ही आहे १३ मजले आणि ३५०० पायऱ्या असलेली भारतातील सर्वात खोल विहीर

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

राजस्थानमध्ये अद्भूत किल्ले आणि दूरवर पसरलेलं वाळवंटं आहे. पण हे राज्य आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे; चांद बावडी ही सर्वात मोठी आणि सर्वात खोल पायरी विहीर.

राजस्थानमधील आभानेरी या गांवात चांद बावडी ही पायरी विहीर आहे. खरं तर, ही एक अत्यंत विलक्षण विहीर आहे जी अनेक हिंदी आणि हाॅलिवुड चित्रपटांमध्ये तुम्ही पाहिली असेल. पहेली (२००५) आणि भूल भुलैया (२००७) या चित्रपटात तिचे दर्शन झाले होते.

ख्रिस्तोफर नोलानच्या ‘द डार्क नाइट राइजेस’ (२०१२) या हाॅलिवुड चित्रपटात ब्रूस वेन (ख्रिश्चन बेल) ‘द पिट’ मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दाखवला आहे. ते पिट इतके हुबेहूब चांद बावडी सारखे दिसते, की जरी तो सेट असला, तरी शूटिंग प्रत्यक्ष त्याचं विहीरीत केल्यासारखे वाटते.

चाँद बावड़ी आभानेरी के बारे में जानकारी - Chand Baori Abhaneri Information  In Hindi

जगभरातील लाखो लोकांनी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली असूनही, ही सुमारे १००० वर्ष जुनी विहीर भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीत नाही.

८व्या आणि ९व्या शतकाच्या दरम्यान निकुंभ वंशाचा राजा चंदा याने ही पायरी विहीर बांधली आणि हशत माता ह्या आनंदाच्या देवीला समर्पित केली. खरं तर ही विहीर म्हणजे एक वास्तूशिल्प आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये इतकी त्याची रचना विलक्षण आहे. पारंपारिक जलसंधारण प्रणाली म्हणून देखील त्याचा उपयोग केला जात असे. पाणीटंचाईच्या काळात या विहिरीने असंख्य पर्यटकांनाही पाणी उपलब्ध करून दिले आहे.

सिंधू संस्कृतीसह अनेक संस्कृतींमध्ये जलसंवर्धनाच्या कार्यात विहीरींचा प्रमुख वाटा आहे. चाणक्याच्या अर्थशास्त्रात विहीरींद्वारे जलसंचयन पद्धती वापरून सिंचनाचा उल्लेख आहे. अलाहाबादजवळील शृंगावेरापुरा येथे गंगा नदीचे पाणी साठवण्यासाठी जमिनीच्या नैसर्गिक उताराचा वापर केला जात असे. चोल राजा करिका ह्याने सिंचनासाठी पाणी वळवण्यासाठी कावेरी नदीच्या पलीकडे ग्रँड अनिकट किंवा कल्लानाई बांधली.

Chand Baori Abhaneri Stepwell Rajasthan 2022

 

चांद बावडी १९.८ मीटर खोल आहे आणि खांबांच्या व्हरांड्यांनी वेढलेली आहे. त्याच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेकडून ३५०० पायऱ्या आहेत, ज्यामुळे उलट्या पिरॅमिडचा आकार तयार होतो. झिगझॅग रचना असलेल्या पायऱ्या बावडीच्या कडेला समांतर आहेत.

विहिरीच्या तोंडाकडून जमा झालेले पाणी पायऱ्यांवरून खाली उतरून विहीरीमध्ये जमा होते, नंतर सच्छिद्र खडकांमधून भूगर्भात शिरते आणि भूजल पातळीचे पुनर्भरण करते. विहिरीच्या तळाशी असलेले तापमान प्रादेशिक तापमानापेक्षा पाच ते सहा अंशांनी कमी असते.

जलसंधारणाच्या व्यतिरिक्त विहीरीत नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहते ज्यामुळे तापमान आणखी कमी होते. झरोखा किंवा खिडकी, जे मूळ राजस्थानी संस्कृतीचा महत्वाचा वारसा आहेत, ज्यामुळे मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश आणि वारा उपलब्ध होतो.

चांद बावडीच्या एका बाजूला बहुमजली कॉरिडॉर आणि कोनाडे आहेत जिथे गणेश आणि महिषासुरमर्दिनीच्या मूर्ती आहेत. विहीरीत अंधेरा-उजाला नावाची एक खोली देखील आहे. विहिरीच्या तीन बाजू पायऱ्यांनी झाकलेल्या आहेत आणि चौथ्या बाजूला एक मंडप आणि काही खोल्या आहेत ज्यात एकेकाळी राजे महाराजे विश्रांती घेत. असे म्हटले जाते की त्या काळात स्थानिक लोक सामुदायिक सभा, कार्यक्रम किंवा सामाजिक मेळाव्यासाठी पायऱ्यांवर जमत.

history of chand baori ) चाँद बावड़ी से जुड़ा रोचक रहस्य

मात्र शतकानुशतके ब्रिटीशांसह वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीत या विहीरीची देखभाल आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे ही विहीर मुख्य प्रवाहातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाण्यात अपयशी ठरली आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांनी १९५५ मध्ये तिची देखभाल करण्यासाठी आणि तिला पूर्वीचे वैभव परत मिळवून देण्यासाठी ही विहीर ताब्यात घेतली.

स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना या विहीरीकडे आकर्षित करण्यासाठी राजस्थान सरकार वार्षिक दोन दिवसीय आभानेरी महोत्सव आयोजित करते, तेव्हां पायर्‍या सुशोभित केल्या जातात आणि कालबेलिया आणि ख्याल यांसारखे अनेक कलाप्रकार तेथे सादर केले जातात.

पिंक सिटी जयपूरपासून चांद बावडी फक्त ९० किलोमीटर अंतरावर आहे. आभानेरी गावात दिवसभराच्या सहलीसाठी बसेस आणि खाजगी गाड्या देखील उपलब्ध आहेत.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा