हरवलेले, खराब झालेले, जुने झालेले वोटर कार्ड किंवा तुम्हाला नवीन रंगीत मतदान कार्ड पोस्टाने घरी कसे मागवायचे असेल तर ते कसे मावगवावे याबद्दलची सविस्तर माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत निवडणूक आयोगाने एक मोठी अपडेट दिलेली आहे त्यांनी एक वोटर पोर्टल काढलेला आहे, तुमचं कार्ड जर हरवला असेल किंवा जुन झालं असेल किंवा तुम्हाला रंगीत मतदान कार्ड काढायच असेल किंवा तुमचं कार्ड खराब झाला असेल

तर अश्या कोणत्याही कारणाने तुम्हाला जर मतदान कार्ड पाहिजे असेल तर ते आता तुम्ही घरबसल्या पोस्टाने बोलू शकता त्यासंदर्भातली सुविधा आता निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे काम कशा प्रकारे चालते याबद्दल माहिती आज आपण पाहणार आहोत.

त्यासाठी गुगल ब्राउझर वर जाऊन तुम्हाला टाईप करायचा आहे NVSP, असे सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे एक वेबसाईट www.nvsp.in उघडेल, त्यातील पहिल्या पर्यायावर म्हणजेच National Voters Services Portal यावर क्लिक करायचे आहे ओपन झाल्यावर यावर अनेक पर्याय आहेत त्यापैकी Voter portal beta यावर क्लिक करायचे आहे,

इथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर किंवा वोटर आयडी नंबर ने लॉगिन करावे लागते. तुम्ही जर न्यू जर असाल तर Create account या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचे अकाऊंट उघडू शकता किंवा फेसबुक, जीमेल, लिंगडीन किंवा गुगल द्वारे देखील तुम्ही लॉग इन करू शकता.

यामध्ये तुम्हाला आणखी पर्याय दिसतील जसे की new voter registration, Correction in voter id Replacement of voter id, Deletion of voter id. तरी यापैकी आज आपण पाहणार आहोत Replacement of voter id म्हणजेच मतदान कार्ड कसे बदलायचे याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत.

तर आपण मतदान कार्ड कशासाठी बदलतो तर तुमचं जुन मतदान कार्ड हरवले असेल. तुम्ही त्यावरील फोटो बदललेला असेल किंवा तुमचे मतदान कार्ड खराब झालं असेल किंवा तुम्हाला रंगीत मतदान कार्ड पाहिजे असेल या कारणाने आपण मतदान कार्ड बदलतो म्हणून आपल्याला आता हे कार्ड नवीन काढायचे आहे

तर त्यासाठी तुम्हाला Replacement of voter id या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक पेज ओपन होईल आणि तिथे खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिलेल्या Lets start या पर्यायावर क्लिक करायचे आहेत असे केल्यानंतर तुमच्या समोर दोन पर्याय येतात.

पहिला पर्याय जर तुमच्याकडे वोटर आयडी नंबर नसेल तर आणि दुसरा पर्याय जर तुमच्याकडे वोटर आयडी नंबर असेल तर जर तुम्ही No, I don’t have voter id no. या पर्यायावर क्लिक केलं तर तुम्हाला नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी पूर्ण रजिस्ट्रेशन करून प्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी इथून replacement करता येणार नाही,

तसेच Yes, I have voter id no. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला मतदान कार्ड बदलता येते, तसे केल्यावर तुमच्या जवळ असलेल्या वोटर आयडी नंबर खाली दिलेल्या रकान्यात तुम्हाला टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर Fetch details या बटन वर क्लिक करायचे आहे.

जर तुमच्या मतदान कार्ड वरील नंबर ची माहिती निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असेल तर तसा मेसेज तुम्हाला खाली लिहून येईल व खाली process करण्यासाठी विचारले जाईल तर खाली proceed या पर्यायावर क्लिक करायचे आहे Proceed बटन वर क्लिक केल्यावर तुमची मतदान कार्ड ची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.

पण इथून काही बदल आपल्याला करता येणार नाही फक्त आपल्याला ती माहिती बघून घ्यायची आहे ती बरोबर आहे काय बदल करायचे आहेत त्यासाठी खाली Continue for replacement of voter id या पर्याय समोर क्लिक करायचे आहे व खाली continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा अपडेटेड मोबाईल नंबर विचारला जाईल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे यावर तुम्हाला एक ओटीपी पाठविला जाईल तो ओटीपी तुम्हाला एक मिनिटाच्या आत दिलेल्या रकान्यान्यांमध्ये टाकायचा आहे व पुढे verify करून मेसेज ला ok करायचे आहे.

यानंतर तुमच्या पुढे एक बॉक्स येईल ज्यामध्ये reason for replacement of voter id म्हणजेच मतदान कार्ड वरील माहिती किंवा मतदान कार्ड बदलण्यासाठी चे कारण विचारले जाईल, तर तुम्हाला ज्या कारणासाठी मतदान कार्ड बदलायचे आहे ते कारण तुम्हाला तेथे लिहायचे आहे.

जर तुम्हाला ही माहिती सेव करायचे असेल तर खाली दिलेल्या save and draft या बटन वर क्लिक करायचे आहे अन्यथा save and continue केले तरी चालेल असे केल्यावर तुमचा मतदान कार्ड देण्यासाठी चे पर्याय तुम्हाला विचारले जातील तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे.

तुम्ही तुमचा वोटर आयडी CSC मधून घेणार असाल तर दुसरा असतो तुम्हाला जर तुमचा मतदान कार्ड पोस्टाने पाहिजे असेल तर आणि तिसरा असतो तुम्ही जर मतदान कार्ड बूथ लेवल ऑफिसर करून घेणार असाल तर, बूथ लेवल ऑफिसर करून घेतले तर तुम्हाला पैसे लागणार नाहीत परंतु वरील दोन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

आता समजा मी पोस्टाने मतदान कार्ड घेण्यासाठी चा पर्याय निवडला तर तिथे खाली तुम्हाला मेसेज लिहून येईल की जर तुम्हाला तुमचा मतदार कार्ड पोस्टाने घरी पाहिजे असेल तर त्यासाठी 30 रुपये एक्स्ट्रा पैसे चार्जेस लागतील जेकी तुम्हाला आत्ताच द्यायची नाहीत तर जेव्हा पोस्टमन तुमच्या घरी ते कार्ड घेऊन येईल तेव्हा द्यायचे आहेत त्यासाठी चा पत्ता हा जो आधी दिलेला असेल तोच घेतला जाईल.

Save and continue केल्यानंतर तिथे पेमेंट करण्यासाठी Offline payment हा एकच पर्याय दिसेल जो की आधीच निवडलेला आहे तर आपल्याला फक्त continue या बटन वर क्लिक करायचे आहे continue या बटन वर क्लिक केल्यावर एक फॉर्म तुमच्यापुढे येतो तुम्हाला तो तपासून घ्यायचा आहे.

आणि खाली continue या पर्यायावर क्लिक करायचे आहे असे केल्यावर तुम्हाला एक मेसेज येईल की तुमचा अप्लिकेशन म्हणजेच अर्ज हा यशस्वीरित्या भरला गेला आहे, तिथे तुम्हाला एक application reference id लिहून येईल ज्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक एस एम एस येईल.

त्यामध्ये देखील हा reference id दिलेला असेल ,जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहिजे असेल तर हा वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता त्यासाठीआपण जे नॅशनल वोटर सर्विस पोर्टल उघडले होते त्यावरील track application या पर्यायावर क्लिक करायचे आहे, इथे आल्यावर enter reference id या समोरील रकान्यात तुम्हाला तुमचा reference id टाकायचा आहे

व त्यासमोर track status या बटन वर क्लिक करायचे आहे असं केल्यावर तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला तिथे लिहून आलेली दिसेल, तसेच तुमचे नाव व इतर माहिती देखील खाली लिहून येईल आणि हे कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल. अशाप्रकारे अगदी सहज रित्या तुम्ही तुमचे नवीन मतदान कार्ड घरबसल्या पोस्टाने मागवू शकता.

10 thoughts on “हरवलेले, खराब झालेले, जुने झालेले वोटर कार्ड किंवा तुम्हाला नवीन रंगीत मतदान कार्ड पोस्टाने घरी कसे मागवायचे असेल तर ते कसे मावगवावे याबद्दलची सविस्तर माहिती !

  1. लग्न झाल्यावर नाव चेंगे करायचे आहे तर काय करावे ते सांगा .

  2. मतदान कार्ड मध्ये नाव बदलने

Comments are closed.