वेगवेगळे ब्रॅंड सोडा, भारतातच नव्हे तर जगभरात शेविंग ब्लेडची रचना एकसारखी कशी काय आहे? जाणून घ्या रंजक माहिती.

Uncategorized

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी वापरतो, पण त्यांच्या खास रचनेकडे कधीच लक्ष देत नाही. उदाहरणार्थ, फक्त शेव्हिंग ब्लेड घ्या. तुम्ही कधी विचार केला आहे का की कोणत्याही कंपनीचे ब्लेड एकादी एकसारख्या पॅटर्न मध्ये का बनवली जाते? विशेष म्हणजे, केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील ब्लेडच्या मध्यभागीही याच पॅटर्नमध्ये रिकामी जागा दिसते. असे का होते, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला ब्लेडचा इतिहास जाणून घ्यावा लागेल.

शेविंग ब्लेड्स चाइतिहास : खरे तर शेव्हिंग म्हणजेच दाढी करण्याचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. अश्मयुगातही माणसं दाढी करायची, हो, तेव्हा परिस्थिति आजच्यासारखी सहज-सोपी नव्हती. त्या काळी लोक धारदार दगडांनी दाढी करायचे. पण आधुनिक ब्लेड तयार करण्याचे श्रेय किंग कॅम्प जिलेटला जाते. त्यांनी 1901 मध्ये रेजर ब्लेड बनवली आणि त्याचे पेटंट घेतले. त्याचे उत्पादन देखील 1903 मध्ये सुरू झाले. जिलेटने पहिल्या वर्षी 165 ब्लेड विकल्या. विशेष म्हणजे पुढच्याच वर्षी कंपनीने 12 दशलक्ष ब्लेड बनवून विकल्या. अगदी एका वर्षामध्येच कंपनीची लोकप्रियता कित्येक पटीने वाढली.

हे आहे ब्लेडच्या एकसारख्या बनावटीचे कारण : जिलेटने जेव्हा ब्लेड बनवण्याचा विचार केला होता, तेव्हा त्याला माहित नव्हते की तुमच्या-माझ्यासारखे जगातील महान जुगाडू लोक त्याचा पेन्सिल शार्प करण्यासाठी किंवा नखे ​​कापण्यासाठी वापर करतील करतील. त्याने ती ब्लेड फक्त दाढी करण्यासाठी बनवली होती. अशा स्थितीत त्या ब्लेडची रचना जिलेटने बनवलेल्या रेझरमध्ये बसेल अशा पद्धतीने ठेवण्यात आली होती. अशा परिस्थितीत, रेझरच्या बोल्टमध्ये बसण्यासाठी ब्लेडच्या मध्यभागी एक विशेष पॅटर्नची जागा तयार करण्यात आली होती.

आता गंमत म्हणजे त्यावेळी रेझर फक्त आणि फक्त जिलेट कंपनी बनवत असे. नंतरच्या काळात सिरिक, विल्किन्सन, निन्जा, लान्सर आणि टोपाझ सारखे ब्लेड बनवणारे ब्रँड बाजारात आले. परंतु रेझर मात्र जिलेट कंपनीचेच सर्वत्र उपलब्ध होते, त्यामुळे साहजिकच या नवीन कंपन्यांना त्यांच्या शेव्हिंग ब्लेडची रचना जिलेटच्या रेझरनुसार करावी लागली जेणेकरून ते त्यात बसू शकेल.

काही काळानंतर या कंपन्यांनी स्वतःचे रेझर बनवण्यास सुरुवात केली, परंतु ब्लेडच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल केला नाही. कारण अगदी सोपे होते की जर कोणी जिलेटचे रेझर वापरत असेल तरीही आपली ब्लेड विकली गेली पाहिजे. आपल्या भाषेत यालाच तर म्हणतात डोक्यालॉजी.

आज ब्लेडच्या या इतिहासाला जवळपास एका शतकापेक्षाही जास्त काळ होऊन गेला, नवनवीन प्रकारचे ब्रॅंड बाजारात आले-गेले, नवनवीन रेझर आले, त्या रेझरच्या वेगवेगळ्या ब्लेड बाजारात आल्या परंतु दाढी-कटींगला आपण सलून मध्ये गेल्यानंतर आजही तीच 1901 मध्ये बनवलेल्या पॅटर्नची ब्लेड दिसते. आणि हो, जिलेट आज देखील मार्केट लीडर म्हणून मिरवत आहे.

नक्कीच आजच्या या लेखामधून तुम्हाला नवीन आणि रंजक अशी माहिती मिळाली असेल, तर विचार कसला करताय? लवकरात लवकर आपल्या मित्रांसोबत ही माहिती शेअर करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.