तुम्हालाही इंग्लिश समजायला अवघड जाते का? तर हा लेख तुमच्यासाठी आहे ।। मराठी चे इंग्लिश, इंग्लिश चे मराठीत भाषांतर करण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण असे ॲप बघणार आहोत की ज्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मध्ये सुधारणा करू शकाल, तुमचे इंग्लिश कच्चे असेल तर इंग्लिश मध्ये तुम्हाला कुठेही अडथळा न येण्यासारखे हे ॲप आहे. गुगलचे हे ॲप आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.(google lens, google translator) असे काही ॲप आहे.

तुम्ही जर तुमचे कोणते डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्ट मोबाईलने फोटो काढून त्याचे पूर्ण मराठी किंवा हिंदी मध्ये ट्रान्सलेशन करू शकता. किंवा मराठीमध्ये असलेले पूर्ण इंग्लिश मध्ये करू शकता. मराठी मधून इंग्लिश मध्ये टाईप करून घेवू शकता. आणि तुमच्याकडे जर इंग्लिशचा कुठला पेपर असेल तर तुम्ही स्कॅन करून पूर्ण मराठी मध्ये ते वाचू शकता.

किंवा त्याला सेव्ह करू शकता त्याची सॉफ्ट कॉपी बनवू शकता. तुम्ही व्हाट्सअप वरती लेख लिहिले जातात, त्या पद्धतीने तुम्ही शेअर करू शकता. आणि दुसर आहे तुम्ही हॅण्डराईटिंग द्वारे मोबाईल मध्ये लिहू शकता आणि त्याचे इंग्लिश मध्ये ट्रांसलेशन करू शकता. किंवा मराठी मधून इंग्लिश मध्ये करू शकता. ह्या ॲपची आपण माहिती घेणार आहोत.

तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मध्ये असो किंवा मराठीमध्ये असो ते तुम्हाला सहज रित्या ट्रान्सलेट करता येणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये गूगल प्ले-स्टोअर ओपन करा. प्ले-स्टोअर मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स मध्ये टाईप करायचे “ट्रान्सलेट”. आणि याच्या मध्ये “गुगल ट्रान्सलेटचा” येईल( गुगल एलएलसी) अशा प्रकारे येईल याच्या लोगो मध्ये कॅपिटल मध्ये (G) आहे. तसेच दुसरे बरेच ॲप आहेत.

पण हा ॲप बेस्ट आहे, 500 मिल्लियन डाउनलोड आहेत, याला 4.4 चे रेटिंग आहे. हे गुगल चे प्रॉडक्ट आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केलेच्या नंतर, ॲप मोबाईल मध्ये ओपन केल्यानंतर कशा प्रकारे तुम्ही प्रोसेस करू शकता ते आपण पाहुयात. सर्वात प्रथम हार्ड कॉपी घेवून कॅमेरा ओपन करून फोटो आपण क्लिक करायचा.

आणि तो फोटो आपण फोटो गॅलरी मधून त्या ॲप मध्ये सिलेक्ट करून स्कॅन करून ट्रान्सलेट करू शकतो. किंवा त्या ॲप मध्येच कॅमेराचा आयकॉन दिलेला आहे त्यावर क्लिक करून आपण डायरेक्ट ॲप मध्ये फोटो काढून स्कॅन करून आपण ट्रान्सलेट करू शकतो. यांनतर स्कॅन झालेल्या पेजला त्यावर जो मायना आहे त्याला सिंपल पुसायच आहे, इरेज करायच आहे. आणि त्यांनतर हे ट्रांसलेट झालेलं दिसेल.

तुम्ही हे कॉपी करून सेव्ह किंवा पोस्ट देखील करू शकता. आणि जे मराठी मध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे ते तुम्हाला थोड स्पेस, वैगरे करून एडिट करावं लागेल. पण तुमच्या टायपिंगचा पण वेळ खूप वाचणार आहे. आणि इंग्लिशचे मराठी मध्ये लगेच ट्रांसलेट होते. तुम्ही कुठे गेलात, तुम्हाला कुठे काही कळलं नाही, तुमच्या मोबाईल मध्ये “गुगल ट्रान्सलेटर” हे ॲप असेल तर तुम्ही जे इंग्लिश चे तुम्हाला कळलेलं नाही.

ते तुम्ही मोबाईल मध्ये त्याचा फोटो घेवून स्कॅन करून ट्रान्सलेट करून तुमची समस्या दूर होईल, तुम्हाला कामात अडचणी येणार नाहीत. उदाहरण पहायचं झालं तर एक फोटो घ्या व त्यावर मजकूर आहे, यावर कॅमेरा ठेवून क्लिक करायच. आणि त्याला स्कॅन करून करून इरेज थोडक्यात स्क्रॅच करायच. त्यांनतर ते लगेचच मराठी मध्ये ट्रान्सलेट होईल.

अशा प्रकारे त्याचे भाषांतर होईल. म्हणजेच तुमच्याकडे पीडीएफ असेल किंवा तुमच्याकडे हार्डकॉपी आहे. तुम्ही कुठे गेला असेल, तुम्हाला वर्ड्स समजत नसतील, तर ही एकदम बेस्ट आयडिया आहे. या गुगल ट्रान्सलेटर ॲप मध्ये भरपूर अशा भाषा आहेत. या भाषा देखील तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर मराठीतून इंग्लिश मध्ये करायच असेल तर तुम्ही लिहून करू शकता.

आता मराठी मध्ये लिहिण्यासाठी तुम्हाला कीबोर्ड च्या ऐवजी तिथे डूडलचा ऑप्शन येईल म्हणजे (लॅपटॉप मध्ये “पेंट” म्हणून एक आपल्याकडे ॲप्लिकेशन असते. त्यामध्ये जस स्केच करण्यासाठी एक पेन्सिलचे स्टिकर असते त्याचा वापर करून आपण स्केच काढतो, लिहितो. त्याचप्रमाणे मोबाईल मध्ये आपण त्याचा वापर करून लिहून ट्रान्सलेट करू शकतो.)

तर तुम्ही देखील अशा प्रकारे लिहून ट्रान्सलेट करू शकता व या सुविधांचा वापर करू शकता. त्यांनतर तुम्ही “व्हॉईस” या ऑप्शनचा वापर करून तुम्ही मराठीत बोलून इंग्लिश मध्ये ट्रांस्लेट करू शकता. तर हा गुगल ट्रान्सलेट ॲप एकदम उपयुक्त आहे. त्याच प्रमाणे सध्या “गुगल लेन्स”, “गुगल ट्रान्सलेटर”, असे अनेक ट्रान्सलेटर ॲप आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.