………आणि म्हणून फोर्ब्स मासिकाने त्यांना दिली भारतातील सर्वात शक्तिशाली ग्रामीण उद्योजक अशी शाबासकी

शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

त्यांचे वडील सुतार होते. घरची परिस्थिती बेताचीच, त्यामुळे त्यांचे बालपण गरिबीत गेले. यात भरीस भर म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना विजेचा शाॅक बसला आणि दोन महिन्यांहून अधिक काळ उपचार घ्यावे लागले. आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना चौथी इयत्ता पूर्ण केल्यानंतर शाळा सोडावी लागली.

मग त्यांनी आपल्या वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली आणि लाकडी वस्तू बनवण्याचे मूलभूत कौशल्य ते शिकले. सुमारे पाच वर्षे सुतार म्हणून काम केल्यावर त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले, कारण त्यांच्या बहुतेक कामांमध्ये जड वस्तू उचलणे, तासनतास अवघडलेल्या स्थितीत बसणे आणि लाकडाच्या चुरीचा सामना करणे समाविष्ट होते. त्यांच्या लक्षात आलं की लाकुड काम आपल्याला झेपणार नाही. मग त्यांनी स्वतःहून काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.

मदनलाल कुमावत हे सीकर, राजस्थान येथील तळागाळातील नव उद्योजक आहेत. ते त्यांच्या भागातील शेतकरी आणि रहिवाशांमध्ये इंधन-कार्यक्षम, बहु-पीक थ्रेशर बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. थ्रेशर म्हणजे गहू, वाटाणे, सोयाबीन आणि इतर लहान धान्य आणि बियाणे पिके त्यांच्या भुशापासून आणि पेंढापासून वेगळे करणारे यंत्र. फोर्ब्स मासिकाने त्यांना “भारतातील सर्वात शक्तिशाली ग्रामीण उद्योजकांपैकी एक” असे सन्मानित केले. त्यांना अशा अनेक मान्यता मिळाल्या आहेत, परंतु क्वचितच कोणाचा पाठिंबा मिळाला आहे.

मदनलाल लवकरच एका वर्कशॉपमध्ये काम करू लागले, जिथे त्यांना ट्रॅक्टर बनवण्याचे आणि तो दुरुस्त करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लोखंडी आणि धातूच्या कामाचे प्रशिक्षण मिळाले. त्यांना त्यांचे काम खूपच मनोरंजक आणि महत्वाचे वाटले कारण त्याचा थेट परिणाम शेतकर्‍यांच्या जीवनावर होणार हे त्यांना माहीत होते. काम शिकून घेतल्यावर त्यांना रोजच्या कामाचा लवकरच कंटाळा आला.

Modified fixture of dozer blade with tractor and Multi Crop Thresher by Madan  Lal Kumawat

त्यांना असं वाटलं की ती कार्यशाळा दुरुस्तीच्या कामावर केंद्रित आहे आणि त्यात क्वचितच काही नावीन्य आहे. त्याऐवजी स्वतःच काहीतरी करायचे त्यांनी ठरवले. त्यांना एक थ्रेशर बनवायचे होते, एक यंत्र जे देठ आणि भुसापासून धान्य वेगळे करण्यासाठी वापरले जाते. पहिले मॉडेल बनवण्यासाठी त्यांना अनेक महिने लागले. त्यांनी बनवलेले थ्रेशर बाजारात उपलब्ध असलेल्या थ्रेशरइतकेच कार्यक्षम होते. पण याने त्यांचे समाधान झाले नाही. थ्रेशरच्या अनेक पैलूंमध्ये सुधारणा करता येऊ शकते हे काही महिन्यांत त्यांच्या लक्षात आले.

उपलब्ध असलेले थ्रेशर बहु-धान्य अनुकूल नव्हते. त्यांना धान्याच्या प्रकारानुसार फिटिंग बदलण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागत होता. लवकरच त्यांनी थ्रेशरमध्ये बदल करून वेगवेगळ्या आकाराच्या अनेक जाळ्या जोडल्या, ज्या सहज बाहेर काढल्या जाऊ शकतात. आता एका पिकातून दुसऱ्या पिकावर जाण्यासाठी त्यांना फक्त १५ मिनिटे लागली.

त्यांनी थ्रेशरमध्ये ब्लोअर जोडला. हवेच्या गतीचे नियमन करण्यासाठी एक गियर आणि पुली प्रणाली जोडली, ज्यामुळे मशीनला विविध आकार आणि घनतेचे धान्य हाताळण्यास मदत झाली. त्यांनी फिरणाऱ्या ड्रमचा व्यासही कमी केला, ज्यामुळे प्रत्येक तासाला एक लिटर डिझेल वाचवता आले.

मदनलाल यांनी बांधलेल्या थ्रेशरचा शेतकऱ्यांना खूपच फायदा झाला. स्वतःसाठी अगदी थोडा फायदा ठेवून त्यांनी ते वाजवी दरात विकले. “पूर्वी, शेतकऱ्यांना धान्य साफ करण्यासाठी योग्य वाऱ्याची वाट पाहावी लागायची. तसेच त्यातील बरीचशी प्रक्रिया मॅन्युअल होती. माझ्या थ्रेशरने ही समस्या दूर झाली.” मदनलाल सांगतात.

Multi Crop Thresher | National Innovation Foundation-India

परंतु त्यांच्या कामाला अजूनही सरकारी मान्यता मिळाली नाही याचं त्यांना दुःख वाटतं. अहमदाबाद नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनमध्ये त्यांच्या डिझाईन्सची नोंदणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्याची सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांच्या डिझाईन्सचा वापर मोठ्या कंपन्यांनी केला आहे, ज्यांना चांगला फायदा होत आहे. मदनलालच्या म्हणण्यानुसार आज बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक थ्रेशर त्यांच्या डिझाइनच्या प्रती आहेत.

“मी जेव्हा थ्रेशर विकायला सुरुवात केली, तेव्हां एक लाखाला विकत होतो. आज त्याची किंमत तीन लाख आहे आणि त्यात मी आणखी बरेच नावीन्य आणले आहे.” सध्या मदनलाल सिकर, राजस्थान मध्ये एक वर्कशॉप चालवतात आणि दुसरे जोधपूरमध्ये त्यांचा धाकटा भाऊ चालवतो.

मदनलाल यांनी बांधलेले थ्रेशर्स चार वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये उपलब्ध आहेत. ते वेगवेगळ्या आकारात येतात, विविध स्तरांची उर्जा वापरतात आणि म्हणूनच लहान आणि मोठ्या शेतकर्‍यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा