सोलार एनर्जी वर चालणारा डासांपासून मुक्त होण्याचा मार्ग

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील मॅथ्यूज के मॅथ्यूज यांनी २००० मध्ये सोलर मॉस्क्विटो ट्रॅपर-कम-डिस्ट्रॉयरचा शोध लावला. अनेक चाचण्या आणि सुधारणा करून शेवटी हे नावीन्यपूर्ण उत्पादन तयार झाले जे “हॉकर” या नांवाने ओळखले जाते. डासांपासून मुक्त होण्याचा हा एक स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे.

त्यांचे कुटुंब व्रृक्ष प्रेमी आहे. त्यांच्या पूर्वजांनी रबर, कॉफी, नारळ, मिरपूड आणि इतर नगदी पिके घेतली होती. रबराचे मळे हे डासांचे आश्रयस्थान आहेत. रबराच्या झाडांवर दूध (लेटेक्स) गोळा करण्यासाठी त्यावर नारळाच्या कवचाचा कप लावलेला असतो. हे कवच बहुतेकदा पावसाच्या पाण्याने भरलेले राहतात.

ज्यामुळे डासांची पैदास होते. कांजिरप्पल्ली येथील रबर प्लांटर कुटुंबातील एका तरूणाने या संकटावर बिनविषारी आणि परवडणारा उपाय कसा शोधता येईल याचा विचार केला. डास खरोखर किती धोकादायक आहेत हे त्यांनी अनुभवले होते. डेंग्यू, मलेरिया अशा घातक रोगास कारणीभूत असलेल्या डासांपासून लोकांना मुक्त करण्यासाठी त्यांनी बिनविषारी द्रावणावर काम करण्यास सुरुवात केली.

इंग्रजी साहित्यातील पदवीधर असलेल्या मॅथ्यूज के मॅथ्यूज यांना विविध कीटक, उंदीर इत्यादी लहान प्राणी पकडण्यासाठी सापळे तयार करण्याची आवड होती. ते महाविद्यालयीन विद्यार्थी असताना मॅथ्यूजना अचानकपणे डासांचे एक वैशिष्ट्य आढळून आले.

खोलीत बसून अभ्यास करत असताना मॅथ्यूजने टाळी वाजवून डास मारण्याचा प्रयत्न केला. पण तो मेला नाही, तर उडाला आणि थेट खोलीच्या छतावर लावलेल्या काचेच्या आच्छादनाकडे गेला, आणि ते बंद आहे हे लक्षात न आल्याने बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत राहिला. यामुळे मॅथ्यूजना हे समजले की डास प्रकाशाकडे आकर्षित होतात. या अनुभवाच्या आधारे मॅथ्यूज एक दशकापासून विविध प्रकारचे डासांचे सापळे विकसित करत आहेत. सन २००० मध्ये ते एक कार्यक्षम आणि पोर्टेबल उपकरण बनवण्यात यशस्वी झाले, ज्याला त्यांनी ” “सोलर मॉस्किटो डिस्ट्रॉयर” असे नांव दिले. “हे उपकरण बनवणे हा त्यांचा ध्यास होता. त्यांच्या प्रयत्नांना फळ येईपर्यंत त्याने लग्न करण्यासही नकार दिला,” मॅथ्यूजचे वडील सांगतात.

हे उपकरण सेप्टिक टँकमधून ट्यूबद्वारे उत्सर्जित होणार्‍या वासाद्वारे डासांना आकर्षित करते आणि एकदां आंत गेल्यावर सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे ते मारले जातात.
कांजिरपल्लीमध्ये ह्या उपकरणाला खूपच मागणी आली कारण प्रत्येक जण डासांच्या त्रासावर उपाय शोधत होता. शिवाय तो काळ असा होता जेव्हां चिकनगुनिया हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य संसर्ग केरळमध्ये पसरला होता.

उपकरणाची लोकप्रियता पाहून मॅथ्यूज यांनी त्याच्या डिझाइनच्या पेटंटसाठी भारत सरकारच्या चेन्नई कार्यालयात अर्ज केला. पुढच्या वर्षी मॅथ्यूज आणि त्याच्या मित्राने संयुक्तपणे एक भागीदारी फर्म सुरू केली – काइन टेक्नॉलॉजीज- आणि कोईम्बतूर येथील प्लास्टिक मोल्डिंग फर्ममध्ये “हॉकर” नांवाने त्यांच्या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले.

हे किफायतशीर आणि पर्यावरणस्नेही उपकरण कुठेही बसवले जाऊ शकते. हाॅकरचे वैशिष्ट्य म्हणजे दमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकणारे वायू उत्सर्जित करणार्‍या इतर नाशकांप्रमाणे ते डास आणि माश्यांपासून बचाव करण्यासाठी कोणतेही रसायन वापरत नाही.

नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन तळागाळातील तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देणारा भारताचा राष्ट्रीय उपक्रम आहे. त्यांच्या वेबसाइटवर ह्या उपकरणाची माहिती मिळू शकते. हे उपकरण सेप्टिक टँकमधून येणारा वास डासांना आकर्षित करण्यासाठी वापरते. एकदा डास अडकले की थेट सूर्यप्रकाशामुळे उपकरणाच्या आत तयार झालेली उष्णता त्यांना मारते. हे सेप्टिक टाक्यांजवळ बसवले जाऊ शकते जे नंतर डासांना थेट त्यांच्या प्रजननाच्या ठिकाणी पकडते आणि त्यांचा नाश करते.

२००९ मध्ये मॅथ्यूज यांच्या उपकरणाला पाचवा नॅशनल ग्रासरूट्स टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अँड ट्रॅडिशनल नॉलेज अवॉर्ड हा नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा