गाव तलाठ्याची कर्तव्ये काय असतात ।। तलाठ्याने कोणती कामे करणे बंधनकारक असतात याबद्दल विस्तृत माहिती !

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तलाठ्याची कर्तव्य काय आहेत. 1.एक ऑगस्ट रोजी नवीन महसुली वर्षाच्या प्रारंभ होण्याच्या सुमारास तलाठ्याने ज्या ठेवायच्या असतात त्या सर्व नोंदवह्या उघडून त्या पुष्टांकित कराव्या व त्या सर्व वह्या कमान एक पंधरवडा आधी तहसीलदारांकडे पाठवून एक ऑगस्ट पूर्वी तहसिलदारांकडून स्वाक्षरीत करून घ्याव्यात.

2.वार्षिक प्रशासननिक अहवालाच्या संकलनासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे एक ऑगस्ट नंतर लगेच पाठवावे. त्या माहितीबरोबरच ज्यांची मोजमापे घ्यायची त्या माहितीबरोबरच त्यांची मोजमापे घ्यायची आहेत अशा नवीन हिश्‍श्‍याचे विवरणपत्र ही त्यांची मोजमापे घेण्याच्या व्यवस्था करण्यासाठी तहसीलदारांकडे पाठवावे.

3.तलाठ्याने त्याच वेळी किंवा त्यानंतर ताबडतोब हंगामाच्या स्वरूपावर लक्ष ठेवावे आणि साप्ताहिक पर्जन्य व पिकांची स्थिती यांचे अहवाल तहसीलदाराला सादर करून त्यांच्या प्रती मंडळ निरीक्षकाकडे पाठवाव्या आणि अशाप्रकारे आपत्ती येण्याचा संभव असल्यास तिच्यासंबंधी अहवाल देण्यास तयार रहावे. 4.तलाठ्याने त्याच वेळी खरीप पीक आणि कुळवहिवाट आणि सीमा आणि भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करावा आणि 15 ऑक्टोंबर पर्यंत ते पूर्ण करावे.

5.यानंतर तलाठ्याने रब्बी पीक व कुळवहिवाट आणि सीमा भूमापन चिन्हे यांच्या निरीक्षणास प्रारंभ करावा आणि 31 डिसेंबर पर्यंत ते पूर्ण करावे. 6.तलाठ्याने मंडळ निरीक्षकास पिकांची आणेवारी तयार करण्यास व आवश्यक तितके पीक कापणी प्रयोग करण्यास मदत करावी. 7.तलाठ्याने 15 डिसेंबर पर्यंत किंवा पिकांच्या परिस्थितीनुसार त्यांच्या आधी चालू वर्षाच्या जमिन महसुलाच्या किंवा तसेच मागील वर्षाच्या तहकूब जमीन महसुलाच्या वसुलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मिळवावे. जमीन महसुलाची तहकुबाची व त्याची वसुली व सीमा संबंधीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना सर्वत्र प्रसिद्ध करावी.

8.दरवर्षी डिसेंबर अखेर तलाठ्याने गाव नमुना आठ अ अद्यावत करावा आणि गाव नमुना आठ ब ची मागणी संबंधीचा भाग जमीन महसूल वसुलीस प्रारंभ करण्यासाठी तयार ठेवावा. 9.जिल्हाधिकाऱ्यांनी नियमान्वये विहित केलेल्या दिनांकांना तलाठ्याने जमीन महसूल वसूल करावा. 10.त्या वर्षांमध्ये वसुलीसाठी नियम असलेला सर्व जमीन व महसूल त्या वर्षाच्या 31 जुलैपूर्वी वसूल केला पाहिजे आणि कोणतीही अनधिकृत थकबाकी वसूल केल्याशिवाय राहू देता कामा नये या गोष्टी तलाठ्याने लक्षात ठेवाव्यात.

11.शासनाच्या वतीने त्याला मिळालेल्या सर्व पैशाबद्दल तलाठ्याने पावती दिली पाहिजे. पावती देण्यात तलाठ्याने कसूर केल्यास मिळालेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल इतक्या दंडास तो पात्र राहील. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 77 नुसार त्यांच्याकडे असलेल्या पावती पुस्तकाच्या हिशेब दर्शविणारी नोंदवही त्याने ठेवावी.

12.तलाठ्याने एक रोकड वही ठेवावी आणि त्याला मिळालेले सर्व पैसे आणि पंधरा दिवसाच्या आत कोपाभारात जमा केलेले पैसे हे दर्शवावे.कोणत्याही वेळी रुपये एक हजार पेक्षा जास्त रक्कम त्याने आपल्या हातात शिल्लक ठेवू नये. 13.तलाठ्याने वसूल केलेल्या जमीन महसुल ज्या चलनाखाली कोषाघरात जमा केलेला असेल, त्या चलनामध्ये त्याने जमीन महसुलाच्या वसुलीच्या प्रगतीचा अहवाल तहसीलदारांना द्यावा.

14.तलाठ्याने वर्षातील सर्व रकमांची वसुली झाल्याबरोबर त्याचे सर्व वसुली लेखी लेखा परीक्षेसाठी तहसीलदाराला सादर करावे यामध्ये 31 मे पर्यंत सादर करावयाचा गाव नमुना आकाराच्या गोपखान्याचा देखील समावेश होतो. 15.तलाठ्यांनी ठेवलेले वर्षाचे लेखे बरोबर आणि आवश्यक तेथे तालुका लेख्याची जुळणारे आहेत हे तहसीलदाराचे समाधान होईल अशा प्रकारे सिद्ध करावे.

16.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्या खालील नियम किंवा त्या वेळी अमंलात असलेला दुसरा कोणताही कायदा यांच्या अन्वये विहित केल्याप्रमाणे किंवा राज्य शासनाच्या आदेशानुसार किंवा राज्य शासन आणि आयुक्त यांच्या सर्वसाधारण आदेशाच्या अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केल्याप्रमाणे सर्व महसूली लेखे, रोकडे वह्या, कार्यभार अहवाल आणि इतर अभिलेख तलाठ्यांनी ठेवावे.

17.जमीन महसुलाच्या थकबाकी ची आणि जमीन महसुलाची थकबाकी म्हणून सर्व योग्य असलेल्या सर्व रकमांची वसूल आणि अधिकार अभिलेख ठेवणे यासाठी तलाठी जबाबदार राहील आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि त्या खालील नियम किंवा त्या वेळी अमंलात असलेल्या कोणताही कायदा किंवा राज्य शासनाचे आदेश त्यामध्ये तरतूद केलेली सर्व कर्तव्य तो पार पाडेल

18.तालुक्याचे वरिष्ठ महसूल किंवा पोलीस अधिकाऱ्याने तसे करण्यास सांगितल्यावर नोटिसा आणि फौजदारी बाबीं मधील तपासाचा अहवाल, जबान्या आणि तपासण्यात यासारखे केंद्र किंवा राज्य शासन किंवा जनता यांच्या उपयोगासाठी आवश्यक असलेले गावाच्या संबंधातील सर्व लेखी तलाठ्याने तयार करावे. 19.तलाठ्याने जमिनीच्या वापरा मधील बदलांचा दिनांक अधिनियमाच्या कलम 44 च्या पोट कलम 4 अन्वये त्याला माहिती मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत अकृषिक परवानगी देणाऱ्या किंवा ज्याने दिली आहे असे मानण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला कळवावा.

20.अ) गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट करण्यास किंवा त्यामध्ये अनधिकृत फेरफार करण्यास प्रतिबंध करण्याचा तलाठ्याने प्रयत्न करावा. 20 ब) तथापि गावाची सीमा चिन्हे किंवा भूमापन चिन्हे नष्ट केल्याचे किंवा त्यामध्ये अनधिकृत फेरफार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यावर त्या संबंधातील नियमानुसार एक पंढरवड्याच्या आत ती पूर्ववत करण्याबद्दल किंवा दुरुस्त करण्याबद्दल त्याने जमीन धारकांना ताबडतोब नोटीस पाठवावी. क) वरील नोटिसा नुसार जमीन धारकाने ती जमीन पूर्ववत किंवा दुरुस्त न केल्यास तलाठ्याने ही गोष्ट आपल्या मंडळ निरीक्षकांमार्फत तहसीलदाराला ताबडतोब कळवावी.

