घरबसल्या ‘या’ स्टेप्स वापरुन मिळवा उत्पन्नाचा दाखला, वाचा सविस्तर !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट.उत्पन्नाचा दाखला घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त 33 रुपये मध्ये काढू शकता. फक्त तीन दिवसांमध्ये तुम्हाला  उत्पन्नाचा दाखला जो आहे, सिटीजन लॉगिन मधून काढून दाखवणार आहे.

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा?

इनकम सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en) या वेबसाईटवर ती यायचं आणि या वेबसाईटवर त्यानंतर तुम्ही वेबसाईटची लैंग्वेज इंग्लिश किंवा मराठी करू शकतात. मी इंग्लिश केलेली आहे आणि तुम्हाला सर्वात प्रथम नोंदणी करायची न्यू यूजर रजिस्टर हियर, ज्या व्यक्तीचा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढतात त्या व्यक्तीचा तुम्हाला अकाउंट तयार करायचा आहे त्यासाठी ऑप्शन नंबर वन जो आहे तो सोपा आहे तो क्रियेट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे, तुमचा अकाउंट इथे क्रिएट करून घ्यायचे आहे.

इथे क्रिएट करताना ज्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यांमध्ये राहताय तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आणि ओटीपी जो आहे तो सेंड करायचा आणि ओटीपी पुढे एंटर करायचा आहे. ओटीपी आल्यानंतर तुम्हाला युजर आयडी बनवायचं आहे.युजरनेम तुम्हाला जे आवडते तुम्ही बनवू शकता. तर मी इथे युजरनेम बनवतो आणि चेक यूजर नेम अवेलेबिलिटी या पर्यायावर क्लिक करतो.

Get Make Money: Work From Home Jobs & Small Business Entrepreneur & Gigs online - Full guide - Microsoft Store en-IN

तर युजर नेम इथे अवेलेबल आहे.ओके पर्यायावर क्लिक केलं तर इथे तुम्हाला आता सर्वात प्रथम पासवर्ड क्रियेट करायचं आणि पासवर्ड क्रियेट केल्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे, तर हे नाव ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट होईल मराठीमध्ये त्याच्यानंतर तुमची जी आधार कार्डवर तिचे नाव आहे ते टाकायचं जन्मतारीख टाकायची आणि त्याच्यानंतर तुमचा अकाउंट रजिस्टर करून द्यायचं. हे तुम्हाला येईल. अकाउंट जे आहे तुमचं क्रिएट झालेले आहे असा मेसेज तुम्हाला येईल.

असा एसएमएस आल्यानंतर आता आपण सर्वात प्रथम लॉगिन करून घ्यायचं त्यासाठी तुम्ही जे युजरनेम बनवलं होतं ते युजरनेम तुम्हाला टाकायचे आणि तुम्हाला पासवर्ड टाकून तुम्हाला लॉगिन करून घ्यायचं आह.लॉगिन करताना तुम्हाला हा व्हेरिफिकेशन कोड आहे तो टाकायचं आहे ,जो जिल्हा तुम्ही सिलेक्ट केला होता तो जिल्हा तुम्ही सिलेक्ट करायचा आणि इथेच तुम्हाला आता लॉगिन करायचं आहे.

लॉगिन केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आपण जे आहे ते वेबसाइटच्या होमपेजवर आलेलो आहोत. आणि होम पेज वरती तुम्हाला येते मी लैंग्वेज इंग्लिश केली आहे कारण की मला शोधायला बरं पडेल. डाव्या साईडला तुम्हाला येथे खाली यायचं संपूर्ण खाली आल्यानंतर रेव्हेन्यू डिपारमेंट ऑप्शन बघायचा आहे आणि त्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता बघा डाव्या साईडला रेव्हेन्यू डिपारमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सब डिपारमेंट निवडायचं तर इतर सिलेक्ट करायचं रेव्ह्यू सर्विसेस.येथील यामध्ये तुम्हाला सर्वात खाली येऊन इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन क्लिक करायच.

याच्या वरती टिक करायचं आणि प्रोसिड या बटनावर क्लिक करायचं. चौक केसरी रांगामध्ये प्रोसीड या बटणावर क्लिक करून अशा प्रकारचा पेज आलं. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं. इनकम सर्टिफिकेट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही आता तिथे पाहू शकता डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत. डॉक्युमेंट्स सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आधार कार्ड असणं गरजेचं आहे, आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड वापरु शकतात किंवा वोटर कार्ड वापरु शकतात.हे आयडी प्रुफ मध्ये त्याच्यानंतर ऍड्रेस प्रूफ मध्ये पण तुम्ही पाहू शकता येथे ते दहा ऑप्शन आहे.

17 Best Online Jobs From Home To Make $1,000+ A Month

त्याच्यामुळे तुम्ही पासपोर्ट वापरू शकता, व्होटर आयडी वापरू शकता,रेशन कार्ड वापरू शकता, आधार कार्ड वापरु शकता, इलेक्ट्रिसिटी बिल वापरू शकता,ड्रायव्हिंग लायसन अशा प्रकारे वापरू शकता. तर हे तुमच्याकडंच कोणतेही डॉक्युमेंट्स वापरू शकता.हे ओदर डॉक्यूमेंट्स आपल्यासाठी नाहीत.ज्यांच्यासाठी मेडिकलच आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर एज या ग्रुपमध्ये तुम्हाला इथं इन केस ऑफ मायनर जर तुम्ही 18 वर्षाखालील असेल तर तुम्हाला येतं हे डॉक्युमेंट द्यावे लागतील. नाही तर हे डॉक्युमेंट त्याची गरज नाहीये.हा ऑप्शन फक्त 18 वर्षाखालील काढत असाल तर.

बर्थ सर्टिफिकेट आहे त्यानंतर बोनाफाईड आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता. नंतर म्यानडीटरी डॉक्युमेंट्स ओदर मध्ये काय अपलोड करायचं आहे हे पण सांगेन आणि सेल्फ डेकोरेशन कसं करायचं ते कुठे भेटेल ते पण तुम्हाला सांगेल. तर इनकम सर्टिफिकेट तहसीलदार तर्फे 15 दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला दिले जातात. त्याच्या नंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करायचं तर हा तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे. एकदा व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे, कोणकोणत्या स्टेटस आहेत ते बघा. तर सर्वात प्रथम तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी इन्कम इयर सेलेक्ट करायचा आहे.

तुम्ही किती वर्षासाठी इनकम सर्टिफिकेट काढणार आहात ते वर्षात सिलेक्ट करायचं. एक वर्षासाठी काढायचा असेल तर एक वर्ष तीन वर्षासाठी काढायचा असेल तर तीन वर्ष. तर मी तीन वर्षवर सिलेक्ट केलं आहे.त्याचा नंतर अॅपलिकँट डिटेल्स, तुमची इथे माहिती भरायची आहे संपूर्ण. तुमच कुमार कुमारी तुमचे काय असेल ते, श्री श्रीमती जे असेल ते तुम्हाला निवडायचे, त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव पूर्ण टाकून घ्यायचे याच्यावरती, तुमची संपूर्ण माहिती आहे ती अगोदर टाकलेली माहिती तुमचा मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, सगळी माहिती तुम्हाला टाकून द्यायची ईमेल एड्रेस सुद्धा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे.

ही माहिती टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायचे आणि त्याच्या पुढे जायचं. तर इथे तुम्हाला महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही शिक्षकांना तत्काळ वैद्यकीय, वकील आहात का, कामगार आहात,उद्योग करत आहे का,जे तुमचं जे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी इथं एक सिलेक्ट करतो शेतमजुरी. व्यवसाय आहे.त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या रखामध्ये आधार कार्ड नंबर टाकायचा आहे,आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला हा अशा प्रकारचा मेसेज येईल तो तसाच ठेवायचा आणि आय ॲग्री या पदावर ती क्लिक करायचे.

या पर्यायावर क्लिक करुन ती संपुर्ण माहिती बरोबर आहे का ते चेक करायचे.इथे निळ्या रंगांमध्ये क्लिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे. त्याच्या नंतर अॅपलिकँट ऍड्रेस, जो ऍड्रेस तुमच्या आधार कार्ड वरती आहे जो अॅड्रस प्रूफ तुम्ही देणार आहात त्याचा एड्रेस तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे, तर सर्वात प्रथम गावाचं नाव टाकायचं त्याच्यामध्ये बिल्डिंग वगैरे तुम्ही काही भरलं नाही तरी चालेल लँडमार्क टाका त्याच्यानंतर जिल्हा तुमचा, तालुका,तुमचं गाव कोणता आहे.त्याच्यानंतर तुमचा पिन कोड हा टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर नाही टाकला तरी चालेल.

नंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल्स टाकायच्या आहेत.रेशन कार्डमध्ये जेवढी तुमची फॅमिली आहे त्यांच्यामध्ये तुमचं इथं ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करत आहे, कोण अर्ज करतोय तर माझा मी स्वतःच अर्ज करत असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आता मुलगा, तुमचा मुलगी, जे तुमच्या घरा मध्ये तुमचा भाऊ असेल तुमच्या आई-वडील असतील तर ते तुम्हाला इतर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि प्रत्येक जणाच्या इथे तुम्हाला नात टाकायचं आहे. ज्या नावाने तुम्ही इनकम सर्टिफिकेट काढत आहेत त्यांच तुम्हाला इथे नात टाकायच. त्याच्यानंतर फॅमिली मेंबरच नाव टाकायचं, तुमचा कोण आहे, त्याच्यानंतर त्याचं वय टाकायचा, त्याच्या नंतर ते काय करतात शिकतात आहेत का? उद्योग करता येत का? गृहिणी आहेत का? मोलमजुरी करतात का? विद्यार्थी आहेत,जर विद्यार्थी असतील तर विद्यार्थी सुद्धा तुम्ही टाकु शकता.

तर अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर फॅमिली इन्कम काय आहे ते पाहू शकता.त्यानंतर ऍड बटणावर क्लिक करायचं आहे.इथे मी तीन जण ऍड केलं आहे. तर ही फॅमिली एज्युकेशन डिटेल्स एकदम सोपी आहे. त्याच्यामध्ये एवढा इम्पॉर्टंट नाहीये. तर ही माहिती तुमच्या घरातली टाकायची आहे.
बेनिफिशियरी इन्फॉर्मेशन. ज्यावेळी व्यक्तीचा तुम्ही इनकम सर्टिफिकेट काढताय ज्या व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला काढताय तुम्ही स्वतःचा काढत असाल तर स्वतः सिलेक्ट करायचं आणि तुमचं नाव आणि तुम्ही कशासाठी काढता हे रिजन द्यायचं.

जर तुमच्या मुलासाठी काढायचा असेल तर इथे तुमच्या मुलाचं नाव टाकायचं आणि रिलेशन जे आहे त्या मुलाच टाकून तुम्हाला तो मुलाचं नाव टाकायचं आणि कशासाठी लागते तर शिक्षणासाठी लागते तरी तुम्ही जे आहे ते कुटुंब प्रमखाच काढताय तर कुटुंब प्रमुखाच काढताना मी स्वतः सिलेक्ट करतोय.त्यामुळे मी स्वतः करून ते मुलांच्या शिक्षणासाठी असं कारण टाकलेला आहे. त्याच्यानंतर येतो फॅमिली फार्म म्हणजे शेती विषयी तुमची शेती असेल तर हा फॉर्म भरायचा, जर तुमची शेती असेल तर शेती तुमची किती एकर मध्ये आहे किती गुंठ्यामध्ये आहे ते तुम्ही ते लिहायचं.

