तिसरा प्रश्न-: जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी नोटरी करून चालते का? उत्तर-: आता यामध्ये कसे आहे प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने याचे उत्तर बदलत जाईल आणि हा जो आज प्रश्न आहे यावर जर आपण कायद्याच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला ठोस हो किंवा नाही असं उत्तर देता येत नाही. याचं कारण असं आहे की आपण नोटरी कायदा आणि नोंदणी कायदा या दोन्हीचा एकत्रितपणे विचार केला तर बरेच उत्तर संभवतात.
एखादी पॉवर ऑफ ऍटर्नी नोटरी असावी किंवा नोंदणीकृत असावी असं कोणतंही बंधन घालण्यात आलेल नाही म्हणजे नोटरी कायद्यानुसार पॉवर ऑफ ऍटर्नी जास्त असावी असं कोणतंही बंधन करण्यात आलेला नाही म्हणजे नोटरी कायद्यानुसार पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा नोटरी कायदा आणि पॉवर ऑफ ऍटर्नी कायदा या दोन्हींचा एकत्रित विचार केला तरीसुद्धा पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा कुलमुखत्यार पत्र हे नोंदणीकृत असण्याची कोणतीही बंधनं त्या दोन कायद्यांमध्ये करण्यात आलेले नाही
आता नोंदणी करण्याचा जर आपण विचार केला तर नोंदणी कायदा काय म्हणतो ही शंभर रुपयापेक्षा जास्त मूल्याच्या मालमत्तेचं जर हस्तांतरण किंवा खरेदी विक्री वगैरे होत असेल तर ते नोंदणीकृत दस्ताने होणं हे बंधनकारक आहे मात्र जेव्हा आपण पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा कुलमुखत्यारपत्र असं म्हणतो तेव्हा त्याद्वारे कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण किंवा खरेदी विक्री होत नसते.
याचा एकत्रित तर जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा कोणतेही पॉवर ऑफ ऍटर्नी नोंदणीकृत असणे बंधनकारक नाहीये असाच आपल्याला निष्कर्ष काढायला लागेल मात्र कायदेशीर बाजू बाजूला ठेवून जर आपण वास्तवात आलो आणि लॉजिकली किंवा वास्तविक दृष्टीतून याचा विचार केला तर कोणतेही पॉवर ऑफ ऍटर्नी विशेषतः जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी ही नोंदणीकृत करणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं कारण हल्ली जीथे मालमत्तांच्या संदर्भात अनेक गैरप्रकार होत आहेत
आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर शक्यतोवर नोंदणीकृत पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा कुलमुखत्यारपत्र ह्यालाच मान्यता दिली जातील एखादी पॉवर ऑफ ऍटर्नी किंवा कुलमुखत्यारपत्र जोवर नोंदणीकृत होत नाही तोवर त्याच्या आधारे पुढचा कोणताही करार करणं किंवा त्या अनुषंगाने हस्तांतरण करणे हे काहीसं कठीण आहे हे सगळे लक्षात घेता कुलमुखत्यारपत्र हे नेहमीच श्रेयस्कर आणि दीर्घकालीन फायद्याचे ठरत.
चौथा प्रश्न-: वडील मुलीकडून हक्कसोडपत्र घेऊ शकतात का? उत्तर-: निश्चित पने घेऊ शकतात. म्हणजे वडील आणि मुलगी कशाला कोणीही कोणाकडूनही कोणत्याही हक्काचं हक्क सोड पत्र घेवू शकतो. हक्कासोड पत्र घेण्याकरता एक म्हणजे जी व्यक्ती हक्क सोडते तिला त्या मालमत्तेमध्ये हक्क असला पाहिजे दुसरं म्हणजे तिने तो स्वखुशीने सोडला पाहिजे
तीसर म्हणजे सरळ त्या संदर्भात एक रजिस्टर्ड किंवा नोंदणीकृत हक्कसोडपत्र झालं पाहिजे आणि ते हक्कसोडपत्र दिले आहे ते ते नोंदणीकृत असलं पाहिजे शिवाय ते पूर्णत: कायदेशीर असला पाहिजे. कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग करणारा हक्कसोड पत्र असता काम नये. ह्या अटी आणि शर्तींच पालन होत असेल वडील-मुलगीच कशाला कोणीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीच्या लाभत आपले हक्क सोडून देऊ शकते त्याला कोणतीही कायदेशीर अडचण असू शकत नाही.