जन्म आणि मृत्यू या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या अत्यंत नैसर्गिक क्रिया आहेत. यातला जन्म हा तर शंभर टक्के नैसर्गिक प्रकारे होऊ शकतो. मृत्यूचा मार्ग काही सांगता येत नाही. काही मृत्यू नैसर्गिक असु शकता, तर काही मृत्यू हे अपघात किंवा अनैसर्गिक प्रकारेसुद्धा होऊ शकतात. पण ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो की एखादी व्यक्ती जन्माला येणं आणि एखाद्या व्यक्तीचं निधन होणे, नैसर्गिक कारणांनी असो किंवा अनैसर्गिक कारणांनी असो, हि एक साधारण प्रक्रिया नैसर्गिक आहे.
आपल्याकडे असे म्हणतात सुद्धा की, जी व्यक्ती जन्माला येते तीच कधी ना कधी निधन होणारच असत.आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जन्म आणि निधन हे दोन्ही एकंदर रीतीप्रमाणे होतं, तेव्हा कायद्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा जन्म दाखला, मृत्यू दाखला, त्यांच्या मालमत्तेची वाटणी किंवा त्या वारसांच्या नावे मालमत्ता हस्तांतरित करणे, या सगळ्या गोष्टी एका रितसर तुलनेने सोप्या मार्गाने होत जातात त्या करता विशेष काही करायची आवश्यकता नसते.
मात्र बरेचदा काय होतं की, काही वेळेला जन्म आणि मृत्यू या दोन घटनांच्या मध्येच एखादी व्यक्ती बेपत्ता होते किंवा परागंदा होते ज्याला आपण बोलीभाषेत माणूस हरवण असं म्हणतो. अशा परिस्थितीत होतं काय, की ती व्यक्ती जन्माला तर आलेली आहे त्यांचा जन्म दाखला हे सगळे डॉक्युमेंट असतात. मात्र ती व्यक्ती बेपत्ता झाल्याने त्याचा मृत्यू दाखला आपल्याला लगेच मिळू शकत नाही.
मग त्यांचा मृत्यूदाखला जवर मिळत नाही तोवर त्यांच्या नावांची जी काही मालमत्ता आहे, किंवा त्यांची बाकीची जी काही कायदेशीर कर्तव्य आहेत, संपत्ती आहे, त्यांची पुढे जबाबदारी जाणं हे फार कठीण मानलं जातं. म्हणजे मालमत्ता वारसांच्या नावावर कशी होणार?मालमत्ता जर त्यांनी व्हील केल असेल तर त्याची अंमलबजावणी कशी होणार?
कारण वारसाहक्काने किंवा मृत्यूपत्राने मालमत्ता पुढे जर हस्तांतरित व्हायचे असेल तर त्याच्या करता त्या मुळ व्यक्तीचं नाव निधन रेकॉर्डर येणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि असं निधन रेकॉर्डवर येत म्हणजे नक्की काय होतं? की जेव्हा त्याचे निधन होतं आणि त्यांचा मृत्यू दाखला आपल्याला प्राप्त होतो मात्र जेव्हा ती व्यक्ती बेपत्ता होते.
तेव्हा त्याची बोलीभाषेत आपल्याला बॉडी भेटत नाही. त्यामुळे ती व्यक्ती जिवंत आहे का मृत आहे? याबाबत आपण केवळ अंदाज बांधू शकतो. आणि जी व्यक्ती बेपत्ता झालेली आहे ती आज माझी हयात आहे किंवा नाही याविषयी ठोसपणे कोणीही काहीही सांगू शकत नाही. मग यामुळे त्याच्या पुढच्या पिढीमध्ये किंवा वारसांमध्ये मालमत्ते संदर्भात जी एक कोंडी होते ती फुटणार कशी?यासंदर्भात सुद्धा आपल्याकडच्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.
