घटस्फोट होण्यामागे कोणकोणती कारणे असतात? ।। पती- पत्नीच्या नात्यातील बेबनाव टाळायचा तर हि कारणे लवकरात लवकर ओळखून त्यावर उपाय नक्की करा !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण पाहणार आहोत घटस्फोट होण्यामागे कोणकोणती कारणे असतात? कोणत्या कारणाने घटस्फोट होतो? या विषयाची माहिती. ही कारणे निश्चितपणे आपल्या सगळ्यांना उपयोगाची आहेत.

घटस्फोट : आपल्याकडे विवाह पद्धत हा एक महत्त्वाचा संस्कार समजले जातो. विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर अनेकांचे आयुष्य बदलत जातं. लग्नासाठी अनुरूप आणि सुस्वरूप असा जोडीदार निवडण्याकडे सर्वांचाच कल असतो. भारत देशात अनेक जाती आणि धर्म आहेत.

या सर्व जाती आणि धर्म मध्ये विवाह हे आपापल्या प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतात. मात्र नव्या जीवनाची सुरुवात करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. आपला संसार आणि आपला जोडीदार याला घेऊन प्रत्येकाच्या मनात अनेक स्वप्न असतात. पण अनेकदा बऱ्याच गोष्टींमध्ये निराशा होत जाते. तर कधी फार मोठी फसवणूक सुद्धा होते.

These mistakes often lead to fight between husband and wife - OrissaPOST

कधी मुलाची बाजू चुकीचे निघते तर कधी मुलीची बाजू चुकीची मिळते. कधी परस्परांशी पटत नाही, वाद होतात, भांडणे होत राहतात, आणि शेवटी नातं संपण्यापर्यंत पोहोचतं. मग घटस्फोट घेतला जातो. जर कधी दोघांनाही असं वाटत असेल एकत्र राहून वाद होण्यापेक्षा वेगळे होन अधिक योग्य आहे. तर सामान्य पणे घटस्फोट होतो. सामान्यत: घटस्फोट होण्यामागे जी कारणे आहेत ती सगळीकडे सारखेच आहेत. ती सुरुवातीपासूनच नात्यामध्ये टाळली तर निश्चितच नातं तूटण्यापासून वाचेल. आज जाणून घेऊयात हे सगळी कारणे कोणती आहेत..

घटस्फोटाची सामान्यपणे आढळणारी कारणे : 1) स्पष्टपणाचा अभाव.. 2) प्रत्येक गोष्टीत होणारा वाद.. 3) विश्वासघात.. 4) प्रगल्भतेचा अभाव.. 5)अवास्तव अपेक्षा.. 6) दुजाभाव.. 7) समजूतदारपणाचा अभाव.. 8) व्यसन/मारहाण/शिवीगाळ.. 9) नाकारलेले स्वातंत्र्य.. 10) आर्थिक/वैवाहिक समस्या..

हे अशी काही कारणे आहेत ज्याला कंटाळून नातं तोडण्याची वेळ ही येते. ही सर्व कारणे आपण सविस्तरपणे जाणून घेवूयात.

1) स्पष्टपणाचा अभाव : लग्नानंतर किंवा लग्नापूर्वी एकमेकांमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी शेअर करणं गरजेचं असतं. जर का त्या लपून राहिल्या तर भविष्यात त्या समोर येऊन त्याचे वेगळे परिणाम नात्यावर होतात. गैरसमज वाढत जातात. यामध्ये शारीरिक व्याधी, आजार, सवयी, व्यसनं, लग्नापूर्वीच आयुष्य याबाबत सगळेजण गुप्तता ठेवतात. आणि त्याच गोष्टी लग्नानंतर समोर येऊन गैरसमज वाढत जातात. त्यासाठी पूर्वीपासूनच स्पष्टपणा असायला हवा. सगळं काही शेअर केलेल असावं.

2) प्रत्येक गोष्टीत होणारा वाद : वाद हा अनेक वेळा अनेक कारणांमुळे होतो. पण कधीकधी कारणाअभावी सुद्धा वाद होतो. यामध्ये चिडचिड, कामाचं टेन्शन, हे सगळं जर घरात निघालं तर वाद होतात. काम कामाच्या जागी अन घर घराच्या जागी असलं तर मग हे होत नाही. पण हे सर्वजण विसरतात. आणि यामुळे घरातल सुख हरवून जात आणि नात्यातला संवाद आणि आनंद संपतो. परिणामी वाद उभे राहतात. आणि हा वाद विकोपाला जाऊन नातं तुटण्यापर्यंत पोहचतो.

Fight Between Husband And Wife May Change Your Life - पति-पत्नी झगड़े के बाद न करें ये काम, बिगड़ सकती है बात - Amar Ujala Hindi News Live

3) विश्वासघात : नातं कोणताही असला तरी त्यात सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे विश्वास. एकमेकांवर विश्वासच नसेल तर संशय निर्माण होतो. आणि हा संशय माणसाला आणि नात्याला पोखरून जातो. अनेक जोडपी विश्वास तुटल्याने विभक्त होतात. अनैतिक संबंध, व्यसन, खोटेपणा ह्यातून नात्यातली दरी वाढत जाते. नातं हे विश्वासाच्या बळावर उभ असत. आणि हा विश्वास प्रत्येक नात्यामध्ये असायलाच हवा.