ड)त्यानंतर मंडळ निरीक्षकाने ती चिन्हे त्यापुढील एका आठवड्याच्या कालावधीच्या आत पूर्ववत किंवा दुरुस्त करून न घेतल्यास तहसीलदाराला शासनाच्या खर्चाने पूर्ववत किंवा दुरुस्त करून घेण्याची व्यवस्था करावी आता असा खर्च जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करून घ्यावा. त्याखेरीज जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 145 द्यावयाच्या एखाद्या शर्तीसही पात्र राहील.

इ)पूर्ववत किंवा दुरुस्त करताना सीमा चिन्हांच्या एका संच त्याच्या जागी दुसरा किंवा दुसरी संच घेतल्यास सीमा चिन्हे दर्शविणाऱ्या नवीन व योग्य निशाणे गाव नकाशा मध्ये दाखवण्यात याव्यात आणि ती गोष्ट निरीक्षक भूमी अभिलेख यांना कळविण्यात यावी. चिन्हाचे पुढील परीक्षण व दुरुस्ती सुकर व्हावी यासाठी जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख याने आपल्या अभिलेखातील गाव नकाशा मध्ये त्याप्रमाणे दुरूस्ती करण्याची कार्यवाही करावी.

21.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 149 खाली अधिकार संपादन बद्दल मोठी किंवा लेखी प्रतिवेदन मिळाल्याबद्दल तलाठ्याने संबंधित व्यक्तीला ताबडतोब लेखी पोच द्यावी. 22.तलाठ्याने अशाप्रकारे त्याला मिळालेल्या प्रत्येक प्रति वेदनांची फेरफार नोंदवहीमध्ये ताबडतोब नोंद करावी. 23.अधिनियमाच्या कलम 154 खालील नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही जिल्हाधिकाऱ्याने कळवलेले संपादन किंवा हस्तांतरण याची तलाठ्याने फेरफार नोंदवहीमध्ये तशाच प्रकारे नोंद करावी.

24.तलाठी फेरफार नोंदवहीमध्ये ज्या ज्या वेळी नोंद करील त्या त्या वेळी तत्काळ त्याने नोंदीची संपूर्ण प्रत चावडीमध्ये ठळक ठिकाणी लावावी आणि अधिकारी अभिलेख किंवा फेरफार नोंदवही यावरून त्या फेरफार यांमध्ये ज्यांचे हितसंबंध असण्याचा संभव आहे असे आढळले, अशा सर्व व्यक्तींना त्याच प्रमाणे त्या फेरफार मध्ये ज्यांचा हितसंबंध असेल असे मानण्यास त्याला कारण दिसेल अशा इतर कोणत्याही व्यक्तीला त्याने लेखी कळवावे. त्या जमिनी संबंधीच्या अधिकार अभिलेखामध्ये असलेल्या नोंदी समोर फेरफार नोंदी चा क्रमांक देखील त्याने पेन्सिलीने लिहावा आणि फेरफार नोंद रीतसर प्रमाणित करण्यात आलेली नाही असा शेरा त्याने लिहावा.

25.फेरफार नोंदवही मध्ये केलेल्या कोणत्याही नोंदीवर तलाठ्याकडे तोंडी किंवा लेखी आक्षेप घेण्यात आल्यास त्यांनी वादग्रस्त प्रकरणांच्या विहित नोंदवहीमध्ये त्या आक्षेपाच्या तपशीलाची नोंद करावी. तलाठ्याने आक्षेप घेणाऱ्या व्यक्तीला आक्षेप मिळाल्याबद्दल ची विहित नमुन्यातील लेखी पोच ताबडतोब द्यावी.

