.in हि वेबसाइट ओपन झालेली दिसेल. ii) तर या ठिकाणी आपल्याला डिजिटली साईन सात बारा अश्या प्रकारच एक चिन्हं दिसून येईल.
त्या चिन्हं च्या बटणा वर क्लिक केल्या नंतर हि डिजिटल सात बारा काढता येईल. 4) तर या वेबसाइट वर आल्या नंतर जर तुम्ही न्यू युजर असाल तर या ठिकाणी तुम्ही न्यू रेजिस्ट्रेशन असे बटण दिसून येईल. या बटण वर क्लिक केल्या नंतर नवीन रेजिस्ट्रेशन करू शकता.
तर नवीन रेजिस्ट्रेशन करणे हे खूप सोप्प आहे. परंतु जर तुम्ही नवीन रेजिस्ट्रेशन केलेलं नसेल. तर तुम्ही त्या नवीन रेजिस्ट्रेशन वर दिलेली माहिती संपूर्ण व्यवस्थित भरून अगदी सोप्या पद्धतीने हे नवीन रेजिस्ट्रेशन करू शकता. 5)तर युजर क्रीएट केल्या नंतर त्या वेबसाइट वर तुम्हचा लॉगिन आयडी प्रविष्टि करायचा आहे.
नंतर पासवर्ड आणि कॅप्चर कोडे प्रविष्टि करून लॉगिन करायचे आहे. 6)तर पुढील पेज आल्या नंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. त्या नंतर आपला तालुका निवडायचा आहे. त्या नंतर आपल्याला ज्या गावाचा सात बारा काढायचा आहे. ते गाव निवडायचे आहे.
7) त्या नंतर सात बारा काढण्या चे दोन प्रकारे दिसुन येते. एक आपण अंकित सात बारा प्रिंट करू शकतो. आणि दुसरा अक्षरी सात बारा प्रिंट करू शकतो. तर तुम्हाला जो सात बारा हवा त्या बटण वर क्लिक करावे.
8)तर समजा तुम्हांला अंकित सात बारा काढायचा आहे तर त्या सात बाऱ्या वर क्लिक करावे. 9)त्या नंतर तुम्हाला गट नंबर किंवा सर्वे नंबर प्रविष्ट करायचा आहे. त्या नंतर परत गट नंबर किंवा सर्वे नंबर निवडायचा आहे. 10)नंतर आपल्याला या शासनाच्या वॉलेट मध्ये आपला बॅलन्स असणे आवश्यक आहे.
आपल्याला तिथे रिचार्जे अकाउंट असे बटण दिसून येईल. त्यावर क्लिक करावे. 11) तर डिजिटल सात बारा काढण्यासाठी आपल्याला 15 रुपये एवढा चार्ज लागतो त्यामूळे आपल्याला पैसे भरन्या पूर्वी त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेली असते, कि आपण या वॉलेट मध्ये पंधरा ते एक हजार पर्यंत रुपये जमा करू शकतो.
तर आपण त्या ठिकाणी 15 रुपये जमा करूया. त्या नंतर त्या ठिकाणी पे नाव (pay now) असे बटण दिसून येईल. या पे नाव बटण वर क्लिक करावे लागेल.12)तर क्लिक केल्या नंतर एक स्पष्ट सूचना दिसून येते. You have selected recharge of 15 confirm to continue. तर कन्फर्म करण्यासाठी आपल्याला I accept असे बटण दिसून येईल.
त्यावर आपल्याला क्लिक करावे लागेल व त्यानंतर आपल्याला कन्फर्म बटण दिसून येईल त्यावर हि क्लिक करायचे आहे. 13)त्या नंतर पेमेन्ट करण्या साठी काही ऑपशन दिसून येतात. तुम्ही स्व:ता च्या i)डेबिट कार्ड वर सुद्धा पैसे भरू शकता. जर तुम्ही ii)इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर त्याने हि तुम्ही पैसे भरू शकता.
किंवा iii)भीम युपीआय वापरत असाल तर त्या द्वारे हि तुम्ही पेमेंट करू शकता. जर आपण डेबिट कार्ड वापरून पे’मेंट करायचे असेल. तर तिथे तुमच्या डे’बिट का’र्ड चा नं’बर आणि काही माहिती तुम्हाला तिथे टाकावी लागेल. तर आपल्याला काही प्रमाणांत माहित असते ऑनलाईन पे’मेंट कसे करायचे.
त्याच पद्धतीने तुम्हाला तिथे वरील तीन ऑपशन वापरून पेमेंट करायचे आहे. 14)तर पुढे पेमेंट झाल्यावर आपल्याला पेमेंट सक्सेसफुल झालेला मेसेज येतो. तसेच आपल्याला बँकेचा रेफेरन्स आयडी व ट्रांसक्सशन आयडी दिसून येतो. तर तिथे आपल्याला पेमेंट सक्सेसफुल झालेली रिसिप्ट पाहिजे असेल तर तिथे व्यु रिसिप्ट नावाचा ऑपशन दिसून येईल
त्यावर क्लिक करून पेमेंट ची रिसिप्ट पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता. 15)त्या नंतर आपल्याला डिजिटल सात बारा काढण्यासाठी आपल्याला तिथे काँटिन्यु हे ऑपशन दिसून येईल. या ऑपशन वर आपल्याल क्लिक करायचे आहे.
16)त्या नंतर आपल्याला डाउनलोड नावाचे ऑपशन दिसून येईल. तर आपल्याला डिजिटल सात बारा काढण्या साठी डाउनलोड या ऑपशन वर क्लिक करावे लागेल. तर क्लिक केल्या नंतर एक सुचना दिसून येईल, RS fifteen will be detected from available balance For 7/12 download म्हणजे हा सात बारा डाउनलोड करण्यासाठी आपल्याला 15 रुपये चार्जे आकारले जातील हि सूचना आहे. या ठिकाणी ओके करून पुढे जायचं आहे.
17)अश्या प्रकारे आपल्याला डिजिटल सात बारा मिळून जाईल. खाली आल्या नंतर आपल्याला एक बार कोड दिसून येईल. या बारकोड ला स्कॅन केल्या नंतर आपली संपूर्ण माहिती दिसून येईल तसेच त्या ठिकाणी आपल्याला सूचना हि दिलेली आहे “हा सात बारा
अभिलेख दिनांक या या दिवशी रोजी डिजिटल स्वाक्षरीत केल्या असल्यामूळे त्यावर कोणत्याही सही शिक्याची आवश्यकता नाही. सदर सात बारा डिजिटल स्वाक्षरीत झाल्या नंतर गट नंबर मध्ये पिकांची माहिती अध्यावत झाली असल्याने सदय स्थिती वर bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर पाहावे.”
अश्या प्रकारे या ठिकाणी सूचना दिलेली आहे याचा अर्थ असा आहे कि डिजिटल सात बारा तुम्ही कोणत्याही शासकीय कार्यालाया मध्ये कुठेही वापरू शकता. तर त्या ठिकाणी गाव नमुना नंबर हि दिसून येते. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणाहून डाउनलोड करून घेता येते
व आपल्याला कोणत्याही कार्यालया मध्ये वापरता येते. नंतर गाव नमुना नंबर यांच्या इथेही आपल्याला बार कोड दिसून येतो, आणि काही सूचना हि दिसून येतील. याचा अर्थ आहे हे संपूर्ण डोकमेंट्स कोणत्याही कार्यालया मध्ये वापरता येते आणि हे अधिकृत कागदपत्रे आहेत.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.