ग्रामीण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये नागरिकांसाठी भरविल्या जाणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व काय आहे? ।। ग्रामसभेच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत? जाणून घ्या सविस्तरपणे.
नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कि ग्रामपंचायतीमध्ये जी काही वर्षातून ज्या काही ग्रामसभा भरवतात त्याचे कामकाज कसे चालते? ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकाने, सरपंचाने आणि गावातील ग्रामस्थांनी कोणकोणते मुद्दे उपस्थित करायला पाहिजे? ग्रामसेवकाने आणि सरपंचानी कोणती माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे? ग्रामसभेचे हे कामकाज कोणत्या पद्धतीने चालायला पाहिजे? या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.
ग्रामसभा गावातील सर्वोच्च संसद: ग्रामपंचायतीची खरी ताकद शासनाचा विविध पातळ्यांवरून प्रदान केलेलं अधिकार किंवा अर्थसहाय्य नसून गावातील लोकांचा सहभाग व लोकांचे नेत्तृव आहे. गावपातळीवरच खरी लोकशाही व्यवस्था अमलात येऊ शकते, बाकी स्थरावरून प्रतिन्याधिक लोकशाही व्यवस्था आहे.
विकासाची कामे केवळ पैशाने नव्हे तर लोकांचा निर्धाराने व लोकांचा सहभागाने होतात. लोकशाही व्यवस्थेत म्हणूनच सहभागी लोकशाहीला महत्व देण्यात आलं आहे. ग्रामसभा म्हणजेच गावाची सर्वसाधारण सभा व ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेची कार्यकारी समिती असे एकंदरीत स्वरूप असते.
ग्रामसभा सर्व जाती वर्गाना सामावून घेणारी व्यक्तींची प्रतिष्ठा व समानतेचा पुरस्कार करणारी असते. गावातील सर्व मतदारांची मिळून ग्राम सभा बनते. ग्रामसभेद्वारे सरकारी कामावर देखरेख, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचे काम हे ग्रामसभेमार्फत करण्यात येते, त्याचबरोबर समस्यांचा विचार करून त्या सोडवण्यासाठी, योजना आखण्यासाठी व त्याचा अंमल आणण्यासाठी ग्रामसभेचा उपयोग होतो.
ग्रामसभेची वैशिष्ट्ये: -प्रातिनिधिक अधिकार वेगळी ठरते. -लोकांची क्षमता मान्य करणारा व त्यांना वाव देणारी ग्रामसभा असते. -ग्रामस्थांचा कुवती वरती विश्वास ठेवणारी. -खऱ्या अर्थाने विकेंद्रित लोकशाही बळकट करणारी आहे म्हणूनच ग्रामसभेचा आग्रह प्रत्येक नागरिकाने धरायला हवा.
ग्रामसभेचा कायदेशीर तरतुदी: १.मित्रांनो वर्षातून किमान प्रत्येक गावामध्ये ४ ग्रामसभा घेतल्याचं पाहिजे. जास्तीत जास्त कितीही ग्राम सभा घेता येतात पण वर्षातून किमान ४ ग्रामसभा घेतल्या पाहिजे. २.ग्रामसभादरम्यान ४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी किंवा गॅप नसायला पाहिजे.
सरपंचाने जर योग्य कालावधी मध्ये ग्रामसभा बोलवली नाही तर ग्रामसभेचा जो सचिव असतो ग्रामसभा हि बोलू शकतो व ती ग्रामसभा हि सरपंच आणि उपसरपंच यांचा सहमतीने बोलवली आहे असं समजण्यात येते. ३.पहिली जी वर्षातील ग्रामसभा होते त्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो किंवा जर सरपंच गैरहजर असेल तर उपसरपंच हा त्या ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.
आणि ज्या काही वषर्भरणानंतर जा काही ग्रामसभा होतील त्याचा अध्यक्ष पद हे जे काही निवडून आलेले सदस्य असतात त्यामधून निवडण्यात येते. ४.ग्रामसभा हि गावातील विकासकामांची निर्णय घेणारी सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. ग्रामपंचायत हि साधारण ग्रामसभेत निर्णय या ठरावांची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
५.पहिली ग्रामसभा हि १ मे ला घेतली जाते. दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्ट तिसरी ग्रामसभा नोव्हेंबर मध्ये व चौथी ग्रामसभा हि २६ जानेवरी या दिवशी घेण्यात येते. या जा काही चार ग्राम सभा आहेत या प्रत्येक गावात कायदेशीर रित्या व्हायलाच पाहिजे. आता नियमित ग्रामसभा व महिला ग्रामसभा म्हणजेच जशी नागरिकांची ग्राम सभा भरते तशीच महिलांची प्रत्येक गावामध्ये हि ग्रामसभा व्हायलाच पाहिजे.
