नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
मुलांचा स्वभाव अनेकदा पालकांसाठी जणू कोडं पडतं. कधी कधी मुलं खुप समंजस वागतात. तर कधी हट्ट करुन पालकांना नकोसं करुन टाकतात. काही मुलांचा स्वभाव कमालीचा रागीट असतो तरी काही अतिशय भावानिक असतात. अशा मुलांच्या मनाविरुद्ध थोडसं जरी काही घडलं तरी ते अतिभावनाशील होतात.
अशा वेळी त्यांना योग्य प्रकारे हाताळला गेल्यास स्वभावाला वेगळं वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा मुलं आत्मविश्वासही गमावून बसतात. अशा वेळी त्यांना खुप कौशल्याने हाताळावं लागतं. तुमचं मुलही अतिभावनाशील असेल तर त्याला सांभाळण्यासाठी पुढील टिप्स जरुर वापरा.
चटकन रागावू नका – मुलाचं मन कोवळं असतं. कोणत्याही गोष्टीचा त्यांच्यावर खुप लवकर आणि खोलवर परिणाम होतो. अनेकदा आपण रागाच्या भरात चटकन काहीतरी बोलून जातो. मुलं यामुळे हिरमुसली होतात. गप्प गप्प होतात. त्यामुळे संयमाने वागून त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं असतं.
मुलांच्या भावनांना किंमत द्या – अनेकदा मुलांच्या भावनांना एकतर गृहित धरलं जातं किंवा दुर्लक्ष केलं जातं. यामुळे हळव्या मुलांच्या मनावर परिणाम होतोच. पण असुरक्षिततेची भावनाही निर्माण होऊ लागते. यामुळे भावनिक मुलं अधिक एकलकोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांच्या भावनाही आपल्यासाठी खुप महत्त्वाच्या आहेत ही जाणीव त्यांना वेळोवेळी करुन देत रहा.
वेळ द्या – मुलांच्या स्वभावाचा कल कसाही असो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मुलांना वेळ देणं. मुलांना वेळ दिल्याने सुसंवाद होतोच. याशिवाय मुलांमध्ये वेगळाच आत्मविश्वास व्हायला मदत होते. अनेकदा मुलांना संवादातून चांगल्या- वाईटाची ओळख करुन घेणं सोपं जातं.
आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा – अनेकदा मुलांचा मुड त्यांना सकारात्मक विचार करण्यास भाग पाडतो. त्यामुळे मुलांना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला शिकवा. यासोबतच कधीतरी चांगलं काम केल्यावर मुलांना छोटे गिफ्ट किंवा सरप्राईज द्या. यामुळे त्यांना आनंदी राहण्यास आणि सकारात्मक विचार करण्यास सतत प्रोत्साहन मिळेल.
निर्णयक्षम बनवा – मुलं अनेकदा भावनिक होऊन निर्णय घेताना दिसतात. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते त्यांच्यात निर्णयक्षमता विकसित करणं. यासाठी मुलांशी निगडीत असलेल्या रोजच्या घडामोडींमधील छोटे छोटे निर्णय मुलांना घेण्यास सुचवावं. यामुळे मुलं निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता सारासार विचार करायला शिकतात.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा