गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी अवकाळी राहिला नाही. खर तर सगळेच ऋतूचे टाईमटेबल आता बदललेला दिसत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र आता पाहायला मिळत नाही. या बदलाची कारणे काही असो, मग अवकाळी पाऊस असो किंवा उष्णतेची लाट हवामान विभागावर मात्र याचं खापर फुटतं.
मग त्याचे मीम व्हाट्सअप फॉरवर्ड होत असतात. पण किती जणांना हवामान विभाग काम कसे करतो? हे माहिती आहे. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचा अंदाज ते कसे लावतात? या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात..
भारतीय हवामान खात्याचे मुख्यालय दिल्लीत आहे. विश्लेषण हवामान विभागाचे शास्त्रज्ञ करत असतात.
जगभरातल्या हवामान संस्थांकडून माहितीची देवाण-घेवाण केली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानाचा अचूक अंदाज लावण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांचा असतो. अरबी समुद्र सह हिंदी महासागरावर बारीक लक्ष ठेवणं आणि त्यातून वेळीच प्रशासनाला सतर्क करणं हे हवामान विभागाच काम आहे. कारण सतर्क करणे यालाच आपण हवामान विभागाचा अंदाज असे म्हणतो.
हवामान खात्याचा इतिहास साधारण सव्वाशे वर्ष जुना आहे. 1864 मध्ये कलकत्त्यात तरी चक्री वादळ आलं होतं. त्यानंतर 1866 मध्ये आणि 1871 मध्ये मान्सूनचा पाऊस पुरेसा पडला नाही. तेव्हा 1875 मध्ये भारतीय हवामान खात्याची स्थापना झाली व हवामान विषयक काम केंद्रे यंत्रणेच्या अधिपत्याखाली आणली गेली. त्यावेळी पहिले चीफ रिपोर्टर होते ते ब्रिटिश अधिकारी होते. ते 1895 प्रमुखानी हवामान विभागाच्या कामकाजात सुधारणा केल्या. तसेच पुढे यांनी ऑक्टोबर ते मे महिन्यातील हिमालयातील
वातावरण मान्सून पूर्व महिन्यातील वातावरण आणि हिंदी महासागर आणि ऑस्ट्रेलियातल्या हवामानाचे निरीक्षण या 3 गोष्टींच्या आधारे अंदाज बांधण्याची पद्धत विकसित केली. मात्र या नव्या पद्धती नंतरही 1987 ला हवामानाचा सगळे अंदाज चुकले आणि मोठा दुष्काळ पडला.
नंतर हळूहळू बदल करत आज भारतीय हवामान विभाग आपल्या अचूक अंदाजासाठी ओळखले जातात. कारण ओडिशा, आंध्र प्रदेशातील फाईलिंग चक्रीवादळ असो, गुजरातमधील निलोफर असो किंवा मग तामिळनाडू केरळ आणि लक्षद्वीपमध्ये आलेलं हे चक्रीवादळ असो भारतीय हवामान खात्याला प्रत्येक वेळी जवळपास अंदाज वर्तवण्यात यश मिळाले आहे.
हवामान विषयक निरीक्षण, दळणवळण, अंदाज आणि हवामान सेवांसाठी आपल्या सुविधांचा हळूहळू विस्तार केलेला आहे. हवामान खाते हे देशांतील अशा काही मोजक्या संस्थांपैकी आहेत जिथे संगणकाचा वापर आधी सुरू झाला होता.
पण मग हवामान विभागाच्या सगळे अंदाज अचूक ठरतात का? तर नाही.. अनेकदा हवामान खात्याचे अंदाज चुकलेले आहेत.
असे म्हणतात की, पावसा स्वभावातच बेभरवशी पणा सामावलेला आहे, त्यामुळे त्याचा अंदाज लावणं सोपं असतं. कधी अचानक हवामानातील बदलामुळे कधी तुफान पाऊस पडतो. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. कधी अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होतो तर कधी वाऱ्याची दिशा बदलते. कुठे कधी आणि किती पाऊस पडणार याचा अचूक अंदाज लावणं हे कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्यासारखे असं म्हणतात. तुम्हाला ही सोपी गोष्ट कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा..