आपल्याकडे हिंदू वारसा हक्क कायदा हा एक स्वतंत्र कायदा आहे. मात्र असे असूनही हिंदू वारसा हक्क कायदा त्या कायद्यानुसार विविध वारसांना मिळणारे हक्क आणि अधिकार हा विषय काहीसा क्लिष्ट राहिलेला आहे. सहाजिकच त्यामुळेच आजही एखाद्या वडिलोपार्जित संपत्ती मध्ये नक्की कोणत्या कोणत्या वारसांना हक्क किंवा अधिकार आहे, असे हक्क किंवा अधिकार असतील तर त्याची व्याप्ती काय आहे, याविषयी अनेकानेक प्रकरणांमध्ये वाद हे निर्माण होतात.
या वादामध्ये अजून एक महत्त्वाचा वाद असतो तो म्हणजे विधवेच्या हक्कासंदर्भात! समजा एखाद्या पत्नीच्या पतीचे निधन झाले आणि ती विधवा झाली आणि त्या वीधवेने जर पुनर्विवाह केला. तर अशा पुनर्विवाहित विधवेला पहिल्या पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आहे किंवा नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयासमोर एका याचिकेद्वारे उपस्थित झालेला होता.
आता या याचिकेची किंवा या प्रकरणाची सर्वसाधारण वस्तुस्थिती लक्षात घेतली तर उदाहरण, ह्या पत्नीने पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरं लग्न केलं म्हणजे पुनर्विवाह केले. तिचा पहिला पती होता तो रेल्वे मध्ये नोकरीला होता आणि सहाजिकच त्याच्या निधनानंतर कोणत्याही सरकारी नोकराला निधनानंतर जे लाभ मिळतात तसेच लाभ त्या पतीला म्हणजेच त्यांच्या वारसांना मिळणार होते.
आणि त्या लाभांमध्ये जे नॉमिनेशन असतं ते पत्नीच्या नावे करण्यात आले होते. सहाजिकच या सगळ्या परिस्थितीच्या आधारे त्या रेल्वेने ते जे काही लाभ किंवा पैसे मिळणार होते त्याचा काही भाग हा पत्नीला सुद्धा दिला, जीच दुसरे लग्न झालं होत. आता हे त्या निधन झालेल्या व्यक्तीच्या आईला म्हणजेच त्याच्या पत्नीच्या सासूला मान्य नव्हतं.
म्हणून तिने तिकडच्या न्यायालयामध्ये एक दावा दाखल केला आणि तो दावा मंजूर करण्यात आला. की तिचा दावा हा होता की, या पत्नीला काही अधिकार नाही, तिचं दुसरं लग्न झालेला आहे, त्यामुळे सगळे पैसे मला मिळाले पाहिजे, हा तिचा दावा मंजूर करण्यात आला. मात्र याच गडबड अशी झाली की या दाव्याचे कामकाज चालू असतांना किंवा निकालाच्या आधी त्यातला काही भाग हा दुसरा विवाह केलेल्या पत्नीला देऊन टाकला जातो.
सहाजिकच या न्यायालयाच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये अपील करण्याचा आणि ते अपील मंजूर करण्यात आलं. आणि जिल्हा न्यायालय असं म्हणाला की त्या पत्नीला सुद्धा मयत पतीच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्क आणि अधिकार असल्यामुळे तिला त्या पैशाचा काही भाग मिळणं हे योग्य होतं. आता हा जो जिल्हा न्यायालयाच्या निकाल आला त्यावेळी त्या विरोधात अपील करण्यात आलं आणि ते अपील आल मुंबई उच्च न्यायालयामध्ये.
आता या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्यतः 2 कायद्यासंदर्भात वाद उद्भवला. एक म्हणजे हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट, आणि दुसरा हिंदू सक्सेशन ऍक्ट. आता हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट हा कायदा सुद्धा रद्दबातल झालेला आहे. आणि हिंदू सक्सेशन ऍक्ट यामधील कलम 24 संदर्भात विशेषत्वाने वादविवाद झाले, तर हे कलम 24 सुद्धा आता रद्दबातल झालेला आहे. हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 मध्ये नक्की काय तरतूद होती तर त्यामध्ये विधवा पत्नीच्या पुनर्विवाह संदर्भात तरतूद करण्यात आलेली होती.
जर एखाद्या महिलेने पहिल्या पतीच्या निधनानंतर म्हणजे ती विधवा झाल्यानंतर जर दुसरं लग्न केलं तर तिला वारसा हक्क मिळणार नाही. अशा स्वरूपाची तरतूद हिंदू सक्सेशन ॲक्ट कलम 24 मध्ये करण्यात आली होती. मात्र कालांतराने म्हणजे 2005 सली हिंदू सक्सेशन ॲक्ट मधील कलम 24 हेसुद्धा रद्दबातल करण्यात आलेला आहे.
