जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

प्रश्न पहिला- समजा एखाद्या जमिनीच्या सातबारा वर इतर हक्कात ज्या व्यक्तीचं नाव आहे, ती व्यक्ती जर निधन पावले असेल. किंवा मृत असेल. तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी? किंवा कशी करता येईल. उत्तर: सगळ्यात आधी एक लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकार म्हणजे नक्की काय?

तर जेव्हा एखाद्या जमिनीमध्ये भोगवटदार आणि कुळ यांच्या व्यतिरिक्त काही व्यक्ती किंवा काही संस्था, यांचे जर हक्क किंवा अधिकार असतील. तर अशा व्यक्ती किंवा संस्थांची नावं ही इतर अधिकारांमध्ये नोंदवण्यात येतं. मात्र आपल्या कडे काही बाबतीत भोगवटदार यांच्या मुलींची नावं सुद्धा किंवा भोगवटदारांच्या वारसांमध्ये जर मुली असतील,

तर त्यांची नावे सुद्धा इतर अधिकारांमध्ये लिहण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. आता हे एकदा लक्षात घेतले पाहिजे की इतर अधिकाऱ्यांमध्ये ज्या व्यक्तीचं नाव आहे, तीचा नक्की हक्क काय आहे? अधिकार काय आहे? तो अजून ही अबाधित आहे का? त्यानी आपल्या खरेदी किंवा विक्रीला कोणती बाधा येणार आहे का? हे आधी लक्षात घ्यायला पाहिजे.

समजा इतर अधिकारांमध्ये एखाद्याचा काही रक्कमेचा बोजा असेल. किंवा इतर अधिकारांमध्ये एखाद्याचा वहिवाटीचा अधिकार असेल. तर त्या अधिकाराच्या आधीन राहून आपण ती मालमत्ता निश्चितपणे खरेदी करू शकतो. व विकू शकतो. आता प्रश्न असा येतो की इतर अधिकारामध्ये ज्या व्यक्तीच नाव आहे,

ती जर मयत झाली असेल, तर काय करायचं? तर या संदर्भात त्या मयत व्यक्तीचे अधिकार हे व्यक्ती विशेष होते, का ते त्या मयत व्यक्तीच्या वारसांना सुद्धा मिळणार आहे. याच्यावर मुख्य अवलंबून आहे. समजा इतर अधिकारामध्ये ज्या व्यक्तीच नाव आहे, ती मयत झाली आणि तिला कोणी ही वारस नसतील, तर मग प्रश्न मिटला.

अशा मिळकतीची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र जर इतर अधिकारामध्ये मयत व्यक्ती ला वारस असतील आणि त्या व्यक्तीचे अधिकार हे वारसाहक्काने पुढे जाण्या सारखे असतील, तर सहाजिकच त्या मयत व्यक्तीच्या वारसांना त्यामयत व्यक्तीचे अधिकार मिळतात.

सहाजीक जेव्हा मयत व्यक्तीचे अधिकार वारसा ने पुढे जातात, तेव्हा मात्र जर अशा जमिनींची खरेदी-विक्री व्यवहार किंवा हस्तांतरण करायचं असेल, तर अशा मयत व्यक्ती च्या वारसांना सुद्धा त्या करारात सामील करून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे.

समजा अशा वारसांना आपण करारात सामील नाही केलं आणि भविष्यात त्यांनी जर त्यात कराराला हरकत घेतली, तर आपला करार व्यवहार आणि हस्तांतरण हे कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता, जर इतर अधिकारातील व्यक्ती मयत असेल आणि तीला असलेले अधिकार वारसाने पुढे गेलेले असतील. आणि त्या व्यक्तीला वारस सुद्धा असतील, तर अशा वारसांची संमती कराराला किंवा खरेदी विक्री घेणं हे निश्चितपणे आवश्य आणि फायदेशीर ठरतं.

दुसरा प्रश्न- वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा? उत्तर: थोडक्यात सांगायचं झालं तर मालमत्तेच्या संदर्भात मालकी हक्क आणि ताबा या दोन्ही ही स्वतंत्र आणि पूर्णपणे भीन्न बाबी आहेत. आणि या दोन्ही गोष्टींना स्वतंत्र कायदेशीर दर्जा आणि अधिकार सुद्धा आहेत.

आता समजा आपली वाटणी झाली असेल. आणि त्या वाटप पत्रानुसार आपल्याला जे क्षेत्र मिळालेला आहे त्या क्षेत्रावर इतर व्यक्तीचा ताबा असेल, तर ते क्षेत्र आपल्याला परत मिळण्या करता आपण २ पर्यायांचा अवलंब करू शकतो एक- सदर व्यक्तीला सामंजस्याने सोबत घेऊन आणि दुसरे जर ती व्यक्ती विरोध करत असेल तर निश्चितपणे सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. आणि ते क्षेत्र आपण परत मिळवू शकतो.

तिसरा प्रश्न- वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे? उत्तर: काही ठिकाणी भोगवटदारांच्या मुलींची किंवा भोगवटदाराचे वारसा असलेल्या मुलींची नावं इतर अधिकारांमध्ये नोंदवण्यात येतं. आता इतर अधिकारांमध्ये नाव आहे म्हणजे हक्क किंवा अधिकार कमी-जास्त होतात,

किंवा भोगवटदार नाव आहे म्हणून हक्क किंवा अधिकार कमी-जास्त होतात, असे अजिबात नाही. मुळात एक लक्षात घेतले पाहिजे की सगळे महसूल अभिलेख आणि त्यातील नोंदी ह्याने कोणत्याही कोणाच्या ही मालमत्तेची सिद्ध होऊ शकत नाही.

किंवा महसुली दफतर आणि त्यातील नोंदी हा कोणाच्या ही कोणत्याही मालमत्तेच्या मालकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही. आता जर मुलींना आपली नावे भोगवटदार सदरील लावून घ्यायचे असतील, तर त्याकरता त्या तसा अर्ज करू शकतात. आणि आपली नावं भोगवटादार सदरी लावून घेऊ शकतात.

समजा मुलींची लागलेली नाव जर कमी करायची असतील तर त्यांच्या करता स्वतंत्र हक्क सोड पत्र किंवा त्यांच्या हिस्साच बक्षीस पत्र किंवा खरेदीखत, इत्यादी मार्गाने त्यांचा जो हक्क किंवा अधिकार आहे, तो आपण रीतसर विकत घेतला, तर त्यांची इतर अधिकारांमध्ये नावे ही आपोआप नाहीशी होतात. तर आपल्याला नक्की करायचं काय आहे? आपल्याला नावं भोगवटदार सदरी हवी आहे, की ती नाव काढून टाकायची आहेत? त्या अनुषंगाने आपण योग्य ती कार्यवाही करू शकता.

चौथा प्रश्न – परागंदा (हरवलेली) व्यक्तीची वारस नोंद कशी करावी? उत्तर: आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की वारस नोंद ज्या व्यक्तींचि करायची आहे त्या व्यक्तीचे आधी निधन होनं आणि त्या निधनाचा कागदोपत्री पुरावा अशनं हे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती परागंदा होते,

किंवा नाहीशी होते, तेव्हा ठरावीक काळ जाई पर्यंत त्या व्यक्तीला मृत घोषित करता येत नाही. जेव्हा कोणतीही व्यक्ती परागंदा होते किंवा नाहीशी होते किंवा हरवते, तेव्हा त्याच्या परिचितांनी किंवा इतर लोकांनी अशी व्यक्ती नाहिशी झाल्या बाबतची तक्रार किंवा नोंद संबंधित पोलिस ठाण्यात केली पाहिजे.

कारण अशी जर नोंदच केली नाही, तर ती व्यक्ती नक्की कधीपासून हरवली आहे, ती कालगणना कशी करायची? हे महत्त्वाचे आणि काहीशी किचकट प्रश्न उभे राहतात. हे टाळण्यासाठी जेव्हा आपण परागंदा व्यक्तीची नोंद करतो, आणि त्या नोंदी नंतर एक ठराविक कालावधी, बारा वर्ष एवढा कालावधी उलटला की अशा व्यक्तीला मृत घोषित करता येत.

मात्र त्याच्याकरता आपल्याला सक्षमी न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करून न्यायालयाचा तसा आदेश द्यायला, आणि जोवर तसा आदेश येत नाही, परागंदा व्यक्ती अधिकृत पणे मृत घोषित होत नाही. तोवर त्याच्या वारसांची नोंद होऊ शकत नाही. कारण जोवर व्यक्ती अधिकृतरित्या मृत होत नाही, तोवर त्याच्या वारसाचे नाव कुठेही लागण्याचा अजिबात शक्यता नाही. किंवा तसे प्रश्नच उद्भवत नाही.

प्रश्न पाच- सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल, तर त्याचा अर्थ काय? उत्तर: आता खरेदी निरर्थक याचा शब्दशः जर आपण अर्थ घेतला तर ती खरेदी ही कायदेशीर नाही किंवा त्या खरेदी ने त्या मालमत्तेमध्ये काहीही फरक पडलेला नाही. किंवा त्या खरेदी नुसार ज्यांना ती मिळकत दिलेली आहे, त्यांना सुद्धा ती मिळकत मिळालेली नाही.

थोडक्यात हा जो करार किंवा व्यवहार किंवा खरेदी आहे ती पुर्णतः निरर्थक आहे असा अर्थ निघतो. आता अशी होण्याची अनेक कारणे असतात. काही वेळेला एखादी मालमत्ता विशेषतः वर्ग दोन ची असेल किंवा त्याच्या वापर किंवा करार किंवा हस्तांतरण यावर निर्बंध असतील.

आणि त्या निरबंधांच्या अधीन न राहता किंवा त्या निरबंधांना उलंघून आपण जर एखादा व्यवहार किंवा खरेदी विक्री किंवा हस्तांतरण केलेलं असेल तर कायदेशीर चौकटीत तो करार, व्यवहार किंवा हस्तांतरण बसत नसल्याने, असा करार व्यवहार किंवा हस्तांतरण हे निरर्थक ठरते.

आणि त्या अनुषंगाने तसा शेरा देण्यात येतो. उदाहरणार्थ महाराष्ट्र मध्ये शेतजमीन घेण्या करता शेतकरी असनं अत्यंत आवश्यक आहे. अशा वेळेला एखाद्या शेतकरी नसलेल्या व्यक्तिंनी जर शेतजमीन खरेदी केली, तर कायदेशीर तरतुदी नुसार जर ते खरेदीखत किंवा तो व्यवहार नियमांकुल नाही केला गेला तर अशी खरेदी निरर्थक ठरु शकते.

किंवा एखादी वर्ग दोन ची जमीन आहे, त्या वर्ग दोन च्या खरेदी करता सक्षम अधिकारी किंवा कार्यालयाची पूर्ण परवानगी आवश्यक आहे. मात्र अशी पूर्व परवानगी न घेता जर आपण किंवा खरेदी विक्री किंवा हस्तांतरण किंवा व्यवहार वगेरे जर केला.

तर असा व्यवहार, हस्तांतरण किंवा खरेदी विक्री, हेसुद्धा कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन केल्याने निरर्थक ठरु शकते. आणि त्या अनुषंगाने खरेदी निरर्थक असा शेरा महसूल अभिलेखा मध्ये येऊ शकतो. थोडक्यात काय? जेव्हा आपल्याला सातबारावर किंवा महसूल अभिलेखा वर खरेदी निरर्थक असा शेरा दिसतो,

तेव्हा ती जी खरेदी आहे ती कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन करुन करण्यात आलेली आहे असा आपण त्याचा थोडक्यात अर्थ घेऊ शकतो. आणि त्या संबंधित मालमत्तेचे जर आपण बाकीचे फेरफार किंवा इतर कागदपत्र तपासली तर नक्की काय भंग झालेला आहे, कसा भंग झालेला आहे? तो नियमांकुल करायचा मार्ग आहे का? या पुढच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडू शकतात.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “जमिनीच्या सातबारावर इतर हक्कात नाव असलेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर अशा जमीनीची खरेदी किंवा विक्री कशी करावी?।। वाटणी झालेल्या क्षेत्राचा ताबा कसा मिळवावा?।। वडिलांच्या निधनानंतर मुलींची नावे इतर हक्कात गेल्यास् काय करावे?।।हरवलेल्या व्यक्तीची वारस नोंद कशी करावी?।। सातबारा वर खरेदी निरर्थक असा जर शेरा असेल तर त्याचा अर्थ काय?।। या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  1. माझ्या 7/12,सक्रिय कुळ असा शेरा आहे मला ति जमिन विकायचिआहेय, याला काही उपाय आहे का

Comments are closed.