मृत्यू पत्राआधारे मालमत्ता एखाद्याच्या नावावर करण्याची प्रक्रिया काय आहे? जाणून घ्या मृत्यू पत्रासंबंधी सखोल माहिती.

कायदा

मृत्यू पत्राबद्दल आपण सिनेमा, मालिकांमध्ये पाहिलेच असेल. याबद्दल बरीचशी माहिती ऐकून असाल. परंतु आपण आपल्या घरामद्धे किंवा नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे रोजच्या जीवनात बहुतांश लोक मृत्यू पत्र करत नाहीत. भारतामध्ये मृत्यू पत्राबाबत म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. यामुळेच न्यायालयांमद्धे भावा-भावामद्धे, भाऊ-बहिणीमद्धे किंवा भावकीमध्ये प्रोपार्टीचे असंख्य दावे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज आपण या लेखामद्धे मृत्यू पत्राबाबत माहिती जाणून घेऊया. या लेखामद्धे मृत्यू पत्र म्हणजे काय, ते कसे केले जाते, एखाद्या मृत्यू पत्राची अंमलबजावनी कशी करावी याबद्दल सखोल माहिती घेऊया.

मृत्यू पत्र म्हणजे काय? : मृत्यू पत्र हा एक कायदेशीर दस्त आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘आपल्या मृत्यू नंतर आपल्या प्रॉपर्टीचे वाटप कसे करावे, कोणत्या व्यक्तिला काय द्यावे या सर्व बाबी नमूद असलेला दस्त.’ एखादा व्यक्ति हयात असताना स्वतःच्या मालकीच्या प्रॉपर्टी बद्दल मृत्यू पत्र बनवून ठेवू शकतो. जो व्यक्ति मृत्यू पत्र बनवते, ती व्यक्ति हयात असे पर्यंत या मृत्यू पत्रात बदल करू शकते किंवा तो मृत्यू पत्राचा दस्त मागे देखील घेऊ शकते. मृत्युपत्राचा कायदा हा हिंदू, मुस्लिम, पारशी वगैरे धर्मांकरिता थोड्या फार वेगळ्या स्वरूपात काम करतो. हिंदू व्यक्तींच्या बाबतीत हिंदू वारसा कायदा 1956, कलम 30 मधील तरतुदींनुसारच होणे आवश्‍यक ठरते.

मृत्यू पत्र कोण बनवू शकतो? : कोणतीही सज्ञान व्यक्ति, जिचे मानसिक संतुलन ठीक आहे ती आपल्या मालकीच्या प्रॉपर्टी बद्दल मृत्यू पत्र बनवून ठेवू शकते. असे मृत्यू पत्र हे कायद्याने वैध मानले जाते. एखादा व्यक्ति जो सज्ञान आहे, पण काही कारणामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले असेल परंतु पुढे तो उपचार घेऊन बरा झाल्यानंतर मृत्यू पत्र बनवू शकतो. असे मृत्यू पत्र देखील वैध मानले जाते. सामान्यपणे असंतुलित असलेला मनुष्य मृत्यूपत्र बनवू शकतो जेव्हा तो संतुलित स्थितीत असेल. मात्र, जर एखाद्या व्यक्तिला आपण काय करतो आहोत हे कळत नसेल, तर अशा मन:स्थितीत ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकत नाही.

मृत्यू पत्र नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे का? : मृत्यूपत्र हे महत्वाचे दस्त आहे, ते लिखिल स्वरुपात असणे बंधनकारक आहे परंतु ते नोंदणीकृत असणे बंधनकारक नाही. मृत्यू पत्राला कोणत्याही प्रकारच्या मुद्रांक शुल्काची आवश्यकता नाही. परंतु मृत्यू पत्राच्या खरेपणाबाबत कोणी शंका उपस्थित करू नये, यासाठी मृत्यू पत्राची नोंदणी करण्याचा सल्ला कायदेतज्ञ देतात. अश्या परिस्थिमद्धे मृत्यू पत्र नोंदणी करिता १०० रुपये इतके नोंदणी शुल्क आकरण्यात येते. भारतीय नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत मृत्यूपत्र सुरक्षित ठेवण्याची तरतूद आहे. मृत्यूपत्र असलेले सील बंद पाकीट, त्यावर मृत्यूपत्र करणार्याचे नाव किंवा त्याच्या एजेंटचे नाव लिहून कुठल्याही निबंधकाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी देता येते.

मृत्यू पत्राची अंमलबजावनी कशी करावी? : जो पर्यन्त एखाद्या मृत्यू पटरबद्दल कोणताही वाद निर्माण होत नाही तो पर्यंत कोणताही सरकारी अधिकारी, ज्याच्याकडे मृत्यूपत्राच्या अंमलबजावनीची जबाबदारी असते तो कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही, किंवा कोर्टाचा हुकूमनामा सादर करा असे म्हणू शकत नाही. ज्या व्यक्तीच निधन झालेलं आहे त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला आणि मालमत्तेवरील नाव बदलण्याकरिता अर्ज पार पडून मालमत्तेवरील नवे बदलली जातात. मात्र असं असूनही काही वेळा प्रोबेटचा आग्रह केला जातो. हेयरशिप सर्टिफिकीट अर्थात वारस प्रमाण पत्र आणि प्रोबेट यांची प्रक्रिया जवळपास एकसमान आहे.

जर मृत्यू पत्रामद्धे प्रशासक नेमण्यात आलेला असेल, तर त्या प्रशासकाकडे या मृत्यू पत्राच्या अंमलबजावनीची जबाबदारी दिलेली असते. अशा वेळी सक्षम न्यायालयातून लेटर ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन हे त्या व्यक्तीच्या लाभमद्धे घ्यावे लागते. एकदा ते लेटर मिळाले की ती व्यक्ति मृत्यू पत्राच्या अंमलबजावनीची करू शकते.

जर आपण प्रेसिडन्सि टाऊन अर्थात मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली या शहरांमध्ये राहत असू तर प्रोबेट घेणे बंधनकारक आहे. हे प्रोबेट देखील सक्षम न्यायालयामधून घेता येते. कोर्टाने प्रोबेट सर्टिफिकेट  देणे म्हणजे संबंधित मृत्यूपत्र हे अस्सल आहे आणि कायदेशीरपणे अंमलात आणलेले आहे अशी पुष्टी देणे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा