ग्रामपंचायतमधे सगळ्यात प्रमुख घटक असणाऱ्या ग्रामसेवकाची कार्य आणि अधिकार काय आहेत? ग्रामीण भागातील प्रत्येकासाठी महत्वाची माहिती थोडक्यात ! भाग -१

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो,आज आपण अगदी छोट्या पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक यांची कार्य व अधिकार आणि ग्रामसेवक कशासाठी असतात हे पाहणार आहोत. ग्रामपंचायतमधे सगळ्यात प्रमुख घटक असतो तो म्हणजे ग्रामसेवक.

आपण जिथे राहतो ज्या गावात आपण शेती करतो, तर शेतकरी बंधूनो त्या गावात आपल्याला, आपलं काम, गावाचे कामकाज बघण्यासाठी ग्रामसेवक हे महत्त्वाची भूमिका बजावत असतो. प्रत्येक ग्रामपंचायतीला हा प्रशासकीय अधिकारी असतो, तो म्हणजे ग्रामसेवक.

ग्रामसेवक हे जिल्हा परिषदेचे वर्ग 3 चे कर्मचारी असतात, म्हणजेच त्यांचा पगार वगैरे जे आहे ते जिल्हा परिषद त्याला देत असते. तसेच ग्रामपंचायतचे प्रशासकीय सेवक आणि सचिव हे देखील ग्रामसेवकच असतात. ग्रामसेवक यांच्यावर गटविकास अधिकारी यांचे नियंत्रण असते.

आता पाहूया ग्रामसेवकाची कार्य आणि अधिकार काय आहेत?: ग्रामसेवकाचे सगळ्यात पहिले काम असतं नोंद करणे. तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या जन्माचे, मृत्यूचे किंवा विवाहाची नोंद करण्याचे काम हे ग्रामसेवक करत असतात. त्याचबरोबर गावाच्या पातळीवर ग्रामसभा घेतल्या जाव्यात.

गावातील लोकांच्या अडचणी वगैरे विचारल्या जाव्यात, त्यासाठी महिन्यातून एक दोन ग्रामसभा झाल्या पाहिजेत असा एक नियम असतो पण बऱ्याच गावात त्या होत नाही आणि या ग्राम सभेच्या माध्यमातून जे काही प्रश्न असतील ते मांडायचे असतात आणि ग्रामसेवक व सरपंच यांनी ते प्रश्न सोडवायचे असतात.

त्याचबरोबर राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या काही योजना असतील, ज्याकी शेतकरीवर्गाला कळत नाही, अशा योजना गावकऱ्यांना समजावून सांगणे हे ग्रामसेवकाचे काम आहे पण असे आपल्याकडे सहसा होताना दिसत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला या गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

जर तुमच्या गावात कोणती नवीन योजना आल्याचे तुम्हाला कळले तर ग्रामसेवकास जाऊन नक्की विचारा.त्याचबरोबर आणखी एक जबाबदारी ग्रामसेवकावर असते ती म्हणजे गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे. त्यांच्या कार्य आणि अधिकारांमध्ये मोडते.

अशी आणखी एक गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत चा जो काही हिशोब असतो तो सरपंच, उपसरपंच हे तर बघताचच, पण ग्रामपंचायतीचा सगळा हिशोब आहे तो ग्रामसेवकाने लावायचा असतो. ग्रामपंचायतीला किती पैसे आले? त्यातले किती खर्च झालेत? हा सगळा हिशोब ग्रामसेवकांनी लावायचा असतो.

पण तस आपण ग्रामसेवकाला आपल्या गावांमध्ये कोणते कार्य झाले त्याबद्दल कधीच विचारत नाही.कधी गावात या पथ दिव्यांसाठी निधी येतो, कधी रस्त्यांसाठी निधी येतो, कधी नाल्यानंसाठी निधी येतो, कधी पाण्यासाठी, पाण्याचा टाक्यांसाठी येतो पण हे निधी आलेले माहीत असले तरी सामान्य नागरिक मात्र शांत असतो.

असे न करता आलेला निधी कोणत्या कामासाठी आणि कसा खर्च झाला? कोणी खर्च केला? हे आपण माहीत करून घेतले पाहिजे. हा जो ग्रामपंचायतीचा वार्षिक अहवाल आहे हे सगळे ग्रामसेवक पाहत असतात. ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधल्या सगळ्या गोष्टींची वार्षिक अहवाल ग्रामसेवक ठेवतो.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “ग्रामपंचायतमधे सगळ्यात प्रमुख घटक असणाऱ्या ग्रामसेवकाची कार्य आणि अधिकार काय आहेत? ग्रामीण भागातील प्रत्येकासाठी महत्वाची माहिती थोडक्यात ! भाग -१

Comments are closed.