घर बसल्या फ्री ऑनलाईन मतदान कार्ड काढा ।। मतदार यादी मध्ये देखील नाव नोंदवून घ्या ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

तुमचे 18 वर्षे जर पूर्ण असेल तर तुम्ही मतदान कार्ड हे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने फ्री मध्ये काढू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मतदान कार्ड तुमचं घरी सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. ऑनलाइन मतदान कार्ड म्हणजे त्याला पण वोटिंग कार्ड म्हणतो हे कसं काढायचं आणि हे मतदान कार्ड काढल्यानंतर तुमचं यादीमध्ये सुद्धा नाव लागणार आहे. तर या साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण प्रोसेस.

मतदान कार्ड तुमचा मोबाईल मधून सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप मधून सुद्धा काढू शकता. मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला nvsp.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन दिला जाईल, लॉग इन रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचे. इथे क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेवट एक ऑप्शन दिलेला आहे डोन्ट हॅव अकाउंट या ऑपशन वरती क्लिक करायचे आणि येथे तुमचे अकाउंट बनवायचे.

अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर विचारला असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्या नंतर तुम्हाला कॅपचा विचारला जातो तो टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून व्हेरिफाय ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. तुमचा ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला इतर दोन ऑप्शन दिसणार आहेत, पहिला ऑप्शन आय हॅव एपिक नंबर.

दुसरा असणार आहे आय डोन्ट हॅव एपिक नंबर. तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर सर्वात पहिल्यांदा तुमचं पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम नंतर लास्ट नेम, त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकायचे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. असा दोनदा पासवर्ड टाकून रजिस्टर ऑपशन वरती क्लिक करायचे. फस्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी पासवर्ड टाकून रजिस्टर केल्यानंतर तुमचे युजर रजिस्टर सक्सेसफुल असा मेसेज आला की तुमचे रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झाले आहे.

नंतर तुम्ही यूजर नेम मध्ये ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगीन करायचे आणि पासवर्ड तुम्ही बनवला होता तो पासवर्ड टाकून द्यायचा. कॅपचा विचारला जातो तो टाकून तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. लॉग इन केल्या नंतर नवीन इंटर्फेस तुम्हाला दिसणार आहे. तुम्हाला डाव्या साईडला पहिला ऑप्शन दिलेला आहे फ्रेश इन्क्लुजन एनरोलमेंट. या पहिल्या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर एक पेज ओपन होणार आहे.

आता येथे ऑनलाइन फॉर्म भरायचा आहे. पहिल्यांदा सिटीझनशिप इंडिया मध्ये राहतो तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला सिलेक्टेड स्टेट मधून आपले राज्य सिलेक्ट करायचे आणि नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. नेक्स्ट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फॉर्म ओपन होणार आहे. इथे तुम्हाला विचारले जाणार आहे की तुमची असेम्ब्ली. असेम्ब्ली निवडायची म्हणजे तुमचे इलेक्शन असते ते कुठे असते? तुमच्या आमदारकीच्या खासदारकीच्या निवडणुका होतात ते मेन इलेक्शन कुठे असते. तुमचा तालुका असू शकतो किंवा तुम्ही ज्या तालुक्यात शहरात राहता ते शहर सुद्धा असू शकते.

तर तुमचा शहर तालुका जे असेल ते तुम्ही तर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता खाली एंटर पोस्टल अड्रेस दिसेल. ज्या ठिकाणी तुमचे यादी मध्ये नाव लावायचे आहे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो पत्ता टाकायचा आहे. यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. जो तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ असेल त्याचाच तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर हाऊस नंबर, तुमचा हाऊस नंबर स्ट्रीट असेल, स्ट्रीट एरिया, लोकलिटी, टाउन, टाऊन असेल टाऊन, व्हिलेज असेल व्हिलेज तसेच तुमच्या पोस्ट ऑफिस असेल पोस्ट ऑफिस पिनकोड तुमचा येते टाकून द्यायचा आहे.

ही सगळी माहिती तुम्हाला ए टू झेड जी तुमच्याकडे ऍड्रेस प्रूफ असणार आहे त्या अड्रेस प्रूफ मध्ये जशी माहिती असेल तीच माहिती द्यायची आहे ज्या ठिकाणी तुम्हाला यादी मध्ये नाव लावायचे आहे. हा सगळा अड्रेस आपण फिल करून घेतल्यानंतर तुम्हाला खाली विचारला जाईल की तुम्ही जो पत्ता वरती लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून राहत आहे. हे तुम्हाला इथे डेट टाकायची आहे.

तर इथे तुम्ही कोणतीही टाकू शकता जन्मापासून तुम्ही राहत असेल तर जन्मतारीख तुम्ही देऊ शकता. जर काही दिवसापासून राहत असाल तर ती तारिख टाकायची आहे. ही डेट टाकल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंटमध्ये ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचा आहे. जास्तीत जास्त साईज 2 एम बी असणे गरजेच आहे. यामध्ये जेपीजी जेपीईजी डायरेक्टली तुम्ही त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो तुम्ही मोबाईल मधून सुद्धा अपलोड करू शकता.

त्यानंतर टाइप ऑफ डॉक्युमेंट- ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, रेशन कार्ड, बँक पासबुक अपलोड करू शकता. त्यानंतर इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, रेंट एग्रीमेंट वॉटर बिल, टेलिफोन बिल, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर ऍड्रेस प्रूफ तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.

मोबाईल मध्ये असेल तर तुम्ही मोबाईल मधून सुद्धा अपलोड करू शकता. अपलोड केल्यानंतर आपण पाहू शकतो आपला अपलोड झालेले आहे. जर तुम्हाला कट करायचा तर कट करू शकता आणि चुज फाईल वरती क्लिक करून तुम्ही पुन्हा अपलोड करू शकता. अपलोड झाल्यानंतर आता एंटर फॅमिली एपिक इफ अप्लिकेबल. जर तुमच्या इथे फॅमिली मेंबर असतील तर फॅमिली मेंबर चे किंवा शेजारच्या कोणाचा मतदान कार्ड चा नंबर वोटिंग कार्ड नंबर असेल तर तुम्ही टाकायचा आहे.

जर तुमच्याकडे एपिक नंबर मतदान कार्ड चा नंबर नसेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करायचे आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला बर्थ डिटेल्स दिसेल म्हणजे तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, मार्कशीट यावरती जी तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती इथे टाकून घ्यायचे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर तुम्हाला टाऊन किंवा तुमच्या गावाचं नाव टाकायचे स्टेट सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्ही कोणत्या डिस्ट्रीक मध्ये राहता तो जिल्हा तुमचा इथे सिलेक्ट करायचा आहे.

आता खाली खाली तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्हाला जेपीजी जेपीइजी फॉरमॅटमध्ये मॅक्झिमम 2 एम बी साईजमध्ये अपलोड करायचा आहे. आता एज प्रूफ अपलोड करायचा आहे. तुम्ही बर्थ सर्टीफिकीट, मार्कशीट दहावीची आठवीची किंवा पाचवीची, पासपोर्ट देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, पॅन कार्ड देऊ शकता हा तुमचा एज प्रूफ आहे.

तर तुम्ही कोणतेही डॉक्युमेंट्स सिलेक्ट करून अपलोड करू शकता. आता तुम्हाला एज डिक्लेरेशन विचारले जाईल. तर आता तुम्हाला डाउनलोड एज डिक्लेरेशन ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. डाउनलोड एज डिक्लेरेशन ऑप्शन वर जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्ही हे डाऊनलोड करून घ्या. डाऊनलोड केल्या नंतर याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढल्या नंतर हे तुम्हाला भरायचे आहे. ज्यांचे वय 21 पेक्षा जास्त आहे त्यांनीच भरायचे आहे. नाहीतर तुम्हाला द्यायची गरज नाही जर तुमचं वय 21 पेक्षा जास्त असेल तर. तुम्हाला हा एज डिक्लेरेशन कलर प्रिंट करायचा आहे.

प्रिंट केल्यानंतर नाव लिहायचे आहे. त्याच्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव लिहायचे आहे. त्यानंतर आर ओ म्हणजे प्रेसिडेंट ऑफ- मध्ये तुमचा ऍड्रेस येणार. जो ऍड्रेस प्रूफ दिलेला आहे त्या ठिकाणच्या ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे. नंतर तुम्हाला खाली विचारले जाणार आहे constituency म्हणजे तुमचा तालुका कोठे असणार आहे ते टाकून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला सिग्नेचर करायचे. त्यानंतर ठिकाण दिनांक आणि सिग्नेचर करून तुम्हाला याचा फोटो काढायचा आणि फोटो अपलोड करायचा आहे.

आता पुढे तुम्हाला एंटर पर्सनल डिटेल्स, माहिती विचारली जाईल पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं नाव विचारले जाणार आहे तुमचं नाव टाकल्या नंतर मराठी मध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायच आहे. नसेल मराठीमधे बरोबर तर तुम्ही तिथं व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर आडनाव टाका व चेक करून घ्या. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा. त्यानंतर खाली फादर मदर किंवा हजबंड डिटेल्स. रिलेशन सिलेक्ट करा. त्यानंतर त्या रिलेटिव्ह चे नाव आणि आडनाव टाका.

मराठी मध्ये स्पेलिंग चेक करा. चेक केल्यानंतर तुम्हाला मराठी मध्ये बदल करायचा असेल तर बदल सुद्धा करू शकता. त्यानंतर आता फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला युवर फोटोग्राफ मध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो आहे तो तुम्ही अपलोड करायचा आहे. एक छोटा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोचा एक फोटो मोबाईल मधून काढा किंवा तुम्ही डायरेक्टली सेल्फी सुद्धा काढू शकता. आणि तो इथे अपलोड करायचा तो मतदान कार्ड वरती येणार आहे. त्यानंतर तुम्हाला विचारले जाईल ते म्हणजे तुम्ही अपंग असाल तर ते सिलेक्ट करायचे.

अपंग असाल तर तुम्ही कशाने अपंग आहात ते. तुम्ही अपंग नसाल तर इथे काहीच करायचं नाही. आता ईलेम आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कम्पल्सरी नाही. नाही टाकला तरी चालेल पण आपण टाकून घ्यावा आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर प्लेस विचारले जाईल आता तुम्ही जिथे राहत आहात जिथून तुम्ही अर्ज करत आहात ते प्लेस तुम्ही टाकून घ्या आणि नेक्स्ट केल्यानंतर फॉर्म तुम्ही काय काय माहिती भरली आहे ते दिसेल आणि हा फॉर्म तुम्हाला कंट्रोल P दाबून प्रिंट करायचा आहे

आणि तुम्हाला सबमिट ऑप्शन येईल तो क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ट्रेकिंग नंबर रेफरन्स नंबर मिळेल. हा रेफरन्स नंबर तुम्हाला शेवटपर्यंत सेव्ह करून ठेवायचा आहे. त्याचा फोटो काढून घेऊ शकता किंवा कंट्रोल P दाबून प्रिंट करू शकता. हाच फक्त रेफरन्स नंबर महत्वाचा आहे. हा रेफरन्स नंबर तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यानंतर हा नंबर कॉपी करून ट्रेक स्टेटस ऑप्शन वर क्लिक करा आणी तुमचा स्टेटस जे आहे ते तुम्ही ट्रॅक करू शकणार आहात.

ग्रीन सिग्नल लागलेला दिसतोय म्हणजे एप्लीकेशन सबमिट झाले आहे. ट्रॅक अप्लिकेशन होम पेज वरती दिसेल. इथे दहा ते पंधरा दिवस किंवा महिना पण लागू शकतो. अशाप्रकारे तुमचा एप्लीकेशन सबमिट होईल आणि शेवटी तुमचा एपिक मिळणार आहे. ही प्रोसेस होण्यासाठी वीस ते तीस दिवस सुद्धा लागू शकतात. त्या नंतर तुमचा एपिक नंबर तुम्हाला भेटणार आहे एपिक नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड चा नंबर असतो. मतदान कार्डचा नंबर भेटल्यानंतर तुम्हाला होम पेज वरती एक दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे.

सर्च इलेक्ट्रॉल म्हणजे तुमचे यादीमध्ये नाव लागले का नाही हे तुम्हाला चेक करायचे आहे. तर सर्च इलेक्ट्रॉल ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं एक ऑप्शन दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही मतदान कार्ड नंबर जो ऑनलाईन भेटलेला आहे तो मतदान कार्ड नंबर दुसऱ्या ऑपशन मध्ये एपिक नंबर मध्ये टाकायचा आणि महाराष्ट्र राज्य स्टेट सिलेक्ट करायचे आणि सर्च ऑप्शन वर क्लिक करायचे.

महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून तुम्ही सर्च ऑप्शन वर क्लिक करता तेव्हा तुमचं नाव यादीमध्ये लागले आहे का ते इथे दाखवले जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा एक नंबर भेटेल तेव्हा तिथे तुम्हाला 15 ते 20 दिवसांनी चेक करायचे आहे. हे चेक केल्या नंतर तुमचे यादीमध्ये नाव लागणार. एक ते दोन वर्षे लागू शकतात तुमचे जे नियर बाय इलेक्शन मध्ये कोण उभं राहतं किंवा पोस्टाने तुमचे वोटिंग कार्ड तुम्हाला भेटून जाणार आहे.

तर तिथे तुम्हाला एक वर्षे लागू शकत किंवा सहा महिने लागू शकतात. तर अशा प्रकारे तुमचं यादी मध्ये नाव पंधरा ते वीस दिवसांमध्ये लागून जाईल. फक्त तुमचे वोटर कार्ड पोस्टाने तुम्हाला येऊ शकते किंवा तुमचं वोटर कार्ड तुमचं इलेक्शन मध्ये उभे राहतात त्यांना सुद्धा किंवा ग्रामपंचायत मध्ये किंवा तुमच्या घरी तुम्हाला वोटिंग कार्ड भेटून जाईल अशा प्रकारे तुम्ही वोटिंग कार्ड साठी घर बसल्या एकदम फ्री मध्ये काढू शकता. अर्ज करू शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “घर बसल्या फ्री ऑनलाईन मतदान कार्ड काढा ।। मतदार यादी मध्ये देखील नाव नोंदवून घ्या ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या लेखातून !

  1. खुप महत्वाची माहिती आहे प्रशासनाचे या स्तुत्य उपक्रम आभार

Comments are closed.