त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयापुढे दोन महत्त्वाचे प्रश्न होते, की या दुसर लग्न केलेल्या विधवेला काही वारसा हक्क आहे का ? आणि जर असेल तर त्याची व्याप्ती किती ? आता या प्रश्नाचा उत्तर देतांना मुंबई उच्च न्यायालयाने तेव्हा वैध असलेला हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 आणि हिंदू विडोज रीमॅरेज ऍक्ट ह्या दोन्ही कायद्यांचा एकत्रितपणे साकल्याने विचार केलेला आहे. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट कलम 24 यामध्ये अशी विशिष्ट तरतुद होती की ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो त्या दिवशी जर पुनर्विवाह झालेला असेल तर त्या पुनर्विवाहित पत्नीला वारसा हक्क मिळणार नाही.
सहाजिकच या तरतुदी मधलं जेव्हा वारसा हक्क निर्माण होतो हे शब्द इंग्लिश मध्ये (ऑन द डेट में सक्सेशन ओपन) असे मुद्रित केलेले आहे ते अत्यंत महत्वाचे होते. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयात अशा निष्कर्षांप्रत आलं की कायदा करणाऱ्या विधीमंडळांनी जेव्हा कायदा केला आणि नंतर ऑन द डेट में सक्सेशन ओपनस् असे विशिष्ट शब्दप्रयोग वापरले. याचाच अर्थ ज्या दिवशी वारसा हक्क निर्माण होतो त्या दिवशी पुनर्विवाहित जर पत्नी असेल तर तिला हक्क अधिकार मिळणार नाही असा त्याचा अर्थ होतो.
आणि याचा व्यत्यास किंवा याचाच उलट अर्थ म्हणजे जर वारसा हक्क निर्माण झालेल्या दिवशी त्या विधवेचा पुनर्विवाह झालेला नसेल तर तिला हक्क आणि अधिकार निश्चितपणे मिळतील. या प्रकरणांमध्ये काय झालं होतं तर पतीचे निधन हे एप्रिल 91च्या सुमारास झालं होतं. आणि त्यानंतर साधारण महिन्याभराने या पत्नीने म्हणजे या विधवा पत्नी दुसरे लग्न केलं होतं. आता ऑन द डेट सक्सेशन ओपन हा जर आपण उल्लेख लक्षात घेतला तर पतीच्या मालमत्तेचा वारसाहक्क कधी निर्माण झाला किंवा कधी उद्भवला तर जेव्हा त्या पतीचे एप्रिल मध्ये निधन झालं तेव्हा.
साहजिकच त्या दिवशी म्हणजे जेव्हा पहिल्या पतीचे निधन झालेला आहे त्या दिवशी त्याची पत्नीही विधवा होती तिने दुसरं लग्न केलेलं नव्हत. सहाजिकच नंतर दुसरे लग्न केलं म्हणून त्या पत्नीचा पहिल्या पतीच्या मालमत्तेत ला वारसा हक्क नाहीसा होत नाही असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेत दिलेला आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या लाभामध्ये त्या पत्नीचा नक्की हिस्सा किती ? पण तो जो मयत पती होता त्या क्लास वन म्हणजे वर्ग-1 वारसांमध्ये आई आणि पत्नी या दोघांचाही समावेश होता.
सहाजिकच त्याची जी काही मालमत्ता असेल त्यामध्ये या दोघींना म्हणजे आईआणि दुसरा विवाह केलेल्या पत्नीला दोघांनाही हक्क आणि अधिकार मिळेल हेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने एकदा स्पष्ट केलेला आहे. हा निकाल विशेषतः ज्या विधवांचा पुनर्विवाह होतो त्यांच्या वारसाहक्काच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे.फ जेव्हा तेव्हा आपल्याला एखाद्या विधवेला जिने पुनर्विवाह केलेला आहे तिला जुन्या किंवा मयत पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क आहे किंवा नाही हे ठरवायचं असेल तर आपल्याला या उच्च न्यायालयाच्या निकालाला प्रमाणे ज्या दिवशी पहिल्या पतीचे निधन झाले.
त्या दिवशी तिला हक्क किंवा अधिकार होते किंवा नव्हते हा प्रश्न स्वतःला विचारायला लागले. आणि जर त्या दिवशी त्या पत्नीला अधिकार असतील तर त्या दिवसानंतर तिने केवळ दुसरं लग्न केलं म्हणून तिचे हक्क आणि अधिकार नाहीसे होणार नाही. तिला तिचे वारसाने मिळणारे हक्क आणि अधिकार हे निश्चितपणे मिळतील हे या निकालाने स्पष्ट केले आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
This is not justice,it’s only judgement but according to my opinion…Benefits goes directly in the basket of remarried woman.
If the widow woman want to be a remarried means she is interested in taking Benefits from second hasbund.since she must leave Benefits for death son’s mother.