नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
येत्या सहा महिन्यांत देशातील प्रत्येक वाहनाला फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य करण्यात येणार आहे. पण हे फ्लेक्स फुएल इंजिन म्हणजेच फ्लेक्सिबल इंजिन नक्की कस आहे ते आपण पाहू. सध्याचं इंजिन एक तर पेट्रोल किंवा डिझेलवर किंवा सीएनजीवर,पण फ्लेक्स इंधन इंजिन हे एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालू शकत.
म्हणजे गॅसोलिन किंवा इथेनॉल. ग्यासोलीन म्हणजे पेट्रोल. तर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आहे की इथेनॉल त्याच्यावरून ते इंजिन लावून घेतल. या इंजिनची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास इथेनॉलचा वापर वाढून सध्याच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनवरचा भार कमी होण्याचा अंदाज आहे.
इथेनॉल म्हणजे काय? : इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. इथिल अल्कोहोल पेट्रोलमध्ये मिसळलं जात. आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जात. इथेनॉल हे ऊसापासून तयार होत. येत्या काही महिन्यांमध्ये देशात फ्लेक्स फ्युएल इंजिनचा जास्तीत जास्त वापर व्हावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. इथेनॉल हे सर्वाधिक परवडणारे इंधन असून विमानातील इंधनासाठी ही यशस्वी ठरले आहे.
खनिज तेल हे वाहतुकीसाठी फार मोठ्या प्रमाणात वापरले जात. पण याचा पुरवठा हा सध्या मर्यादित आहे. पेट्रोल ची सध्याची किंमत शंभर रुपयांच्या वर गेली आहे. पेट्रोलची किंमत ११० रुपये च्या पुढे आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेता पर्यायी इंधनाची गरज आहेच. मग इथेनॉल, सीएनजी, बायोफ्युल, इलेक्ट्रिक हे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत.
हे नव्या इंधनाची किंमत फक्त 60 ते 62 रुपये प्रतिलिटर असणार आहे. यामुळे आत्ताच्या पेट्रोल सोबत कम्पेअर केलं तर प्रति लिटर 35 ते 40 रुपयांची बचतही फिक्स आहे. सध्या प्रति लिटर पेट्रोलमध्ये 8.5 टक्के इथेनॉल मिसळल जात, हे प्रमाण 2014 साली फक्त एक ते दीड टक्के होतं. 1932 ला सर्वात आधी ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर केला गेला.
त्यानंतर आता कॅनडा आणि अमेरिकेतही या इंधनाचा यशस्वी वापर सुरू आहे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कित्येकपटीने चांगलं इंधन आहे आणि यामुळे प्रदूषण होत नाही. तसेच ते स्वदेशीय आहे. भारतीय अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. कारण आपल्याकडील अतिरिक्त खाद्यपदार्थ आणि उसाचा रस वापरू इथेनॉल तयार केल जात.
साखर उद्योगाबरोबरच मका आणि इतर अन्नधान्यापासून इथेनॉल तयार करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहे. देशात निर्माण होणाऱ्या इथेनॉलपैकी निम्मे इथेनॉल साखर उद्योगापासून, तर निम्मे इथेनॉल हे धान्यापासून तयार होत. सध्या भारतात 684 कोटी लिटर इथेनॉल हे तयार करण्याची क्षमता आहे. ही क्षमता 1000 कोटी लिटर पर्यंत वाढविण्याची सरकारची योजना आहे.
एकीकडे इथेनॉलचा वापर वाढवण्याबरोबरच दुसरीकडे इथेनॉलची निर्मिती जास्तीत जास्त व्हावी यासाठी या उद्योगांना शक्य तितक्या सुविधा देऊन इथेनॉलच उत्पादन वाढविण्यासाठी प्रवृत्त केले जात. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या आदेशानुसार 25 मार्च 2015 पासून पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यात येते.
जगभरात अमेरिका, युरोपीय देशांमध्ये 20 पेक्षा जास्त देशांमधील E10 या प्रमाणात इथेनॉल मिश्रित पेट्रोल विकल जात. E10 म्हणजे इथेनॉल 10 टक्के.अस ही E10 ते E85 पर्यंत इथेनॉल इंधनात,पेट्रोलमध्ये मिसाळण्यात येते. यामुळे फक्त अमेरिकेमध्ये दरवर्षी 4.3 अब्ज डॉलर्स एवढा इंधन वाचते. गहू, मका, धान्य, फळे इतर साखरेचे उत्पादनांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करू शकतो,
त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होईल हे इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनॉक्साईड प्रमाणे 35 टक्क्यांनी कमी होऊ शकत. कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण कमी होईल. इथेनॉल नी चालवलेली कार पेट्रोल पेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलच पटकन बाष्पीभवन होत त्यामुळे इंजिन गरम होत नाही.
आपला देश हा कॉर्न प्लस देश आहे. आपण गहू, साखर प्लस आहोत. आपल्याकडे सर्व धान्य साठविण्यासाठी जागा नाहीये, इतकं म्हणजे गरजेपेक्षा जास्त उत्पन्न होते, त्यामुळे इथेनॉलचा वापर वाढल्यास भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. इथेनॉल हे पेट्रोलियम पेक्षा चांगलं इंधन तर आहेच आणि ते आपल्याला आयात करावं लागतं नाही.
पुढील दोन वर्षात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा सरकारचे उद्दिष्ट आहे. आणि 2025 पर्यंत हे लक्ष्य साध्य करण्याचे सरकारने ठरवले होत पण आता सरकारला हे लक्ष 2023 पूर्वीच साध्य करायचे आहे. यामुळे देशाला कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्यास मदत होईलच पण आपलाही फायदा होईल.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.