दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची गाडी वापरणे किंवा आपली गाडी आपल्या एखाद्या परिचिताने वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे का? याविषयी माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार, आपण एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची गाडी वापरणे किंवा आपली गाडी आपल्या एखाद्या परिचिताने वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे का? या विषयाची आपण आज माहिती करून घेऊया. आपल्यापैकी कोणीतरी मला एका व्हिडिओची लिंक ई-मेल केली होती

आणि त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची गाडी वापरत होता किंवा चालवत होता आणि त्या वाहनाला पोलिसांनी तपासणी करता थांबवली आणि जेव्हा पोलिसांनी त्या कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा ती व्यक्ती त्या गाडीच्या मालकाचा कुटुंबीय नसल्याचं बाब निष्पन्न झाली.

तेव्हा त्यांचा असं म्हणणं पडलं की एखाद्या व्यक्तीची गाडी त्या गाडीचा मालक म्हणजे तो स्वतः किंवा त्याचे कुटुंबीय यांशिवाय इतर कोणासही वापरण्यास परवानगी नाही आणि तसं जर झालं तर तो कायद्याने गुन्हा आहे. आता बरेचदा आपणही काही वेळेला दुसऱ्याची गाडी घेऊन कामाला किंवा फिरायला जातो,

काही वेळेला आपली गाडी काही इतर व्यक्ती आपले परिचित असतात ते कामाला किंवा फिरायला घेऊन जातात हे आणि सर्रास होणारी गोष्ट आहे असं नाहीये की हे एक दोन घटनांमध्ये होत असतं आपल्या समाजामध्ये ही अगदी नियमितपणे आणि सर्रास पणे घडणारी गोष्ट आहे.

आता या पार्श्वभूमीवर जर एखादी सर्रास घडणारी गोष्ट गुन्हा असेल तर त्या बाबत ह्या ज्या घटना घडतात किंवा आपण ज्या एकमेकांच्या गाड्या वापरतो तो जर गुन्हा ठरत असेल तर आपल्याला तसं करणं बंद करायला लागेल मात्र वस्तुस्थिती तशी आहे का?

याचा तपास करायचा जर झाला तर आपल्याला मोटार वाहन कायदा आणि तो मोटार वाहान कायद्या अंतर्गत बनवण्यात आलेले नियम यामधील कायदेशीर तरतुदींची माहिती घेणे क्रमप्राप्त ठरतं त्यानुसार मोटार वाहन कायदा आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम याचा जर आपण अवलोकन केलं किंवा त्याचं जर आपण अभ्यास केला तर एकाची गाडी दुसऱ्याने वापरणे हा गुन्हा असल्याची कोणतीही कायदेशीर तरतूद त्या कायद्यामध्ये किंवा नियमांमध्ये अजिबात नाही.

आता एकाची गाडी दुसऱ्याने वापरणे हे काही परिस्थितीत गुन्हा ठरतो तर त्या तरतुदी कोणत्या आहेत: तर पहिली तर तरतूद आहे कलम 180 ज्यामध्ये समजा आपण एखाद्या अधिकार(लायसन्स) नसलेल्या व्यक्तीला गाडी चालवायला दिली तर असं करणं गुन्हा ठरतो.

म्हणजे आपल्याकडे गाडी चालवण्या करता लायसन्स असणं आवश्यक आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे लायसन्स नाही हे आपल्याला माहिती आहे आणि तरी सुद्धा जर आपण त्याला गाडी वापरायला दिली तर असं करणं गुन्हा ठरू शकतो आणि अशा गुन्हा करता तीन महिन्यापर्यंत कारावास किंवा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकता.

दुसरी कायदेशीर तरतूद आहे ती कलम 197 मध्ये आहे आता ती काय म्हणते तर एखाद्याने विनापरवानगी जर दुसऱ्याची गाडी घेतली तर असं करणं सुद्धा गुन्हा ठरतो म्हणजे माझी गाडी आहे ती मला न विचारता किंवा माझ्या परवानगीशिवाय माझ्या अपरोक्ष जर एखादी व्यक्ती घेऊन गेला आणि ती चालत असेल किंवा वापरत असेल तर असं करणं सुद्धा गुन्हा आहे

आणि या कलम 197 नुसार त्याला साधारणता तीन महिने कारावास किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, पण या दोन्ही ज्या कायदेशीर तरतूदी आहेत त्या म्हणजे 180 आणि 197 यामध्ये जर कोणत्या कायद्याचा भंग होत असेल म्हणजे लायसन्स नसलेल्या व्यक्तीला आपण गाडी देत असू

किंवा एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय जर ती गाडी भलत्याद्वारे वापरली जात असेल तर ते गुन्हे ठरतात. पण समजा एखाद्या व्यक्तीकडे लायसन्स आहे त्याने कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा भंग केलेला नाही त्याला ती गाडी त्याच्या मालकाच्या पूर्व परवानगीने मिळाली आहे.

