एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी करून ठेवलेले रजिस्टर्ड मृत्यूपत्र देखील रद्द करणे शक्य आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

कायदा

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण बरेचवेळा असे पाहतो की एखादी व्यक्ति आपल्या मृत्यूपत्रात त्याच्या वारसदारांपैकी फक्त एकाच व्यक्तीचे नाव लिहून किंवा काही व्यक्तींचे नवे वगळून सर्व प्रॉपर्टी त्या एकाच व्यक्तीला देऊन टाकतो किंवा काही व्यक्तींना वगळतो. काही वेळेला आपण असेही पाहतो की कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रॉपर्टी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने बनावट मृत्यूपत्र बनवून घेतो आणि त्याद्वारे तो एकटाच संपूर्ण प्रॉपर्टीचा मालक बनतो. अश्या परिस्थिति मध्ये इतर वरासदारांना प्रॉपर्टी मध्ये हक्क मागण्याचे कायद्याने काय संरक्षण दिलेले आहे? असे बनावट मृत्यूपत्र आपण कसे अव्हानीत करून रद्द करून घेऊ शकतो याबद्दल आज आपण या लेखामद्धे सविस्तर माहिती घेऊया.

रजिस्टर्ड मृत्यूपत्र रद्द होऊ शकते का? : आपल्या पैकी बर्‍याच व्यक्तींचा असा समाज असेल, किंवा ऐकून असाल की मृत्युपत्र नोंदणीकृत असेल तर ते कधीच रद्द करून घेता येत नाही. परंतु असे नाही. नोंदणीकृत मृत्युपत्र देखील रद्द करता येते. त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीने नोंदणीकृत मृत्यूपत्र करून ठेवले आणि त्यानंतर आणखी एक मृत्युपत्र केले जेकी नोंदणीकृत नसेल तर अशा वेळेस नंतर केलेले मृत्युपत्र कायम राहते.  सांगायचा अर्थ एवढाच आहे की रजिस्टर मृत्युपत्र देखील रद्द करता येते.

रजिस्टर्ड मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी कायदेशीर मुद्दे : आता आपण पाहूयात की असे कोणते कायदेशीर मुद्दे आहेत ज्यामुळे मृत्युपत्र आपणास रद्द करून मिळते.

१) स्वतंत्र इच्छा : पहिला मुद्दा म्हणजे स्वतंत्र इच्छा अत्यंत महत्त्वाचे असते. ज्यावेळेस मृत्युपत्र केले गेलेले असेल त्या मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतंत्र इच्छेला कोणत्याही प्रकारे प्रभावित केले गेले नसावे. एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध केलेले मृत्यूपत्र हे रद्द करून घेणे शक्य आहे. याठिकाणी आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया. असे समजून चला की एका व्यक्तीला तीन मुले आणि दोन मुली आहेत. परंतु त्या व्यक्तिने केवळ एका मुलाचे व एका मुलीचे नावे मृत्यूपत्र केलेले असेल, तर अशावेळी ज्याला ते मृत्यूपत्र करून दिलेले आहे त्या व्यक्तीने जर मृत्युपत्र करणाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणून अथवा धमकी वगैरे देऊन ते मृत्यूपत्र करून दिलेले असेल तर स्वतंत्र इच्छा नसल्याने ते मृत्यूपत्र कोर्टात आव्हान करता येईल.

२) कोणत्याही गोष्टीची समज नसणे : दूसरा कायदेशीर मुद्दा म्हणजे एखादा मतीमंद व्यक्ती. जर समजा एखादी व्यक्ती तो जे काही करत आहे त्याला कळतच नसेल आणि जर अशा व्यक्तीला मृत्युपत्रा बद्दल किंवा मृत्युपत्राचा दस्ता बद्दल त्याच्या वेडसरपणा मुळे कळत नसेल आपण काय दस्तऐवज करत आहोत? या गोष्टीचे पुढे काय परिणाम होणार आहेत? हे कळत नसेल तर त्यात देखील स्वतंत्र इच्छा म्हणता येणार नाही. त्यामुळे असे मृत्यूपत्र देखील कोर्टात आव्हाणीत करून रद्द करून घेणे शक्य आहे.

३) लबाडी करून बनवलेले मृत्यूपत्र : आपल्याकडे एखाद्या व्यक्तीस दारू पाजून वगैरे त्याच्याकडून असे मृत्युपत्र करून घेतात हे देखील कायद्याने मान्य नाही. त्यामुळे असे मृत्यूपत्र देखील कोर्टात आव्हाणीत करून, ते मृत्यूपत्र लबाडी करून बनवल्याचे  कोर्टात सिद्ध केल्यास कोर्टाच्या आदेशाने ते रद्द करता येते.

४) आजारपण : चौथा कायदेशीर मुद्दा म्हणजे आजारपण. आजारपण देखील खूप महत्त्वाचे कारण आहे . जर एखादी व्यक्ती त्यांच्या आजारपणामुळे तो कोणत्या प्रकारचा दस्तऐवज करत आहे हेच कळत नसेल तर या मुद्द्यावर देखील तुम्ही मृत्युपत्र रद्द करू शकतात. त्यामुळे आता मृत्युपत्र करणारी व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या मृत्युपत्र करण्यास सक्षम असल्याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र मृत्युपत्राचा दस्त सोबत जोडावयास लावतात. परंतु जर मृत्यूपत्रासोबत असे प्रमाणपत्र जोडलेले नसेल तर तुम्ही मृत्यूपत्र कोर्टात आव्हान करू शकता.

५) मृत्यूपत्रातील मजकूर : आता आपण पाचवा मुद्दा समजून घेऊया जो मृत्यूपत्रातील मजकुरा संबंधी आहे. मृत्यूपत्रातील मजकूर हा खूप महत्त्वाचा असतो. जसे की मृत्युपत्रात काय लिहिले आहे ? कोणाच्या नावे लिहिलेली आहे? असे समजून चालू की एका व्यक्तीस दोन मुले आणि एक मुलगी आहे. म्हणजे तिन्ही अपत्य त्या व्यक्तीसाठी एक समान आहेत. परंतु मृत्युपत्र मध्ये फक्त एकाच मुलाला संपूर्ण प्रॉपर्टी दिलेली आहे. परंतु मृत्यूपत्रात असा उल्लेख नाही की बाकीच्या दोन वारसांचे नावे मृत्युपत्रात कोणती संपत्ती का दिलेली नाही. तर अश्या परिस्थितीत बरेच प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे देखील असे मृत्युपत्र आव्हान केले जाऊ शकते. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने असे मृत्यूपत्र रद्द केलेले आहेत.

६) मृत्युपत्र ज्याचे नावे करून दिलेले आहे त्याची वागणूक : मृत्युपत्र मध्ये ज्याचे नावे संपूर्ण प्रॉपर्टी दिलेली आहे तो व्यक्ती मृत्युपत्र करताना सक्रिय असेल, म्हणजेच त्या व्यक्तीच्या प्रयत्नानेच मृत्यूपत्र करून घेतलेले असेल. तर अशा वेळेस देखील त्या मृत्युपत्रावर शंका निर्माण होते. मृत व्यक्तीने त्याच्या इच्छेविरुद्ध मृत्यूपत्र केलेले आहे असे प्रश्न उपस्थित होऊन ते आव्हनीत करता येते.

७) प्रमाणीकरण : आपणास माहीत असेलच की कोणत्याही मृत्यूपत्रावर ते मृत्यूपत्र करणार्‍या व्यक्तीची सही असणे आवश्यक असते. सोबतच, इतर दोन साक्षीदारांच्या सह्या देखील त्या मृत्यूपत्रावर आवश्यक आहेत. परंतु काही वेळेला एका किंवा दोनही साक्षीदाराची सही त्या मृत्यूपत्रावर नसते . अश्या वेळेला ते वैध प्रमाणीकरण म्हणणे चुकीचे ठरते, त्यामुळे असे वैध प्रमाणीकरण नसलेले मृत्यूपत्र आपणास कोर्टात आव्हनीत करून रद्द करून घेणे शक्य आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.