ग्रामीण भागातील घरकुलाचे स्वप्न होणार साकार, महाआवास अभियान होणार सुरु ।। घरकुलाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार ।। महत्वाचा शासननिर्णय !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण शासनाच्या एका महत्वपूर्ण निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या निर्णयामुळे तुमच हक्काचे घर घेण्याचे स्वप्न आहे ते लवकर होण्यास मदत होईल. मित्रांनो,प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं घर व्हावं आणि त्यासाठी आपण मोठ्या अपेक्षेने पाहतो ते म्हणजे घरकुल योजनेकडे.

त्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, पारधी आवास योजना किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजना अशा खूप साऱ्या योजना राज्यामध्ये राबवल्या जातात. परंतु घरकुल योजना म्हटलं की आपण त्याकडे पाहताना तक्रारीच्या स्वरूपात पाहतो की काम होत नाही, योजनेचा फायदा मिळत नाही,

लवकर मंजुरी होत नाही, किंवा गेल्यावर्षी अर्ज भरला आहे पण अजूनही आधार सिडिंग झाले नाही, निधी मिळाला नाही हे सर्व तक्रारी बंद व्हाव्यात कमी व्हाव्यात आणि प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या हक्काचं घर मिळावं, यासाठी एक महा आवास अभियान राज्यामध्ये राबवला जाणार आहे आणि याच यासंदर्भातलं हा शासन निर्णय आहे.

या अभियानाच्या अंतर्गत दहा उपक्रम राबवले जाणार आहेत, ज्याच्या मध्ये घरकुलाची मंजुरी, त्याचा निधी वाटप करणे, उत्तम दर्जाचे घरकुल बांधून देणे, कमी जागेमध्ये जास्त बांधकाम करणे, त्याचप्रमाणे त्याची गुणवत्ता राखणे तसंच शौचालय, पाण्याचा पुरवठा अशा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या देणे,

त्या बरोबरच ज्या लाभार्थ्यांना कडे जमीन नाही, त्या लाभार्थ्याला जमीन उपलब्ध करून देणे असे काही उपक्रम त्याच्यामध्ये राबवण्यात आलेले आहेत. हे उपक्रम राबवत असताना जे विभाग, जे तालुके, जिल्हे चांगले काम करतील त्यांना राज्यस्तरीय, विभागीय स्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय अशी पारितोषिके देखील दिली जाणार आहेत.

शंभर दिवसांचा हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून सर्व योजना गतिमान होऊन आपल्याला घर हे लवकरात लवकर मिळू शकतो. तर एकंदरीत हे महा आवास अभियान काय आहे हे आपण या शासनाच्या निर्णयातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो याच्या संदर्भात 19 नोव्हेंबर 2020 चा शासन निर्णय आपण पाहू शकता.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविणेबाबतचा. याची प्रस्तावना खाली दिल्याप्रमाणे आहे. ‘सर्वांसाठी घरे 2022’ हे केंद्र शासनाचे महत्त्वाचे धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे.

या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येत असून,

त्यांना पूरक पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अतिक्रमण नियमानुकूल करण्याची योजना अशा योजनाही राबविण्यात येत आहेत. सन 2020-21 या वर्षाकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण 405077 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास मधील देयक क्रमांक 11 नुसार किफायतशीर गृहनिर्माण क्षेत्राचा विकास झाल्यास एकूण 17 SDG पैकी किमान 14 SDG वर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. यासाठी घरकुलांच्या कामाची प्रगती फक्त संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी, नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधांनी युक्त असे घरकुल उपलब्ध करून द्यावे.

तसेच नैसर्गिक आपत्तीत सक्षमपणे सामोरे जाणारे घरकुल बांधण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे शासनाचे ध्येय आहे. प्रधानमंत्री आवास-ग्रामीण ही योजना देशात दिनांक 20 नोव्हेंबर 2016 पासून अंमलात आली असून दरवर्षी 20 नोव्हेंबर हा राष्ट्रीय आवास दिन म्हणून राबविण्यात येतो.

या वर्षी प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत आवास दिनाचे औचित्य साधून राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी महा आवास अभियान ग्रामीण राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याच अनुषंगाने हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णयानुसार सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 21 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत आवास अभियान-ग्रामीण राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

‘सर्वांसाठी घरे 2022’ या शासनाच्या धोरणाला अंतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शहरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

मित्रांनो या अभियानाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे याच्या मधील नाविन्यपूर्ण व गतीशील काम करणाऱ्या संस्थांना पारितोषिकं देखील दिली जाणार आहेत तर याचे उपक्रम काय आहेत हे बघुयात. 1.भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे- ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत गरजू व पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना

अ) पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ब) शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करण्याची योजना क) ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची योजना हे उपक्रम यांच्या अंतर्गत राबवले जाणार आहेत 2.घरकुलांचे उद्दिष्ट प्रमाणे 100% मंजुरी देणे- राज्य स्तरावरून केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सन 2016 17 ते 21 पर्यंत जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेल्या उद्दिष्टांना 100% मंजुरी देणे हा एक उपक्रम याच्यामध्ये राबवला जाणार आहे

आणि या उपक्रमांमध्ये व्यवस्थितपणे काम करणाऱ्या संस्थांना परितोशिके दिली जाणार आहेत. 3.मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण करणे- केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत सन 2016-17 ते 2020-21 मधील मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे शंभर टक्के वितरण विनाविलंब करणे, घरकुलाच्या उद्दिष्टानुसार 100% घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे, त्याचप्रमाणे प्रलंबित घरकुले पूर्ण करणे,

सर्व घरकुले आर्थिक दृष्ट्या पूर्ण करणे, ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे, कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग, त्याचप्रमाणे आवास योजनेमधील लाभार्थ्यांचे आधार सीडींग, जॉब कार्ड मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणे या बाबी सुद्धा या उपक्रमाचे अंतर्गत राबवले जाणार आहेत.

