तुम्हाला माहीत आहे का रायगडावरील मंदिराचा आकार मस्जिद सारखा का आहे? जाणून घ्या स्वराज्याची राजधानी, ‘रायगड किल्ल्याचा’ रंजक इतिहास.

लोकप्रिय

आज आपण रायगड किल्ल्याचा इतिहास आणि रंजक गोष्टींची माहिती घेणार आहोत. रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि शिवरायांचा अभेद्य किल्ला. या किल्ल्याने मराठा साम्राज्यातील तीन छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा पाहिला आहे. आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आज आपण काही यातील विषयांची माहिती घेणार आहोत.

▪️  रायगड किल्ल्याचे निर्माण आणि वैशिष्ट्ये.
▪️ गडावरील मज्जिदी सारखे दिसणारे रहस्यमय शिवमंदिर.
▪️ या गडाने अनुभवलेले चांगले आणि वाईट प्रसंग.
▪️ येथील शिवरायांचे 32 मण सोन्याचे सिंहासन.
▪️ रायगडावरील विध्वंस, ज्यामुळे हा किल्ला तब्बल 12 दिवस आगीत जळत होता.

1) रायगड किल्ल्याचा निर्माण आणि वैशिष्ट्ये : १६४७ साली शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेऊन आजूबाजूचा प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या अनेक गडकिल्ल्यांवर विजय मिळवला. स्वराज्याचे क्षेत्रफळ दिवसोंदिवस वाढत होते. सह्याद्रीच्या कुशीत रायरी नावाचा प्रचंड मोठा डोंगर होता. हा रायरीचा डोंगर म्हणजे सध्याचा रायगड. हा डोंगराळ प्रदेश जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. 1656 मध्ये हा संपूर्ण प्रदेश शिवरायांनी लढाई करून जिंकला. यामुळे अनेक मैलांचा डोंगराळ भाग स्वराज्यात आला.

रायरीच्या या डोंगराचे नामकरण रायगड असे करण्यात आले. पण हा गड जिंकण्यासाठी शिवरायांना प्रचंड मेहनत करावी लागली होती. तसेच बराच काळ लढा द्यावा लागला होता. त्यामुळे या डोंगराळ भागावर विजय मिळवणे किती अवघड आहे हे शिवरायांनी जाणले होते. या गडाची नैसर्गिक रचना म्हणजे जणू अभेद्य कवच होते. म्हणून त्यांनी येथे भव्य किल्ला बांधून त्यास राजधानी घोषित करण्याचा निर्णय घेतला. येथील रायगड किल्ल्याच्या निर्मानाचे काम शिवरायांनी हिरोजी इंदुलकर या अभियंत्यास सोपवले. हिरोजी इंदुलकर हे त्या काळचे सर्वोत्कृष्ट इंजिनिअर होते. 1656 ते 1670 या तब्बल 14 वर्षाच्या कालावधीत रायगडाचा निर्माण झाला. त्यावेळेचा हा सर्वात भरभक्कम किल्ला होय.

किल्ल्याच्या निर्माण मध्ये अनेक अडचणी आल्या. तसेच काही खर्च उचलण्यासाठी हिरोजी यांना आपली जमीन देखील गहाण ठेवली लागली होती. कारण या काळात शिवाजी महाराज हे अनेक मोहिमांवर असत. त्यामुळे त्यांची भेट घेणे आणि समस्या सांगणे थोडे अवघड होते. स्वराज्याचा बहुतांश विस्तार याच कालावधी मध्ये झाला. त्यामुळे हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःच्या कल्पकतेने रायगडाचे काम थांबू दिले नाही. त्या कातळ दगडांमध्ये सुमारे अकरा तलाव खोदले आहेत. गडावर जवळपास तब्बल 80 पाण्याच्या टाक्या आहेत. यामुळे दुष्काळाने सुद्धा या गडावर काही फरक पडणार नाही. आणि जनजीवन सुरळीत राहील याची काळजी घेतली होती. गडावर सुमारे साडेतीनशे इमारती बांधण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक धान्य कोठारे आणि शस्त्र साठी होते. गडावर बाजार पेठाचे नियोजनही केले होते. यावरून हा रायगड किती वैभवशाली होता हे कळते.

2) गडावरील शिवमंदिर : रायगडावर जगदीश्वर नावाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. याची रचना हेच या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या मंदिरात शिवराय रोज सकाळी शिवलिंगाची पूजा करण्यात येते असे सांगितले जाते. या मंदिराची रचना मज्जिदी सारखी बनवण्यात आली आहे. कारण लांबून शत्रूने पाहिल्यावर त्याला ती मज्जित वाटावी असा यामागचा उद्देश होता. त्या मंदिराचा आकार मोठा असून याचा दरवाजा मात्र फारच छोटा आहे. कारण जर कधी शत्रू जे येथे शिरला तरी त्याला या मंदिरात प्रवेश करताना येथील शिवलिंगा समोर वाकणे जरूरीचे झाले पाहिजे असा विचार करण्यात आला होता. या मंदिराचे रहस्य आणि वैशिष्ट्ये खूप आहेत.

किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शिवरायांनी या गडाला भेट दिली. अशा या भव्य दिव्य किल्ल्याची संरचना बघून शिवराय प्रचंड आनंदित झाले. त्यामुळे त्यांनी हिरोजी इंदुलकर यांना सांगितले की आम्ही तुमच्या निर्माण कौशल्याने फारच आनंदित झालो आहोत. त्यामुळे तुम्हाला बक्षीस म्हणून काय पाहिजे ते सांगावे. यावर हिरोजी इंदुलकर म्हणाले की मला एका दगडावर माझे नाव लिहून तो दगड जगदीश्वर मंदिरासमोरील दाराच्या पायरीवर लावण्यात यावा. यावर आश्चर्य चकित होवून शिवराय म्हणाले, की येथील दरवाजाच्या पायरीवर कशाला आम्ही तुमचे नाव मुख्य द्वारावर लिहिण्यास देखील तयार आहोत. याचे उत्तर देत हिरोजी म्हणाले, की राजे तुम्ही रोज जेव्हा या जगदीश्वराच्या मंदिरात याल तेव्हा तुमच्या पायाची धूळ माझ्या नावाच्या पायरीवर लागेल. आणि हे माझ्यासाठी स्वर्ग सुखासारखे असेल. हिरोजींची इच्छा शिवरायांनी मान्य केली. तुम्ही आजही रायगडावर गेलात तर, तुम्हाला आजही ही पायरी पाहण्यास मिळते. ज्यावर लिहीले आहे, सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर यावरून मावळ्यांची शिवरायांवर असलेली निष्ठा दिसून येते.

3) रायगडाने अनुभवलेले चांगले आणि वाईट प्रसंग :  या गडाने अनेक प्रसंग अनुभवले आहेत. अनेक लढायांच्या विजयाचा जल्लोष या किल्ल्याने पाहिला आहे. तसेच अनेक शिलेदार यांच्या मृत्यूची बातमी देखील या गडाने ऐकली आहे. मराठा साम्राज्याच्या सुवर्ण काळाचा रायगड साक्षी आहे. या गडाला वेढा देण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. रायगडा वरील सर्वात सुंदर प्रसंग म्हणजे, शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ साली रायगडावर शिवबांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. आपले शिवराय छत्रपती बनले. यावेळी शिवरायांसाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले होते. त्याचे पुढे काय झाले? हे आपण पुढे पाहुयात. त्यानंतर काही कालावधीमध्ये मासाहेब जिजाऊ यांनी रायगडावर अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे स्वराज्याचे फार मोठे नुकसान झाले.

रायगडावरील हिरकणीच्या शौर्याची कथा तुम्हा सर्वांना माहित असेलच. त्यामुळे येथील हिरकणी बुरूज अजरामर झाला. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाले. रायगडावरील ही सर्वात दुर्दैवी घटना असावी. १६८१ साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. आणि १८८९ साली छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक देखील रायगडावरती झाला. यानंतर मात्र रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. जो १७३३ रोजी शाहू महाराजांच्या कालावधीत पुन्हा स्वराज्यात आला. पण मुघलांनी या किल्ल्याचे फार नुकसान केले. तसेच येथील अनेक वस्तू तोडल्या.

4) रायगडावरील शिवरायांचे 32 मण सोन्याचे सिंहासन : रायगडावरील सर्वात सन्मानाचे स्थान म्हणजेच सिंहासन स्थळ. राज्याभिषेकावेळी येथे 32 मण सोन्याचे हिरेमोती जडित सिंहासन होते. पण जेव्हा मुघलांनी फितुरीने हा गड मिळवला तेव्हा त्यांनी यातील सर्व मौल्यवान वस्तू लंपास केल्या. सोन्याचे सिंहासन इंग्रजांनी नेले की मुघलांनी याबाबत शंका आहे.

5) रायगडावरील विनाश आणि विध्वंस :  रायगड हा फंद फितुरीने ताब्यात घेतल्यावर मुघलांनी येथे प्रचंड विनाश केला. त्यांनी येथील अनेक मंदिराचा नाश केला. अनेक इमारती तोडल्या. जगदीश्वर मंदिराचे नुकसान केले. पण त्याची रचना मज्जिदी प्रमाणे असल्यामुळे मंदिराची मूळ इमारत मात्र वाचली. त्यानंतर मराठ्यांनी रायगड पुन्हा मिळवला. पण नंतर पेशवे काळात इंग्रजांनी मोठे युद्ध करून रायगड मिळवला. यावेळी रायगडावर मोठ्या प्रमाणात तोफगोळे टाकण्यात आले. अनेक गोळ्यांचे घाव या गडाने झेलले. ज्यामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली. तसेच सागाचे बांधकाम असल्यामुळे संपूर्ण गडाला आग देखील लागली. असे म्हटले जाते की या वेळी रायगड तब्बल 12 दिवस आगीने जळत राहिला होता. मराठाकालीन सर्व समृद्ध किल्ल्याला विनाशकाले दिवस पाहण्याची वेळ आली. पण तरीही आज रायगडवर उभा आहे. व आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत आहे.