मौर्य साम्राज्य – बलाढ्य सैन्याची ताकद आणि कलाविष्कार यांचा अपूर्व संगम

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मौर्य साम्राज्याची स्थापना ख्रिस्त पूर्व ३२२ मध्ये झाली आणि ख्रिस्त पूर्व १८५ पर्यंत ते अस्तित्वात होते. त्याची राजधानी मगध मध्ये पाटलीपुत्र येथे होती. सम्राट अशोकाच्या राजवटीपासून सुमारे ५० वर्षांनंतर मौर्य साम्राज्य अस्तास गेले. ख्रिस्त पूर्व १८५ मध्ये पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाची हत्या केली आणि मगधमध्ये शुंग घराण्याची सत्ता स्थापन केली.

मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य याने केली आणि पुढे बिंदुसार, अशोक, दशरथ, संप्रती, शालिशुक, देववर्मन, शतधनवन आणि बृहद्रथ ह्या सम्राटांनी तो वारसा पुढे चालवला. परंतु केवळ चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोकाच्या राजवटीत मौर्य साम्राज्य नावारुपास आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मौर्य राज्याची अधिकृत भाषा मगही प्राकृत होती. मगही नांव थेट मगधी या शब्दावरून आले आहे. मगही भाषेला त्या भाषेचे अभ्यासक मगहीपेक्षा “मागधी” ह्या आधुनिक नावाने जाणतात. भाषातज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की मगही सोबत आसामी, बंगाली, भोजपुरी, मैथिली आणि ओरिया यांचा उगम ८व्या ते ११व्या शतकात मगधी प्राकृतमधून झाला.

चंद्रगुप्त मौर्यने अर्थशास्त्राचे जनक चाणक्य या कुटिल आणि हुशार मार्गदर्शकाच्या सहाय्याने मोठे सैन्य उभारले आणि ख्रिस्त पूर्व ३२२ मध्ये जुलमी नंद साम्राज्याचा पाडाव केला. अलेक्झांडर द ग्रेटने नेमलेल्या क्षत्रपांवर विजय मिळवून चंद्रगुप्ताने वेगाने पश्चिमेकडे आपल्या साम्राज्याचा मध्य आणि पश्चिम भारतापर्यंत विस्तार केला आणि ख्रिस्त पूर्व ३१७ पर्यंत मौर्य साम्राज्याने संपूर्ण वायव्य भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चंद्रगुप्त मौर्यने सेल्युसीड-मौर्य युद्धादरम्यान डायडोकस आणि सेल्युसिड साम्राज्याचा संस्थापक सेल्यूकस पहिला याचा पराभव करुन सिंधू नदीच्या पश्चिमेकडील प्रदेश काबीज केला.

मौर्य साम्राज्याच्या काळात वित्त, प्रशासन आणि सुरक्षा ही त्रिसूत्री आणि कार्यक्षम प्रणालीमुळे आशियामध्ये अंतर्गत आणि बाह्य व्यापार, शेती आणि आर्थिक देवाणघेवाणीची भरभराट झाली. मौर्य राजघराण्याने पाटलीपुत्र ते तक्षशिला हा राजरस्ता बांधला. कलिंगच्या युद्धानंतर मौर्य घराण्याने अशोकाच्या अधिपत्याखाली सुमारे अर्धशतक केंद्रीकृत शासन अनुभवले. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्मप्रचारकांच्या पुढाकारामुळे त्या धर्माचा श्रीलंका, वायव्य भारत आणि मध्य आशियामध्ये विस्तार झाला.

मौर्य साम्राज्याच्या काळात कला, स्थापत्य, शिलालेख आणि ग्रंथांमधील सर्जनशीलता यांची भरभराट झाली. पुरातत्वदृष्ट्या अर्थशास्त्र आणि अशोकाचे शिलालेख हे मौर्य काळातील लिखित नोंदींचे प्राथमिक स्त्रोत आहेत. सारनाथ येथील अशोकाचा सिंह स्तंभ भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

ह्या राजघराण्याचे नांव ‘मौर्य’ कशावरून पडले त्याचे काही मतप्रवाह आहेत. बौद्ध परंपरेनुसार, मौर्य राजांचे पूर्वज अशा प्रदेशात स्थायिक झाले होते जेथे मोर भरपूर प्रमाणात होते. त्यामुळे ते “मोरया”, किंवा मोरांच्या ठिकाणचे मौर्य म्हणून ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या एका मतानुसार, त्यांच्या पूर्वजांनी मोरिया-नगरा (“मोरिया-शहर”) नावाचे एक शहर वसवले जे “मोराच्या गळ्यासारख्या रंगाच्या विटांनी” बांधले गेले होते.

बौद्ध आणि जैन परंपरेत नमूद केल्याप्रमाणे राजवंशाचा मोरांशी असलेल्या संबंधांना पुरातत्वीय आधार सापडतो. उदाहरणार्थ, नंदनगढ येथील अशोक स्तंभावर मोराच्या आकृत्या आणि सांचीच्या महान स्तूपावर अनेक शिल्पे आढळतात ज्यात मोराचा अंतर्भाव आहे. या पुराव्याच्या आधारे आधुनिक विद्वानांचा असा सिद्धांत आहे की मोर हे राजवंशाचे प्रतीक देखील असावे.

मौर्य काळातील कलाविष्कार हे विशेषतः सम्राट अशोकाच्या काळात निर्माण झाले. ह्याच काळात भारतीय कलेत एक महत्त्वाचे संक्रमण झाले. तोपर्यंत लाकडापासून विविध प्रकारची कला साकारली जात असे, परंतु सम्राट अशोकाच्या काळात दगडांचा वापर करण्यात येऊ लागला. दगडामध्ये साकारलेले विविध स्तंभ, स्तूप, गुहा त्याची साक्ष देतात.

मौर्य साम्राज्याने भारतीय इतिहासातील सर्वात बलाढ्य आणि कलासक्त राजघराणे बनण्याचा दुहेरी बहुमान प्राप्त केला.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा