नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
घर घेणं किंवा फ्लॅट घेणं हे प्रत्येकाचे स्वप्न असत. पण हल्ली कर्ज घेतल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण करणं शक्य नाही. आपण देखील दीर्घकालीन चालणाऱ्या ईएमआय (emi) च्या फेऱ्यात अडकत असतो. तुम्ही देखील ह्यामध्ये अडकले आहेत का? आणि जर तुम्हाला या फेऱ्यातून बाहेर पडायचं असेल आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे. यातून तुम्हाला होम लोनच्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच सापडेल.
आज आपण अशा 5 स्टेप पाहणार आहोत ज्यातून तुम्ही होम लोन पासून लवकरात लवकर मुक्ती मिळू शकतात. खर तर आपण सुखासमाधानाने राहण्यासाठी घर घेतलेल असत. पण होम लोन घेतल्यावर आपण घराचे ‘ओनर’ होण्याऐवजी ‘लोनर’ होऊन बसतो. आणि हे होम लोन इतके दीर्घकाळ चालतं की त्यामुळे आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे निघून जातात. आपण या ब्लॉग मध्ये अशा काही स्टेप पाहुयात ज्यामुळे होम लोन पासून आपण लवकर मुक्त होवू.
लेस होम लोन टेन्युर : तुम्ही होम लोन साठी जेवढा कमीत कमी टेन्युर घ्याल. तितकाच तुम्हाला कमी व्याजदर पडते. पण होतं काय, EMI चे हफ्ते कमी भरण्यासाठी आपण जास्त काळातील म्हणजे 20 वर्ष, 25 वर्ष, एवढ्या काळासाठी लोन काढतो. पण तेच आपण कमी काळासाठी काढला तर आपण आपले लाखो रुपये वाचू शकतो. ते कसं ते आपण एका चार्ट उदाहरण द्वारे समजून घेऊया.
कमी काळासाठी लोन घेतल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो हे आपण उदाहरणाने समजून घेऊ. समजा, तुम्ही 50 लाखांच लोन घेतल आहे. त्यावर 8.5% व्याजदर आहे असे मानू. तर तुम्ही 50 लाख रुपयांचे लोन 25 वर्षांसाठी केलं तर त्यावर तुम्ही एकूण 130 ते 167% इतका व्याज देत आहे. फक्त व्याजाची रक्कम साधारण 68 लाख रुपये इतकी होते. तेच लोन जर तुम्ही 20 वर्षा साठी केलं तर 100 ते 128% व्याज देता व ती रक्कम असते रुपये 52 लाख रुपये.
समजा, तेच 50 लक्ष रुपयांचे लोन जर तुम्ही 15 वर्षा साठी केले ते 80 ते 91% इतके व्याज देता व ती रक्कम असते रुपये 37 लाख रुपये. आणि तेच लोन आणखी कमी काळासाठी म्हणजे, 50 लाख रुपयाचे लोन जर तुम्ही 10 वर्षा साठी केलं तर 45 ते 57% व्याज देता व ती रक्कम असते रुपये 26 लाख रुपये. लक्षात घ्या 26 लाख आणि 68 लाख या दोन्ही रकमेमध्ये खूप मोठा फरक आहे. जर तुम्ही कमी काळासाठी लोन घेतलं तर जवळजवळ 40 ते 45 लाख रुपये तुम्ही तुमच्या व्याजाचे वाचवू शकता. आपण पाहिले की लोन टेण्युर जर तुम्ही कमी केलं तर आपले लाखो रुपये वाचतात. अर्थात यामुळे आपल्या EMI चा हप्ता थोडासा वाढेल. पण तुम्ही थोडं स्ट्रेच केलं तर तुम्ही होमलोन पासून लवकर मुक्त होऊ शकता.
होम लोन सर्वात स्वस्त लोन आहे असं म्हणतात. यामुळे त्याचे प्रिपेमेंट करू नये असे अनेक जण सांगतात. तरीही त्यावर 7.5% ते 8% एवढा इंटरेस्ट असतो. तर आपण अशा काही सोप्या स्टेप्स पाहणारा आहोत ज्याने टेन्युर कमी होईल. आणि तुमचे पैसे वाचू शकतात. आता आपण जाणून घेऊयात छोटासा एक्स्ट्रा ईएमआय भरून सुद्धा तुम्ही तुमचा होम लोनचा टेन्युर कमी करू शकता.
व्याजावर जाणारे तुमचे लाखो रुपये तुम्ही कसे वाचू शकता : जर तुम्ही वर्षाला फक्त एक एक्स्ट्रा ईएमआय भरला, म्हणजे तुम्ही बारा EMI भरतात त्याऐवजी एक एक्स्ट्रा ईएमआय, म्हणजेच जर तुम्ही 13 EMI भरले आणि तुमचं होम लोनच टेन्युर जर 25 वर्षे असेल तर तो कमी होऊन डायरेक्ट 19 वर्ष 3 महिने असा होतो. आणि सहाजिकपणे तुमच व्याज हे भरपूर प्रमाणात वाचते.
तुम्ही दुसरी गोष्ट करू शकता ती म्हणजे, तुमचा EMI प्रत्येक वर्षाला पाच टक्क्यांनी (5%) वाढवायचा. म्हणजेच समजा तुमचा EMI असेल 40000. तर 40000 च्या 5% रक्कम होते 2000. जर तुम्ही दरवर्षी तुमचा ईएमआय 2000 रुपयांनी वाढवला तर तुमचे होम लोनचे टेन्युर 13 वर्ष 3 महिने असे होते. याच प्रकारे जर तुम्ही तुमचा ईएमआय दरवर्षी दहा टक्क्यांनी (10%) वाढवत गेले तर तुमचं होम लोन फक्त 10 वर्ष 2 महिन्यांमध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि तुम्ही लवकरात लवकर होम लोनच्या जाळ्यातून मुक्त व्हाल.
जास्तीत जास्त डाऊन-पेमेंट : जेव्हा आपण घर घ्यायला जातो तेव्हा आपण 20% डाऊन पेमेंट करतो आणि 80% होम लोन करतो. हेच 20% भरण्याऐवजी आपण थोडे जास्त जास्त पैसे भरू शकलो तर आपले होम लोन थोड्या कमी होते. आणि एक लक्षात घ्या की जेव्हा आपण आपण होम लोनचे हप्ते भरत असतो, ईएमआय भरत असतो त्यावेळी बँक सुरुवातीला तुमच्या ईएमआय मधून त्यांच्या इंटरेस्टचा (व्याज) भाग जास्त डिडक्ट करत असते. आणि प्रिन्सिपलचा भाग कमी करत असते. त्यामुळे जरी चार पाच वर्षानंतर तुम्ही तुमचा स्टॅंडिंग बॅलन्स जरी चेक केला, तर तुमच्या लक्षात येईल की प्रिंसिपल मधला खूप कमी भाग त्यातून दिडक्ट झालेला आहे आणि इंटरेस्टच (व्याज) खूप गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हा एवढा मोठा इंटरेस्टचा पैसा वाचवायचा असेल तर स्वतः कडून जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन करण्याचा प्रयत्न तुम्ही करा.
इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी विनंती : कोणत्याही कर्जासाठी बँकेचा व्याजदर आजच्या काळात वाढत चालला आहे. परंतु तुम्ही जर जुने कस्टमर असाल आणि तुमचा इंटरेस्ट रेट जास्त असेल तर तुम्ही बँकेला होम लोन इंटरेस्ट रेट कमी करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. यासाठी तुम्हाला थोडीशी प्रोसेसिंग फी द्यावी लागते. किंवा तुम्हाला लोन ट्रान्सफर करण्याचा म्हणजे एखादी बँक कमी इंटरेस्ट रेट नी तुम्हाला होम लोन द्यायला तयार असेल तर तुमचं लोन तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता. हाऑप्शन सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे.
होमलोन ओवरड्राफ्ट अकाउंट फॅसिलिटी : हल्ली बँकांनी ओवरड्राफ्ट अकाउंटची फॅसिलिटी उपलब्ध करून दिली आहे. जसे की SBI चा मॅक्सगेन, एचडीएफसीचा मॅक्सवेंटेज, याठिकाणी तुमच्याकडे आलेली कुठलीही सरप्लस अमाऊंट तुम्ही पार्क करू शकता. हे अकाउंट एखाद्या करंट अकाउंट सारखा असत. तुम्ही त्यातून कोणतीही रक्कम कधी काढू शकता किंवा कोणतीही रक्कम खात्यात जमा करू शकता. पण या अकाउंट मध्ये तुम्ही जेवढे जास्तीत जास्त रक्कम जमा कराल आणि जितके वेळ ठेवाल त्यावर तुमचा होम लोन वरचा इंटरेस्ट देखील वाचू शकतो. त्याच बरोबर तुमचा टेन्युर देखील कमी होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही होम लोनच्या ओव्हरड्राफ्ट अकाउंटचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल आणि त्यातून तुम्ही होम लोन च्या जाळ्यातून लवकर मुक्त व्हाल..
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.