अन्य ग्रामसभा किमान ७ दिवसांचा वेळ देऊन गावातील नागरिकांना दवन्डीने हा निरोप पोहोच करायला पाहिजे किंवा आताचा आधुनिक युगामध्ये प्रत्येक गावकऱ्याला मेसेज व व्हाट्सअँप द्वारे आपण त्याची माहिती पोहोचवू शकतो. ग्रामसभेची वेळ हि गावकरांचा सोयीने निवडण्यात यायला पाहिजे.
६.महिला ग्रामसभेचे इतिवृत्त असते म्हणजेच जे काही त्या महिलाग्रामसभेत मांडण्यात येते त्याची माहिती हि ग्रामसभा व मुख्यग्रामसभा यामध्येही ते वाचून दाखवायला पाहिजे. त्यानंतर सरपंच ग्रामसभा त्यातील शिफारशींचा विचार करतील व शिफारशींवर सहमत नसल्यास कारणांची नोंद करतील.
म्हणजेच महिला ग्रामसभेचे जे काही इतिवृत्त असेल त्याच्यावर सरपंच शिफारशी करतील आणि ते सर्व सदस्यांना मान्य असेल तर त्या मान्य केल्या जातील. ७.नोव्हेंबर महिन्यामध्ये जी ग्रामसभा भरते त्या ग्रामसभेला अंदाजपत्रांची ग्रामसभा म्हणतात. इतरवेळी आवश्यक वाटल्यास जादा ग्रामसभाही सरपंच बोलवू शकतात.
पंचायतसमिती, मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा सूचनेवरूनही जादा ग्रामसभा या बोलवू जाऊ शकता. ८.गावात कमी करणाऱ्या सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांवर ग्रामसभेचे शिस्त विषयक नियंत्रण असेल अशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक मूल्यमापन ग्रामसभेकडून त्यांचा वरिष्ठांचा निदर्शनास आणून दिले जाईल.
अगर ग्रामसभा सदर चा अधिकारी ग्रामपंचायतला बोलवू शकतात. ९.ग्रामसभेची नोटीस ७ दिवस आधी दिली पाहिजे, जादा ग्रामसभेची नोटीस ४ दिवस आधी द्यायला पाहिजे, त्यात सभेचा काळ, दिवस, वेळ, जागा व सगळे पुढे असणारे विषय इत्यादी माहिती हि दिली गेलेली पाहिजे.
म्हणजे ग्रामसभा असेल तर तर त्याची माहिती हि ७ दिवस आधीच गावकर्यांना दिली गेली पाहिजे. ग्रामसभा, ग्रामसभेचा वेळ, दिनांक, ठिकाण तिचा अगोदरची जी काही ग्रामसभा झाली असेल त्यावरून निश्चित केली जाईल कि पुढची ग्रामसभा जर मोठी गटग्रामपंचात असेल.
किंवा गटग्रामपंचायत हि वेगवेळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या प्रभागात नियमित सभापूर्वी सभा घेऊन प्रभागातील विकास प्रकल्प व कार्यक्रम याबाबत विचारविनिमय करून त्याचे रतिवृत्त सदस्यांनी सहीनिशी देऊन त्याची एक प्रत ग्रामपंचायतीला पाठवली पाहिजे.
१०.जर दलित व आदिवासी महिला व तरुणांचा अशा-आकांक्षा व्यथा-वेदना वाव देणारे गावाचे शहाणपण सदिच्छा व कर्तृत्व व्यक्त करणारे लोकांचे व्यासपीठ म्हणजेच ग्रामसभा होय. ११.गावात काम करणारे शाकीय निमशासकीय व पंचायतीचा कर्मचाऱ्यांवर जसे शिक्षक,
अंगणवाडी ताई परिचारिका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स व अन्य कर्मचारी तलाठी, वनाधिकारी शासकीय कर्मचारी यांच्यावर यांच्यावर ग्रामसभेचे शिस्तविषयक नियंत्रण राहील अशा कर्मचाऱ्यांचे वार्षिक कार्याचे मूल्यमापन त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्याचा निदर्शनास आणून दिले जाईल.
१२.राज्यशासनाच्या व केंद्रशासनाच्या व्यक्तिगत लाभधारक योजना करता लाभधारकांची नाव ग्रामसभा करेल. जसे कि अन्नदानावरील शेती व अवजारे, उपकरणे, शाल व मुलींना सायकल वाटप, विधवा वेतन योजना, शेतमजूर, वृद्धापकाळ योजना तसेच आता अन्य जे काही योजना असतात त्याची जी काही निवड प्रक्रिया असेल ती ग्रामसभेमार्फत होईल.
