1 ब्रास बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतात किंवा विटांची संख्या कशी काढायची? ।। वीट बांधकाम ब्रास मध्ये कसे मोजायचे आणि एक ब्रास बांधकामासाठी किती विटा लागतात हे कसे काढायचे यासंबंधीची माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, 1 ब्रास बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतात किंवा विटांची संख्या कशी काढायची याविषयीची माहिती तसेच वीट बांधकाम ब्रास मध्ये कसे मोजायचे आणि एक ब्रास बांधकामासाठी किती विटा लागतात हे कसे काढायचे यासंबंधीची ही माहिती.

आता पहिला मुद्दा आहे की ब्रास मध्ये बांधकाम कसे मोजायचे? एक ब्रास म्हणजे शंभर चौरस फूट किंवा इंग्लिश मध्ये 100 स्क्वेअर फूट. आपल्याला बांधकाम ब्रास मध्ये मोजायचं झालं तर काय करायचं विटेची ची भिंत असणार आहे त्या भिंती चे क्षेत्रफळ त्याला भागेला 100 करायचं त्याची पद्धत आहे ब्रास=100 sq ft लांबी × उंची ÷ 100.

भिंतीची उंची फुटामध्ये घ्यायची आणि भिंतीची लांबी सुद्धा फुटामध्ये घ्यायची व त्यांचा गुणाकार करायचा, मग आपल्याला चौरस फुटामध्ये क्षेत्रफळ मिळून जाईल आणि क्षेत्रफळ आपल्याला मिळाले आहे त्याला भागेला 100 करायचं, म्हणजे आपल्याला ब्रास मध्ये उत्तर मिळेल. त्याचा हा फॉर्मुला लक्षात ठेवा.

भिंतीची लांबी × भिंतीची उंची भागेला 100 फक्त मोजमाप घेताना ते फुटा मध्ये घ्यायचे म्हणजे आपल्याला ब्रास मध्ये मोजमाप करता येते. आता समजा २० फूट लांबी आणि १० फूट उंची अशी भिंत आहे तर ती भिंत किती ब्रास ची असणार आहे तर यामध्ये आपल्याला 20ft × 10ft ÷100 आता आपल्याला माहिती आहे

की 1 ब्रास= 100 sq ft. 20ft × 10ft = 200ft म्हणजेच 200ft ÷ 100 =2 ब्रास म्हणजेच जी भिंत आपण बांधणार आहोत ती 2 ब्रास ची असणार आहे. आता यानंतर आपण 1 ब्रास बांधकामासाठी किती विटा लागतात हे आपण पाहणार आहोत यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे.1) भिंती ची साईज 2)विटे ची साईज म्हणजेच जि भिंत आपल्याला बांधायची आहे

त्या भिंतीची लांबी रुंदी उंची आपल्याला माहिती पाहिजे व बांधकामासाठी वापरणाऱ्या विटे ची लांबी रुंदी उंची आपल्याला माहिती पाहिजे उदाहरणार्थ समजा आपल्याला एक ब्रास बांधकाम करायचे आहे भिंत= 10 ft × 10 ft × 4 इंच. वीट= 9 इंच × 4 इंच × 3 इंच चार इंच जाडीची भिंत आपल्याला बांधायची आहे तेव्हा किती विटा लागतील हे काढायची आहे.

सर्वप्रथम आपण भिंतीचे घनफळ काढायचे. त्यानंतर एक फॉर्मुला आहे. फुटाचे रूपांतर इंचात करायचे म्हणजेच आपल्याला 10 फूट × 12 करायचे= 120. भिंत= 120 इंच × 120 इंच × 4 इंच ÷ वीट= 9 इंच × 4 इंच × 3 इंच याचे मोजमाप केले तर उत्तर येईल 534 विटा लागतील

पण आपल्याला 534 पेक्षा कमी विटा लागतील कारण आपण बांधकामासाठी सिमेंट मॉर्टर व वाळूचे मिश्रण वापरणार आहोत. पण नेहमी विटांची संख्या जास्त घ्यावी कारण विटा बांधकामात वापरताना विटा वेस्ट होतात किंवा तोडफोड होऊ शकतात त्यामुळे विटा जास्त घ्याव्यात जर आपल्याला तंतोतंत काढायचे असेल

तर विटा 15 ते 20 टक्के कमी करा फक्त फॉर्मुला लक्षात ठेवा. भिंती ची साईज भागेला विटांची साईज म्हणजे आपल्याला विटांची संख्या मिळून जाईल मग ती कोणत्याही साईज ची भिंत असो विट असो. फार्मूला चा वापर करून आपण विटांचे संख्या काढू शकतो.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.