मित्रांनो कोणत्याही गावाचे विकासाचे मुख्य केंद्र म्हणजे त्या गावचे ग्राम पंचायत आणि या ग्रामपंचायती साठी राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या कडून विविध प्रकारचे अनुदान मिळत असते आणि प्रत्येक ग्रामपंचायत स्वतः च्या उत्पन्नातून सुद्धा काही निधी कमवत असते. जसे घरपट्टी, पाणीपट्टी विविध प्रकारचे दाखले देणे, व्यवसाय कर, मालमत्ता कर अशा अनेक माध्यमातून ग्राम पंचायत उत्पन्न कमावत असते.
मित्रांनो, प्रत्येक महिन्यामध्ये ग्रामपंचायतीला शासनाकडून किती निधी मिळाला आहे आणि स्वतःचा निधी किती प्राप्त झालेला आहे हे विविध माध्यमातून याची प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक महिन्याची माहिती आपण आपल्या मोबाईल वरती ऑनलाईन बघु शकतो. एकंदरित आपल्या ग्रामपंचायतीचे जे पासबुक असते, त्यामध्ये कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारची एँट्री झाली हे लक्षात येते.
ग्रामपंचायतीने हा सर्व निधी कोणत्या गोष्टीसाठी खर्च केला, कोणत्या दिवशी खर्च केला, कोणत्या चेक नंबर नुसार खर्च केला आणि सद्या आपल्या ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर किती रककम निधी शिल्लक आहे ही सर्व माहिती ऑनलाईन आपण बघु शकतो. एकंदरित आपण ग्रामपंचायतीचे पासबुकच प्रिंटच्या स्वरूपात बघु शकतो.
तर ही सर्व माहिती कशी बघावी या विषयी चे सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत. ही सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्याला सर्वात आदी गुगलच्या सर्चबार मध्ये “egramswaraj.gov.in ” टाईप करायचे असते. ही वेबसाईट सर्च केल्यानंतर पुढील प्रकारचे जे पेज येते, त्या पेजवर खालच्या बाजूला आल्यावर विविध प्रकारचे टॅब आपल्याला दिसतील.
रिपोट्स च्या खाली जे विविध टॅब आहेत, त्यापैकी आपल्याला accounting या टॅबवरती क्लिक करायचे असते. आता accounting या टॅबवरती क्लिक केल्यानंतर परत आपण पुढील पेजवरती जाऊ शकतो. तर या पेजवरती विविध प्रकारचे टॅब दिसतात, ज्यापैकी आपल्याला तीन नंबरच्या टॅब म्हणजेच accounting entity wise report समोरील प्लस आयकॉनवरती क्लिक करायचे आहे.
Accounting entity wise report च्या प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारचे विविध टॅब आपल्यासमोर ओपन झाले असतील ज्यापैकी दोन नंबरची टॅब cash Book report असते. त्यावर क्लिक करायचे असते. Cash book report या टॅब वर क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होते.
या पेजवरती आपल्याला काही माहिती भरायची असते तर cash book report च्या समोर जे दोन ऑप्शन दिसत असतात – मंतवाईज आणि स्कीमवाईज. आपल्याला मंत वाईज या गोलमध्ये टिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला डेट रेंज वाईज आणि मंत वाईज करून परत मंत वाईज वरती क्लिक करायचे आहे.
आता ही निवड केल्यानंतर मित्रांनो फायनँशियल ईयर म्हणजेच आर्थिक वर्षाची निवड करायची असते. कोणत्या वर्षाची माहिती आपणास आवश्यक आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे असते. आता इकडे आपण २०१० ऑनलाईन माहिती बघु शकतो. त्यामध्ये मी आता २०१९-२० या वर्षाची निवड करत आहे.
आर्थिक वर्ष निवडल्या नंतर आपल्याला आपलं राज्य निवडायचे असते. कुठल्याही राज्यातील ग्राम पंचायतील माहिती मोबाईल वरून बघु शकतो पण सद्या आपल्याला महाराष्ट्र राज्याची निवड करायची आहे. तर मित्रांनो इथे आपल्याला तीन प्रकारची माहिती बघायला मिळते. ते म्हणजे जिल्हा परिषद फंड, पंचायत समीती फंड आणि ग्राम पंचायत फंड.
यातील जे तीन नंबरचे ऑप्शन असते village panchayat यावर टिक करायचे असते. village panchayat वरती टिक केल्यानंतर तुमचे गाव ज्या जिल्ह्यामध्ये येत असेल त्या जिल्ह्याची म्हणजे तुमच्या स्वःतची जिल्ह्याची निवड करायची असते. उदाहरणासाठी मी या ठिकाणी अहमदनगर या प्रथम जिल्ह्याची निवड करत आहे.
आता तुम्हाला Block मध्ये तालुक्याची निवड करायची असते. मी इथे सद्या अकोली या तालुक्याची निवड करत आहे.आता आपल्याला village म्हणजे तुमच्या गावाची ज्या ग्रामपंचायतीच्या माहिती तुम्हाला बघायची असते, त्या ग्राम पंचायतीची निवड तुम्हाला करायची असते. मी सद्या इथे आंबड या ग्राम पंचायतीचे निवड केली आहे.
आता पुढे month म्हणजे माहिन्याचे तुम्हाला निवड करायची असते. तुम्ही जे वर्ष निवडले असते त्या वर्षातील कोणत्या महिन्याची एंट्री तुम्हाला आवश्यक आहे त्या महिन्याची तुम्हाला निवड करावी लागेते. मी सद्या फेब्रूवारी या महिन्याची निवड केली आहे. आता महिना निवडल्यानंतर खालच्या बाजूला या काळ्या बॉक्समध्ये जे अक्षरे दिसतात यांना captcha असे म्हणतात.
तो जशास तसे आपल्याला खालच्या या टॅबमध्ये भरायचा असतो. या पेजवरील सर्व माहिती आणि captcha काळजीपूर्वक भरल्यांनतर मित्रांनो आपल्याला Get report या टॅबवरती क्लिक करायचे आहे. आता Get report या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या ग्रामपंचायतची आणि ज्या महिन्याची निवड केली असते,
त्या महिन्याचा संपूर्ण डाटा त्या ग्रामपंचायतीचे त्या महिन्याचे पासबुकचे प्रिंट आपल्यासमोर ओपन झालेली असते. मित्रांनो या ठिकाणी आपण आंबड या ग्राम पंचायतीचे निवड केली होती आणि २०२०-२१ साठी हा महिना फेब्रूवारी निवडला होता. तरी या विषयीचे माहिती पाहण्यासाठी ही प्रिंट आता दोन पार्टमध्ये दिसते.
पहिला पार्ट असतो receipt चा ज्यामध्ये त्या ग्रामपंचायतीला कोण कोणत्या माध्यमातून या महिन्यामध्ये निधी प्राप्त झाला ही माहिती असते.दोन्ही माध्यम राज्य शासन आणि स्वःतचे अनुदान उत्पन्न ही माहिती आपल्याला receipt या कॉलम मध्ये मिळत असते आणि या रेषेच्या उजव्या बाजूला पेमेंट हे ऑपशन असते.
पेमेंट म्हणजेच या ग्रामपंचायतीने या चालू महिन्या मध्ये कोणत्या दिवशी कोणता निधी, कोणत्या चेक द्वारे कोणाला दिले याची माहिती मिळत असते.तर याबद्दल सविस्तर माहिती बघूयात. मित्रांनो आपण इथे उदाहरणादाखल एक ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड बघूया. पहिल्यांदा आपण receipt मधे बघितल्यावर ०३/०२/२०२० रोजी या ग्रामपंचायतीला विवाह नोंद फी ८०० रुपये,
दाखला फी ६०२ रुपये आणि व्यवसाय कर ६०० रुपये असे एकूण २०२० रुपय जमा झाले आहेत. तर ०३/०२/२०२० रोजी एकूण रक्कम या बँक खात्यामध्ये आहे रुपये २८३२८०५ रुपय शिल्लक रकम या ग्राम पंचायतीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. पुढच्या डेटला जर बघितले तर ०३/०२/२०२० रोजीच घरपट्टीच्या स्वरूपामध्ये ग्रामपंचायतीला ८५८९ रुपय या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे.
पुढे जागा भाडे, टॉवरचे जागा भाडेसाठी ग्रामपंचायतीला ३९५८ रुपय जमा करण्यात आले आहे. अशा प्रकारे हे स्वःकष्टीत अनुदान त्या ग्राम पंचायतीच्या आहे असे म्हणता येईल. आता पुढे जर बघितले तर या ठिकाणी दिनांक ११/०२/२०२० रोजी Fourteen Finance commission म्हणजेच चौदाव्या विक्त आयोगाचे जवळपास ८०१६८३ रूपय या ग्राम पंचायतीला मिळाले आहे.
अशा प्रकारे रिसिप्ट मध्ये या ग्राम पंचायतीला कोण कोणत्या माध्यमातून उत्पन्न मिळाले आणि कोणत्या तारखेला ते बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत याची माहिती आपल्याला मिळत असते. जर उजव्या बाजूल पेमेंट या ऑप्शन मध्ये आपण बघितले की कोणत्या बाबीवर खर्च करण्यात आलेले आहे. तर इथे ०८/०२/२०२० रोजी एक परस्पर कपात म्हणून एंट्री आहे ज्यामध्ये १७ रुपय कपात झालेली आहेत.
हे sms चार्जेस किंवा बँकेचे विविध चार्जेस असतात. त्यामध्ये कपात करण्यात आलेली आहे. पुढच्या बाजूला खालच्या बाजूस जर आपण बघितले तर त्या ठिकाणी परत एक एंट्री दिसत आहे. १४/०२/२०२० रोजी एक जाहिरात या ग्रामपंचायती तर्फे प्रसिद्ध करण्यात आली होती. वर्तमान पत्रामध्ये ज्या जाहिरातीसाठी ५००० रुपय खर्च हा दिनांक १४/०२/२०२० रोजी चेक नंबर पण आहे.
०१९०२१ या चेकनुसार ५००० रूपय रक्कम खर्च करण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो परत १८/०२/२०२० रोजी या ठिकाणी भिमनगर रस्ता काँक्रिटीकरण साठी १२०००० रुपय चेक नंबर ९२९२२८ या चेक नंबर नुसार खर्च करण्यात आले होते. खालच्या बाजूला आंबीका नगर रस्ता काँक्रिटीकरण साठी परत १८/०२/२०२० रोजी रुपय १००००० करण्यात आले होते.
अशा प्रकारे आपण महाराष्ट्रेतील कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये किती निधी शिल्लक आहे आणि कोणत्या महिन्या मध्ये कोणत्या योजनेसाठी किती रक्कम मिळाली हे बघता येते. किती रक्कम खर्च करण्यात आली या विषयीचे सविस्तर माहिती आपल्या मोबाईलच्या सहाय्याने हे देखिल बघता येते.
सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
मला आपण दिलेल्या माहिती खुप छान आहे..आपले मार्गदर्शन.व मोलाचे योगदान दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे..
Very nice good job👍👍
Mast aahe