त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी तुमची जमीन कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या तालुक्यात आहे ,कोणत्या गावांमध्ये आहे,ते तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. शेती नसेल तर हा फॅमिली फॉर्मचा इन्कम डिटेल्स सोडून द्यायचं. आता इथे आल्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट देतो, म्हणजे तुमचा इन्कम तुमचा कसा काय येतो तर इथे तुम्हाला तुम्ही नक्की काय करता शेतमजुरी करतात, तुमची शेती आहे का ,तुमचा इतर उद्योग आहे ,त्याच ठिकाणी त्याच्यासमोर तुम्हाला तुमचा तीन वर्षाचा इन्कम टाकायचं. तुम्हाला तुमचा इन्कम माहीत नसेल तर तुम्ही तलाठ्याकडून तलाठी ऑफिस मधून तुमचे इनकम सर्टिफिकेट काढायचा आणि तलाठी ऑफिस इन्कम सर्टिफिकेट मधली इतर रक्कम तीन वर्षाची टाकायचे. आणि त्याच्या नंतर पुढे तुम्हाला इन्कम सोर्स टाकायचा. तुम्ही नक्की काय करतात.

इथे मी मजुरी कामगार आहे अस टाकलेलं आहे.17-18,18-19,19-20,हा मी इन्कम जो तलाठी चा जो इनकम सर्टिफिकेट आहे त्याच्यात येतं टाकलेला आहे.तर हा इन्कम सोर्स तुम्ही कोणत्या अटॅचमेंट मध्ये आहात तरी तुम्ही तलाठी अहवाल सोबत करतो. तलाठी अहवाल म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट,तर कुणाच? तलाठ्याचे इनकम सर्टिफिकेट मी देणार आहे प्रुफ म्हणून तो इन्कम आहे. त्याच्यानंतर आय एक्सेप्ट वर क्लिक करायचं आणि समावेश करा या बटणावर क्लिक केल्यानंतर हा पॉपऑप तुम्हाला येईल याच्या मध्ये सगळी माहिती भरताना तुम्हालाही दुरुस्त करता येणार नाही नंतर त्यांच्यासाठी ही माहिती तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचे. आणि ओके बटनावर क्लिक करुन पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती सगळी पाहून घ्यायची आहे.

ज्यांच्याकडे तलाठ्याचा दाखला असेल तर त्याच्या उत्पन्नाचा सर्टिफिकेट असेल त्यांनाच हे निघणार आहे तर तलाठ्याचा सर्टिफिकेट तुम्हाला घेणे गरजेचे आहे. इन्कम सर्टिफिकेट तलाठीच असेल तरच हा उत्पन्नाचा दाखला निघणार आहे.तुम्हाला आता समावेश बटणावर क्लिक करायचा आहे. आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर डॉक्युमेंट अपलोड करायचा पाठ समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही स्वतः हे करू शकता,इथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे तर कोण कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे,

कशी अपलोड करायचे, कम्प्रेस कशी करायची, ती वेबसाईट मी तुम्हाला मी सांगेल. (https://compressimage.toolur.com/ )  या साईटवर तुम्ही जाऊन तुम्ही फोटोची साईज कमी जास्त किंवा फोटोची पिक्सल असतील ते तुम्ही कम्प्लीट कम्प्रेस करू शकता. तर कसा पद्धतीने तरी ते पाहू शकता फोटो आहे पहिल्यांदा तुमचा रुंदी आहे 160 पिक्सलस आणि उंची 200 पिक्सेल आहे.160 बाय 200 च 5 केबी ते 20 केबी पर्यंतचा फोटो हवा आहे.या वेबसाईटवर आल्यानंतर अपलोड इमेज, तुमचा जो फोटो असेल तर फोटो तुम्हाला येतं अपलोड करायचा.

फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज क्वालिटी आपल्याला हवी ती ठेवू शकता. पण इथं सर्वात पहिल्यांदा रेसाइज किती करायचा 160 बाय 200. आणि आता तुमचा फोटो झाला आहे 20.5 केबी. 20.5 केबी तर नाही पाहिजे आपल्याला.आपल्याला फोटो 5 ते 20 केबी पर्यंत हवा आहे.तर इथे मी इमेज कॉलिटी मी थोडी डाऊन करतो 90 केली आणि इथे पाहू शकत आता 8.1 केबी पर्यंत झालेले आहे,आपल्याला किती पाहिजे होत 5 च्यापुढे आणि 20 च्या आत, तर इथे डाऊनलोड करून घेतो ही इमेज आणि मी आता ती इमेज अपलोड करतो.

तर अशाप्रकारे आपला फोटो कम्प्रेस झालेला आहे. आता आपण अपलोड करूयात इथे चूज फाईलवर क्लिक करूया आणि अशा प्रकारे फोटो आहे तो अपलोड झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे आहे आयडेंटिटी, ओळखीचा पुरावा द्यायचा आहे.ओळखीचा पुरावा तुम्हाला 75 केबी ते 500 केबी मध्ये द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला आधारकार्ड चा फोटो, पॅन कार्ड, अर्जदाराचा फोटो, त्यापैकी कोणतही एक देवू शकता. तरी आपण सर्वात प्रथम आधार कार्ड आधार कार्ड देवू.आधारकार्ड इथे अपलोड करा, जर आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड अपलोड करा, नाहीतर मतदान ओळखपत्र अपलोड करा. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तुम्ही नक्की अपलोड करा.तरी इथे महत्त्वाच्या ओळखीचा पुरावा आपला पूर्ण झालेला आहे .

75 ते 500 केबी मध्ये जर इथे साइज तुमची कमी जास्त होत असेल तर मी तुम्हाला वेबसाईट दिलेले आहे या वेबसाईटवर अपलोड करायचा फोटो आणि कम्प्रेस करायची साइज 75 ते 100 केबीच्या आत मध्ये तुम्हाला द्यायचे. आणि पीडीएफ फाईल असेल तर तुम्हाला 500 केबीच्या आतमध्ये द्यायची आहे. तर इथे पत्त्याचा पुरावा तुम्हाला द्यायचं तर पत्त्याचा पुरावा सुद्धा सेम साइज ठेवायचे त्याच्यामध्ये तुम्हाला इतर रेशनिंग कार्ड तुम्ही देऊ शकता, आधार कार्ड सुद्धा शकता,भडेपावती देऊ शकता,घर पट्टी देवू शकता,मतदार ओळखपत्र देऊ शकता. सातबारा उतारा घेऊ शकता.

तुमच्या रेशन कार्ड असेल तर नक्की तुम्ही अपलोड करा तर तुम्हाला नक्की 100% अॅप्रोवल भेटणार आणि तीन दिवसात तुम्हाला पण नक्की अॅप्रोवल भेटणार. आधार कार्ड आणि रेशन कार्ड वरती सेम ऍड्रेस आहे. तुम्ही दोन कागदपत्रे पत्त्याचा पुरावामध्ये टाकू शकता. काही अडचण नाही एक दिला तरी चालेल.तर इतर दस्तावेज.इतर दस्तऐवज हा वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी असतो हे तुम्हाला काही गरज नाही भरायची ते सोडून द्यायच.

त्याच्यानंतर वयाचा पुरावा. वयाचा पुरावा मध्ये काही गरज नाही तुम्हाला द्यायची.वयाचा पुरावा कधी लागतो जेव्हा तुम्ही अंडर 18 असता. म्हणजे 18 वर्षाखालील असाल तर तुम्हाला वयाचा पुरावा द्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, यांच्यापैकी काहीही टाकू शकता. हा वयाचा पुरावा 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी काढत असाल, तर इथे तुम्हाला वयाचा पुरावा द्यावा लागेल. त्याच्यानंतर आता उत्पन्नाचा पुरावा हा महत्त्वाचा पॉईंट आहे.

