1 फेब्रुवारी पासून ‘हे’ रेशन कार्ड होणार बंद II शासन निर्णय आला II सर्वांची होणार चौकशी।। सर्वसामान्यांसाठीची महत्वाची माहिती जाणून घ्या सवीस्तरपणे!

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, राशन कार्ड विषयी अतिशय महत्वाची आणि तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे असा एक जीआर म्हणजेच शासनाचा मोठा निर्णय आलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे राशन कार्ड हे रद्द करण्यात येणार आहे. प्रत्येकाला आपल्या राशन कार्ड मध्ये डॉक्यूमेंट व्हेरीफिकेशन म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.

त्याबाबतचा शासनाचा शासन निर्णय आलेला आहे तर जाणून घेऊ या कुणाच्या शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहेत आणि कुणाच्या चालू राहणार आहेत? अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा दिनांक 28 जानेवारी 20 21 चा शासन निर्णय आहे. याची प्रस्तावना खालील प्रमाणे आहे.

केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिका यांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे,

त्यामुळे अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्या करिता खास शोध मोहीम राबविणे आवश्यक आहे. राज्यातील कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपूर्णा, केसरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोधमोहीम दिनांक 01/02/2021 ते 30/04/2021 या कालावधीमध्ये राबविण्यात यावी. सदर शोधमोहिमेत खालीलप्रमाणे कार्यवाही करावे.

अ)सध्याच्या शिधापत्रिकाधारकांकडून मोहीम घेणे: 1)शहरातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करावी. 2)वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील/कार्यालयातील रास्तभाव/ अधिकृत शिधावाटप दुकानातून शासकीय कर्मचारी/ तलाठी यांचेमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत नमुना फॉर्म वाटप करण्यात येतील.

3)शासकीय कर्मचारी/ तलाठी यांनी संबंधित रास्त भाव दुकानात जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांना कडून माहिती भरून दिलेले फॉर्म स्वीकृत करून अर्जदाराने स्वाक्षरी दिनांकासह पोच देण्यात यावी. 4)फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते त्या भागात राहात असल्याचा पुरावा द्यावा.

पुरावा म्हणून उदा. भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकी बद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक,बँक पासबुक, विजेचे बिल,टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र (कार्यालयीन, मतदार ओळखपत्र /आधार कार्ड) इत्यादींच्या प्रति देता येतील. दिलेला पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधी पेक्षा जुना नसावा. 5)फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन आवश्यक जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व फॉर्म यादी सह संबंधित शासकीय कर्मचारी/ तलाठी यांनी क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावे.

वरील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी ही कार्यवाही करण्यासाठी उचित प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनतेला सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. म्हणजेच मित्रांनो 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत तुमच्याकडून या सर्व बाबी भरून घेतल्या जाणार आहेत हे लक्षात घ्यायला हवे. याच्यामध्ये काही अटी आहे,त्यावरून तुम्हाला समजेल की कोणाची राशन कार्ड रद्द होणार आहे किंवा नाही.

ब)आलेल्या माहितीची तपासणी करणे 1)वरीलप्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या नमुन्यांची त्यासोबतच कागदपत्रांची तपासणी पुरवठा क्षेत्रीय कार्यालयांनी करावी. 2)वरील छाननी केल्यानंतर पुरेसा पुरावा असलेल्यांची यादी गट अ म्हणून करावे तर गट ब मध्ये पुरावा न देणाऱ्यांची यादी करावी.

3)गट-अ यादीतील शिधापत्रिकाधारकांची शिधापत्रिका पूर्ववत चालू कार्यरत राहील. 4)गट-ब यादीतील शिधापत्रिका त्वरित निलंबित करण्यात याव्यात अशा शिधापत्रिकेवर शिधा वस्तू देणे त्वरित थांबविण्यात यावे व त्यानुसार दुकानदारस देण्यात येणाऱ्या नियतनात कपात करण्यात यावी.

5)वरील एक ते चार प्रमाणे कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्यात येईल. 6)गट ब यादीतील निलंबित केलेल्या शिधापत्रिकाधारकांना आणखी पंधरा दिवसांची मुदत देऊन त्या कालावधीत ते त्या भागात राहत असल्याबाबत सबळ पुरावा देण्यास सांगावे,आवश्यकतेनुसार पुरावा देण्यात मुदत वाढ देण्याचा विचार करावा. त्यानंतरही पुरावा न आल्यास पुरावा देऊ न शकलेल्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात. ही कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करावी.

तर मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे तुमचा रहिवासाचा पुरावा नसेल तर तुम्हाला आणखी पंधरा दिवसांची मुदत देऊन तो पुरावा सादर करण्यास सांगितले जाईल तर पुढील पंधरा दिवसात पुरावा सादर करता आला नाही तर मात्र तुमचे राशन कार्ड रद्द होऊ शकते. क)वरील अ व ब प्रमाणे कार्यवाही करताना घ्यावयाची दक्षता.

1)शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शिधावाटप अधिकाऱ्यांनी घ्यावा.

2)एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटुंबामध्ये देताना दोन्ही शिधापत्रिका बीपीएल अथवा अंत्योदय योजनेच्या असणार नाहीत. 3)वरील गट अ व गट ब मधील यादी जनतेस व प्रसिद्ध माध्यमात देण्यास प्रत्यवाय राहणार नाही. 4)पुराव्याचे चाचणी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्या बाबत पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी.

5)विदेशी नागरिकांना शिधापत्रिका दिलेली असणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. 2.वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील, खाजगी कंपन्यातील कर्मचारी, कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांच्या शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात याव्यात व त्यांच्या मागणीनुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी.

3.शोधमोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांच्या शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेचे मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्ती,मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे.

4.शिधापत्रिकांच्या तपासणीचा आढावा घेऊन तपासणी कार्यपद्धती व इतर बाबींसाठी जिल्हाधिकारी तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रांसाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये पुढीलप्रमाणे सदस्य असावेत.

5.शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्यात शासकीय अधिकारी/कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी व त्याबाबतची माहिती शासनास सादर करावी. 6.जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या आतील कार्यालयांना वितरित केलेले अर्ज तसेच शिधापत्रिकाधारकांना वितरित केलेले अर्ज व शिधापत्रिकाधारकांना कडुन माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा.

वरील प्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांचे विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेनंतर आढळून येणार्‍या शिधापत्रिका रद्द करण्यात येतील व त्या प्रमाणात रास्त व दुकानांकडे कोटा कमी करण्यात यावा. अपात्र शिधापत्रिका मोहिमेबाबत दिनांक 15 मे 2019 पर्यंत शासनास सादर करण्यात यावा.

तर मित्रांनो वरील माहितीवरून तुम्हाला कुणाच्या शिधापत्रिका रद्द होणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे हे लक्षात आले असेलच, तरीही जर तुमच्याकडे निवासाचा पुरावा नसेल तर तो तयार करून ठेवा. अन्यथा तुमचे राशन कार्ड बंद होऊ शकते.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.