या तीन घटस्फोटांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत होते आहे जोरदार चर्चा

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सिनेसृष्टीत सतत मसालेदार बातम्यांची चर्चा असते. बॉलिवूडमध्ये तर अशा बातम्या रोज कानावर येत असतात. अनेकदा सेलिब्रिटींचं लिंक अप्स, ब्रेक अप्स याच्या बातम्या चवीने चघळल्या जातात. सेलिब्रिटींची लग्न, पालक होणं या सारख्या बातम्या त्यांच्या फॅन्सना आनंद देणा-या ठरतात.

याशिवाय मसालेदार चर्चा होते ती घटस्फोटांची. दोन कलाकार लग्नाच्या नात्यातून विभक्त होणार असतील तर बी टाऊनमध्ये कधी कुजबुजत्या आवाजात तर कधी खुलेआम चर्चा होत असते.

पण सध्या या चर्चांमध्ये आघाडीवर आहे ती दाक्षिणात्य सिनेसृष्टी. सध्या या सिनेसृष्टीत घटस्फोटांच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेले काही दिवस साऊथ सिनेसृष्टीत मातब्बर घरातील कलाकारांच्या घटस्फोटांच्या चर्चा होत आहेत. विशेष म्हणजे हे स्टार किड आणि त्यांचे जोडीदार दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी –

धनुष आणि ऐश्वर्या धनुष – एकीकडे धनुषचा बॉलिवूड सिनेमा ‘अतरंगी रे’ रिलीज झाला आणि दुसरीकडे साऊथ सिनेसृष्टीला या जोडीच्या घटस्फोटाच्या बातमीचा धक्का बसला. जवळपास 18 वर्षं एकत्र असलेली ही जोडी विभक्त होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. धनुषच्या चाहत्यांनी यावर दु:ख व्यक्त केलं आहे. तामिळ रितीरिवाजाने झालेल्या या लग्नाची त्यावेळीही बरीच चर्चा झाली होती. या घटस्फोटामागे धनुषचं सतत बिझी असणं तर ऐश्वर्याच दिग्दर्शन क्षेत्रातील अपयश हे कारण असल्याचं बोललं जात आहे.

Dhanush announces separation from wife Aishwaryaa after 18 years of togetherness | Celebrities News – India TV

नागा चैतन्य आणि समंथा – साऊथ सिनेमातील आणखी एक सुपर क्युट कपलने ही अलीकडेच विभक्त होत असल्याची घोषणा केली. पॉवर कपल म्हणून ओळखलं जात असलेल्या समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाने चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. या जोडीने चार वर्षापुर्वी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करत लग्नगाठ बांधली होती. ‘ये माया चेसावे’ या सिनेमापासून या जोडीची लव्हस्टोरी सुरु झाली होती. जवळपास 40 दिवसांचा हनीमूनही या जोडीने साजरा केला होता. समंथाने करिअर ऐवजी कुटुंबाकडे फोकस करावा ही नागा आणि कुटुंबियांची इच्छा असल्याने या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे.

Samantha Ruth Prabhu on split from Naga Chaitanya: 'All my carefully laid plans have crumbled' - Hindustan Times

 

श्रीजा आणि कल्याण – मेगास्टार चिरंजीवीची मुलगी श्रीजा ही अभिनेता पती कल्याण देव याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. श्रीजा आणि कल्याणशी हे दुसरं लग्न आहे. 2016 मध्ये तिने कल्याणसोबत लग्नगाठ बांधली. या बातमीला कल्याणच्या किंवा चिरंजीवीच्या कुटुंबियांकडून कोणताही दुजोरा दिला गेला नाही.

Amid Rumors, 'Sreeja Kalyan' Turns 'Sreeja Konidela' – Movie News

 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.