4) प्रगल्भतेचा अभाव : आपल्याकडे बऱ्याचदा लग्न हे कमी वयात केलं जात. तेव्हा दोघांनाही दुनियादारीची जाणीव नसते. त्यामुळे परिणामी संयम नसतो. कुठे थांबायला हवे याचीही माहिती नसते. बायकोला ही मत आहे आणि नवराही आपल्याला बोलू शकतो हे दोघांनाही कळायला हवं असत. पण प्रगल्भतेचा अभाव असल्याने हे होत नाही. आणि दोघांकडेही त्यातून वाद होतात. ही प्रगल्भता दोघांनीही आत्मसात करायला हवी. ती असेल तर अनेक गोष्टी समजून घ्यायला सोप्या जातात.

5) अवास्तव अपेक्षा : नात्यातली अपेक्षा ही कोणाकडे बघून असू नये. एखाद्याची श्रीमंती बघून आपलाही नवरा असा असावा असं म्हणून त्याच्याशी वाद करणं योग्य नाही. तर एखाद्याची सुंदर बायको बघून आपली बायको ही अशीच सुंदर असायला हवी असं म्हणून तिला दोष देणं योग्य नाही. अपेक्षा ही अवास्तव झाली की वाद होतोच. अशा अपेक्षा टाळायलाच हव्या.

6) दुजाभाव : संसार हा दोघांचाही असतो. नवरा बायको यांना संसाररुपी रथाची दोन चाके म्हणल जात. त्यामुळे संसारात दोघांचाही तेवढाच अधिकार आहे. घरात मी म्हणेल तेच होईल अशी भूमिका असेल तर घरातलं सुख लवकर हरवत. दोघांच्या मताला किंमत असावी. एकमेकांमध्ये दुजाभाव होवू नये.

7) समजूतदारपणाचा अभाव : समजुतदारपणा हा प्रत्येक ठिकाणी असायला हवा. तो नसेल तर वाद आणि भांडण होणारच. पती रागावतो म्हणजे तो आपल्यालाच बोलू शकतो इतरांनाही नाही. ही समज बायकोला असायला हवी. आपण पत्नीला रागावतो तर तिलाही तसा अधिकार हवा हेही पतीला समजल की अनेक भांडणे सहजपणे विरून जातील.

8) व्यसन/ मारहाण/ शिवीगाळ : हे सर्वात मोठ कारण आहे वाद होण्याचं. व्यसन करण, घरी मारहाण करण यामुळे कुठल्याही घरात तर तिथं सुख नांदणार नाही. ह्या गोष्टी ज्या घरात असतील तिथं सुख, शांती, नांदत नाही.सतत वाद आणि आर्थिक अडचणी राहतातच. परिणामी नात्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होणार नाही.

9) नाकारलेले स्वातंत्र्य : आजकल स्त्रियांसाठी अवकाश खुल आहे. त्या शिक्षण, नोकरी, व्यवसाय सगळीकडे जम बसवत आहेत. त्यामुळे प्रत्येकीला अस वाटत असत की यासाठी घरातून पाठबळ मिळावं. पण जर का घरातून याला विरोधच झाला तर मग मात्र त्यांच्या भवनाचा उद्रेक होतो. जसं आपण मुक्त आहोत तस सामंजस्याने दोघांनाही सर्व बाबींच स्वातंत्र्य द्यावं. आणि स्त्रियांनी सुध्दा प्रत्येक ठिकाणी आपल्या नवऱ्याला काबूत ठेवण्याचं टाळलं पाहिजे.

10) आर्थिक/ वैवाहिक समस्या : घर चालवण्यासाठी गरजेचं असतो तो म्हणजे पैसा. त्याचीच उणीव असेल तर वाद होतात. त्यामुळं आर्थिक बाजू भक्कम  असायला हवी. आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे व्यासनासारख्या ठिकाणी पैशाचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. ते जर झालं तर परिस्थिती अस्थिर होते. आणि त्यातून वाद उभे राहतात. हे वाद पुढे नात तुटण्या पर्यंत जातात.

11) वैवाहिक समस्या : पतीपत्नीच्या नात्यात वैवाहिक सुखाची जागा महत्वाची आहे. जर कधी यात काही अडचणी असतील तर आजच्या युगात सुध्दा त्या सुधारता येतात. उपचार घेता येतात. पण ह्यासाठी दोघांमध्येही तेवढीच मोकळीक असावी. तरच ह्यातून दोघांनी ते मान्य करून पुढे मार्ग निघतो. अस असेल तर प्रत्येक नात्यामध्ये आनंद राहील.

अनेक अभ्यासातून अस दिसून येत की हीच काही कारणे आहेत ज्यामुळे घटस्फोट होतात. एक सुंदर नात संपत. स्वप्न तुटतात, भविष्य अंधारात जातं. परिणामी मुलांची सुध्दा मनस्थिती विपरीत होते. ही कारणे जर टाळली तर संसार निश्चितच आनंदाचा होईल. आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि लघु कुटुंब प्रणालीत हे सर्व करण गरजेचे आहेत. तर ही सर्व कारणे तुम्ही टाळायला हवी.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा