घरबसल्या विजेच्या मीटरचे रीडिंग महावितरणला पाठवून होणाऱ्या नुकसानीपासून वाचा।। आपल्या मोबाईल वरून मीटर रिडींग पाठवून अंदाजे किंवा चुकीचे बिल येण्यापासून स्वतःला वाचावा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

घरातील विजेच्या मीटरचे रीडिंग हे तुम्हाला स्वतः ला देखील पाठवता येणार आहे. लॉकडॉऊन मुळे महावितरण म्हणजेच एमेसिबी बोर्डाकडून कोणताही व्यक्ती तुमच्याकडे पाठवण्यात आला नव्हता आणि हे मीटरचे रीडिंग जर तुम्ही पाठवलं नाही तर तुम्हाला जास्त बिल सुद्धा येऊ शकतं.

महावितरण काय करतं, की लॅक डाऊन मध्ये कोणी रीडिंग घेतलेलं नसतं त्याच्यामुळे डायरेक्ट तुमचं मागचं बिल बघून अंदाजे जे आहे ते बिल तुम्हाला पाठवतो. आणि अंदाजे बील आल्यामुळे जास्त बील येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला पुन्हा जे बील आहे ते कमी करायला महावितरणच्या ऑफिसमध्ये जायला लागतं. आणि कमी करून आणावे लागतं. हा ताप तुम्हाला वाचवायचा असेल तर ही माहिती नक्की वाचा.

या माहिती मध्ये आपण फक्त मोबाईलच्या साह्याने एका मिनिटांमध्ये आपण महावितरण ला जे आहे ते विजेचे मीटरचे रिडींग चे‌ बील ते इथे आपण पाठवू शकनार आहात. तर चला मित्रांनो महावितरणला विजेचे मीटर रेडींग कसं पाठवायचे? मित्रांनो रेडींग पाठवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोर वरती तुम्हाला यायचं आहे.

आणि प्लेस्टोर वरती सर्च करायचं महावितरण. महावितरण सर्च केल्यानंतर तुम्हाला जे ॲप्लिकेशन दिसेल. त्या ॲप्लिकेशनवर ती तुम्हाला इंस्टॉल करायचे आहे. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे. आणि सर्वात पहिल्यांदा तुमच्या इथे अकाउंट नसेल तर तुम्हाला अकाउंट बनवून घ्यायचा आहे. जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉगिन करू शकता.

तरी आपण एप्लीकेशन ओपन करूयात. ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. इथे तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मागत आहे. जर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड माहित असेल तर लॉगिन आयडी पासवर्ड तिथे टाकू शकता. नाहीतर तुम्हाला एक इथ दुसरा ऑप्शन आहे. डोन्ट हॅव अकाउंट साइन अप. हा ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. डोन्ट हॅव अकाउंट साइन अप या ऑप्शनवर क्लिक करायचे.

आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कंज्युमर नंबर टाकायचा. म्हणजेच ग्राहक क्रमांक जो असेल तो तुमच्या लाईट बिल वरती तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. घरातला कोणताही मोबाईल नंबर टाका. ईमेल आयडी कोणताही टाकू शकता. त्याच्या नंतर एक लॉगिन नेम तुम्हाला तयार करायचा आहे.

लॉगिन यूजर नेम जे आहे ते कोणताही तुम्ही तयार करा. आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे. आणि कन्फर्म पासवर्ड करून सबमिट करायचे. सब्मिट केल्यानंतर तुमचा अकाउंट क्रिएट होईल. त्यानंतर तुम्ही ज्या अकाउंट मध्ये युजरनेम आणि पासवर्ड बनवला होता. तो इथे तुम्हाला टाकून लॉगिन करायचे आहे.

तर फायनली आपण आता लॉगिन करूया. लॉगिन केल्यानंतर एक इंटरफेस दिसेल. तिथे तुम्हाला तिसरा ऑप्शन दिसेल. सब्मिट मीटर रीडिंग याच ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर जर तुम्हाला एनेबल होत नसेल. तर एक मेसेज तुम्हाला येणे गरजेचे आहे. ज्यामध्ये तुम्हाला हा असा मेसेज आला असेल. तरच तुमचा तो पुढचा ऑप्शन जो आहे तो एनेबल होईल. तर ऑप्शन इथं अशाप्रकारे क्लिक केल्यानंतर तुमचं नाव दिसेल.

ज्या व्यक्तीच्या नावावरती मीटर आहे. तर मीटर आहे त्या व्यक्तीच्या नावावर तिथे क्लिक करायचं. आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं आता रेडींग घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे तुमची सगळी माहिती जी आहे ती आलेली दिसेल. बिलिंग युनिट बिल मन्थ. त्यानंतर रीडिंग डेट. मागची रिडींग डेट कधी घेतली होती. तुमचा ग्राहक क्रमांक सगळ दिसेल. तर इथे आपल्याला जे परमिशन द्यायचे आहेत. ओके करायचं. अलाव बटनावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर मिटर रिडींग जो आहे तो एक के डब्ल्यू एच फॉरमॅट आहे. तिथे मीटर रीडिंग टाकायचे आहे. ते कसं टाकायचं? तर के डब्लु एच म्हणजे असतात किलोवॅट आवर. किलो वॅट ‌आवर मध्ये रेडींग टाकायचं असतं. तर आपण मीटरच अगोदर फोटो काढायचा. आणि मीटरचा फोटो मध्ये जे रेडींग असेल तेच तुम्हाला मीटर रेडींग मध्ये टाकायचं आहे.

तर दुसरा ऑप्शन आहे मीटर फोटो. तिथे तुम्हाला प्रेस टू कॅप्चर फोटो. या ऑप्शनवर ती निळ्या रंगाचं ऑपष्न वरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा प्रेस टू कॅपचर फोटो. या ऑप्शनवर क्लिक करून तुमचा जो मीटर आहे तिथे यायचा आहे तुम्हाला. आणि हा फोटो काढायचा आहे. फोटो काढताना लक्षात ठेवा ते, जे मीटरचे रीडिंग आहे.

ते के डब्ल्यू एच पाहिजे. के डब्ल्यू एच जिथे थांबेल तिथेच तुम्हाला रिडींगच फोटो काढायचा आहे. हे लक्षात ठेवा. तर इथे आपलं एक हजार रेडींग आहे. के डब्लु एच मध्ये ओके करायचं. क्रोप करायचा फोटो. जेवढा मीटर आहे तेवढा फोटो घ्यायचे आहे. म्हणजे रेडींग स्पष्ट दिसलं पाहिजे. एकदम ओ के करून ओके करायचं.

त्यानंतर फोटो ऍड होईल. तर ते रिडींग तुम्हाला इथे टाकायचे आहे. तुमचं जे असेल ते तुम्ही टाका. आणि त्यानंतर सबमीट रेडींग या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. तुमचा रेडींग जे आहे ते फायनली सब्मिट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला विचारतो युनिट बरोबर टाकलेले आहेत का? तर युनिट बरोबर आहेत आपले.

शंभर युनिट. तरी एक हजार युनिट. तुमचे जे असतील ते तुम्ही टाकून घ्या. आणि येस करा. त्यानंतर सबमीट सक्सेसफुली झालेला आहे. या महिन्याच रिडींग आपण पाठवलेला आहे महावितरणला. तर अशा प्रकारे तुम्ही हे रिडींग घर बसल्या एका मिनिटांमध्ये पाठवू शकता.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.