यातली म्हणून तर मुळ तरतूद आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. अर्थातच पुरावा कायदा कलम 108 मध्ये आहे. आता हे कलम 108 मध्ये म्हणजे, हे कलम थोडक्यात म्हणत की एखादी व्यक्ती बेप्पता होऊन सुद्धा सात वर्ष उलटले असतील आणि गेल्या सात वर्षांमध्ये त्याव्यक्तींचा साधारणतः ज्या लोकांची संपर्क झाला असता त्या लोकांचा सुद्धा त्या व्यक्तीशी जर संपर्क झालेला नाही तर अशी व्यक्ती हयात आहे किंवा जिवंत आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीची आहे, जो असं म्हणेन की अशी व्यक्ती जिवंत आहे.
म्हणजे एखादी व्यक्ती जर सलग सात वर्षे बेपत्ता असेल तर ती व्यक्ती मृत आहे असं गृहीत धरता येऊ शकतं.असं या कायद्यात सोप्या भाषेत सांगण्यात आलेला आहे.मात्र त्याच्या करता म्हणजे नुसती सात वर्ष झाली आपण सांगून आपलं कुणी ऐकणार नाही,कायदेशीर प्रक्रिया जर आपल्याला पार पाडायचे असेल तर त्याच्या करता आपल्याला आवश्यक टप्पे दरवेळेला पार पाडायला लागतील.
आता जेव्हा कोणतीही व्यक्ती बेपत्ता झाली,की तिच्या मृत्यूची नोंद आपल्याला जर मृत्यू दाखला हवा असेल तर आपल्या काही टप्पे पार पाडायला लागतात.आता ह्यात जो कालावधी दिलेला आहे तो सात वर्षाचा आहे.म्हणजे आपल्याला ती व्यक्ती गेली सातवर्ष बेपत्ता आहे,हे सिद्ध करणं आवश्यक आहे. कायदेशीर प्रक्रिया जर त्याच्या करता आपल्याला आवश्यक त्या टप्पे दर वेळेला पार पाडायला तेव्हा कोणत्याही व्यक्ती एकदा बेपत्ता झाली की तिच्या मृत्यूची नोंद होऊन आपल्याला जर त्याचा मृत्यू दाखला हवा असेल तर आपल्याला काही टप्पे पार पाडावे लागतात.
हे सिद्ध करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? जेव्हा कोणतीही व्यक्ती बेपत्ता होते,तेव्हा संबंधित पोलिस स्टेशनमध्ये ती व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद किंवा तक्रार नोंदवण्यात येते.आणि त्या तक्रारीचा जो काही दिनांक असेल तो आपण या सात वर्ष कालावधीचा पहिला दिवस किंवा सुरुवात म्हणून मी वरील 2000 मध्ये समजा गृहीत धरू शकतो.
उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बेपत्ता झाली आणि जानेवारी 2000 मध्ये ती व्यक्ती बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा देण्यात आली,तर सर्वसाधारणतः जानेवारी 2007 मध्ये ती व्यक्ती बेपत्ता असलेला अधिकृतपणे सात वर्षे पूर्ण होतील,आणि त्यानंतर या कलमाच्या अनुषंगाने आपण त्या व्यक्तीचे निधन घोषित करण्यात करतात आणि मृत्यू दाखला मिळण्याकरता,सक्षम दिवानी द्यायला मध्ये अर्ज करू शकतो. मात्र काही वेळा अशीसुद्धा अडचण येते की,व्यक्ती बेपत्ता होते मात्र बराच काळ याबद्दल कुठलीही नोंद किंवा तक्रार करण्यात येत नाही.
अस जर आपण केलं तर आपण जो घालवलेला वेळ आहे म्हणजे व्यक्ती बेपत्ता झाल्यापासून ते प्रत्यक्ष तक्रार करेपर्यंत.हा कालावधी त्या सात वर्ष कालावधीमध्ये धरता येणार नाही. आणि सहाजिकच जेव्हापासून आपण तक्रार दाखल केली, तेव्हापासून किमान सात वर्ष आपल्याला थांबणं क्रमप्राप्त ठरले.पुढचा टप्पा कधी येतो तर सात वर्ष पूर्ण होतं,तेव्हा सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये त्याबेपत्ता व्यक्तींचा मृत्यू घोषित करून मृत्यू दाखला मिळावा, याकरता अर्ज करतो.