26अ) नोंद प्रमाणित करण्यास सक्षम असलेल्या अव्वल कारकून किंवा मंडळ निरीक्षक यांच्यापेक्षा कमी दर्जाच्या नसलेल्या महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याने फेरफार नोंदवही मधील नोंद प्रमाणित केल्यावर तलाठ्याने ती अधिकार अभिलेखा मध्ये शाईने अभीलेखीत करावी. ब)सक्षम प्राधिकारी याने फेरफार नोंदवही मधील नोंद रद्द केलेली असल्यास तलाठ्याने अधिकार अभिलेखात पेन्सिलने केलेली नोंद करून टाकावी.

27.तलाठ्याने फेरफार नोंदवही मधील प्रमाणित नोंदीनुसार संबंधित गाव नमुने आणि त्यांची गोपवारे हीदेखील दुरुस्त करून घ्यावेत. त्याच प्रकारे त्याने आवश्यक तेथे गाव नकाशा मध्ये पेन्सिलीने दुरुस्ती करावी. मंडळ निरीक्षकाने आवश्यक असल्यास तपासणीनंतर ति शाईने करावी. 28.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 पोट कलम 1 अन्वये केलेल्या मागणीप्रमाणे पुरविलेल्या माहितीची किंवा केलेल्या कागदपत्रांची लेखी पोच तलाठ्याने माहिती पुरविणाऱ्या किंवा कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीला ताबडतोब द्यावी आणि असे कागदपत्र सादर केल्याचे त्यावर लिहून सादर केल्याचा दिनांक नमूद करणारी नोंद आपल्या सहीनिशी पुष्टांकित करावी आणि आवश्यक असल्यास त्या कागदपत्रांची एक प्रत ठेवून घेऊन ते ताबडतोब परत करावे.

29.महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या( तयार करणे, ठेवणे आणि देणे) नियम 1971, नियम 1971 अनुसार तलाठ्याचे अधिकार अभिलेख तयार करावे व ठेवावे. 30अ) शेत जमीन धारकाकडून किंवा जमिनीचा महसूल देण्यास आद्य पात्र असलेल्या कुळाकडून लेखी अर्ज मिळाल्यावर तलाठ्याने अशा जमीनीसंबंधीचे अधिकार अभिलेखाची प्रत असलेली एक पुस्तिका खाते पुस्तिका त्याला द्यावी.

ब) जमिनीच्या महसुलाच्या आणि धारकाकडून किंवा सद्यस्थिती कुळाकडून येणे असलेल्या इतर शासकीय रकमांच्या प्रधानास संबंधी माहिती आणि तसेच त्यांच्या जमिनीची मशागत आणि गाव लेख यात दर्शविल्याप्रमाणे पेरणी केलेल्या पिकांची क्षेत्रे यासंबंधीची माहिती आहे. विहित करण्यात आलेली किंवा यानंतर विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती तलाठ्याने या पुस्तिकेमध्ये दर्शवावी.

क) महाराष्ट्र जमीन महसूल खाते पुस्तिका तयार करणे देणे आणि ठेवणे नियम 1971 या नावाच्या नियमानुसार तलाठ्याने ही पुस्तिका तयार करावी द्यावी आणि ठेवावे. 31.तलाठ्याने त्याच्याकडे चावडी मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी म्हणून पाठवलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश विहित केलेल्या पद्धतीने प्रसिद्ध करावे. 32.तलाठ्यांनी दवंडी पिटवून जाहीर करण्याचे आदेश देऊन पाठवलेल्या सर्व नोटिसा किंवा आदेश विहित केलेल्या पद्धतीने प्रसिद्ध करावे.

33.तलाठ्याने ठिकाणी कुळवहिवाट आणि सीमा व भूमापन चिन्हे यांचे निरीक्षण प्रत्येक शेती त्या जागी तेथे त्या वेळी उपस्थित असतील असे गावकरी ग्रामपंचायतीचे सभासदांनी सरपंच असल्यास त्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पडताळणी करून करावे. निरीक्षणाच्या वेळी तलाठ्याने पुढील गोष्टींची पडताळणी करावी. 1.भोगवटदार कुळे व इतर अधिकार धारकांचे, इतर अधिकारी यांची नावे प्रत्यक्ष कब्जा ची जुळणार आहे.