१३.ग्रामपंचायतीला सामाजिक व आयिक विकासाच्या योजना कार्यक्रम किंवा प्रकल्प यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी ग्रामसभेची मान्यता द्यावी लागते. म्हणजेच कुठलीही योजना गावामध्ये अमलात आणायची असलं किंवा कुठलेही नवीन काम गावात करायचे असेल तर त्याला ग्रामसभेची मान्यता लागते.
विकास योजनांवर कोणताही खर्च करण्यास ग्रामपंचायतीला ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागते, रस्ते बांधणे, बाजार तळ बंधने, नाली बंधने अन्य विकासाची कामे म्हणजे ग्रामसभेला किती मोठ्या प्रमाणात भारताचा लोकशाहीने ताकत दिली आहे कि ग्रामसभेचा परवानगी शिवाय ग्रामपंचायतमधील कोणतेही विकास काम केलं जाऊ शकत नाही.
म्हणजे प्रत्येक विकास कामला गावकऱ्यांची मंजुरी लागतेच. १४.शासकीय कामांकरिता जमीन अधिग्रहण करण्यासाठी ग्रामसभेचे मत घेणे आवश्यक राहील ग्रामसभेने बहुमताने ठराव दिला तरच पुढे राज्य शासनात जमीन अधिग्रहित करता येईल अन्यथा नाही.
ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे ते बघूया: १.सर्वसाधारण ग्रामस्थ विशेषतः शेतमजूर व स्रिया याना सोयीचा दिवस व वेळ ग्रामसभेची निवडावा. २,ग्रामसभेची तारीख वेळ आणि ग्रामसभा पुढील विषय व्यापक पूर्व प्रसिद्धी द्यावी दवंडी द्वारे लाऊडस्पीकर वरून ग्रामपंचायत कार्यालय व गावातील मुख्य च्या जागी मोठे ठळक फलक लावून अशी प्रसिद्धी करता येईल.
तसेच गावातील शाळेचा प्रत्येक वर्गात ग्रामसभेची माहिती सांगून मुलांना आपल्या पालकांना सभेत पाठवण्यास प्रवृत्त करावे त्यामुळे भावी पिढीवरही ग्रामसभेचे संस्कार होतील. ग्रामसभेपुढे गावातील स्वयंसेवी संस्था अंगणवाडी सेविका मार्फत महिला मंडळाला ग्रामसभेची माहिती देण्यात आली तर महिलांचा सहभाग ग्रामसभेत वाढेल. ३.ग्रुप ग्रामपंचायत असल्यास प्रत्येक गावात आळीपाळीने ग्रामसभा घेतली जावी एरवी गावातील वेगवेगळ्या वाडी पाड्यावर आळीपाळीने ग्रामसभा घेण्यात यावी.
ग्रामसभेत काय मागाल: मित्रांनो प्रत्येक गाव ची जी काही ग्रामसभा होते त्यामध्ये कोण कोणत्या प्रकारची माहिती हि आपण एक नागरिक म्हणून त्या गावचा सदस्य म्हणून आपण कोणकोणती माहिती हि ग्रामसभेत मागायला पाहिजे. १.मागील वर्षाचा ग्रामपंचायतीचा छापील जमाखर्च असतो म्हणजेच जाला ऑडिट रिपोर्ट म्हणतो जी एप्रिल महिन्यामध्ये केला जातो त्याची माहिती आपण इथे मागू शकतो.
२.महिला ग्रामसभेचा अहवाल. ३.परिपत्रक याचे वाचन ग्रामसेवकाने केले पाहिजे. ४.त्याचबरोबर हिशोब तपासणे ऑडिट रिपोर्ट ची काही शंका असतील तर त्यांची उत्तरे हि ग्रामसेवकाने आणि ग्रामसभेलाही घ्यावयाला पाहिजे. ५.अंदाजपत्रकावर मान्यता घेण्यात अली पाहिजे नोव्हेंबर महिन्यामध्ये मजूर अंदाज पत्रकांचे वाचन झाले पाहिजेत.
६.चालू वर्षात झालेल्या व करावयाच्या विकास कामांची माहिती दिली पाहिजे. ७.ग्रामशिक्षण समिती रेशन दक्षता समिती व ग्रामीण पाणीपुरवठा व स्वछता समिती निवड व अहवाल वाचन हे झालं पाहिजे. ८.महिलांसाठी जो काही १० टक्के राखीव निधीचा योग्य वापर हा व्हायला पाहिजे.
९.त्याचबरोबर अनुसूचित जाती व जमातीकरिता जो काही १५ टक्के निधी असतो त्याचा व्यवस्थितपणे व्यवस्थापन करून वापर व्हायला पाहिजे. (वरील माहिती https://www.youtube.com/channel/UC_e8Vz8-VTrapzoqHPOLtXw या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे).