स्ट्रेटनिंगने झालंय केसांचं नुकसान ? वापरा हे फंडे

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

केसांचं स्टायलिंग करण्यासाठी आजकाल वेगवेगळ्या पद्धातींचा वापर केला जातो. इतके दिवस केवळ हेअर स्टायलिंगवर अवलंबून न राहता केसांचा मुळ पोत बदलूनही स्टायलिंगमध्ये चार चांद लावता येतात. सध्या स्ट्रेटनिंगच्या माध्यमातून केस सरळ केला जातात.

स्ट्रेटनर या इलेक्ट्रॉनिक स्टायलिंग टूलने केस सरळ केले जातात. पण या टुलच्या अतिवापराने केसांचं अपरिमित नुकसान होतं. अनेकदा चुकिच्या पद्धतीने वापरल्याने केस निर्जिव होऊ लागतात. अनेकदा केस सुकवण्यासाठी वापरलेल्या ड्रायरने ही केसातील मुळची आर्द्रता निघून जाते.

अनेकदा केस स्टायलिंग केले जातात. पण त्यानंतर त्यांची योग्य निगा राखली जातेच असं नाही. त्यामुळे स्टायलिंगमुळे खराब झालेले केस आणखी डॅमेज होऊ लागतात. पण रोजच्या जीवनात या साधनांचा वापर अपरिहार्य असेल तर पुढील प्रकारे काळजी घेऊन तुम्ही केसांचं आरोग्य जपू शकता.

हेअर प्रॉटेक्शन सिरम :
हीट प्रोटेक्शन सीरम हे तुमच्या केसांना हीट टूल्सपासून होणा-या तीव्रतेपासून वाचवते. हे तुमच्या केसांवर एक प्रोटेक्शन लेअर बनवते. त्यामुळे या टूल्सपासून केसांचं कमीत कमी नुकसान होतं.

How to use hair serums

 

टुल्सचं टेम्परेचर वेळोवेळी चेक करा :
सध्या बाजारात असलेल्या अनेक टुल्समध्ये तापमान नियंत्रण आणण्यासाठी सेटिंग आहे. खरं तर लो तापमानात केस नीट सेट होत नाहीत म्हणून अनेकदा जास्त तापमानाचा आधार घेतला जातो. पण यामुळे केस जास्त खराब होण्याची शक्यता असते. याशिवाय मुळंही कमजोर होतात. अशा वेळी मिडियम हीट सेटिंगचा आधार घ्यावा.

This is the ideal temperature for your heat styling tools | Be Beautiful India

 

हेअर रुटीन ठेवा:
आपल्या शरीराचं रुटीन नीट रहाव यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे केसांचं रुटीन बसावं यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषत: हीट टूल्स वापरत असाल तर केसांची वेळोवेळी काळजी घेणं अपरिहार्य आहे. केसांना वेळोवेळी ऑईलिंग, हेअर मास्क आणि हेअर स्पा या साधनांचा वापर करुन पोषण द्यावे. याशिवाय संतुलित आहारही घ्यावा जेणेकरुन केसांचा पोत चांगला राहिल.

How oiling can make a difference to your hair - The Statesman

 

स्वच्छता :

केसांसाठी हीट टुल्स वापरत असाल तर स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. स्वत:चा कंगवा वापरणं, केस शक्यतो धुळीत मोकळे न सोडणं, जास्त उन्हात गेल्यास केस थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात न येऊ देणं, झोपण्यासाठी असलेल्या उशीच्या कव्हरची वेळोवेळी स्वच्छता राखणं गरजेचं आहे. यामुळे केसांचं होणारं बरचंसं नुकसान टाळलं जाईल.

Side effects of washing hair every single day

 

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.