2.उपविभागाच्या हिशेब योग्यप्रकारे दाखविण्यात आला आहे व प्रयोजनार्थ नवीन हिस्स्याची नोंदवही विहित नमुन्यात ठेवण्यात आले आहे. 3.फकाचे वहीत घरे बांधण्यात प्रतिबंध करण्याबाबत नियमांचे योग्य प्रमाणे पालन करण्यात आलेले आहे. 4.भोकरदन आणि पट्टे आणि अकृषिक परवानगी यांच्याशी संलग्न असलेल्या शेतीचे योग्य प्रकारे पालन करण्यात येते. 5.अतिक्रमणे आणि अधिकृतपणे अकृषिक उपयोग यांचा तपास लावून अहवाल सादर केला आहे आणि या प्रयोजनार्थ विहित नमुन्यातील अतिक्रमण नोंदवही ठेवण्यात आली आहे.

6.नकाशे, गाव नकाशा, पुस्तक आणि अधिकार अभिलेख यामधील विसंगतीचे प्रकरणे दर्शविणारी नोंदवही अचूक आणि अद्ययावत ठेवलेली असून ती शेतातील वास्तविक परिस्थितीशी जुळणारी आहे. 7.विशेषतः सुधारित बियाणे दुबार पीक जलसिंचन पिके हीच मिश्रणे आणि पडीत जमिनी यांच्यासंदर्भात स्थायी आदेशानुसार विवरणपत्रे काळजीपूर्वक संकलित केले आहे. 8.सीमा आणि भूमापन चिन्हे चांगल्या दुरुस्त स्थितीत आहेत आणि ती नादुरुस्त स्थितीत असल्यास अधिकार अभिलेखातील शेऱ्याचा स्तंभात त्याची नोंद केली आहे. 9.पाणीपुरवठा ची साधने पीक विवरणपत्रामध्ये, गाव नकाशा मध्ये आणि गाव नमुना आकारांमध्ये योग्य प्रकारे दाखवण्यात आली आहे.

10.मुळीच्या जमिनीचा आणि पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचा तपास लावून त्यासंबंधीचा अहवाल अशोचीतरीतच सादर केला आहे. 11.शासनाला संकीर्ण जमीन महसूल मिळवून देणाऱ्या लिलावयोग्य बाबींचा तपास लावून त्यांचा अहवाल सादर केला आहे. भूमापन क्रमांकाचा आणि भूमापन क्रमांकाच्या प्रत्यक्ष कब्जा धारण करणारी व्यक्ती ही अधिकार अभिलेखातील नोंदी नुसार जमिनीची मशागत करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीहून वेगळी असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती म्हणून वेगळ्या असलेल्या कच्च्या धारण करणाऱ्या व्यक्तीच्या नोंदवहीमध्ये त्याच्या नावाची नोंद घ्यावी आणि त्यांच्यातील संबंधात उतारे आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे अग्रषित करावे या नोंदवही चा नमुना महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार 1-5 आणि नोंदवहया तयार करणे आणि ठेवणे नियम 1971 मध्ये विहित केला आहे. जर उपस्थित असलेले गावकरी किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य तलाठ्या बरोबर आले नाही तर तलाठी आपले वरील कर्तव्य त्याच्याशिवाय पार पाडेल.

34.कलम 149 अन्वये आवश्यक असलेली सूचना विहित कालावधी मध्ये पाठविण्या कडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा अधिनियमाच्या कलम 151 आवश्यक असलेली माहिती पुरविण्यात किंवा कागदपत्र सादर करण्यात कसूर करणाऱ्या सर्व व्यक्तीच्या नावाची तलाठ्याने विलंब शुल्क नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी आणि नोंदवही प्रमाणे अधिकाराच्या आदेशार्थ प्रस्तुत करावे. 35.संबंधित कुळवहिवाट कायदा, कमाल मर्यादा कायदा आणि मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करणे बाबत अधिनियम 1947 त्यांच्या तरतुदीचे उल्लंघन करून झालेल्या व्यवहारासंबंधी चे प्रतिवेदन तलाठ्याने तहसिलदाराकडे पाठवावे.

36.तलाठ्याने जमिनीच्या सर्व तुकड्याची फेरफार नोंदवहीमध्ये नोंद करावी आणि अधिकार अभिलेख ठेवण्यास संबंधीच्या नियमानुसार द्यावयाच्या व प्रसिद्ध करावयाच्या नोटीस शिवाय एकत्रीकरण अधिनियमान्वये नमुन्यातील नोटीस संबंधित व्यक्तींना पाठवाव्यात. 37.तलाठ्याने वारसा प्रकरणाची नोंदवही विहित नमुन्यात ठेवावी व वारसा संबंधित नोंदी करताना हिंदू उत्तराधिकारी अधिनियमातील उपबंध आणि वारसांचे चार प्रकार व हिंदू विधवांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंबंधीच्या अधिनियम आणि मुसलमान आणि इतर जमातीत यासंबंधीचे काय ते लक्षात ठेवावेत. 38.तलाठ्याने गहाळ दुव्याची प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 151 मधील उपबंध यांचा अवलंब करून आणि वरिष्ठ महसूल आणि भूमापन अधिकार्‍यांचे आदेश प्राप्त करून निकालात काढावे.

39.तलाठ्याने त्यांच्या समाजातील गावांमध्ये पडणाऱ्या पूर, आग, धुके, गारपीट, टोळधाड, माणसांच्या आणि गुरांची साथीचे रोग, पिक बुडणे इत्यादींसारख्या नैसर्गिक आणि इतर आपत्तींचा अहवाल मंडळ निरीक्षकाडे आणि तहसिलदाराकडे पाठवावा. 40.तलाठ्याने मुंबई कृषी उपद्रवी कीड आणि रोग अधिनियम 1947 अन्वये कोणत्याही गावात कोणतीही कीटक, उपद्रवी कीटक इत्यादींच्या प्रादुर्भाव संबंधीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवावा.

41.जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने एकाधिकार प्रश्नाच्या प्रयोजनार्थ शासनाने विहित केलेल्या नमुन्यात शेतकरी सूची पत्रके तयार करावी व ठेवावी. 42.जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने गावातील शिधापत्रिकेची सूची तयार करावी. 43.जिल्हाधिकारी आदेशदेईल तेव्हा तलाठ्याने शेतकऱ्याकडून साठ्या संबंधित प्रतिज्ञापत्र मिळवावे.

44.जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा जमीनधारक आपल्या धान्याची विक्री शासकीय आदेशानुसार हे कार्यकारी खरेदी योजनेखाली करतील अशी व्यवस्था तलाठ्याने करावी. 45.जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने गावकऱ्यांना शिधापत्रिका द्यावी. 46.जिल्हाधिकारी आदेश देतील तेव्हा तलाठ्याने लेव्ही नोंदवही ठेवावी व खातेदारांना मागणी नोटिसा पाठवाव्यात.

47.जिल्हाधिकारी आदेश देईल तेव्हा तलाठ्याने दुर्गम प्रदेशातील नागरी पुरवठा च्या पावसाळी केंद्रांचा गोदामपाल म्हणून काम करावे. 48.तलाठ्याने सर्व विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या जमीनदाराच्या पतदारी संबंधी अहवाल सादर करावे. 49.सार्वत्रिक निवडणूक आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका यांच्यासाठी तलाठ्याने मतदार याद्या तयार कराव्यात. 50.तलाठ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांच्या निवडणुकीविषयी खात्यांमध्ये मदत करावे.

