नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
आई-वडिलांच्या भूमिकेत गेल्यानंतर प्रत्येक पालक मुलांबाबत अतिशय प्रोटेक्टीव्ह होताना दिसतात. सतत मुलांना हे करु नको, ते करु नको असं सांगताना दिसतात. यामुळे मुलंही अनेकदा हिरमुसली होतात. सतत सुचना केल्याने चिडचिडी होऊ लागतात.
अनेकदा सतत टोकल्याने एखादं काम करण्याचा आत्मविश्वासही गमावून बसतात. त्यामुळे तुम्हीही पालक असाल तर पुढील गोष्टी करण्यापासून मुलांना अडवू नका.
मातीत / मैदानात खेळणं- अनेक पालकांचा मातीत खेळणं किंवा मैदानात खेळणं याला मनाई असते. पण अशा खेळांमुळे मुलांमध्ये टीम स्पिरिट निर्माण व्हायला मदत होते. यामुळे मुलांना मातीत खेळणं, कपडे खराब करणं यासाठी रागवणं सोडून द्या.
पाळीव प्राणी- अनेकदा पाळीव प्राणी मॅनेज करणं सहज नसल्याने घरी पाळीव प्राणी आणण्यासाठी पालक नाखुश असतात. पण अलीकडे अनेक घरात एकुलतं एक मुल असतं. अशा वेळी पाळीव प्राणी असेल तर मुलांना उत्तम कंपॅनिअन मिळेल. अनेकदा पाळीव प्राण्यांशी खेळणं हे ताण कमी करणारं असतं.
नवीन चवींची अनुभूती घेऊ द्या – मुलं मोठी होताना अनुभवातून शिकत असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीबाबत त्यांना त्यांचं मत बनवण्यास मदत करा. अनेकदा काही खाण्यापुर्वी त्यांना चव घेऊन पाहू द्या. यातून त्यांचं चवीबाबतचं मत बनण्यास मदत होईल.
सतत शिस्तीचा बडगा नको – पालक अनेकदा मुलांबाबत शिस्तीचा बडगा घेऊन असतात. मुलाने असंच वागावं अशी इच्छा मनोमन बाळगून असतात. पालक म्हणून हे चुकिचं नसलं तरी मुलांचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडण्यास यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे अनेकदा मुलांच्या कलाने घेऊन त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं इष्ट ठरतं.
गोंधळ केला तरी…….- अनेकदा मुलांच्या चुकांवर पालक खुप कठोरपणे व्यक्त होतात. अशा वेळी मुलांचा आत्मविश्वास हरवण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी मुलांवर न ओरडता कोणीही चुकू शकतो. याबाबत त्यांना जाणीव करुन द्यावी.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.