घर घ्यायचा विचार करताय? आणि घर घ्यावं कि जमीन घ्यावी कि रो हाऊस घ्यावं ह्यात गोंधळ होतोय तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. जाणून घ्या महत्वाची माहिती !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

प्रत्येकाच एक स्वप्न असत कि आपल स्वतःच एक घर असाव, तेच जर खरेदी करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी आपल्याकडे बरेच असे ऑप्शन असतात. जस कि अपार्टमेंट मधला फ्लॅट घेणे, रो हाऊसेस घेणे म्हणजे तयार घर घेणे किंवा जमीन खरेदी करणे आणि त्या जमिनीवरती बांधकाम करणे. जसे कि आपण प्लॉट घेतो, त्या प्लॉट वरती आपण बांधकाम करत असतो. असे बरेच ऑप्शन आपल्यासमोर असतात. आता ह्यातला कुठला ऑप्शन आपल्यासाठी चांगला, ह्यातल कुठलं काम आपण कराव.

आपल्याला कुठे फ्लॅट घ्यायचा झाला तर बरेच जण आपल्याला सांगतात फ्लॅट कशाला घेतोस? जमीन खरेदी कर त्यानंतर त्यावर बांधकाम कर. जमीन खरेदी करून त्याच्यावर बांधकाम करायच जर आपल्या डोक्यात असेल, तर बरेच जण आपल्याला म्हणतात कशाला बांधकाम करतोस त्याला खर्च जास्त होतो.

त्यामुळे तु फ्लॅटच घे, अपार्टमेंट मध्ये किंवा रो हाऊस घे. रो हाऊसेस घेताना बरेच लोक आपल्याला म्हणतात त्या पेक्षा फ्लॅट चांगला, फ्लॅटच खरेदी कर. काही म्हणतात जमीन खरेदी करून त्यावर बांधकाम करणे हेच चांगल आहे. असेच आपल्या समोर वेग वेगळे बरेच कंन्फुजन करणारे प्रश्न निर्माण होतात. मग आपण त्या वेळेस काय करायच?

आता आपल्याला हे तिन्हही ऑपशन चांगले आहेत. तर त्यामध्ये फ्लॅट पण चांगला असतो, रॉ हाऊसेस पण चांगलेच आहेत आणि प्लॉट घेऊन म्हणजेच जमीन घेऊन त्याच्यावरती बांधकाम करणे हेही चांगलच पण यासाठी आपल्याला ह्यातल काय चांगल आहे हे आपण पाहूया.

आपल्याला घर घ्यायच झालं तर फ्लॅट चांगला आहे?, रॉ हाऊसेस चांगल आहे? किंवा प्लॉट घेऊन त्यावर  बांधकाम करणे हे चांगल आहे? ह्यातल आपल्याला कुठला पॉईंट सोईस्कर आहे हे कस ठरवायचं त्यासाठी काही पॉईंट आहेत, त्या पॉईंटच्या आधारे हे आपण समजून घेऊया.

आता या मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बजेट: आता बजेट म्हणजेच काय? आपल्या खिश्यात किती पैसे आहेत किंवा बँकेत किती पैसे आहेत. हे म्हणजे बजेट नाही. तर बजेट म्हणजे आपण किती पर्यंत खर्च करू शकतो आपली तयारी किती आहे ह्याला आपण बजेट म्हणतो. म्हणजे जसं कि तुमच्याकडे थोडी फार शिल्लक रक्कम असेल, बँकेतून तुम्हाला कर्ज भेटू शकेल किंवा इतर पद्धतीतून तुम्ही पैश्याची उपलब्धता करू शकता अश्या पद्धतीने तुम्ही तुमचं बजेट तयार करू शकता.

मग हे बजेट कस ठरवायच? तुमचा इनकम किती आहे तुमच्या कडे पैसे शिल्लक किती आहे, जर तुम्ही कर्ज काढलं तर ते कर्ज तुम्ही फेडू शकता का? या पद्धतीने असे बरेच काही मुद्दे आहेत ह्याच्या आधारे तुम्ही तुमच बजेट ठरवू शकता. ह्या बजेट मध्ये तुम्हाला काय बसत, फ्लॅट बसत असेल तर फ्लॅट घ्या, रॉ हाऊसेस बसत असतील तर ते घ्या, किंवा एखादा प्लॉट बसत असेल जमीन बसत असेल तर त्या जमिनीवर तुम्ही बांधकाम करून तुम्ही तुमच स्वतःच घर बनवू शकता.

आता आपण दुसरा मुद्दा पाहूया, आवड: आपल्याला आवड कश्या मध्ये आहे इंटरेस्ट कश्या मध्ये आहे, बंदिस्त वातावरणा मध्ये राहायची आवड असेल इंटरेस्ट असेल. एकलकोंडा वातावरणा मध्ये राहायची आवड असेल तर तुम्ही बिनधास्तपणे फ्लॅट घ्या. अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घ्या तुम्ही तिथे बिनधास्तपणे राहू शकता.

तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही किंवा तुम्हाला सोसायटी मध्ये देखील ग्रुप असतात. सोसायटी मध्ये देखील तुम्हाला मिळून मिसळून राहता येते मात्र तिथे तुमच्या स्वभावा नुसार, मर्जी नुसार तुम्हाला वागता येते. आता तुम्हाला त्या पद्धतीच राहणीमान पाहिजे असेल तर तुम्ही फ्लॅट घ्या.

जर तुम्हाला मोकळीक मध्ये राहायचं असेल तर, मोकळ्या मैदानात खुल्या आसमानामध्ये राहायचं असेल तर तुम्ही रो हाऊस घ्या, किंवा जमीन घेऊन त्यावरती बांधकाम करा. गावाकडील आपल्या सारखी माणसं आपण काय करतो आपल्याला फ्लॅट मध्ये जास्त इंटरेस्ट नसतो. आपल्याला जेवढं मोकळ बांधकाम असेल, सुटसुटीत असले जेवढं आपल्याला ते आवडत असत.

मग इथे तुम्हाला प्रायोरीटी कशाला द्यायची आहे तर तुमच्या इंटरेस्टला तुम्हाला काय आवडत, नाहीतर तुम्हाला मोकळ्या मैदाना मध्ये राहायला आवडत, किंवा रो हाऊसेस मध्ये राहायला आवडत आणि मोकळ्या घरामध्ये आवडत असत आणि तुम्ही फ्लॅट घेता तर तिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही. मग तुम्हाला तिथे निराश झाल्या सारख किंवा अनकम्फर्टेबल वाटत त्यामुळे इथे तुम्हाला कशावरती फोकस करायचा आहे.

तर तुम्हाला इंटरेस्ट कश्यामध्ये आहे तुमची आवडत कश्यामध्ये आहे. तुमच्या घरा मध्ये जी माणसं राहतात त्याची आवड कशात आहे. आता ज्या वेळी तुम्ही फ्लॅट मध्ये राहता. फ्लॅट मधल्या खोल्या आपल्याला माहित आहे. छोट्या छोट्या खोल्या असतात. हॉल छोटा असतो, बेडरूम छोट असत, किचन तर खूपच छोट असत. मग आता तुम्हाला समजा तुमची गावाकडची फॅमिली असेल तर ऐसपैस पैस घर लागत.

जास्त करून किचन मोठं पाहिजे, हॉल मोठा पाहिजे, बेडरूम मोठं पाहिजे हे सगळं यैस पैस लागत. मग फ्लॅट मध्ये ज्या वेळी आपण राहायला जातो त्यावेळी आपल्याला ते अनकम्फर्टेबल, बंदिस्त वाटत. त्या मध्ये काही इंटरेस्ट राहत नाही त्यामुळे तुमची आवडत कशात आहे हे तुम्ही लक्ष्यात घ्या.

आता यानंतरचा मुद्दा जर पाहिला तर एरिया: तर आता एरिया कोणता आहे, जर तुम्ही पुणे, मुंबई या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायच असेल तर तिथे आपल्याला फ्लॅटचाच ऑपशन असतो. तिथे आपल्याला जमीन भेटणारच नाही आणि जर भेटली तर त्याची किंमत इतकी असते, कि आपल्याला परवडणारच नाही. मग अश्या ठिकाणी जर तुम्हाला बांधकाम करायच असेल किंवा स्वत:च घर घ्यायच असेल.

तर तिथे फ्लॅट असणे किंवा फ्लॅट हाच तुमच्या साठी बेस्ट ऑपशन असतो. पण जर गावापासून जर थोड्या अंतरावर जर तुम्ही प्रयत्न करत असताल किंवा तुम्हाला लांब राहायला परवडत असेल. तुमच्या कामा नुसार किंवा तुमच्या डेली रुटिन नुसार तुम्हाला ते जमत असेल तर पुणे, मुंबई ह्या ठिकाणी आपल्याला काही प्लॉट सुद्धा भेटतात.

किंवा काही रो हाऊसेस सुद्धा तिथे आपल्याला भेटतात. पण गावा पासून काही लांब अंतरावरती ते असतात. जर तुम्हांला ते परवडत असले किंवा तुमच्या डेली रुटिन  मध्ये बसत असेल. तर तुम्ही तिथे प्लॉट किंवा रो हाऊसेस घेऊ शकता. नाहीतर तुम्हाला फ्लॅट घेणे सगळ्यात सोईस्कर आहे.

