जगभर प्रवास करायचा आहे ? तर पासपोर्टबाबत ही माहिती तुम्हाला हवीच..!

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण जर कोणत्याही एखाद्या व्यक्तीला जर bucket list बद्द्दल विचारलं तर प्रत्येक जण सांगतोच कि मला संपूर्ण जग फिरायचंय. जगातील प्रत्येक देशातील प्रत्येक सुंदर स्थळ पहायचं आहे तसेच एखाद्याच्या वैयक्तिक अथवा औद्योगिक कामांसाठी लोकांना परदेशात जाण्याची गरज पडते परंतु आपल्याला जर आपल्या देशातून कुठे दुसऱ्या देशात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे “पासपोर्ट” होय.

कारण आपण पासपोर्ट शिवाय कोणत्याही देशात पाऊल टाकू शकत नाही. म्हणजेच काय तर पासपोर्ट म्हणजे कोणत्याही देशांत प्रवेश करण्यासाठी लागणारे ओळखपत्रच होय. दुसऱ्या देशांत प्रवेश देणारी चावी म्हणजे पासपोर्ट होय. पासपोर्ट म्हणजे सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तयार करण्यात आलेलं एक अधिकृत प्रमाणपत्र असं म्हणालो तरी हरकत नाही.

पासपोर्ट मध्ये तुमच्या विषयीची संपूर्ण माहिती नोंदवलेली सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहेत हे या पासपोर्ट म्हणजेच मराठीत याला पारपत्र म्हणतात यावरून कळते. आपल्या भारतीय पासपोर्ट चे काही प्रकार: भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट प्रदान केले जातात. आपण पासपोर्ट कोणत्या प्रकारचा आहे हे त्याच्या रंगावरून ओळखू शकतो.

पासपोर्ट चे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

१) पर्सनल पासपोर्ट २) डिप्लोमॅटिक पासपोर्ट ३) ऑफिशियल पासपोर्ट

१) पर्सनल पासपोर्ट : पर्सनल पासपोर्ट लाच ordinary पासपोर्ट असं ही म्हटलं जातं. हा पासपोर्ट प्रामुख्याने सामान्य नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरला जातो. म्हणजेच सुट्टी, शिक्षण अथवा अभ्यास, व्यवसाय ट्रिप इत्यादी करणांसाठी या पासपोर्ट चा उपयोग केला जातो. हा पासपोर्ट दिसायला गडद निळ्या कव्हर चा असतो. याला ‘P’ पासपोर्ट असं ही म्हणलं जातं. ज्यात P म्हणजे पर्सनल.

 

Apply online Passport | Renewal Passport online -India Passport

 

२) डिप्लोमॅटिक पासपोर्ट : डिप्लोमाटिक पासपोर्ट भारतीय राजनैतिक, केंद्रीय मंत्री, काही उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी आणि राजनयिक कौशल्याचे सदस्य यांना प्रामुख्याने हा पासपोर्ट देण्यात येतो. परंतु एखाद्याने जर विनंती केली तर अधिकृत व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना आणि उच्च स्टेट लेव्हल अधिकाऱ्यांना ही हा पासपोर्ट बिनशर्त दिला जाऊ शकतो. डिप्लोमाटिक पासपोर्ट ला ‘D’ पासपोर्ट असं ही म्हणलं जातं. या मध्ये ‘D’ म्हणजे डिप्लोमाटिक. डिप्लोमाटिक पासपोर्ट हा दिसायला तपकिरी लालसर रंगाचा असतो.

 

Do IFS officers get diplomatic passports when posted abroad? Can any IFS be posted abroad his entire career by wish? - Quora

 

३) ऑफिशियल पासपोर्ट : एखाद्या अधिकृत व्यवसायावर भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना प्रामुख्याने हा पासपोर्ट दिला जातो. ऑफिशियल पासपोर्टला ‘S’ पासपोर्ट असं देखील म्हणलं जातं. यामध्ये S चा अर्थ सर्व्हिस असा होतो. ऑफिशियल पासपोर्ट चा रंग दिसायला पांढरा असतो. काही देशांमध्ये आपण व्हिसा शिवाय जाऊ शकतो तर काही ठिकाणी व्हिसा ऑन अरीवल देण्यात येतो अंटार्क्टिका, ब्रिटिश व्हर्जिन आईसलँड, बॉलिव्हिया, थायलंड, कंबोडिया, त्रिणीदाद अँड टोबॅगो, नेपाळ, मकाऊ यांसारख्या बऱ्याचशा देशांमध्ये जाण्याकरिता आपल्याला वरील गोष्टी लागू होतात.

File:Indian Diplomatic Passport.jpg - Wikipedia

 

जेव्हा एखादा नागरिक नवीन पासपोर्टसाठी अर्ज करतो तेव्हा त्याला पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ला भेट द्यावीच लागते. ही सेवा देशातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला नवीन पासपोर्ट बनवायचा असतो त्यावेळी त्यांना बर्‍याचशा अडचणींचा सामना करावा लागतो. आपण आता घरी बसूनही पासपोर्ट साठी अर्ज करू शकतो . सगळंच ऑनलाइन झाल्यामुळे आपण घरबसल्या पासपोर्ट साठी ऑनलाइन अर्ज भरू शकतो.

ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला पदेशिक पासपोर्ट कार्यालयात जवळ लागते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी अपल्याजवळ आपली मुळ कागदपत्रे जवळ ठेवावी लागतील.

पासपोर्ट साठी अर्ज कसा करायचा ?

1 : चला तर मग जाणून घेऊ कसं करता येत पासपोर्टसाठी अप्लाय सर्वात आधी आपल्याला पासपोर्ट सेवा पोर्टल वर जावे लागेल त्यानंतर रजिस्टर नाऊ या वर क्लीक करावे.

2 : तेथे आपल्याला सर्व प्रकारची माहिती व्यवस्थित भरावी लागेल आणि पासपोर्ट कार्यालयानुसार त्या माहितीची निवड करावी लागेल.

3 : सर्व माहिती भरून झाल्यानंतर, खाली कॅपचा लिहावा लागेल आणि खाली असलेल्या नोंदणी बटनावर क्लीक करून आपल्याला नोंदणी केलेल्या लॉगइन आयडीने लॉगइन करावे लागेल.

4: एवढी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फ्रेश पासपोर्ट या लिंक बटन वर क्लीक करा

5: त्या नंतर फॉर्म मधली सर्व माहिती तपासून भरा आणि सबमिट करा.

6 : या नंतर आपल्याला भेटीची वेळ ठरवावी लागेल आणि त्यानुसार फी ही यावेळी भरावी लागेल.

7: पावतीची प्रिंट तुमच्या कडे घ्या

8 : यानंतर तुम्हाला एसएमएस वर तुमची भेट कन्फर्म झाली हे कळविण्यात येईल आणि नियुक्तीचा तपशील पाठविला जाईल.

9 : तुमच्या मोबाईल वर हा sms आल्यानंतर तुम्हाला प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जावे लागेल. प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात जाताना आपल्या आपली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन जावी लागतील. तेथे पावती घेऊन जाण्याची गरज नाही. आपल्याला आलेला sms आपण त्यांना दाखवू शकतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.