51.गावांमध्ये अल्पबचत कार्यक्रम आयोजित करण्यात अर्थ बजेट अधिकाऱ्यांना तलाठ्याने मदत करावी. 52.गावांमधील अल्पबचत योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांच्या नावांची नोंदवह्यात ठेवावेत. 53.ग्रामीण ऋण पत्रांची कर्जरोखे विक्री तलाठ्याने करावी. 54.संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दारुबंदी सप्ताह, हरिजन सप्ताह महोत्सव इत्यादी साजरे करण्यास तलाठ्याने मदत करावी. 55.राजपत्रित अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्यावर किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांच्या बाबतीत तहसीलदारांकडून सूचना मिळाल्यावर तलाठ्याने निर्णय शासकीय विभागांचे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत उपस्थित रहावे व त्यांना हवी असलेली कोणतीही माहिती पुरवावी.

56.सर्व भूमापन काम चालू असतांना भूमापन अधिकाऱ्यांना त्याला त्याला आवश्यक ते सहकार्य करावे. 57.तलाठ्याने आपल्या संज्ञांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी किंवा जिल्हाधिकारी ठरवून देईल अशा इतर कोणत्याही ठिकाणी राहावे इतरत्र कोठेही राहू नये. 58.तलाठ्याने एक दैनंदिनी ठेवयाची आहे, तपासणी आणि शेरे व अनुदेश देण्यासाठी वरिष्ठ महसूल आणि भूमापन अधिकारी यांची मागणी केल्यावर ती त्यांना सादर करावे.

59.तलाठ्याने त्यांच्या ताब्यातील ग्राम अभिलेखाच्या प्रती किंवा त्याचे उतारे त्या करिता अर्ज करणाऱ्या हितसंबंधी व्यक्तींना अर्ज मिळाल्यापासून 24 तासांच्या आत नक्कल शुल्क घेऊन द्यावे आणि अशा रीतीने वसूल केलेल्या शुल्काचा हिशेब ठेवावा. 60.तलाठ्याने एक भेट नोंद पुस्तक ठेवावे आणि ते भेट देणाऱ्या प्रत्येक महसूल आणि भूमापन अधिकाऱ्यांसमोर पुष्टांकन आणि असल्यास शेरे यासाठी सादर करावे. 61.तलाठ्याने तगाई आणि इतर सर्व शासकीय येणे यांचे लेखे त्याकरिता विहित केलेल्या नमुन्यात ठेवावे.

62.ज्या प्रयोजनार्थ तगाई कर्ज देण्यात आली असतील त्याकरिताच वापरण्यात येतात आणि कसे ते तलाठ्याने ठरवावे आणि कोणताही गैरवापर त्यांच्या निदर्शनास आल्यास त्या संबंधित तहसीलदारांकडे अहवाल पाठवावा. 63.तलाठ्याने आपल्या ताब्यातील सर्व शासकीय मालमत्तेचे नोंदवही ठेवावी आणि तपासणी वसुलीसाठी ती निरीक्षक अधिकार्‍यास सादर करावी.

64.तलाठ्याने पोस्टाच्या सरकारी तिकिटांची नोंद विहित केलेल्या नमुन्यात ठेवावी. 65. त्या त्या वेळी अमंलात असलेला कोणताही कायदा किंवा नियम किंवा शासनाने वेळोवेळी काढलेले सर्वसाधारण किंवा विशेष आदेश किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले कोणतेही निर्देश या अन्वये विहित केलेली सर्व कर्तव्य तलाठ्याने पार पाडली पाहिजे.

3 thoughts on “गाव तलाठ्याची कर्तव्ये काय असतात ।। तलाठ्याने कोणती कामे करणे बंधनकारक असतात याबद्दल विस्तृत माहिती !

  1. जमिनीचे खरेदी आणी विक्रिचे जेव्हा तहशील मधे खरेदी खत केल्या नंतर तलाठी जमिनिची नोंद ओढण्या साठी बिना पावती पैसे का घेतात याचे उत्तर मिळेल का.
    कारण खरेदी खत असून देखील आणी तलाठ्या कडून जमिनिची नोंद ओढली गेली नाही तर खरेदी खत शून्यवत होते का
    याचे उत्तर मिळेल का

  2. खुप छान माहिती आहे

    गावरान व गाव तलाव बाबत तलाठी, ग्रामसेवक यांना असे अधीकार आहे
    या बाबत काही माहिती असल्यास कववावे

Comments are closed.