आता या नंतरचा पुढचा मुद्दा जर आपण पहिला तर इनकम सोर्सेस: आता इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून जर घर घ्यायच असेल म्हणजे तुमच ऑलरेडी घर आहे. तुमच्या कडे भरपूर पैसे आहेत मग तुम्ही काय करता. रिअलइस्टेट मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. कंस्ट्रक्शन लॉबी मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे.

तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेणार तो भाड्याने देणार किंवा एखादी जमीन घेणार ती थोड्या दिवसांनंतर विकणार किंवा एखाद रो हाऊस घेणार ते विकणार किंवा भाड्याने देणार असं जर तुम्हाला करायचं असेल तर इथे तुम्हांला खूप महत्वाचं म्हणजे खूप डोक लावून काम करायच आहे. जर तुम्ही फ्लॅट घेतला, तर इथे तुमचा ज्या एरिया मध्ये घेणार तो एरिया सुद्धा इथे महत्त्वाचा आहे.

मुख्य ठिकाणी घेतल असेल तर तिथे भाड जास्त येणार किंवा त्याची किंमत जास्त असणार, बाहेर घेतला असेल तर म्हणजे भाड्याने द्यायच झालं तर त्याच रेट थोडा फार कमी असतो तर तुम्ही ते कुठल्या पर्पज साठी घेताय किंवा तुम्ही घेतलेली जमीन असेल किंवा फ्लॅट असेल तो कुठल्या एरिया मध्ये आहे यावरती त्याचा इनकम सोर्स ठरतो.

मग ह्या मध्ये तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा लक्ष्यात ठेवायचाय कि जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जर करणार आहात तर तुम्हाला जास्तीत जास्त इनकम मिळेल अश्या पद्धतीने तिथे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. मग जस तुम्ही फ्लॅट घेतला तर फ्लॅटच भाड तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकत मग तो 1bhk घ्यायचा 2bhk घ्यायचा  3bhk घ्यायचा हे तुमच्या बजेटवर डिपेंड आहे.

जर त्यापेक्षा जास्त इनकम पाहिजे असेल तर रो हाऊसेस घ्या, फ्लॅट पेक्षा रो हाऊसेस ला तुम्हाला भाड जास्त मिळेल कारण ते जरा सेपरेट असल्यामुळे, अपार्टमेंट मधल्या फ्लॅट पेक्षा त्याला भाड थोड जास्त मिळत जर तुम्हाला विक्री साठी पाहिजे असेल तर रो हाऊसेस कस असत अगोदर तुम्हांला बुकिंग करून सुद्धा भेटतात किंवा बांधल्या नंतर तयार झाल्यावर विकत घेतो त्यामुळे त्याची किंमत जरा जास्त असते.

फ्लॅट च्या बाबतीत थोडी फायदेशिर बाब असते कि फ्लॅट बांधकाम करायच्या अगोदर अपार्टमेंट मध्ये तयार व्हायच्या आत आपलं अगोदर बुकिंग करून ठेवतो मग टप्या टप्याने पैसे भरून फ्लॅट घेतो त्यामुळे आपल्याला थोडी कमी इन्व्हेस्टमेंट असते आणि ज्या वेळी फ्लॅट पूर्ण होतात त्या वेळी आपण जेव्हा विक्री करायला जातो तेव्हा तिथे आपल्याला चांगले पैसे मिळतात म्हणजे आपल्याला इनकम थोडा वाढून मिळतो.

इनकम करण्यासाठी जर घर घ्यायच असेल किंवा जागा घ्यायची असेल, या मध्ये सर्वात चांगला ऑपशन आहे जागा घेणे कारण फ्लॅट पेक्षा रो हाऊसेस पेक्षा जागेची किंमत जास्त वाढते. मग तुम्ही फ्लॅट घेतला तो विकायला गेला तर त्या मध्ये इतकी वाढ तुम्हाला दिसणार नाही. फ्लॅट आणि रो हाऊसेस हे तुम्ही जर भाड्याने देणार असाल, रेंट वर देणार असाल तरच तुम्ही ते घ्या. जर तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करा कि एखाद्या जमिनीचा भाग विकत घ्या, किंवा प्लॉट विकत घ्या त्याला तुम्हाला जास्त फायदा भेटू शकतो.

आता या नंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया डेव्हलोपमेंट: तर आता डेव्हलोपमेंटचा ऑपशन म्हणजे काय? आपण जर तिथे फ्लॅट घेतला तर तिथे आपल्याला डेव्हलोपमेंट करता येणार आहे का? आता समजा तुम्ही हा जर 1bhk चा फ्लॅट घेतला, उद्या जर तुमच्या घरात चार माणसं वाढली किंवा एक दोन माणसं वाढली तिथे आपल्याला 1 bhk च 2 bhk करता येणार आहे का ? वरच्या मजल्या वर वाढवता येणार आहे का? नाही, तिथे आपल्याला लिमिटेशन असतात.

डेव्हलोपमेंट तिथे आपल्याला करता येणार नाही त्यामुळे त्या फ्लॅटचा आपल्याला तिथे उपयोग नसतो. तुम्ही जर रो हाऊसेस घेतलं, रो हाऊसेस म्हणजे सेपरेटच बांधकाम असत. तुम्ही त्याचं वरच्या मजल्यावर बांधकाम करू शकता, साईटला बांधकाम वाढवू शकता बरेच ऑपशन तिथे तुम्हाला असतात किंवा तुम्ही जर जमीन घेतलेली असेल प्लॉट घेतलेला असेल तर त्या प्लॉट मध्ये आपल्याला आता समजा आपल बजेट आता कमी आहे आपण एक मजल्याचच बांधकाम केलं, उद्या आपल्या कडे पैसे वाढलेच, इनकम वाढला किंवा आपल्या कडे खर्च करायची तयारी झाली तर आपण त्याच्या वर दुसरं बांधकाम दुसरा मजला आपण वाढवू शकतो. अशाप्रकारे तुम्ही तिथे बांधकाम वाढवू शकता.

जर समजा तुम्ही जर प्लॉट घेतला असेल जमिन घेतली असेल, एखाद्या बिल्डर कडून कॉन्ट्रॅक्ट करून तर तिथे तुम्ही अपार्टमेंट उभारू शकता. मग त्या मध्ये तुम्ही पार्टनरशिप करून एखाद बांधकाम करू शकता असे बरेच तुमच्याकडे ऑपशन असतात त्यामुळे तिथे आपल्याला डेव्हलोपमेंटचा चान्स जास्त असतो.

जर तुम्ही डेव्हलोपमेंट पर्पसने जर एखादा घर घेत असाल, स्वतःच घर बांधत असाल, तर तिथे तुम्हाला फ्लॅटचा ऑपशन नाही तिथे तुम्ही रो हाऊसेस घ्या, किंवा त्या पेक्षा चांगला ऑपशन प्लॉट घ्या, त्या प्लॉटवरती तुम्ही ह्या वर्षी थोडं बांधकाम केलं, पुढच्या वर्षी थोडं बांधकाम केलं तुमच्या सोईनुसार तुम्ही या मध्ये बदल करू शकतात.

मार्केट मध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्याला फ्लॅट सुद्धा देऊ शकतात, रो हाऊसेस सुद्धा देऊ शकतात किंवा जमिनीचे प्लॉट सुद्धा आपल्याला देऊ शकतात मग तुम्ही त्यांच्याशी पण कन्सल्ट करा चर्चा करा. तुमच्यासाठी काय चांगल आहे तुमच्या फॅमिली साठी काय चांगल आहे. तुमच्या बजेट नुसार आवडी नुसार इंटरेस्ट नुसार किंवा तुमच्या इनकम सोर्सेस नुसार तुम्ही असे बरेच पॉईंट आहे त्याचा स्टडी करून पूर्ण पणे विचार करून याचा योग्य पद्धतीने सिलेक्शन करा.

कारण बऱ्याच ठिकाणी अस झाल आहे कि, त्यांनी फ्लॅट घेतला पण त्याचा त्यांना काहीच उपयोग झाला नाही. रो हाऊसेस घेतला त्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता किंवा जमीन घेतली पण त्या वरती बांधकाम करण शक्य झालं नाही. अशी बरीच उदाहरणे झालेली आहेत त्यामुळे तुम्ही घर खरेदी करताना स्वतःच घर बांधत असताना.

आपण कष्ट करत असतो पैसे साठवून स्वतःच घर बांधत असतो हि गोष्ट करत असताना आपल्याला खूप काळजी पूर्वक विचार पूर्वक आपल्याला हे पाऊल उचलायच असत आणि हे काम करत असताना तुम्ही मोठ्या माणसांचा अनुभवी माणसांचा सल्ला तुम्ही नक्की घ्या जेणे करून तुम्हाला इथे अनुभव हि सर्वात मोठी अशी गोष्ट आहे ज्या वर आपल्याला खूप नॉलेज भेटू शकत.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.