अबब ! पुण्यात आहेत इतक्या पेठा, त्यांच्या हटके नावांमागचा इतिहास माहिती आहे का?

मनोरंजन लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पुणे महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण देशांतील प्रसिद्ध अशा शहरांच्या यादीमधील प्रसिद्ध असे शहर. पुण्याला फार मोठा इतिहास लाभलेला आहे. पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर , पुणे म्हणजे देशाची सांस्कृतिक राजधानी. पुणे म्हणजे पूर्वीचे सायकलीचे शहर आणि आताचे दुचाकी वाहनांचे शहर.

पुणे म्हणजे नवीन संधी आणि पुणे म्हणजे पेठाचे शहर. पुण्यात जर कोणाला पत्ता विचारला आणि त्यांनी सांगितलं की पेठेत राहतो. लगेच आपल्या वाटते की हा व्यक्ती पक्का पुणेकर आहे.सोमवार ते रविवार अशी पुण्यातील पेठांनची नावे आहेत. त्या बरोबरच सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ, अशी देखील पेठांची नावे आहेत.

शिवरायचं बालपण पुण्यात गेलं, त्यांच्या अनेक खाना- खुणा पुण्यात आहेत. शाहिस्तेखानाची बोटे देखील लाल महालात तोडली. पेशवाईची साक्ष देणारा शनिवारवाडा, टिळकांनी सुरू केलेला गणेश उत्सव ते मानाचे गणपती, अफाट देखावे आणि मोठ्या मिरवणुका यामुळे पुण्याची निर्मिती कशी झाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पुण्याचा विचार केला तर पुण्यात एकूण 17 पेठा आहेत. यातील सात पेठा या वारांच्या नावावरून आहेत, तर इतर पेठा या त्या काळातील कर्तबगार लोकांच्या नावावरून ठेवण्यात आली आहेत. यासर्व पेठा मराठे आणि पेशव्यांनी उभ्या केल्या आहेत.चला तर मग जाणून घेऊ पेठांचा इतिहास

1) कसबा पेठ – ही पुण्यातील पहिली पेठ,या पेठेचे नाव पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती यांच्या नावावरून कसबा पेठ हे नाव ठेवलं गेलं आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात उभी राहिली आहे.

2) सोमवार पेठ – त्रिशुंड म्हणजेच तीन सोंडेचा गणपती असलेल्या पेशवेकालिन गणपतीचे मंदिर येथे आहे. पण पूर्वी यांची शहापुरा अशी ओळख होती. बँकांची निर्मिती होण्यापूर्वी पैसे उधार उसनवार द्यायचं इथं चालायचं. पैसे देण्याऱ्या लोकांना गोसावी म्हणत.

3) मंगळवार पेठ – मंगळवार पेठेला जुना बाजार परिसर म्हणून ओळखले जाते. पूर्वी या पेठेचे नाव शाईस्तेपुरा म्हणत. आता इथे जुन्या वस्तूची खरेदी-विक्री होते. येथे दोन दिवस जुना बाजार भरतो. हा मुख्यता झोपडपट्टीचा भाग आहे.

Fascinating Facts About 134-Year-Old Mahatma Phule Mandai, Pune's Oldest Vegetable Market | WhatsHot Pune

4) बुधवार पेठ -बुधवार पेठ – बुधवार पेठ हे नाव जरी पुण्यात काढलं तरी अनेकजण तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात पण या बुधवार पेठेत फक्त देह विक्रीचा व्यवसायचं केला जात नाही तर अनेक इतर मोठे व्यवसाय देखील आहेत. सिटी पोस्ट, तुळशीबाग, श्रीमंत दगडूशेठ गणपती ही प्रसिद्ध ठिकाणे देखील येथेच आहेत. देहविक्री होणार व्यवसाय देखील येथच चालतो. यामुळे ही पेठ प्रसिद्ध आहे.

5) गुरुवार पेठ – गुरुवार पेठ ही जुनी पेठ आहे, ही पेठ आधी हत्तीच्या झुंजीसाठी प्रसिद्ध होती. या पेठेला पूर्वी विठ्ठल पेठ म्हणून ओळखले जात. कारण येथे एक विठ्ठलाचे मंदिर होते.1730 साली अस्तित्वात आली.

6) शुक्रवार पेठ – पूर्वी ही पेठ विसापुर या नावाने ओळखली जायची, पण बाळाजी विश्वनाथ यांनी 1734 मध्ये जिवाजीपंत खाजगीवाले यांच्या मदतीने ही पेठ उभारली. आजही या पेठेत महात्मा फुले भाजी मंडई आहे.

7 )शनिवार पेठ -शनिवारवाडा वास्तु येथे असल्यामुळे या पेठेला शनिवार पेठ असे नाव होते. पूर्वी हा भाग मूर्तजाबाद या नावाने ओळखला जायचा, पण पेशव्यांच्या काळात यांचे नाव शनिवार पेठ करण्यात आले.

Pune | BudgetCab

 

8) रविवार पेठ – मलकापुर हे नाव असलेला भाग नंतर रविवार पेठ म्हणून ओळखला जाऊ लागला. इथं सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी विक्री होते. रविवार पेठ ही एक मोठी होलसेल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते.इथे एक लक्ष्मीनारायण मंदिर देखील आहे. तसेच येथे अनेक जुनी मंदिरे देखील आहेत. राम मंदिर या पैकी एक.

90 सदाशिव पेठ – पुण्यातील सर्वात शुद्ध भाषा बोलली जाणारी पेठ म्हणजे सदाशिव पेठ होय. पेशव्यांचे भाऊ सदाशिव यांच्या नावारून या पेठेचे नाव सदाशिव ठेवले गेले.

10) नाना पेठ – पेशवाईतील अत्यंत हुशार अशा नाना फडणवीस यांच्या स्मरणार्थ निहाल पेठेचे नाव नाना पेठ असं केलं.होलसेल किराणा मालाची बाजारपेठ इथे आहे .

11 ) गणेश पेठ – सवाई माध्यवराव पेशव्यांनी ही पेठ 1755 मध्ये उभारली. गणपतीच्या नावाने गणेश पेठ असं या पेठेच नाव ठेवलं आहे.

12 ) भवानी पेठ – 1863 मध्ये भवानीमातेचं मंदिर इथे बांधलं गेलं. त्यावरुन या पेठेचं नाव भवानी पेठ असं ठेवलं आहे. इथे बोरांची झाडे खूप होती त्यामुळे या परिसराला बोरवन म्हणतात.

13 ) घोरपडे पेठ – पेशव्यांचे पराक्रमी सरदार घोरपडे यांच्या स्मरणार्थ ही पेठ बनविली आहे. पण आता हा भाग रहिवासी क्षेत्र आहे.

14 ) नारायण पेठ – नारायण पेठ ही पेठ नारायण पेशवे यांनी 1773 साली उभारली. नारायण पेठेची आणखी एक ओळख म्हणजे येथे एक गायकवाड वाडा हा एक वाडा होता. या वाड्यात टिळकांनी आपलं केसरी हे मराठी वर्तमान पत्र सुरू केलं. ही इमारत आता केसरीवाडा म्हणून ओळखला जातो.

Kasba Peth Was Established In The 5th Century & Is Said To Be The Oldest Locality Of Pune | WhatsHot Pune

15 ) गंज पेठ- सवाई माधवराव पेशवे यांच्या काळात मुजफ्फरगंज हे एक व्यवसायिक केंद्र होतं. नंतर याचं नावं गंज पेठ केलं. आता महात्मा फुले पेठ ओळखली जाते.

16)नवी पेठ – पुण्यातील सर्व नवीन पेठ म्हणजे नवी पेठ होय. ही अलीकडे उभी राहिलेली पेठ आहे.

17) रास्ता पेठ — केम हॉस्पिटल आणि त्या लगतचा परिसर म्हणजे रास्ता पेठ होय. 1 776 मध्ये या पेठचे नाव शिवपुरी पेठ म्हणून होते .नंतर या पेठेचे नाव बदलून पेशव्यांचे सरदार आनंदराव लक्ष्मणराव रास्ते यांच्या स्मरणार्थ रास्ता पेठ असं या पेठेचं नाव ठेवलं गेलं.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.