आता असा जेव्हा अर्ज केला जातो तेव्हा साधारणतःज्या पोलीस स्टेशन मध्ये आपण नोंद दिली होती त्या पोलिस स्टेशन कडून रिपोर्ट मागवला जातो. म्हणजे असा रिपोर्ट तुमच्याकडे नोंदवला आहे का? त्या व्यक्तीचा काही शोध लागला किंवा नाही लागला? याचा अधिकृतपणे पोलीस स्टेशनने काही कळवल आहे का?आणि जर कळवल असेल तर त्याची प्रत त्या न्यायालयामध्ये दाखल करण्यात येते.त्याच्या नंतर जर सगळं न्यायालयाला ठीक आहे असं वाटलं तर तो अर्ज मंजूर होतो.
आणि बेपत्ता व्यक्तीचं निधन रेकॉर्ड करून त्या अनुषंगाने मृत्यू दाखला देण्याचा आदेश करण्यात येतो. सर्वसाधारणतः जेव्हा अशा प्रकारचा अर्ज करण्यात येतो तेव्हा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्ड सोबतच कोर्टाद्वारे सुद्धा एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात येते,की अमुक अमुक व्यक्ती बेपत्ता असून त्याच निधन घोषित होण्याकरता आमच्या न्यायालयात अर्ज आलेला आहे,तर त्याबद्दल कोणाला काही हरकत आहे का?आता कोणाची काही हरकत आली नाही तर प्रश्नच नाही.
ते प्रकरण जवळपास पुढे जाईल आणि संपेल.पण जर कोणाची हरकत आहे म्हणजे कोणी त्या व्यक्तीच्या संपर्कात असेल,कोणी त्याला पाहिलं असेल,भेटलं असेल, बोललं असेल,आणि त्याने जर तसं कोर्टत सांगितलं तर त्या संबंधित पुरावे दिले तर मात्र हा अर्ज भेटायला जाण्याची दाट शक्यता आहे.थोडक्यात जर आपण लक्ष्यात द्यायचं झालं,तर बेपत्ता व्यक्तीच्या मृत्यूची नोंद होऊ शकते का?तर निश्चितपणे होऊ शकते.मात्र त्याच्या करता अशी व्यक्ती सलग सात वर्षे बेपत्ता असणं हे अत्यंत आवश्यक किंबहुना बंधनकारक आहे.
आणि सात वर्षांनी एकदा का उलटली की आपण सक्षम दिवानी न्यायालयामध्ये त्या व्यक्तीच्या निधनाची नोंद व्हावी आणि त्याचा मृत्यू दाखला देण्यात यावा असा अर्ज करू शकतो.आणि सगळ्या साक्षी पुराव्याच्या आधारे जर आपण आपला अर्ज सिद्ध केला तर आपल्या बाजूने आदेश होऊन त्या बेपत्ता व्यक्तीचा मृत्यू दाखला सुद्धा आपल्या मिळू शकतो.मात्र याच्या करता सात वर्षांचा कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
म्हणून आपल्यापेकी ज्या कोणाच्या बेपत्ता झाले असतील, आणि त्यांनी जर अजूनही पोलिस तक्रार केली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर पोलिस तक्रार करावी,जेणे करून तो सात वर्षाचा कालावधी एकदाचा सुरू होईल आणि ती सात वर्ष पूर्ण झाली की संबंधितांना संबंधित बेपत्ता व्यक्तींचा मृत्यू दाखला मिळू शकेल.
कारण जोवर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळत नाही ती नुसतीच बेपत्ता असेल तर त्याच्या मालमत्ते संदर्भात त्याच्या वरासासमोर समोर अनेक अडचणी उभ्या राहतात.हे सगळं टाळण्याकरता बेपत्ता व्यक्तीच्या अनुषंगाने कारेवाही लवकरात लवकर पूर्ण करावी जेणे करून आपल काम हे योग्यरित्या आणि ठरलेल्या कालावधीत पूर्ण होईल आणि आपल्याला त्या बेपत्ता व्यक्तींचा दाखला मिळाला की त्या मालमत्तेला व बाकी कामांना एक प्रकारची गती येते.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.