आपत्कालीन निधी म्हणजे काय? : अनेक प्रसंगी तातडीच्या आर्थिक मदतीची गरज भासू शकते. नोकरी गमावणे, गंभीर आजारपण, मोठे वैद्यकीय खर्च, अचानक उद्भवलेला लांबचा प्रवास आदी कारणांसाठी आर्थिक तरतूद करावी लागते. नेहमीच्या बचतीवर ताण पडू नये म्हणून असे खर्च भागविण्यासाठी राखीव ठेवण्यात येणारी रक्कम म्हणजे आपत्कालीन निधी. असा निधी नेहमी उपलब्ध ठेवावा, असा सल्ला अर्थनियोजक देतात.
आपत्कालीन निधीची तरतूद करण्याचे फायदे काय? : आणीबाणीच्या प्रसंगी मोठा खर्च उद्भवल्यास आपण सहसा नातेवाईक अथवा मित्रमैत्रिणींकडून पैसे घेतो. मुदत ठेवी मोडून अथवा शेअर्स विकून पैसे उभारण्याचाही पर्याय असतो. मात्र योग्य नियोजन करून आपत्कालीन निधीची उभारणी केल्यास हे सर्व टाळता येते. या निधीमुळे तुम्ही नेहमी निश्चिंत राहू शकता. शिवाय, अनावश्यक खर्च टाळणे व बचतीची सवय लागणे हेदेखील याचे फायदे आहेत.
इमर्जन्सी फंड का असावा, किती असावा ? आणि इमर्जन्सी फंड किती असावा ? हे आज आपण पाहणार आहोत. मागच्या एक वर्षापासून जस की हे जे पेंड्यामिक आलेले आहे त्यामुळे सर्व स्तरातील व्यक्तींची जी दुविधा झालेली आहे, या विशिष्ट परस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंडची अवशकता असते.
वाईट दिवसांसाठी साठवलेला फंड अस इमर्जन्सी फंडला नक्कीच म्हणता येईल. आपल्याला माहीत नसत की कधी कोणती परिस्थिती उद्भवेल, जस की मेडिकल इमर्जन्सी, आपल्या जॉब वर काही प्रोब्लेम होवू शकतात का, इन्सेक्युरिटी रिगार्डिंग इन्कम असू शकेल का, या सगळ्या गोष्टी कव्हर करणेसाठी आपल्याकडे इमर्जन्सी फंड असायलाच हवा. थोडक्यात काय तर ज्या अनप्लान सीच्युएशन आपल्या समोर येऊ शकतात ती परिस्थिती हातळण्यासाठी आपल्याकडे तो पैसा असावा.
दुसरा प्रश्न असा आहे की इमर्जन्सी फंड किती असावा? दोन प्रकारचे व्यक्ती असू शकतात. 1. पगारी कामगार (स्यालरी एम्प्लॉइड), हे जे व्यक्ती असतात त्यांचेकडे कॅशफ्लो जो आहे तो रेगुलर बेसिस वर असतात. त्यामुळे जी अनसर्ट्यानिटी जी असते ती कमी असते एका व्यावसायिक व्यक्ती पेक्षा.
त्यामुळेच जर तुमचा पगार महिन्याला 20000 रुपये आहेत तर 1,20,000 रुपये तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असावा. जर 30000 रुपये पगार असेल तर 1,80,000 रुपये, 40000 रुपये पगार असेल तर 2,20,000 रुपये, 50000 रुपये पगार असेल तर 3,00,000 रुपये इमर्जन्सी फंड आपल्याकडे असावा.
आता अनेकजण म्हणतात आपला जो महिन्याचा खर्च आहे त्याला 6 ने गुणल्यास जेवढे येतील तेवढा तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असावा. पण असे मत आहे की, जेवढा आपला पूर्ण पगार आहे तो पूर्ण इमर्जन्सी फंड मध्ये असावा. कारण समजा 50000 रुपये आपला पगार आहे, आणि आपला महिन्याचा खर्च आहे 20 ते 25 हजार रुपये, आणि राहिलेले जे पैसे आहे ते आपण कुठेतरी गुंतवत असतो, किंवा आपले काही बँकेचे किंवा इतर हप्ते जात असतात, अशा अनेक गोष्टी असू शकतात.
म्हणून आपल्या पूर्ण पगार आणि त्याला 6 ने गुनल्यास जी रक्कम येईल तितका इमर्जन्सी फंड असायला हवा. म्हणजेच समजा कधी आपल्या जॉब वर काही अडचणी आल्या आणि काही महिन्यांचा पगार देण्यात आला नाही तर तेव्हा आपल्याला हे नक्कीच फायदेशीर राहील.
2.सेल्फ एम्प्लॉइड जे लोक असतात त्यांनी माहिण्याचा खर्च आणि बरोबरच जे काही इतरत्र गुंतवणूक असेल हे सर्व धरून त्याला 12 ने गूनल्यास जी काही रक्कम असेल तेवढा त्यांचा इमर्जन्सी फंड असावा. हे आपण घराच्या दृष्टीने पहिले. जर बिझनेसचा विचार केला तर त्याला लागणारे भांडवल सुद्धा तितकं आपल्याकडे अशा वाईट वेळेत असायला पाहिजे.
त्यामुळे जे काही सेल्फ एम्प्लॉइड किंवा बिझनेस असणाऱ्या व्यक्तींचे जे ॲक्च्युअल इन्कम असत त्याला 12 ने गुनल्यास जी रक्कम येते तेवढा आपला इमर्जन्सी फंड असावा. उदाहरण घ्यायचं म्हणजे जर आपला 50000 रुपये माहिना इन्कम असेल तर, 50000 असेल तर 6,00,000 रुपये आपला इमर्जन्सी फंड असावा.
इमर्जन्सी फंड हा कुठे असावा, साधारण इमर्जन्सी फंड आपण सेविंग्ज अकाउंट मध्ये ठेवला तरी देखील चालेल. प्रयत्न करा की सेविंग्ज अकाउंट पेक्षा फिक्स डीपॉझिट मध्ये कन्व्हर्ट करा. आणि त्या फिक्स डीपॉझिटला आपल्या सेविंग्ज अकाउंट सोबत लिंक करून टाका.
त्यामुळे जे स्वीप आऊट एफडी असतात. ज्यामध्ये तुम्ही जेवढे विदड्रो करता तेवढीच एफडी तुटून तुमच्या अकाउंट मध्ये येते. म्यूच्युअल फंड मध्ये काही गुंतवणूक करायची असेल तर त्यात लिक्वीड फंड नावाची एक कॉन्सेप्ट आहे. त्यात तुम्ही तुमचे जे शॉर्ट टर्म एफडी असतात 4 ते 5 % च्या तेवढच व्याज तुम्हाला ह्या लिक्वीड फंड मध्ये मिळत. त्यामुळे जे उदिष्ट ऑब्जेकटिव असला पाहिजे ह्या इमर्जन्सी फंड बाबत गुंतवणूक करण्याचा तो रिटर्न हा ऑब्जेकटिव नसला पाहिजे.
तर असा असला पाहिजे की मला तत्काळ लिक्विडीटी मिळायला पाहिजे. मला पैसे पाहिजेत आणि मी ते लगेच जाऊन काढू शकतो. त्यामुळे इमर्जन्सी फंड कोठे ठेवावा तर शॉर्ट टर्म एफडी मध्ये ठेवा, किंवा लिक्वीड फंड मध्ये ठेवा, नाहीतर सेविंग्ज अकाउंट जे चांगले व्याज देत असेल तिथे ठेवा. ही सर्व माहिती इमर्जन्सी फंड बाबतीत होती.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.