त्वचेवर पसरत चाललं आहे सुरकुत्यांचं जाळं? वापरा ‘हा’ पॅक

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे  NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

सुरकुत्या येणं म्हणजे शरीराची वार्धक्याकडे वाटचाल सुरु झाल्याचं चिन्ह असतं. पण अनेकदा त्वचेची योग्य निगा न राखल्याने वेळेपुर्वीच सुरकुत्या यायला सुरुवात होते. त्वचेत असलेली पाण्याची कमतरता हे देखील अकाली सुरकत्या येण्याचं मुख्य कारण असू शकतं.

अशा वेळी अचानक महागडे प्रॉडक्ट्स वापरून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण अनेकदा हे प्रॉडक्टस मुळ समस्या दूर होण्याऐवजी तिच्यात वाढ होतानाच दिसून येते. अनेकदा अचानक वजन कमी करणं हे देखील सुरकुत्या येण्याचं मुख्य कारण असू शकते. वेट लॉसमुळे त्वचा सैल पडत जाते.

परिणामी सुरकुतलेली दिसण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी पुढील पॅक वापरु शकता. घरातील उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवलेल्या या पॅकमुळे त्वचेला केमिकल विरहित पोषण मिळणं शक्य होईल. त्यासाठी पुढील घटक लागतील : कॉफी पावडर, पिकलेलं केळं, दुध, मध.

सर्वप्रथम चेहरा क्लीन करुन घ्या. आता कॉफी पावडरमध्ये थोड दुध मिसळून घ्या. आता दुध आणि कॉफीचं हे मिश्रण अर्ध्या केळ्यासोबत मिसळा. आता हे मिश्रण हलक्या हाताने चेह-यावर लावा. मसाज करत रहा. त्यानंतर पुन्हा मध आणि केळ मिसळा. आता हा पॅक चेह-यावर 15 मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर पुन्हा चेहरा धुवून घ्या.

यानंतर गरज वाटल्यास चेह-याला अ‍ॅलोव्हेरा जेल लावू शकता. यामध्ये केळ्याच्या ऐवजी पपईचा वापरही करु शकता. अंघोळीच्या आधी हा उपाय केल्यास उत्तम. त्वचा खुपच सैल झाली असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा पॅक लावावा.

यामुळे स्कीन टाईट होण्यास मदत होतेच याशिवाय त्वचेला आवश्यक ते पोषक घटकही मिळतात. चेह-याशिवाय सुरकुत्यांनी जास्त प्रभावित होणारा भाग म्हणजे हाताचं कोपर आणि गुडघे. मुळातच या अवयवांच्या वाट्याला खुप कमी काळजी येते. त्यात वातावरण आणि वेट लॉसमुळे या ठिकाणी सुरकुत्या दिसून येतात.

यासाठी कोपर आणि गुडघ्यावर दही आणि बेसनचा लेप रोज अंघोळी दरम्यान लावला. याशिवाय मध आणि चंदनाची पेस्ट लावावी. आठवड्यातून एकदा हा उपाय गुडघे आणि कोपरासाठी करावा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.