एक गुंठे जमिनीचे खरेदी खत आणि सातबारावर नोंद होते का? ।। शेतजमिनीत लाईट पोल असल्यास भाडे मिळते का?।। वडिलांच्या मृत्यूनंतर आई मुलाच्या नावे मृत्युपत्र करू शकते का?।। फेरफार विरोधात दिवाणी दावा करता येतो का? ।। कबुलीजबाबाद्वारे खरेदी होते का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या !

एक गुंठे जमिनीचे खरेदी खत आणि सातबारावर नोंद होते का? ।। शेतजमिनीत लाईट पोल असल्यास भाडे मिळते का?।। वडिलांच्या मृत्यूनंतर आई मुलाच्या नावे मृत्युपत्र करू शकते का?।। फेरफार विरोधात दिवाणी दावा करता येतो का? ।। कबुलीजबाबाद्वारे खरेदी होते का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या !

प्रश्न 1- एक गुंठे जमिनीचे खरेदी खत आणि सातबारावर नोंद होते का? उत्तर- निश्चितच होऊ शकते. या अशा खरेदीला किंवा सातबारा नोंदीला तुकडे जोड,तुकडे बंदी कायदा सोडला तर इतर कुठल्याही कायद्याची बाधा किंवा निर्बंध निश्चितपणे नाही, पण जर एखाद्या विभागात अशा तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यानुसार अशा एक गुंठा जमिनीची तुकडे करून विक्री करणे यावर निर्बंध असेल,

तर अशा जमिनीची खरेदी करणे आणि त्याची स्वतंत्रपणे तुकडा करणे किंवा त्याचा स्वतंत्र सातबारा करणे हे काहीस कठीण होऊ शकते. मात्र जर तुकडे बंदी तुकडे जोड कायदा सोडला तर इतर कोणत्याही कायदेशीर तरतुदीनुसार अशा कुठल्याही एक गुंठा जमिनीची खरेदी आणि त्याची सातबारा नोंद यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण येत नाही.

प्रश्न 2- शेतजमिनीत लाईट पोल असल्यास भाडे मिळते का? उत्तर- सर्वसाधारणपणे वीज कंपनीला वीज पुरवठा करण्यासाठी लाईन पोल किंवा ट्रान्सफॉर्मर हे टाकावे लागतात आणि बरेचदा असे करताना जी जागा लागते ती भुईभाड्याने घेण्यात येते. बरेचदा ही जागा मोठी असते जसे की ट्रांसफार्मर करिता किंवा सब स्टेशन करिता तर ही जागा अगदी नाममात्र भाड्याने घेण्यात येते.

सहाजिकच ही जागा जसे की ट्रान्सफॉर्मर साठी किंवा सब स्टेशन उभारण्याकरिता जी जागा लागते जी की बऱ्यापैकी मोठी असते, ती जागा जर नाममात्र भुईभाड्याने घेत असेल तर लाइट पोल करता फार भाडे मिळण असे काही शक्य नाही. सगळ्यात आधी लाईट पोल आपल्या जमिनीत लावताना जर आपण एनओसी दिली असेल म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र दिले असेल,

किंवा नाममात्र भुईभाड्याचा करार केलेला असेल तर त्याच्या पलीकडे कोणतीही रक्कम आपल्याला भाडे म्हणून वसूल करता येणार नाही. जर आपण लाईट पोल करिता विनामोबदला ना हरकत प्रमाणपत्र दिले असेल तर आता त्या लाईट पोल साठी भाडे वसूल करणे जवळपास अशक्य आहे.

त्याकरता आपल्या शेतामध्ये किंवा जमीनीमध्ये जो लाईट पोल लावण्यात आला आहे त्यासंदर्भात आधी आपण कागदपत्रे जमा करावी म्हणजे आपण ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे का? काही करार केला आहे का? ही माहिती जर आपण गोळा केली तर त्या माहितीच्या आधारे मग आपल्याला त्या लाईट पोलच्या क्षेत्रफळा करिता भाडे मिळेल का? मिळणार असेल तर किती मिळेल?आणि ते वसूल करणं किती कठीण किंवा सोप्प आहे याचा निश्चित अंदाज बांधता येईल.

प्रश्न 3- वडिलांच्या मृत्यूनंतर आई मुलाच्या नावे मृत्युपत्र करू शकते का? उत्तर- वडिलांच्या मृत्यूपूर्वी वडिलांनी मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचा काय व्हावं याची काही तजवीज केलेली आहे का? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आधी शोधाव लागेलं. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपूर्वी जर मृत्यूपत्र करून ठेवलेला असेल,

आणि त्याच्या मृत्युपत्राची अंमलबजावणी जेव्हा त्याच्या मृत्यूनंतर करण्याची वेळ येथे तेव्हा त्या मृत्यूपत्रानुसार त्या मालमत्तेचे वाटप किंवा हस्तांतरण केले जाते आता अशा मृत्युपत्रामध्ये जर आईला म्हणजेच पत्नीला काही हिस्सा दिलेला असेल तर तो हिस्सा तिला निश्‍चितपणे मिळेल आणि मग त्याचं पुढे काय करायचं हा निर्णय तिला घेता येईल.

पण समजा अस होण्यापूर्वी जर काही मृत्यूपत्र करून ठेवलेला असेल तर मात्र त्या व्यक्तीच्या निधनानंतर पत्नी आणि मुलं या सर्वांचा समान अधिकार प्राप्त होतो. सहाजिकच वडिलांच्या मृत्यूनंतर आईला जो काही वारसा हक्क किंवा क्षेत्र मिळणार आहे त्याच मृत्यूपत्र ती निश्चितपणे करू शकते किंवा मृत्युपत्र नावे ती कुणालाही देऊ शकते,

पण त्याच्याकरिता पत्नीला म्हणजे आईला नक्की हिस्सा मिळाला आहे का? मिळाला असेल तर किती मिळाला आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईला वारसाहक्काने किंवा मृत्यू पत्राने काही हक्क, अधिकार हिस्सा किंवा क्षेत्रफळ मिळालेला असेल तर ते मिळालेल्या क्षेत्रफळ किंवा हक्क-अधिकार त्यासंदर्भात मृत्युपत्र करण्याचा पूर्ण अधिकार त्या पत्नीला म्हणजेच मुलांच्या आईला निश्चितपणे आहे.

प्रश्न 4- फेरफार विरोधात दिवाणी दावा करता येतो का? उत्तर- आपल्याकडे मालमत्तांचे संदर्भात दोन मुख्य न्यायालय आहेत. एक आहे दिवाणी न्यायालय आणि दुसरा आहे महसुली न्यायालय. या दोन्ही न्यायालयाचे अधिकार आणि कार्यक्षेत्र हे एकमेकांपासून पूर्णतः भिन्न आहेत आणि कोणत्याही न्यायालयाला दुसऱ्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात ढवळाढवळ करता येत नाही.

किंवा दुसऱ्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या बाबींवर कोणताही निर्णय किंवा निकाल देता येत नाही जेव्हा आपण फेरफार याचा विचार करतो किंवा त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा फेरफार हा एक महसुली अभिलेख असल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि त्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या नियमानुसार त्याला आव्हान जर द्यायचं असेल

तर ते फक्त आणि फक्त महसुली न्यायालयांमध्ये द्यावे लागेल. कोणत्याही महसुली अभिलेखा संदर्भात किंवा कोणत्याही महसुली अभिलेखातील नोंदी संदर्भात कोणताही दावा दाखल करण्याचे किंवा त्यावर आदेश देण्याचे असे कोणतेही अधिकार हे दिवाणी न्यायालयाला नाहीत.

दिवाणी न्यायालय महसुली अभिलेखा संदर्भात कोणताही दावा दाखल करून घेऊ शकत नाहीतो त्याचा निकालही देऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं तर आपल्याला फेरफार याविरोधात दिवाणी दावा करण हे अशक्य आहे. जर एखादा फेरफार चुकला असेल तर एखाद्या फेरफाराने एखाद्या कायद्याची पायमल्ली झालेले असेल तर त्याच्या विरोधात महसुली न्यायालयामध्ये सक्षम दाद मागू शकतो.

तसेच जर समजा फेरफार संबंधित काही दिवाणी अधिकार उदाहरणार्थ मालकी किंवा ताबा अशा स्वरूपाच्या अधिकारांचे उल्लंघन झालं असेल किंवा अशा प्रकारच्या अधिकारांचे उल्लंघन होण्याची संभावना असेल तर तेवढ्यापुरता दिवाणी दावा आपल्याला करता येऊ शकतो. मात्र एखादा फेरफार चुकलेला आहे, एखादा फेरफार दुरुस्त कर, ह्याच्या करता आपण दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही.

कारण दिवाणी न्यायालयाला असे कोणतेही अधिकार नाहीत थोडक्यात काय तर जर फक्त पेपर संदर्भात वाद असेल तर आपल्याला केवळ आणि केवळ महसुली न्यायालयांमध्ये जाता येईल. मात्र फेरफाराची अनुषंगाने इतर काही महसुली वाद उद्भवले असतील किंवा उद्भवण्याची संभावणा असेल तर ते एवढ्या मर्यादित कारणाकरिता आपल्याला दिवाणी दावा सुद्धा निश्चितपणे करता येईल.

प्रश्न 5- कबुलीजबाबाद्वारे खरेदी होते का? उत्तर- कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण किंवा खरेदी विक्री जेव्हापण करतो तेव्हा त्याच्या करता आपल्याला करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा,नोंदणी कायदा, मुद्रांक शुल्क कायदा या सगळ्या कायद्यांचा आणि त्यातील तरतुदींचा बारकाईने विचार करायला लागतो कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण हे वैध आणि कायदेशीर ठरवण्याकरता

ते हस्तांतरण किंवा तो करार, करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, मुद्रांक कायदा आणि नोंदणी कायदा या सगळ्या कायद्यांमधील कायदेशीर तरतुदींच्या चौकटीत बसणारा असला पाहिजे. जर यापैकी कुठल्याही कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन होत असेल तर असा करार कायदेशीर रित्या वैध आहे असे आपल्याला म्हणता येणार नाही.

कबुलीजबाबाला कराराचा कोणताही दर्जा देता येत नाही. सहाजिकच कबुलीजबाबाद्वारे खरेदी विक्री किंवा हस्तांतरण असं करता येण हे जवळपास अशक्य आहे. आता काही बाबतीत तर भूतकाळात असा करार झाला असेल आणि त्या भूतकाळात झालेल्या कराराला एखाद्याला आज रोजी मान्यता द्यायची असेल तर तेवढ्या मर्यादित कारणाकरता त्या जुन्या कराराला मान्यता देणारा करार किंवा घोषणापत्र किंवा कबुलीजबाब किंवा पुरवणी करार असं आपल्याला करता येईल.

मात्र जुन्या म्हणजे भूतकाळातल्या कराराला मान्यता देणे हा मर्यादित उपयोग जर सोडला परत या व्यतिरिक्त कोणत्याही मालमत्तेची खरेदी विक्रीकरिता किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्याकरता कबुलीजबाब आपण करता कामा नये. कारण असा कबुलीजबाब हा कायदेशीररित्या वैध निश्चितपणे नाही.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

admin

2 thoughts on “एक गुंठे जमिनीचे खरेदी खत आणि सातबारावर नोंद होते का? ।। शेतजमिनीत लाईट पोल असल्यास भाडे मिळते का?।। वडिलांच्या मृत्यूनंतर आई मुलाच्या नावे मृत्युपत्र करू शकते का?।। फेरफार विरोधात दिवाणी दावा करता येतो का? ।। कबुलीजबाबाद्वारे खरेदी होते का? या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या !

  1. माझी 1एकरजमीन आहे तर मला सरकारी मोजनी करायची आहे पण जमीन मालक त्यांच्या जमीन वाद निर्माण झाला असून या प्रकरणी सरकारी मोजनी होत नाही असे सांगत आहे तरी मला उपाय सांगा

  2. मी 1 गुंथा जमीन विकत घेतली आहे मला खरेदी करायची आहे पैन जमीन मालक बोलतो खरेदी हॉट नाही मी काय कर प्लीज् काही उपाय सांगा

Comments are closed.

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!