ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आता RTO ऑफिसला जाण्याची गरज नाही, मिळवा घरबसल्या लायसन्स !
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
ड्रायव्हिंग लायसन्स ची नवीन प्रोसेस ऑनलाइन पद्धतीने सुरू झालेले आहे. तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज लागणार नाही. ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडं लर्निंग लायसन असणे गरजेच असतं. आणि लर्निंग लायसन काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसला जावं लागत होतं तिथे गेलो ते तुम्हाला एक्झाम द्यावी लागत होती.
जिल्ह्याच्या ठिकाणी जायला तुम्हाला अडचण येत होती. आणि करोनामुळे सरकारने असा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सगळी प्रोसेस जे आहे ते ऑनलाइन केलेली आहे. लर्निग लायसन काढण्यासाठी फक्त तुमच्याकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहेत. आणि आधार कार्ड वरती तुम्ही तुमचं लर्निंग लायसन जे आहे ते काढू शकता. लर्निंग लायसन काढण्यासाठी लक्षात ठेवा तुम्हाला एक टेस्ट सुद्धा द्यावे लागणारे आणि ही टेस्ट तुम्ही घर बसल्या देऊ शकतात. तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज नाही.
सर्वात पहिले लर्निग लायसेन्स कस काढायचं त्यासाठी एप्लिकेशन कस करायच, त्यामध्ये सिग्नेचर अपलोड कशी करायची, ह्या सर्वांची माहिती आपण घेवूयात. सर्वात पहिल्यांदा parivahan.gov.in या वेबसाईट वर तुम्हाला पहिल्यांदा यावं लागत. या वेसाइटवर आलेवर तुम्हाला लायसेन्स संबंधित सर्व्हिसेस मध्ये एक ऑप्शन आहे “ड्रायव्हर अँड लर्नर लायसेन्स.” हा पहिलाच ऑप्शन तुम्हाला दिसेल. इथे “मोर ऑप्शन” असा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे.
“मोर ऑप्शन” वर क्लिक केल्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथं सिलेक्ट करायचे आहे. महाराष्ट्र मध्ये (M) सिलेक्ट जरी केला तर तुम्हाला महाराष्ट्र राज्य असा ऑप्शन येईल. त्यांनतर समोर तुम्ही वरती लाल रंगांमध्ये मेसेज पाहू शकता, महाराष्ट्राने सर्विस स्टार्ट केली आहे लर्नर लायसन साठी ऑनलाईन पद्धतीने. त्यांनतर तिथे डाव्या साईडला पहिला ऑप्शन तुम्हाला दिसेल “ॲपलाय फॉर लर्निंग लायसन” याच ऑप्शनवर क्लिक करायचे.
कारण की ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी पहिल्यांदा लर्नर लायसन काढावा लागत. इथे आल्यानंतर तुम्हाला “कंटिन्यू” या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लर्नर लायसन काढण्यासाठी कंटिन्यू केल्यानंतर जर तुम्ही पहिल्यांदाच लायसन काढत आहे त्यामुळे अगोदर तुमच्याकडे लायसन नाहीत. त्यामुळं इथे जेंनेरल सिलेक्ट करायचं. आणि त्यांनतर डाव्या साईटला “ॲपलिकंट डज नॉट होल्ड ड्रायव्हिंग लायसेन्स” सिलेक्ट करून तुम्हाला कंटिन्यू करायच आहे.
कंटिन्यू केल्यानंतर इथे त्यांनी काही सूचना दिल्यात. पहिली सूचना म्हणजे इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर तुम्हाला (LL टेस्ट) लर्निग लायसनच्या टेस्ट साठी किंवा डॉक्युमेंट साठी आरटीओ ऑफिसला जायची गरज लागणार नाही. तुम्हाला एक एप्लीकेशन आयडी आणि पासवर्ड मोबाईल वरती पाठवला जाईल. तुम्ही घर बसल्या तुमची लर्निंग लायसनची टेस्ट द्या. त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुली पास झाला की तुम्ही तुमचं लर्निग लायसेन्स डाऊनलोड करू शकता. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे तुमच्याकडे जर इथं आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला मात्र डॉक्यूमेंट वेरिफिकेशन साठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार आहे.
आता आपण पहिल्या ऑप्शने सुरू करणार आहोत. पहिला ऑप्शन सिलेक्ट केलेनंतर सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट केलेनंतर खाली यायचं आहे. लक्षात ठेवा हा पहिला ऑप्शन जो आहे त्यात आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये मोबाईल नंबर लिंक नसेल तरी चालेल. पण तुम्हाला डॉक्यूमेंट वेरिफिकेशन साठी आरटीओ ऑफिसला जावे लागणार आहे.
त्यानंतर इथ आधार कार्ड नंबर जो आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे तुम्हाला शेवटचे हे चार डिजिट नंबर आहे ते इथे दिसतील. तो जो नंबर आहे त्याच्या वरती एक ओटीपी येईल. तो तुम्हाला इठे टाकून द्यायचा आहे. आणि ओटीपी इथे टाकल्यानंतर तुम्हाला ज्या खालच्या तीन टर्म आणि कंडीशन दिल्यात त्या तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे.
तरी तिन्ही टर्म आणि कंडीशन सिलेक्ट केल्यानंतर ओटीपी टाकून अथेंटीकेशन आहे ते करायचे आहे. “अथेंटीकेट” या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुमचे डिटेल्स इथे चेक केले जातील. आणि अथेंटीकेट होईल. तुमचे जे काही डिटेल्स आहे आधार कार्डचे सर्व जे काही ऑटोमॅटिकली तुमचं नाव, तुमची जन्मतारीख, जे आहे ते तुमच्या समोर दिस्प्ले होईल. तुमचं ॲप्लीकंट नेम, तुमचं रिलेशनशिप, वडिलांचे नाव, ते तुम्हाला येथे दाखवले जाईल. तिथे जर काही एरर येत असेल तर तुमच आधार कार्ड जे आहे ते अपडेट करणे गरजेचे आहे. ऍड्रेस डिटेल तुमचे ऑटोमॅटिकली येणार आहे. तुम्हाला इथ काही चेंज करता येणार नाही.
तुमची जन्मतारीख तुम्हाला चेक करायची आहे, नावाचे स्पेलिंग तुम्हाला चेक करायचा आहे. ऍड्रेस तुम्हाला इथे येईल तो बरोबर आहे का चेक करून खाली “प्रोसिड” या बटण वर क्लिक करायचे आहे. प्रोसिड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता सर्व डिटेल्स आली आहेत. सर्वात पहिल्यांदा आरटीओ ऑफिस सिलेक्ट करायचा आहे. आधार कार्डच्या ऍड्रेसवर तुम्ही राहता त्या आरटीओ ऑफिस सर्वात पहिल्यांदा आपण येथे सिलेक्ट करणार आहोत. आरटीओ ऑफिस अवेलेबल नसतील तर नंतर अपडेट होईल. तर इतर जे काही तुमच नाव आहे ते तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर वडिलांचे नाव तुम्ही टाकलेला आहे ते व्यवस्थित पहा.
तुमच्या नावाचे स्पेलिंग व्यवस्थित पहा. प्लेस ऑफ बर्थ म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला ते लिहा. डेट ऑफ बर्थ पुन्हा एकदा पाहून घ्या. ब्लड ग्रुप तुम्हाला टाकायचा असेल तर ब्लड ग्रुप टाका नाही टाकले तरी चालते. कॉलिफिकेशन मात्र तुम्हाला टाकणे अनिवार्य आहे. तुमचं जे काही शिक्षण झाले असेल दहावी/ बारावी/ पदवी/ ते तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या बेसिक डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित टाकून द्यायच्यात. मोबाईल नंबर तुम्हाला आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इमर्जन्सी मोबाईल नंबर म्हणून आणखी एक मोबाईल नंबर तुम्ही देऊन ठेवा.
त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे तुमच्या अंगावरती एखादी खूण असेल ती तुम्हाला द्यायचे आहे. आणि खाली येऊन महत्त्वाचा पार्टमध्ये तुम्ही फोर व्हीलरचे लायसन काढणारे का, की टू व्हीलरचे लायसन हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. आणि वरती निळ्या रंगाचा ऑप्शनवर क्लिक केलं की उजव्या साईडला तेच जाईल.
लाईट मोटर व्हेईकल म्हणजे म्हणजे(LMV) फोर व्हीलरचे लायसन आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि मोटर सायकल विथ गिअर ऍड करायचा असेल तर तुम्ही तर ऑप्शन मध्ये ऍड करू शकता. तर पाहू शकता मोटरसायकल विथ गिअर म्हणजे (टू व्हीलर) आणि लाईट मोटर व्हेईकल म्हणजेच (फोर व्हीलर) जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही स्वीकारा. त्यानंतर जर तुम्ही ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकला आहे का तर इथे क्लिक करायच आहे. आणि ड्रायविंग स्कूलचे नाव द्यायचं आहे.
तुम्ही स्वतः शिकला असेल गाडी तर तुम्हाला काढून टाकायचा आहे तो ऑप्शन. आणि फॉर्म नंबर 1 तुम्हाला इथ भरायचा आहे. पिवळ्या रंगामध्ये जो ऑप्शन “फॉर्म नंबर 1” त्याच्यावर क्लिक करायचं लक्षात ठेवायचा आहे. तिथे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा “नो” ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो “येस” करायचे आहे आणि बाकी सर्व ऑप्शनसाठी “नो” या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
जर तुम्हाला दिसत नसेल तर दुसरा ऑप्शन आहे तो सुद्धा तुम्हाला “नो” करायचा आणि सबमिट करायचं आहे. आपल्याला दिसते दुसरा ऑप्शन “येस” करायचा आणि सबमिट करून टर्म आणि कंडीशन ॲक्सेप्ट करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे. “फॉर्म1 सबमिट सक्सेसफुली” असा एसएमएस यायला पाहिजे स्क्रीन वर. अस आल्यानंतर तुम्हाला क्लोज करायचे आहे. हे क्लोज झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे अवयव असतात आपला एक्सीडेंट झाल्यानंतर तुमचे अवयव, डोळे असेल काही दुसरे अवयव असेल ते तुम्हाला दान(donate) करायचे आहे का? तर करायचे असेल तर तिथे क्लिक करा.
नसेल करायच तर तिथे क्लिक करू नका. त्यांनतर “येस” ऑप्शन वर क्लिक करायच आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे ( यू हॅव नॉट डोनेटेड) येथे कॅन्सल करायचे लक्षात ठेवा. कॅन्सल केले नंतर “युवर एप्लीकेशन बिंग ॲक्सेप्टेड” येस करायचं आणि “ओके” बटनावर क्लिक करून तुमचा फॉर्म सबमिट करायचे आहे. प्रोसेस नीट समजून घ्या. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल (काँग्रॅच्युलेशन युवर ॲप्लिकेशन ह्याज बीन सबमिटेड सक्सेसफुली.) तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज लागणार नाही. तुमची ही एकनॉलेजमेंट स्लीप आलेली आहे.
लक्षात ठेवा कोणतेही स्लीप येवूद्या ती प्रिंट करणे गरजेचे आहे. इथे तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे तो कॉपी करणे गरजेचे आहे. आणि खाली येऊन तुम्हाला इथं ऑप्शन आहे “प्रिंट एकनॉलेजमेंट नंबर प्रिंट ॲप्लिकेशन” जो फॉर्म आहे तो आणि “ॲप्लिकेशन फॉर्म (प्री फील्ड)” असे दोन्ही फॉर्म प्रिंट काढून घ्यायचे आहे. या दोन्ही प्रिंट तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असेल किंवा तुमच्या पीसी मध्ये तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे आहेत. त्यांनतर तुम्हाला पुढे “नेक्स्ट” ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
नेक्स्ट ऑप्शन वर तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर नवीन स्क्रीन ओपन होईल त्यांनतर उजव्या बाजूला “प्रिंट फॉर्म नंबर1” तर तो फॉर्म देखील तुम्हाला प्रिंट करायचा आहे व डाउनलोड करून सेव्ह करायचा आहे. म्हणजे तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथे “शो फोटो आणि सिग्नेचर” वरती क्लिक करायच आहे. तुम्ही पाहू शकता तुम्हाला आरटीओ ऑफिसला जायची गरज नाहीये तुमचा हा फेसलेस ई-केवायसी फॉर्म आहे.
इथं फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं खाली यायचं आणि दोनच स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. तसे इथे 5 स्टेप दिले आहेत पण आपल्याला 2च स्टेप पूर्ण करायचे आहे. “अपलोड फोटो आणि सिग्नेचर” हा एक ऑप्शन आहे. आणि “फीज पेमेंट” त्यानंतर तुम्हाला “प्रोसिड” बटनावर क्लिक करायचे आहे. तुमची सिग्नेचर अपलोड करायची आणि फीज पेमेंट म्हणजे आपल जे पेमेंट आहे ते करायचे आहे.
पेमेंट किती असेल तेही तुम्हाला समजेल. तर “प्रोसिड” ऑप्शन दिसतो त्या ऑप्शन वर क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट तुम्हाला समजून घ्यायचा तो म्हणजे इथे लिहिलेला आहे की, ”तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे तुमचा फोटो इथं ऑटोमॅटिकली आलेला आहे.” त्यामुळे तुम्हाला फोटो अपलोड करायची गरज नाहीये.
फक्त तुम्हाला आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल “अपलोड सिग्नेचर” तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवा काय सांगितले याची विड्थ 256 पिक्सेल आणि हाईट 64 पिक्सेल पाहिजे. आणि 2kb पर्यंत पाहिजे. तुम्ही ऑनलाईन वेबसाईट वरून देखील फोटो साईज एडजस्ट करू शकता. जसं की (Image reducer, फोटो कॉम्प्रेसर) अशा वेबसाईट आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्या वेबसाईट वर गेलेवर तुम्ही जी काही विड्थ, हाईट, kb, तुम्हाला हव्या असतील त्या साईज मध्ये करू शकता.
त्यानंतर फोटो क्वालिटी तुम्हाला पाहिजे तशी ठेवा, प्रोग्रेसिव नॉर्मल ठेवा आणि फोटो कंप्रेस करा आणि तो फोटो डाउनलोड करून घ्या. आणि तुमच्या फॉर्म मध्ये तो रीसाईज करून डाउनलोड केलेला फोटो अपलोड करा. फोटो अपलोड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता “अपलोड आणि व्हू फाईल” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या फोटोच्या खाली उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता सिग्नेचर आलेली असेल. आणि तुम्हाला आता “सेव्ह फोटो आणि सिग्नेचर इमेज फाईल” हा एक ऑप्शन खाली दिसेल तुम्हाला त्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. म्हणजे तुमचा फोटो आणि तुमची सिग्नेचर ऑटोमॅटिकली सेव्ह होईल.
सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला “अपडेट सक्सेसफुली” असा हिरव्या रंगात एक एसएमएस स्क्रीन वर दिसेल. त्यांनतर “नेक्स्ट” ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यांनतर तुम्हाला महत्वाचं असे पेमेंट करायच आहे. आपली पहिली स्टेप पूर्ण झाली, अपलोड फोटो आणि सिग्नेचर. दुसरी आहे, “फीज पेमेंट” पेमेंट मध्ये तुम्हाला “प्रोसीड” बटनावर क्लिक करायचं आहे. आणि तुमचं पेमेंट करायचं आहे. इथे पाहू शकता टू व्हीलरला जर पाहील तर 201 रुपये फक्त पेमेंट आहे. आणि टू व्हीलर व फोर व्हीलर या दोन्ही साठी जर तुम्ही टाकलं तर 350 रुपयांच्या आसपास असू शकत.
तर इथे तुम्हाला “एसबीआय ई-पे” सिलेक्ट करायच आहे. हा एकच ऑप्शन आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला इथे कॅप्तचा टाकून “पे-नाऊ” या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. “पे-नाऊ” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच ॲप्लिकेशन नंबर, तुमची जन्मतारीख, ट्रांजेक्शन डिटेल्स आहेत त्या पाहू शकता तयांनतर “आय अग्री” या बॉक्स वर क्लिक करून “प्रोसिड फॉर पेमेंट” यावरती क्लिक करायचे आहे. “प्रोसिड फॉर पेमेंट” या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डने, इंटरनेट बँकिंग, यूपीआय पेमेंट आणि वॉलेट ने पेमेंट करू शकता. जर तुम्ही यूपीआयने पेमेंट करताय तर यूपीआय आयडी तेथे टाकावा लागतो.
त्यांनतर “पे-नाऊ” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. तर अशाप्रकारे 201 रुपयाचे पेमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर इथं तुम्हाला “क्लिक हियर फॉर प्रिंट रिसिप्ट” यावरती क्लिक करून रिसिप्टची प्रिंट घ्यायची आहे. त्यावर क्लिक केले वर स्क्रीन वर एक ऑप्शन येईल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जे ॲप्लिकेशन केले आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो सेक्युरिटी कोड तो टाकून “प्रिंट रिसिप्ट” या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह करून ठेवा.
त्यांनतर अत्यंत महत्वाची स्टेप आहे, “प्रिंट रिसिप्ट” या ऑप्शनच्या पुढे तुम्हाला “नेक्स्ट” या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथ टाकायचा आहे. आणि तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. आणि त्यानंतर “सबमीट” ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सर्व प्रोसेस झालेली आहे. तिथे स्क्रीन वर तुम्हाला एक एसएमएस येईल, (ॲप्लिकेशन इज उंडर प्रोसेसिंग ॲट आरटीओ लेव्हल.) तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते प्रोसेस मध्ये आहे कारण तुमची एक्साम अजून तुम्हाला द्यायची आहे.
ती टेस्ट देण्यासाठी तुम्हाला स्क्रीन वरती स्क्रोल करायची आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे, “रोड सेफ्टी टिटोरियल” त्यावरती क्लिक करून ते तुम्हाला वाचणे गरजेचे आहे. किंवा पाहणे गरजेचे आहे. एक व्हिडिओ आहे ती तुम्हाला पहायची आहे. आणि त्याच्यानंतर “क्लिक हीयर” वरती क्लिक करून तुम्हाला लर्नर लायसनची टेस्ट द्यायचे आहे. तर “क्लिक हिअर” वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जनरेटर ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. ओटीपी आधार कार्डला जो नंबर रजिस्टर आहे त्या नंबर वर ओटीपी येईल. आणि तो टाकून तुम्हाला सबमिट करायचे आहे.
नंतर तुम्ही पाहू शकता लँग्वेज तुम्हाला घ्यायची होती लँग्वेज सिलेक्ट करायची. आणि इथं व्हिडिओ येईल ती व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघायची आहे. एक्झाम द्यायच्या अगोदर पूर्णपणे कशाप्रकारे त्याच्यामध्ये माहिती सांगितले आहे सगळे व्हिडिओ बघून घ्या. आणि त्याच्या नंतर तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. टेस्ट देनेसाठी तुम्हाला “क्लिक हीयर फॉर लर्नर टेस्ट” या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुम्हाला लर्नर लायसनचा ॲप्लिकेशन नंबर द्या. तुमचा ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. आणि तुम्हाला एक एसएमएस आला असेल ज्यामध्ये तुम्हाला पासवर्ड सुद्धा आला असेल आणि ॲप्लिकेशन आलेला आहे.
तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग-इन करायचे आहे. नसेल आला तर तुम्ही रिसेट करू शकता. त्यांनतर तुम्ही पाहू शकता स्क्रीन टेस्ट फॉर लर्निंग लायसन. लर्नर लायसन साठी इथे महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. की तुम्ही सर्वात पहिल्यांदा कॅंडिडेटनी आपल्या पोझिशन वरती यायचं आहे. समोर जे लॅपटॉप असेल किंवा पीसी असेल त्याच्या समोर तुम्हाला एकदम बसून तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. लँग्वेज आहे तुम्ही मराठी लँग्वेज सुद्धा आपली सिलेक्ट करू शकता. असे सांगितले आहे की, तुम्ही जी आपली मातृभाषा आहे ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता.
त्या लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम (टेस्ट) आहे आपली छोटीशी ती देऊ शकता. ही अजून एक पॉईंट महत्त्वाचा तो म्हणजे ग्रीन कलर म्हणजे हिरवा रंग मध्ये ऑप्शन तुमचे येथील टेस्ट देताना ते तुमचे बरोबर आहेत. आणि रेड जर आला तर तुमच उत्तर चुकलेला आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं जर तुम्ही पाहिलं तर रिझल्ट. रिझल्ट तुम्हाला लगेच तत्काळ भेटणार आहे. तुम्हाला 60 टक्के पडले पाहिजे. तेवढे प्रश्न असतील त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर पैकी 60 टक्के मिनिमम पडणे गरजेचे आहे.
आता “प्रोसीड” ऑप्शनवर क्लिक केलं तर इथ पाहू शकता तुमचं नाव आल असेल, तुमचा फोटो आला असेल, तुमच्या इथं ॲप्लिकेशन नंबर, डेट ऑफ बर्थ आल असेल. त्याच्या नंतर खाली जर तुम्ही पाहिलं तर सिलेक्ट लँग्वेज (भाषा निवडा) आपली मातृभाषा तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यांनतर एंटर पिंन तो ऑटोमॅटिक पिंन तुम्हाला दाखवला जाईल. त्याच्यानंतर जर तुम्हाला एक्झाम “विदाउट ऑडियो” तुम्हाला आवाज नको असेल तर हा ऑप्शन आहे तो तुम्ही निवडू शकता.
न तुम्हाला आवाज चालत असेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन निवडा. त्यांनतर “अग्री” करून तुम्हाला “प्रोसीड” बटण वर क्लिक करायच आहे. त्यांनतर तुमची टेस्ट सुरू होईल. टेस्ट मध्ये तुम्हाला 60% पडणे गरजेचे आहे. तेव्हाच तुमचे लर्निग लायसेन्स तयार होईल. आणि ते लर्निग लायसेन्स तुम्हाला डाउनलोड करता येईल. त्यांनतर होम पेज वर येऊन काही महत्वाचे ऑप्शन आहे.
तुम्ही प्रिंट लर्नर लायसेन्स फॉर्म 3 करू शकता. त्यांनतर ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी तिथे ऑप्शन आहे. त्यांनतर मोक टेस्ट तुम्हाला दिल्या आहेत. त्यांनतर सँपल प्रश्पत्रिका दिल्या आहेत. तुमचं लायसेन्स म्हणजे जे तुम्ही ॲप्लिकेशन केलं आहे जर तुम्हाला अपडेट करायच असेल तर तुम्ही एडिट करू शकता. रोड सेफ्टी टीटोरियल तुम्ही इथून पाहू शकता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.