याप्रमाणे शासकीय योजनांची कृती संगम करून लाभार्थ्यांना रोजगार व स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत शौचालय बांधून देणे,जल जीवन मिशन मधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, प्रधानमंत्री आवास योजने मधून गॅस जोडणी देणे, सौभाग्य योजने मधून विद्युत जोडणी देणे, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान या मधून उपजीविकेचे साधन देणे अशा प्रकारचे उपक्रम देखील यामध्ये राबवण्यात येणार आहेत.

त्यानंतर पुढचा जो उपक्रम आहे तो आहे नाविन्यपूर्ण उपक्रम यामध्ये अ) पुरेशी जागा नसल्यास दोन मजली इमारती बांधणे. ब) पुरेशी जागा असल्यास गृह संकुल उभारण्याची सहकारी संस्था स्थापने. क) लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी बँकेचे रु. 70000/- कर्ज स्वरूपात मिळवून देणे.

ड) घरकुलांचे बांधकाम साहित्य स)जसे दगड, विटा, वाळू, सिमेंट, स्टील, शेताचे साहित्य इत्यादी उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ग सुरू करून त्यात महिला बचत गटांचा सहभाग घेणे. इ) पंचायत राज संस्था( जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) सेवा संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था लाभार्थी व लोकसहभाग यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे. अशा प्रकारचे उपक्रम राबवले जाणार आहेत.

हे उपक्रम राबवले जात असताना या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यशाळा, राज्यस्तरीय कार्यशाळा, तालुकास्तरीय कार्यशाळा व ग्रामस्तरीय कार्यशाळा, ग्राम कृती गट तसेच लाभार्थ्यांचे व बँकेचे मेळावे अशा प्रकारचे उपक्रम व जिल्ह्याच्या अंतर्गत राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच या उपक्रमाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही समिती सुद्धा नेमण्यात आलेले आहेत जसे की सनियंत्रण व मूल्यमापन समिती याच्यामध्ये राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, ग्रामपंचायत स्तरीय अशा विविध समित्या या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत,। उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागांना पुरस्कार देण्यासाठी देखील समिती नेमण्यात आलेली आहे. यासाठी पुरस्कारांची नामांकने राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामपंचायत स्तरीय अशी आहेत.

पुरस्कारासाठी जर पाहिला तर प्रधानमंत्री आवास योजना साठी राज्यस्तरीय पुरस्कार आहे, यामध्ये सर्वोत्कृष्ट विभागासाठी प्रथम क्रमांक, सर्वोत्कृष्ट जिल्ह्यासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट तालुक्यांसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आणि सर्वोत्कृष्ट गृहसंकुल साठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक त्याचप्रमाणे राज्यस्तरीय योजनासाठी देखील अशाच प्रकारे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

यानंतर राज्य पुरस्कृत आवास योजना यासाठीदेखील सर्वोत्कृष्ट तालुका, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, सर्वोत्कृष्ट बँक शाखा, शासकीय जागा उपलब्ध व वाळू उपलब्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी अशा प्रकारचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरिय यांच्या अंतर्गत पुरस्कार दिले जाणार आहेत.

मित्रांनो हे पुरस्कार देण्यासाठी राबवले जाणारे जे उपक्रम आहेत,त्याच्यामध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजना अंतर्गत सन 2016-17 ते 2020-21 या कालावधी मधील पात्र व भूमिहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजना व इतर मार्गाने जागा उपलब्ध करून देणे यासाठी कमाल दहा गुण असणार आहे आणि याच्यासाठी ज्या संस्था, जे विभाग काम करतील त्यांना त्यांचा कामाप्रमाणे गुण दिले जातील.

त्याचप्रमाणे घरकुलांचे उद्दिष्ट प्रमाणे 100% मंजुरी देणे मंजूर घरकुलांना पहिल्या हप्त्याचे 100% वितरण करणे, घरकुलांचे उद्दिष्ट प्रमाणे 100% घरकुले भौतिक दृष्ट्या पूर्ण करणे, त्यालासुद्धा प्रत्येकी दहा दहा आणि वीस असे मार्क देण्यात आलेले आहे उद्दिष्टानुसार शंभर टक्के घरकुले आर्थिक दृष्ट्या पूर्ण करायला देखील दहा गुण देण्यात आलेले आहेत तसेच ग्रामीण गवंडी प्रशिक्षण पूर्ण करणे, डेमो हाऊसेस उभारणे यांनादेखील प्रत्येकी दहा गुण देण्यात आलेले आहेत.

त्याचप्रमाणे कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांचे आधार सिडिंग प्लस व जॉब कार्ड मॅपिंग शंभर टक्के पूर्ण करणे,शासकीय योजनांची कृतिसंगम व नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे अशा विविध उपक्रमांना प्रत्येकी दहा गुण देण्यात येणार आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे हे महा आवास अभियान ग्रामीण हे राबवले जाणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी चा खर्च प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, राज्य पुरस्कृत योजना यांच्या प्रशासकीय निधीतून करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.

या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठीच्या ज्या सूचना आहे त्यासुद्धा स्वतंत्रपणे निर्गमित केल्या जातील अशा सूचना देखील देण्यात आलेले आहेत. शासनाचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर देखील पाहू शकता. त्याच्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न आतापर्यंत अपेक्षित होतं ते आता साकार होण्यास मदत होणार आहे.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “ग्रामीण भागातील घरकुलाचे स्वप्न होणार साकार, महाआवास अभियान होणार सुरु ।। घरकुलाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार ।। महत्वाचा शासननिर्णय !

Comments are closed.