ई-श्रम पोर्टल (E-Shram Portal) काय आहे? ।। ई-श्रम किंवा यूएएन कार्डचे फायदे काय आहेत ?।। रजिस्ट्रेशन कसे करावे? याविषयी माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शेती शैक्षणिक

ई-श्रम पोर्टलच्या मदतीने कामगारांचा डेटा आणि माहिती गोळा केली जाईल आणि मग त्याच्या आधारावर सरकार कामगारांसाठी योजना आणि नियम बनवेल. योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहोचेल आणि याची सरकार खात्री करेल.

सरकारच्या वतीने, देशातील सर्व कामगारांना ओळखपत्र आणि आधार कार्डच्या धर्तीवर त्यांच्या कामाच्या आधारे श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. या आधारावर सरकार कामगारांची नोंद तयार करेल. ई-श्रम पोर्टलवर सुमारे 38 कोटी कामगारांची नोंदणी करण्याची सरकारची तयारी आहे.

यूएएन कार्ड म्हणजे काय? : ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर अर्जदारांना एक यूएएन कार्ड मिळेल ज्यात एक यूआयएन एक युनिक क्रमांक असेल. यूआयएन द्वारे नियोक्ता कौशल्य, शैक्षणिक पात्रता आणि योजनांशी संबंधित माहिती यांसारख्या कामगारांची संपूर्ण माहिती तपासली जाऊ शकते.

ई-श्रम किंवा यूएएन कार्डचे फायदे काय आहेत ? : भारत सरकार असंगठीत क्षेत्रातील कामगार आणि मजूर यांच्या फायद्यासाठी अनेक योजना चालवते. मात्र कामगारांच्या अनभीज्ञतेमुळे या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचत नाही आणि ते अशा कल्याणकारी योजना आणि उपक्रमांपासून वंचित राहतात.

मात्र या ई-श्रम किंवा यूएएन कार्डमुळे कामगारांना व मजुरांना विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळू शकेल. आर्थिक मदत मिळू शकेल. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत विविध लाभ मिळू शकतील. स्थलांतरित मजुरांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेता येणे शक्य होईल. कामगारांना त्यांच्यासाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येईल.

ई-श्रम किंवा यूएएन कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो ? : जे लोक असंघटित क्षेत्रात काम करत आहेत व ते ई-श्रम कार्डसाठी पात्र आहेत असे लहान व सीमान्त शेतकरी, सुतार रेशीमपालन कामगार, मीठ कामगार, पशू पालक, माछिमार, सॉ मिल कामगार, इमारत आणि बांधकाम कामगार, लेदर कामगार, घरगुती कामगार,

केशकर्तन करणारे कामगार, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षा ओढणारे, ऑटो चालवणारे, घरकाम करणारे, रस्त्यावरील विक्रेते, आशा कामगार, दूध विक्रेते शेतकरी, स्थलांतरित कामगार, लेबलिंग आणि पॅकिंग कामगार अशा प्रकारचे असंगठीत कामगार अर्ज करू शकतील.

ई-श्रम किंवा यूएएन कार्डसाठी अर्ज कुठे करावा, ई-श्रम पोर्टलवर काम नोंदणी कशी होणार ? : ई-श्रम किंवा यूएएन कार्डसाठी अर्ज करण्यास इच्छुक कामगार सर्व आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या CSC केंद्राला भेट देऊ शकतात. किंवा मग ई-श्रमची जी अधिकृत वेबसाईट https://register.eshram.gov.in/#/user. आहे त्यावर देखील नोंदणी केली जाऊ शकते.

यासाठी कामगाराला जन्मतारीख, होम टाऊन, मोबाईल नंबर आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती द्यावी लागेल. याशिवाय आधार कार्ड क्रमांक आणि बँक खात्याचा तपशील टाकावा लागेल. ही सर्व माहिती दिल्यानंतर कामगार स्वतःची नोंदणी करू शकतात. ही सर्व माहिती दिल्यानंतर कामगारांना एक ई-श्रम कार्ड म्हणजेच यूएएन कार्ड दिले जाईल, ज्यात त्यांना 12 क्रमांकाचा युनिक कोड दिला जाईल. यूएएन कार्डची मर्यादा आजीवन आहे.

आवश्यक कागदपत्रे काय आहेत ?: आधार कार्ड, बँक पासबूक, वीज बिल/रेशन कार्ड, सक्रिय मोबाइल नंबर, पर्यायी कागदपत्रे: शैक्षणिक कागदपत्रे, उत्पन्न कागदपत्रे कौशल्य प्रमाणपत्रे, व्यवसाय प्रमाणपत्र

पात्रता निकष ?:  कामगाराचे वय 16- 59 च्या दरम्यान असावे, कामगार EPFO आणि ESIC चे सदस्य नसावा. कामगार आयकर भरणारा नसावा. कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत असणे आवश्यक आहे. कामगार, राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक14434 यावर कॉल करून नोंदणीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. नोंदणीमध्ये काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांकावर उपाय देखील सांगितले जाणार आहेत.त्याचप्रमाणे 1800-1374-150 या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.