ड्रंक अँड ड्राइव्ह बद्दल काय सांगतो कायदा? अश्या प्रकारच्या केस मध्ये पुढे काय होते? यावर आहे का काही कायदेशीर मार्ग? जाणून घ्या सविस्तर.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

दारू पिऊन गाडी चालवणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम 188 मद्यपान करून वाहन चालविण्यास प्रतिबंधित करते आणि हा कायदा दंडनीय गुन्हा बनवते. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणे टाळावे. मद्यपान करण्यास मनाई नाही पण दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. आज आपण या लेखामद्धे मोटार वाहन कायद्याचे कलम 188 समजून घेऊ. जर एखाद्या व्यक्तिवर असा खोटा आरोप लावल्यास त्याच्याकडे काय मार्ग आहेत हे देखील जाणून घेऊ.

काहीवेळा असे घडते की दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली जाते, तर वास्तव असे आहे की त्या व्यक्तीकडून काही किरकोळ वाहतुकीचे नियम मोडले जातात. मद्यपान करून वाहन चालवणे हा एक मोठा गुन्हा आहे परंतु मोटार वाहनांशी संबंधित इतर किरकोळ गुन्हे देखील आहेत.

उदाहरणार्थ, सीट बेल्ट लावून गाडी न चालवणे किंवा लाल सिग्नल तोडणे इ. अनेक वेळा किरकोळ गुन्ह्यांनंतरही एखाद्या व्यक्तीवर अन्यायकारकपणे दारू पिऊन गाडी चालवल्याचा खोटा आरोप केला जातो. दारूच्या नशेत गाडी चालवताना जेव्हा एखादी व्यक्ती पकडली जाते, तेव्हा पोलिसांकडून अशा व्यक्तीची ब्रीद टेस्ट केली जाते. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जातो.

पोलिसांकडे एक मशीन असते जी त्या व्यक्तीच्या श्वासावरून मद्यपानाचे प्रमाण ठरवते. त्या मशिनमध्ये पॉझिटिव्ह सिग्नल आढळल्यास त्या व्यक्तीला मोटार वाहन कायद्याच्या कलम १८८ अंतर्गत आरोपी बनवले जाते. मोटार वाहन कायद्यातील कलम १८८ नुसार मद्यपान करून वाहन चालवल्याच्या आरोपाखाली कोणत्याही व्यक्तीची ‘पावती फाडण्याचा’ अधिकार घटनास्थळावरील पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेला नाही, परंतु पोलीस अशा व्यक्तीला 24 तासांच्या आतमध्ये प्रथम श्रेणी न्यायाधीशांसमोर हजर करतील.

जेव्हा अशा व्यक्तीला प्रथम श्रेणी न्यायाधीशासमोर हजर केले जाते, तेव्हा मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी निश्चित केलेला दंड भरण्याचा पर्याय त्याच्यासमोर ठेवला जातो, अन्यथा त्या व्यक्तीने आपल्यावर खोटा आरोप करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्या व्यक्तिद्वारे कोर्टात आपली फसवणूक केली आणि आपण दारू पिऊन गाडी चालवत नसल्याचे सांगण्यात येते. पुढे आपण फक्त लाल सिग्नल तोडला आहे अश्या गोष्टी आरोपीद्वारे कोर्टापुढे मांडताना दिसून येते.

आरोपीने गुन्हा कबूल न केल्यास त्याच्यावर कोर्टात खटला चालवला जातो. खटल्याचा अर्थ असा आहे की आता त्या व्यक्तीवर संपूर्ण खटला चालवला जाईल आणि खटल्यात सिद्ध झाल्यानंतर त्याने हा गुन्हा केला आहे समजून, त्याला शिक्षा होईल. जर त्या व्यक्तीने गुन्हा कबूल केला तर त्याला दंड भरावा लागतो. कलम 188 अन्वये, दारू पिऊन गाडी चालवल्यास ₹ 10000 चा दंड आकारला जातो. जर त्या व्यक्तीने गुन्हा कबूल केला तर त्याला हे ₹ 10000 जमा करावे लागतील. परंतु जर तो निर्दोष असेल आणि त्याने कोणताही गुन्हा केला नसेल, तर त्याला या खटल्याला न्यायालयात आव्हान देण्याचा आणि त्याच्यावरील आरोप मान्य न करण्याचा अधिकार आहे.

एखाद्या व्यक्तीने निर्दोष असल्याबद्दल गुन्हा कबूल करू नये कारण त्यामुळे व्यक्तीच्या प्रतिमेवरही वाईट परिणाम होतो. हा गुन्हा त्या व्यक्तीच्या रेकॉर्डवर कायमस्वरूपी राहतो. भविष्यात त्या व्यक्तीवर एखादा आरोप झाला तर सरकारी पक्ष त्या व्यक्तिला जमीन मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न करतील.

आता कलम 188 नुसार खटला सुरू झाल्यानंतर या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब घेतले जातात, मशिनद्वारे सांगितलेल्या तपासाचा विचार केला जातो आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्यास त्याचे कोर्टसमोर जबाब घेतले जातात. साक्षीदारांची उलटतपासणी केली जाते, त्यानंतर कोर्ट खटल्याचा निर्णय देते.

खटल्याच्या कार्यवाहीसाठी आरोपीला जामीन घ्यावा लागतो, त्याच्या बाजूने आरोपीचा जामीन घेणार्‍या व्यक्तिला न्यायालयासमोर जामीन जमा करावा लागतो. निरपराध लोकही अशा आरोपात गुन्हा स्वीकारतात आणि दंडाची रक्कम भरतात, ही पद्धत योग्य नसतानाही दिसून येते. निर्दोष व्यक्तीने खटला चालवला पाहिजे आणि सर्व साक्षीदारांना न्यायालयात बोलावले पाहिजे, जेणेकरून त्याने दारू पिऊन गाडी चालवली नाही हे न्यायालयात सिद्ध होईल.

या प्रकरणात खटल्याची कार्यवाही होऊनही कोणत्याही प्रकारचा तुरुंगवास नाही. कलम 188 अन्वये कारावासाच्या शिक्षेची तरतूद असली, तरी त्यावर तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, इतका मोठा गुन्हा नाही. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला तरी न्यायालय शक्यतो दंड करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे खटल्याच्या कामकाजाला घाबरून न जाता तो निर्दोष असल्यास त्याची बाजू न्यायालयासमोर मांडावी.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.