इथे तुम्हाला पाच ऑप्शन आहेत आयकर विवरण पत्र, त्याच्या नंतर सरकारी अधिकाऱ्यांचे पडताळणी पत्र, हे तुम्ही देऊ शकता त्याच्यात वेतन मिळतं याचा 16 नंबरचा फॉर्म देऊ शकता, निवृत्तीवेतन धारकांच्या तुम्हाला बँकेचे प्रमाणपत्र देऊ शकता आणि पाच पॉईंट पाच वाजता आहेत तिथे तुम्ही सातबारा किंवा तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता. तरी इथं तुमच्याकडे सातबारा असेल तर सातबारा अपलोड करू शकता, सातबारा तुमच्याकडे नसेल तर फक्त इनकम सर्टिफिकेट अपलोड करायचं.

तुम्हाला तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र अपलोड करायचे तलाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला इतर मध्ये पण तेच अपलोड करायचं आहे जे आपण वरती अपलोड केल आहे. तलाठी प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर स्वघोषणाचा पार्ट आणि स्वघोषणापत्र खाली डाउनलोड ऑप्शन आहेत.इथे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म आहे तो तुम्ही डाउनलोड करायचाय तो भरायचा आहे, त्याच्या वरती फोटो सेट करायचा आहे.

इथे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवर गेल्यावर अपलोड डॉक्युमेंट्सवर क्लिक करायचं आहे हे लक्षात घ्या आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तुम्ही तुम्हाला लाल रंगामध्ये जो ऑप्शन आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो भेटून जाईल.सेल्फ डिक्लेरेशन झाल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स पर्यायावर क्लिक करायचं.डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. आता आपण पेमेंट करायचं. पेमेंट करताना लक्षात घ्यायचे फक्त 33 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायच.

पंधरा तारखेला म्हणजे आपण पंधरा तारखेला पेमेंट करतोय तरी पंधरा तारखेला आपला एप्लीकेशन कंप्लीट होणार आहेत, 33 रुपयाचं पेमेंट आहे. सर्व्हिस चार्जेस वगैरे धरून त्याच्या नंतर कन्फर्म बटनावर क्लिक करायचे. आणि पेमेंट करायचे एकदम सोपी पद्धत पेटीएम या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तिथे ऑप्शन येतो की कन्फर्म, प्रोसेस फोर पेमेंट ऑप्शन वर क्लिक करायचं. हे सगळ्यांना ऑप्शन येणार आहे.

आता इथे लक्षात घ्यायचं तिथं सोपा उपाय सांगतो तुम्हाला पेमेंट करायचं, हा जो कोड दिसतोय त्याच्यावर क्लिक करायचं, हा कोड तुम्हाला वरती दिसेल तुम्ही गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम अस डायरेक्ट हे स्कॅन करायचा आणि ते 33 रुपयाच पेमेंट आहे ते करून टाकायचं. 33 रुपयाच पेमेंट केले त्याला फ्यू सेकंदामध्ये. डायरेक्टली रीडायरेक्ट होईल वेबसाईट. आणि वेबसाईट रीडायरेक्ट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झालेला आहे.

ट्रांजेक्शन सक्सेसफुली झाल्यानंतर बॅक या बटनावर यायचं. तुम्ही इथे इन्कम सर्टिफिकेट पाहू शकता. करंट स्टेटस 15 दिवसाचा कालावधी आहे. पण आपण तीन दिवसात भेटणार आहे.इथे मग डायरेक्टली तीन दिवसांनी लॉगिन करायचं आहे. आणि डाउनलोड वर क्लिक करायचा आहे. तिथे तुमचं इनकम सर्टिफिकेट आलेला असेल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.