यापूर्वी आपण जमीन मोजणी संबंधी ही काही माहिती पाहिली होती यामध्ये गुंठया मध्ये जमीन कशी मोजावी एकरमध्ये जमीन कशी मोजायची किंवा जमिनीचा आकारमान कसं चेक करायचे त्याचबरोबर आर चं रूपांतर गुंठयामध्ये कसं करायचं आर म्हणजे किती जमीन असते.
तर आपण पूर्वीचे सातबारा उतारे किंवा जमिनी संबंधी दस्तऐवज पहिले तर त्यामध्ये आपल्याला गुंठा, एकर, चौरस फूट या मोजमाप एककाचा वापर पाहायला मिळायचा. पण सध्याच्या काळात जास्त करून हेक्टर, आर आणि चौरस मीटर या एककाचा वापर केला जातो.
मग हे हेक्टर म्हणजे किती जमीन असते? हेक्टरच रूपांतर गुंठ्यामध्ये कसे करायचे चौरस मीटर मध्ये कसे करायचे किंवा एकर मध्ये कसं करायचे: पहिला प्रश्न येतो की हेक्टर म्हणजे काय किंवा हेक्टर म्हणजे किती जमीन असते? एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर (१हेक्टर=१०००० चौ.मी.) असतात.
आपल्याला तर माहितीच आहे एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो. मग आता या हेक्टरचे गुंठयामध्ये एकर मध्ये आर मध्ये किंवा चौरस फूटा मध्ये चौरस मीटर मध्ये रुपांतर कसं करायचं या संबंधित माहिती आपण घेऊया.
मी काही फॉर्मुले दिलेले आहेत त्या फॉर्मुले च्या आधारे आपल्या ते लक्षात येईल. आपण जर सातबारा उतार पहिला तर त्यामध्ये आपल्याला हेक्टर आणि चौरस मीटर असे शब्द पाहायला मिळतो हेक्टर मध्ये आपल्याला सुरुवातीला जे काही दहा हजार चौरस मीटर उरतील त्याचे रूपांतर हेक्टरमध्ये करून दिलेलं असतं
त्यानंतर दुसरा शब्द जो असतो आर. आर म्हणजे 100 चौरस मीटरचा 1 आर असतो. त्यानंतर आपल्याला चौरस मीटर हा शब्द दिलेला असतो. आपण काही महत्वाचे फॉर्मुले आहेत हेक्टरचे रूपांतर दुसऱ्या एककामध्ये करण्यासाठी ते आता पाहूया. जर आपल्याला हेक्टरच रूपांतर आर मध्ये करायचे असेल,
तर आर बरोबर हेक्टर गुणिले शंभर(आर=हेक्टर*१००) म्हणजे जे काही आपल्याला हेक्टर मध्ये दिलेले असतील त्याला गुणिले 100 करायचे आपल्याला आत मध्ये रूपांतर मिळून जाईल चौरस मीटर बरोबर हेक्टर गुणिले 10000 (चौ.मी=हेक्टर*१००००) म्हणजे आपल्याला काय करायचं आहे.
जेवढे हेक्टर असतील त्याला गुणिले 10000 करायचं आपल्याला चौरस मीटर मध्ये उत्तर मिळून जाईल चौरस फुट बरोबर हेक्टर गुणिले एक लाख सात हजार सहाशे एकोंचाळीस (चौ. फू.=हेक्टर*१०७६३९) म्हणजे आपल्याला काय करायचे जर आपल्याला चौरस फुटामध्ये हेक्टरचे रूपांतर करायचे असेल,
तर हेक्टरला गुणिले १०७६३९ करायचे कारण एका हेक्टर मध्ये एक लाख सात हजार 639 चौरस फूट असतात गुंठा बरोबर हेक्टर गुणिले 98.84 (गुंठा=हेक्टर*९८.८४) हा महत्त्वाचा फॉर्मुला आहे कारण जास्त करून आपल्याला गुंठ्यामध्ये रूपांतर करायचं असतं.
त्यामुळे जे काही एक तर आपल्याला दिले असतील त्याला गुणिले 98.84 करायचे आपल्याला गुंठ्यामध्ये उत्तर मिळून जाईल. एकर=हेक्टर*२.४७१ म्हणजे जर आपल्याला हेक्टरचे रूपांतर एकर मध्ये करायचे असेल तर जेवढे हेक्टर असतील त्याला गुणिले 2.471 करायचं,
म्हणजे आपल्याला एकर मध्ये उत्तर मिळून जाईल हे फॉर्मुले मी दिलेले आहेत ह्या फॉर्म्युलाच्या आधारे आपण हेक्टरचे रूपांतर गुंठ्यामध्ये, एकर मध्ये, चौरस फुटामध्ये, चौरस मीटर मध्ये, किंवा आर मध्ये सहजपणे करू शकतो.
चौरस मीटर = हेक्टर x 10000
चौरस फुट = हेक्टर x 107639
गुंठा = हेक्टर x 98.84
एकर = हेक्टर x 2.471
1 गुंठा = 1089 चौ फुट
1 आर =1076.39 चौ फुट
1 एकर = 40 गुंठे
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.