म्हणजे त्या मालकाच्या अपरोक्षतेने किंवा विना परवाना देणे असे ही झालेले नाही असं जर नसेल तर मात्र असं कृत्य गुन्हा ठरण्या संबंधात कोणतीही कायदेशीर तरतूद मोटार वाहन कायदा किंवा मोटार वाहन नियम यामध्ये किमान मला तरी आढळून आलेली नाही.

आता या आधारावर आपण असे म्हणू शकतो की कलम 180 आणि 197 चा जर आपवाद वगळला तर इतरत्र म्हणजे इतर बाबतीत एका ची गाडी दुसऱ्याने वापरणे हा गुन्हा अजिबात नव्हे. एका ची गाडी दुसऱ्याने वापरण्याला कोणतेही कायदेशीर बंधन हे अजिबात नाही किमान मोटारवाहन कायदा आणि मोटार वाहन नियम यामध्ये तरी अशी काही तरतूद आढळून आलेली नाही.

आपल्यापैकी कोणाला त्यासंदर्भात इतर काही तरतूद माहिती असेल तरी ती आपण मला आवश्यक कळवा त्यांनी माझ्या ही ज्ञानात भर पडेल. इतरांच्याही ज्ञानात भर पडेल आणि आपण या मुद्द्याला अजून जास्त योग्यतीने मांडू शकतो मात्र मी ज्या प्रकारे मोटार वाहन कायदा आणि नियम वाचून पाहिलेले आहेत त्यामध्ये तरी एका ची गाडी दुसऱ्याने चालवणे या कृत्याला गुन्हा ठरविण्यात आल्याचे कोणतीही कायदेशीर तरतूद नाही.

याचा आपल्याला उपयोग काय तर जेव्हा आपली गाडी आपण दुसऱ्याला देऊ किंवा आपण दुसऱ्याची गाडी घेऊन जाऊ तेव्हा जर आपल्याला असं थांबवलं गेलं आणि तपासणी केली. आणि तिथे जर त्यांनी दंडात्मक कारवाई करण्याबद्दल आपल्याला सांगितलं तर त्यांने घाबरून न जाता कोणत्या कायदेशीर तरतूदीच्या आधारे कृत्य गुन्हा आहे

त्याला किती दंड आहे त्याला किती कैद होऊ शकते म्हणजे त्याला काय शिक्षा होऊ शकते. याचं स्पष्टीकरण तुम्ही त्या वाहतूक पोलिसाला किंवा पोलिसाला विचारलं पाहिजे कोणत्याही कायदेशीर तरतुदीचा जर आपण भंग करत असू तर आपण नक्की कोणत्या कायदेशीर तरतुदीचा भंग केलाय त्याला काय शिक्षा होऊ शकते हे जाणून घेण्याचा एक नागरिक म्हणून आपल्याला निश्चितपणे अधिकार आहे.

म्हणून कोणीतरी तुम्हाला थांबवलं कोणीतरी तुम्हाला सांगताय तुम्ही करताय हे बरोबर नाही हा गुन्हा आहे म्हणून त्यांने घाबरून अजिबात जाऊ नका जर आपल्या हातून गुन्हा झाला असेल तर त्याला दंड भरून आपण त्यातून कायदेशीर मार्गाने सुटू शकतो.

एका ची गाडी दुसऱ्याने चालवली म्हणजे काही फार मोठा प्रमाणात किंवा फार मोठा अपराध केलेला नाहीये. माझ्या मते तर कायदेशीर तरतुदीनुसार अपराधच नाहीये त्यामुळे पहिल्यांदा हे कृत्य अपराध आहे असं जी कोणी व्यक्ती तुम्हाला सांगेल त्या व्यक्तीला कोणत्या कायदेशीर तरतुदी मध्ये हे कृत्य अपराध आहे याबद्दल स्पष्टीकरण विचारा

नाहीतर जर तो स्पष्टीकरण नाही देऊ शकला तर त्यांना दाद द्यायची किंवा त्यांनी घाबरून जायची काहीही आवश्यकता नाही. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण पोलिसांना किंवा इतरांना निश्चितपणे मान दिलाच पाहिजे ते आपला एक कर्तव्य आहे पण याचा अर्थ आपण कुठल्याही भूलथापांना बळी पडावं आणि घाबरून जावं असं मात्र निश्चितच नाही

केवळ याच बाबतीत नाही कोणत्याही बाबतीत जेव्हा तुमची गाडी थांबवली जाते किंवा तुमच्याकडून दंडाची मागणी केली जाते किंवा तुम्ही गुन्हा केलाय असं सांगितलं जातं तेव्हा तुम्ही अतिशय विनम्र भाषेत बाबा मी की काय केलं तो कोणत्या कायद्याच्या कोणत्या तरतूदीनुसार गुन्हा आहे त्याला किती शिक्षा आहे हे निश्चितपणे विचारू शकता.

एक नागरिक म्हणून तुमचा तो अधिकार आणि एक लोक सेवक म्हणून तर पोलीस किंवा इतर अधिकाऱ्यांच ते कर्तव्य आहे. की एखाद्या कायद्याचा जर भंग झाला असेल त्याची माहिती देणं माहिती मिळणे हा आपला अधिकार आणि माहिती देणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.